Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋतुराज. थँक्यू
ऋतुराज. थँक्यू
अनिंद्य या वड्या पण अजिबात तेलकट होत नाहीत.. नेहमीच्या वड्या करताना आपण बेसन फक्त binding होइल इतकेच घेतो यात थोडे जास्त घ्यायचे.. फ्रिज मधे अर्धा एक तास ठेवून वड्या पाडल्या तर अजून जास्त चांगल्या पडतात तुकडे तुकडे न पडता..
कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट
कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट जमलीये.
अस्मिताच्या मंगलकार्यालयाच्या काकूंच्या चिवडा, वड्यात लाडवांची भर
सौजन्य: मेधाविचे शेवेचे लाडू
मँगो चिकन विथ जास्वंद ज्यूस
मँगो चिकन विथ जास्वंद ज्यूस यम यम!
मँगो म्हणजे आंबा विथ चिकन?
मँगो म्हणजे आंबा विथ चिकन?
एकत्र कसे लागत असेल हा प्रश्न पडला..
अर्थात चिकन मटण जेवण झाल्यावर नंतर आंबे हाडादायला मजा येते पण सोबत मिक्स असलेले कधी खाल्ले नाही.
कोथिंबीर वड्या आई च्या
कोथिंबीर वड्या आई ची रेसिपी

