शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा ! प्रथमच ऐकला.
. .
हा सोपा वाटतो :
झलक
= वानगीदाखल दाखविली जाणारी दृश्यमालिका

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

अनिन्द्य! Happy
पण झलक मध्ये थोडी हिंदीची झलक आहे,

* लघुशंका ( शंका = लाज)
मोल्सवर्थ शब्दकोश
>>>> म्हणून दीर्घशंका पण आहे कोशात.
(पण वापरात नाही)

लघुशंका आणि दीर्घशंका दोन्ही अयोग्य शब्द वाटतात मला.

पहिले हे की शब्दावरून कृतीचा नीट बोध होत नाही आणि दुसरे साध्या सामान्य नियमित शरीरधर्माला “लाज” क्याटेगिरीत का टाकायचे तेही अगम्य आहे.

या कृतींसाठी सामान्य वापरातले शब्द योग्य असूनही आता शिष्टसंमत नाहीत. So bad.

शिष्टसंमत.
एकी आणि दोकी. किंवा सिंगल आणि डबल. अजिबात लाज वाटत नाही.
आमच्या शाळेचे ध्येय वाक्यच मुळी "एकी हेच बळ" असे होते.

चला. मीच बिषय बदलतो.
झपूर्झा ही केशवसुतांची गूढ कविता. त्यातील झपूर्झा शब्दाचा अर्थ काय?
मुलींच्या खेळात ‘जा पोरी जा’हे शब्द असताना होणारा ध्वनी, शब्द. हा शब्द कवी केशवसुत यांनी अत्यानंदाच्या सीमेचा वाचक या अर्थी रूढ केला : ‘झपूर्झा ! गडे झपुर्झा !’ - केक १०६.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
शब्दरत्नाकर मध्ये मोठे काव्यमय वर्णन आहे. अज्ञेयाच्या अफाट मैदानात संचार करणाऱ्या मानवाची चिच्छक्ती जेव्हा उद्युक्त होते तेव्हा तिला जी दिव्य गीते ऐकल्याचा भास होतो तो या शब्दाने आधुनिक काव्यप्रवर्तक कवि केशवसुत यांनी निर्दिष्ट केला आहे,
या शब्दासाठी किंवा कावियेसाठी WIKI चे एक पान आहे. ते ही वाचनीय आहे.
झपूर्झा
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5...

झपूर्झा ऐकूनच माहिती होता. या नावाचे एक संग्रहालय पुण्यात नवीन झाले आहे असेही ऐकले आहे. नवीन माहिती आवडली.

.. विषय बदलतो….

या घाईमुळे त्यादिवशी “त्या” क्रियांसंबधी ३-४ अधिकचे शब्द चर्चिले गेले असते ते राहिले. 😀

आता विसरलो. असो.

इतक्यात माझ्या वाचनात आलेला नवा शब्द

कलमचोर

अर्थ = लिहित असतांना काही गोष्टी वगळणारा/ राखून ठेवणारा. सांगितल्याबरहुकूम न लिहिणारा.

हो. कामचुकार+दीडहुषार असे वाटते.

स्वत:च्या खऱ्या वयापेक्षा खूप तरुण दिसणाऱ्यांना “उमरचोर” असा शब्दही आहे.

आता मराठीत वापरात नसावा फारसा पण हिंदी-उर्दूत अजून आहे.

*कलमचोर छानच!

यावरून कलमकसाई आठवला :
लेखणीने 'गळा कापणारा' . . .

कलमकसाई आहे तर

“केसकसाई” पण चालावा. केसाने गळा कापणारा 😀

माझ्या माहितीत आहेत काही

Pages