Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नी! जास्वंद जेल लावल्याने काय
नी! जास्वंद जेल लावल्याने काय होत?
जास्वंद तेल लावल्यानी केसांना
जास्वंद तेल लावल्यानी केसांना चकाकी येते.
>>अजूनही म्हणजे? म्हातारी
>>अजूनही म्हणजे? म्हातारी झालीस की काय तू? <<<
लहानपणी काम धंदे न्हवते. आयते खा,गिळा. कोणीतरी(आईच) आयते तेल सुद्धा लावून द्यायचे.
उलटे सुलटे केसावर पॅक लावून बघायची आवड होती ते पण कोणीतरी लावून देत केसाला. मला माझ्याच केसाचा खूप छंद होता व अतीव प्रेम होते त्यावेळेला लांब्,सरळ्,जाड माझेच केस पाहून. पप्पा तर ४-४ तास रवीवारची आरशासमोर मला उभे बघून ते कंटाळून बघून म्हणायचे ,अग किती ते केसावर प्रेम.
आता कसले लाड व वेळ मिळणार नोकरी, घरकाम म्हणून अजूनही.....
BTW,मेथीने केस गलत नाहीत म्हणून मेथी. जास्वंदाच्या कळ्या व मेथी एकत्र वाटल्याने केस जाड,काळेभोर रहातात. हाही उपाय करायचे त्यावेळेला(१२- १६ वर्षाच्या काळात) गरज नसताना.
न्यू यॉर्क मध्ये चायना टाउन
न्यू यॉर्क मध्ये चायना टाउन मध्ये बरेच सलोन आहेत. बरेच चान्गले आहेत. मि स्वतः straight केलेत तिकडे.
आता हल्लि Dallas ला आल्यावर मला चान्गल salon नाही मिळालय इकडे.
Chinese/Japnese/Vietnamese Salon चान्गले असतात.
फक्त वेळ हवा भरपुर. मला पुर्ण ४ तास लागलेत. आता भारतात जातेय तेव्हा तिक्डेच करुन यायचा प्लान आहे.
पुण्यात कुणाला चान्गल सलोन/पार्लर माहिति आहे का?
मी पण आणलीए शिकेकाइ दळून
मी पण आणलीए शिकेकाइ दळून यावेळी. आता वापरायला मुहुर्त शोधला पाहिजे. नीधप आणि मःनस्विनी यांनी सुचवलेले उपाय करुन पाहिले पाहिजेत.
मला इथे शँपू कुठला वापरावा हे कोणी सुचवेल का? मुळात माझे केस ऑइली आहेत पण सध्या खूप कोरडेपणा आला आहे त्यामुळे कोंडा ही आहे आणि केसही खूप गळत आहेत. वरील घरगुती उपाय तर केले पाहिजेत पण मला त्याबरोबर ड्राय व सेंसेटीव स्कॅल्प साठी कोणी शँपू सुचवेल का?
माझे केस खुप पातळ आहेत पण
माझे केस खुप पातळ आहेत पण माझ्या लेकीचे बर्यापैकी जाड आहेत, पण तिचे केस खुप कोरडे आहेत आणि वाढतपण नाहित, तर वर तुम्ही सगळ्यांनी सांगितलेले उपाय केले तर तिचे केस वाढतिल का?
शिकेकाई वगैरे नेहमीचा गिरणीवाला दळुन देतो का?
बी शाम्पु कोणता वापरायचा ते
बी
शाम्पु कोणता वापरायचा ते सांगा (मि clinic all clear वापरते) अजुन कोणता हरबल किंवा आयुर्वेदिक असल्यास सांगा ?
सिल्केशाइन नावाची एक पवडर
सिल्केशाइन नावाची एक पवडर मिळते. ति पण चांगलि आहे. कोणत्याहि मेडिकल मध्ये मिळते.
सिल्केशाइन मी पण आणली आहे.
सिल्केशाइन मी पण आणली आहे. आता पाहीन वापरुन. जैसन ची आहे.
सिल्केशाइन म्हणजे पूर्वीची
सिल्केशाइन म्हणजे पूर्वीची सिल्केशा पावडर. पण भरपूर तेल लावल्याशिवाय मुळीच वापरू नका ती. जाम कोरडे होतात केस. आणि नंतर कंडीशनर सारखं जास्वंद जेल लावायचं सोडू नका. तसंच केस वाळवताना डोकं उलटं करून केस व्यवस्थित झटकून घ्या. ती पावडर केसात अडकून राहू शकते.
हे एवढं पाळलं तर ती पावडर पण मस्त आहे.
माझे हि केस अतिशय पातळ झाले
माझे हि केस अतिशय पातळ झाले आहेत, वय १३-१८ असताना खुप दाट होते ,कोरडे तर ते आधिपासुनच आहेत (कोंडा नाहिये). प्लिज काहितरि उपाय सुचवा. मि लंडनला असते. जॉब मुळे काळजि घेणं हि होत नाहि. केस खुपच गळतात
हे एवढं पाळलं तर ती पावडर पण
हे एवढं पाळलं तर ती पावडर पण मस्त आहे. >>> कर्म माझं
नीधप, जास्वंद जेल लाऊन केस
नीधप, जास्वंद जेल लाऊन केस धुवुन टाकायचे का? त्याचे काय काय फायदे आहेत?ड्राय केसांसाठि चालेल का?