लाडु, मँगो चिकन, कोथिंबीर
लाडु, मँगो चिकन, कोथिंबीर वड्या भारीच.
मँगो चिकन विथ जास्वंद ज्यूस
मँगो चिकन विथ जास्वंद ज्यूस…
प्लेटिंग आणि रंगसंगती सुंदर आहे
फायनली ह्या सिझनचे शेवटचे
फायनली सिझनचे शेवटचे 'ओले काजु' मिळवण्यात यश आले आहे...
उद्या त्यांची उसळ करण्याचा बेत ठरला आहे. (आता हे सोलण्याचे वैतागवाणे काम माझ्याच माथी मारले जाणार ह्यात शंका नाही 😀 ) इथल्या सुगरणींना विनंती आहे की त्यासाठी त्यांची काही खास रेसिपी असल्यास सांगावी. आधीच कोणी इथे लिहिली असल्यास कृपया धाग्याची लिंक द्यावी.
संजय भावे एका पॅन मधे फोडणीत
संजय भावे एका पॅन मधे फोडणीत कडीपत्ता, कांदा टोमॅटो परतून घ्यावे व्यवस्थित मग त्यात लाल तिखट मसाला हळद घालावी, कांदा खोबर लसूण अद्रक आणि खडा मसाला घालून बनवलेलं जे वाटण असतं, आम्ही गोडा मसाला बोलतो ते घालावं मग काजू आणि छोटा बटाटा फोडी करून घालाव्या मीठ टाकावं थोडसं पाणी घालून त्यावर झाकणात पाणी ठेवून वाफेवर शिजवायची...
धन्यवाद जुई.
धन्यवाद जुई.
मी अशाच करते पण त्या मऊ पडतात. बाहेर कुरकुरीत वड्या खाल्ल्या आहेत. त्या नक्की कशा करतात ते माहित नाही.
ओक्के... धन्यवाद jui.k
ओक्के... धन्यवाद jui.k
🙏
'बटाटा' हा इंटरेस्टींग घटक वाटला, आमच्याकडे ह्या उसळीत आईने कधी घातलेला आठवत नाही... पण ह्यावेळी ट्राय करणार 👍
आज शनिवार सुट्टी म्हणून उशीरा
आज शनिवार सुट्टी म्हणून उशीरा उठल्याने हा ब्रेक फास्ट कम लंच अका ब्रंच झाला.
विशेष काही नाही, कोबीचे पराठे सोबत दही चटणी.. आणि या उन्हाळ्यात चटणीचा तिखटपणा बॅलन्स करायला थोडेसे कलिंगड
संजय भावे>>> मला बटाटा फारसा
संजय भावे>>> मला बटाटा फारसा आवडत नाही पण आई च्या मते बटाट्याने भाजीला छान चव येते पण तो सालीसकट टाकायचा फोडी करून..
मँगो चिकन विथ जास्वंद ज्यूस >
मँगो चिकन विथ जास्वंद ज्यूस >>>>>
अत्युच्च प्लेटिंग.
दोन्हीची रेसिपी द्याल का प्लीज
कोथिंबीर वड्या यम्मी
ओले काजू भारी...ती आंब्याच्या आकाराची प्लेट पण भारी.
कोबी पराठा पण मस्त दिसतोय.
गारेगार कलिंगड बघूनच जीव गार झाला.
आंबा विथ चिकन?
आंबा विथ चिकन?
एकत्र कसे लागत असेल हा प्रश्न पडला>>> मला तरी जाम आवडलं. चिकन ब्रेस्ट मीट डार्क मीटइतकं उग्र चवीचं नसतं
रेसिपी द्याल का?>>> रेस्टॉरंटवाल्याला विचारावी लागेल
बाकी hibiscus tea उर्फ agua de jamaica टी बॅग्स, वाळवलेल्या जास्वंदाच्या पाकळ्या किंवा कॉन्सन्ट्रेट पासून सहज बनवता येतो
ओके.. तसे मलाही आवडू शकते.
ओके.. तसे मलाही आवडू शकते. फक्त कोणी नाव किंवा घटक पदार्थ सांगू नये म्हणजे आधीच काही जज करणे होणार नाही.. मनाची पाटी कोरी करून खायला बरे पडेल
ठेला स्टाईल पावभाजी
ठेला स्टाईल चमचमीत पावभाजी
बटरमध्ये थबथबलेल्या पावांसोबत फोटो काढायचा राहिला..
काय दिसतेय पावभाजी अगदी
काय दिसतेय पावभाजी ,अगदी चमचमीत... रंग तर मस्तच.
कार्यालयातले शेवेचे लाडू भारी.
मँगो चिकन विथ जास्वंद ज्यूस ,खरच युनिक आणि सुंदर दिसतेय
मी एकदा हब मध्ये एका रेस्टॉरंट मध्ये विचारलं होत मँगो विथ चिकन काय असतं, त्यावर त्यांनी रसात शिजवलेलं चिकन असं सांगितलं, पण तेव्हा उगाच काहीतरी म्हणून टाळलं ,आणि नॉर्मल चिकन डिश खाल्ली, पण जेवण संपल्यावर म्हटलं मँगो विथ चिकन आहे म्हणजे आमरस ही असेल, मेन्यू कार्ड मध्ये तो शोधत होते, नाही दिसला म्हणून वेटरला विचारलं ,पण वेटर ने फक्त चिकन मध्ये घालायला इंग्रीडीयंट आहे वेगळा आमरस डिश म्हणून नाही असं सांगून पोपट केला होता
ते आठवलं.
संडे स्पेशल