कशी लावायची ती पावडर???
कशी लावायची ती पावडर???
हो अगदी कंडीशनरसारखंच वापरते
हो अगदी कंडीशनरसारखंच वापरते मी ते जास्वंद जेल. १ मोठ्ठा चमचा घेऊन मग २ चमचे पाण्यात ते डायल्यूट करायचं. केस धुतल्यावर स्काल्पवर आणि केसांवर सगळीकडे चोळायचं. २-३ मिनिटांनी धुवून टाकायचं. पण हे शिकेकाई किंवा सिल्केशाइनने धुतल्यावरच. ड्राय केसांसाठीचं माहीत नाही गं प्रतिभा.
सिल्केशाइन पावडर पेस्ट करून घ्यायची आणि ती पेस्ट शाम्पूसारखीच वापरायची. फेस होतो त्याचा. पण तेल लावायचं आधी.
वर्षा, नेहमीचा गिरणीवाला
वर्षा,
नेहमीचा गिरणीवाला शिकेकाई नाही दळून देत.पुण्यात सहस्रबुध्देंच्या गिरणीमध्ये शिकेकाई दळून मिळते.गावात राजमाचिकरांच्या गिरणीत दळून मिळते.जिथे हळद,ति़खट,मसाला दळतात अश्या गिरणीत चौकशी कर.
मी मुंबई अन बंगळूरू इथे
मी मुंबई अन बंगळूरू इथे लॅक्मे पार्लर मधून केस सरळ करून घेतलेत. ६ तास तरी लागतात पण अगदी स्वच्छ अन नीटनेटकी आहेत त्यांची पार्लर्स.
इथे केस गळू नये म्हणुन नायोक्सिन शँपू / कंडीशनर वापरा म्हणतात सलॉनवाल्या बाया.
धन्स अलबेली, मी मुंबईत असते,
धन्स अलबेली, मी मुंबईत असते, पण ईकडे तिखट दळतात तिकडे चौकशी करीन.
केस वाढण्यासाठी सांगा ना काहितरी उपाय.
साधना, मी लहान असताना माझी आईपण रिन साबणाने माझे केस धुवायची. तेव्हा माझे केस पातळ असले तरी खुप मऊ आणि चमकदार होते. लग्न करुन ईथे मुंबईत आल्यापासुन केसांची फारच वाट लागली.
रिन साबणाने माझे केस
रिन साबणाने माझे केस धुवायची>>> बापरे हे म्हण्जे भलतच काहीतरी..
डिटर्जंट ने महिन्यातून एकदा
डिटर्जंट ने महिन्यातून एकदा केस धुवावेत म्हणजे ते चांगले वाढतात/ राहतात/ दिसतात असं सांगणारे अनेक लोक माहीती आहेत मला. पण माझी हिम्मत नाही झाली आजवर कधी.
बापरे, रिन? कपड्यांना चमक
बापरे, रिन? कपड्यांना चमक आणतो तशीच केसांना पण?
तिथे असताना शिकेकाई साबण किंवा वाटिका वगैरे. इथे मात्र नेहमीच पँटीन. क्वचितच(वर्षातून एकदा) तेल लागतं केसांना. मध्यंतरी कर्लिंग आयर्न वापरायला लागले. त्यात अडकून आणि हाय टेंपमुळे खूप केस गळतायत असं लक्षात आलं म्हणून बंद केलं वापरणं. पण तरि।इ हल्ली जरा जास्तच गळायला लागलेत. शँपू नंतर ब्लो ड्राय करते म्हणून असावं का?
आता तर मीही वापरत नाही, पण
आता तर मीही वापरत नाही, पण तेव्हा आईच्या हातात होते ना सगळे.
पण तेव्हा आई कंपल्सरी रोज तेलही लावायचीच. आणि अत्तासुध्हा मी आठवड्यातुन तीनवेळा तेल लावते केसांना. माझ्या लेकीलापण रोजच तेल लावते. तिच्या शाळेतपण कंपल्सरी आहे रोज तेल लावणे.
माझ्या लहानपणी घाणेरड्या
माझ्या लहानपणी घाणेरड्या वासाचा लाईफबॉय मिळायचा, आमच्या ६ जणांच्या निम्न मध्यमवर्गिय कुटूंबाला दुसरेही साबण बाजारात मिळतात हे माहित नव्हते. ह्या साबणानेच डोक्यापासुन पायापर्यंत आंघोळ व्हायची. केस अगदी चांगले लांबसडक वगैरे वगैरे होते. (घराण्याचा गुण, दुसरे काय?? )
मी कॉलेजात जाईजाईपर्यंत केस धुण्यासाठी शांपु वापरतात ह्याचा टिवी पाहुन शोध लागला, मग केसही माझ्या हातात आले आणि मी त्यांची योग्य ती वाट लावली इतकी की शेवटी कमरेइतके लांब केस कापत कापत मानेच्या वरती आले
मी कॉलेजात जाईजाईपर्यंत केस
मी कॉलेजात जाईजाईपर्यंत केस धुण्यासाठी शांपु वापरतात ह्याचा टिवी पाहुन शोध लागला, मग केसही माझ्या हातात आले आणि मी त्यांची योग्य ती वाट लावली इतकी की शेवटी कमरेइतके लांब केस कापत कापत मानेच्या वरती आले >> साधना, आपण दोघी एका नावेमधे माझे केस तर कमरेखाली वगैरे होते हे सांगून पण खरं वाटत नाही कुणाला
शाम्पू माहीत होता पण ७ वी
शाम्पू माहीत होता पण ७ वी पर्यंत वापरला नव्हता. केस लांबसडक होते त्यामुळे तेल लावणे, आठवड्याला शिकेकाई किंवा सिल्केशाने धुणे इत्यादी असायचे. पुढेही केस कापल्यावर शाम्पू वापरायची परवानगी क्वचितच मिळायची. साधारण टि वाय ला असताना रेग्युलरली शाम्पू आणायला सुरूवात झाली होती. तो सुद्धा कधीतरी वापरायला. एरवी वापरायला अनेक द्रव्यं एकत्र केलेली शिकेकाईच.
माझ्या लहानपणी घाणेरड्या
माझ्या लहानपणी घाणेरड्या वासाचा लाईफबॉय मिळायचा>>> आणि हमाम साबण,
ट्रिचप तेल चांगले आहे
ट्रिचप तेल चांगले आहे केसांसाठी. १०० रुपयाला १०० ग्रॅम तेल मिळतं. या तेलासोबत जो शाम्पू मिळतो तो खूप चांगला असतो पण बहुतेक तो फक्त एका बाटलीवर एकच मिळतों. सुटा मिळत नाही.
शिकेकाईला दळायची किंवा
शिकेकाईला दळायची किंवा भरडायची काही गरज नाही खरे तर. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली की चिंचेसारखा कोळ निघतो तिचा. फक्त चांगली असायला हवी. आतून फोल नसावी. गरयुक्त शेंग चांगली. लावण्यापुर्वी एक तास आधी एक उकळी आणावी आणि गार होऊ द्यावी. चांगली शेंग भिजल्यावर आपोआप सोललेल्या वाटाण्याच्या शेंगाप्रमाणे दोन भागात विभागून येते. मग ती शेंग केसांवर अलगत घासायची. केसांवर कधीच गरम पाणी ओतू नये. त्यामुळे डोक्याला आणि केसांना ईजा पोचतात. कोमट फार फार तर. केस धुतल्यावर केस झटकू नये किंवा हातानी घासू नये. ते उन्हात किंवा पंख्याखाली किंवा कापडात बांधून पाणी सुकू द्यावे.
या टिप काही माझ्या आणि काही बहिणींच्या आहेत.
मी केसांची काळजी करुन निराश
मी केसांची काळजी करुन निराश झाले, काळजी घेऊन दमले. केस वाढावेत म्हणुन लोकांचे ऐकुन कापत राहिले. पण केस अतिशय संथ गतीने वाढायचे. माझ्या मनासारखे कधीच वाढले नाहीत.
गेले चार वर्ष त्यांच्याकडे अजिबात बघत नाहीय. केस कापण्यासाठी पार्लरमध्ये ५ वर्षांपुर्वी गेले होते. मध्ये तर तेलही लावायचे सोडले होते. महिनामहिना तेलही लावत नव्हते. पण केसांनी मात्र वाढायचे मनावर घेतले. वाढत वाढत परत कमरेखाली येऊन पोचले. असे १५ वर्षांपुर्वी पोचले असते तर मला खुप आनंद झाला असता. पण तेव्हा नव्हते ना नशिबी
आता इतक्या वेगात वाढतात की मी मेंदी लावुन नुसतेच पाण्याने धुते व तेल लाऊन ठेवते आणि दोन दिवसांनी शाम्पु करते तर तेवढ्या वेळात मुळांमध्ये केस परत पांढरे दिसायला लागतात.
आता परत त्यांची काळजी घ्यायला लागलेय.. हल्ली तेल न लावता धुवायची चुक अजिबात करत नाही. रविवारी मनुने लिहिलेला पॅक पण लावणार आहे तेवढेच जरा बरे वाटते स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळतोय म्हणुन..
आमच्या गावी शिकेक्काईचे उदंड पिक आहे. मी वापरायची मध्ये, पण तो व्याप खुप मोठा वाटतो. त्यापेक्षा शांपुने एकदम फास्ट काम होते.
केस गळतात तेव्हा आहाराकडे पण
केस गळतात तेव्हा आहाराकडे पण लक्ष द्यायला हवे.
ताबडतोब आहारामध्ये पालेभाज्या,मोड आलेली कडधान्ये,गाजर,सोयाबिन,तीळ,दूध,दही,ताक ह्यांचा समावेश करावा.गरज पडेल तेव्हा मल्टी व्हायटॅमिन्,बी कॉम्प्लेक्स घ्यावे.
Pages