पावभाजी, वडा सांबार दोन्ही
पावभाजी, वडा सांबार दोन्ही फेव्ह मेन्यू.
रंगतदार फोटोज.
मी सुद्धा आज सकाळी मेंदू वडा
मी सुद्धा आज सकाळी मेंदू वडा सांबर चटणी नाश्ता केला. पण ते विकतचे होते. माहेरी आलो की वडील कुठून कुठून काय काय घेऊन येतात..
पण वेटरने फक्त चिकन मध्ये घालायला इंग्रीडीयंट आहे वेगळा आमरस डिश म्हणून नाही असं सांगून पोपट केला होता
>>>>>
कदाचित माझा किंवा मँगोला टाकत असतील त्यात
मला असा अनुभव आहे. एकदा एका मित्राची वाट बघत थांबलो होतो. त्याला यायला उशीर झाला म्हणून जवळच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन काहीतरी थंडगार पिऊया म्हटले. मेनूत मँगो ज्यूस बघून ते मागवले. तर तो एका ज्यूस च्या ग्लासमध्ये "माझा बॉटल" रिकामी करून घेऊन आला. गंमत म्हणजे हे ओतायचे काम त्याने एका काउंटरवर पण मला दिसेल अशा जागी केले. अन्यथा अज्ञानात असतो तर निदान खरेच मॅंगो ज्यूस समजून तरी प्यायलो असतो. आणि गंमत म्हणजे नंतर बिल माझाच्या किमतीच्या साडेतीन पट लावले. त्यावरून जो राडा घातला होता त्याचा वेगळा धागा निघेल..
पावभाजी आणि वडा सांबार भारीच.
पावभाजी आणि वडा सांबार भारीच.
पावभाजी आणि वडा सांबार भारीच
पावभाजी आणि वडा सांबार भारीच >>> +१
आमचं संडे स्पेशल - चिकन स्टू आणि कुलचा
कुलचा आणि स्ट्यू भारीच, एकदम
कुलचा आणि स्ट्यू भारीच, एकदम प्रो दिसतेय.
हे माझे खूप दिवसांचे मेन्यू -
१.दोसा, सांबार, भाजी, चटणी

२.पुलाव, बुंदी रायता, पालकची कोशिंबीर (पुलाव जरा जास्तच लाल दिसतोय, देगी मिर्च घातल्याने बहुतेक)
३. पास्ता , ब्रोकोली आणि क्रीम

४. पनीर पुदिना राईस आणि मिसळ.
५.पाणीपुरी, बुंदी, दही, बटाटा, पाणी. पापु जास्त तळली गेली.

६.रगडा पॅटीस
७.ब्लॅक बीन्सची उसळ, अंड्याची भूर्जी
८.हे वरचे सगळे घालून खालचे तयार झाले. ग्वाकामोले, सावर क्रीम, झटार मसाला घालून परतलेल्या बटाट्याच्या फोडी, टॉर्टिया रॅप.

टोटल लयलूट! डोळ्यांत बदाम!!
टोटल लयलूट! डोळ्यांत बदाम!!
कुलचा विकतचा आहे पण स्टू मात्र धनिने केला आहे
तोडीसतोड आहे दोन्ही.
तोडीसतोड आहे दोन्ही.
चिकन स्टू पांढऱ्या रश्यातल्या
चिकन स्टू पांढऱ्या रश्यातल्या चिकन सारखा दिसतोय.रेसिपी पाहिजेच.
पालकाची कोशिंबीर वेगळी वाटतेय तिची पण रेसिपी हवी.
अस्मिता तुझे सगळेच फोटोतील पदार्थ तोपासू दिसतायेत.
फोटोजची लडी पाहून लॉकडाऊन ची आठवण झाली त्या काळात तू आणि म्हाळसा अश्याच फोटोज च्या लड्या पोस्ट करायचात . म्हाळसा तर गायबच झाली.
टोटल लयलूट! + ११११११
टोटल लयलूट!
+ ११११११
स्टू ची रेसीपी रणवीर ब्रार ने
स्टू ची रेसीपी रणवीर ब्रार ने दिलेली आहे. खाली लिंक टाकतो.
मी करताना बोनलेस थाइज वापरल्या. आख्खे धणे टाकले नाहीत फक्त धणेपूड टाकली.
क्रीम ऐवजी थोडे काजू दुधात भिजवून ते पेस्ट करून टाकले. बहुतेक त्यामुळे दही फुटत नाही
आणि अर्धा चमचा साखर टाकली थोडे आंबट वाटले म्हणून.
https://youtu.be/RCK4VWD_gUw?si=-2eeOtp1DDGzByno
अमेरिकेतील देसी हॉटेलची
अमेरिकेतील देसी हॉटेलची फायरींग होऊन गेलेली दिसतेय इथे
टोटल लयलुट +१११
टोटल लयलुट +१११
स्टु चिकन भारi दिसतय
Pages