खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मगाशी मनात आलेलेच.. लिहायचे राहिलेले.. अनिंद्य ऑनलाइन आले की अजून काही तोडफोड माहिती देतील.

मागे एका वर्षी आमच्या नवी मुंबईतील ऑफिसमधील काही जण मला आमच्याइथे मुंबईत अकस्मात भेटले. चौकशी करता समजले की ते रमजान खादाडी करायला आले होते. आणि अंड्याचे मालपुवे त्यांनाही फार आवडले होते..

अनिंद्य
छान माहिती. तुमच्याबरोबर एकदा फिरल पाहिजे.
ऋन्मेSSष
तो अफलातून बर्फी फोटो कातिल आहे.

अफलातून वरची सगळी माहिती आवडली. मी कधीही खाल्लेलं नाही. पण येथे एका दुकानात पाहिलं होतं, ते कितपत ओरिजनल होते माहिती नाही. ते खाल्ले आहे, ते मला कोरड्या नानकटाई सारखे घशाला ठोठरा बसवणारे वाटले, आवडले नाही. सिमरन, अनिंद्य आणि ऋ हे सगळं वाचायला आवडलं पण Happy

कोरड्या नानकटाई सारखे घशाला ठोठरा बसवणारे वाटले,…

मग नक्कीच वरजीनल नै. दाणा दाणा मोत्यावाणी असतोय. रिच, क्रीमी Happy

माझ्या एका मुस्लिम कलीगने “अरे आप लोगों को अफलातून नही पता” म्हणून मीरारोडवरून सुलेमान उस्मानमध्ये जाऊन अफलातून आणून आम्हांला खाऊ घातले होते. God bless him..
अर्धा तुकडा खाऊनच गार झाले होते मी.

… कोरड्या नानकटाई सारखे…

@ अस्मिता.

हे तुम्ही “रोट” बद्दल म्हणत असावात. जून झालेले रोट कोरड्या नानकटाईसारखे असू शकतील चवीला. If they are badly made or stale. अफलातूनची चव कलाकंद च्या जवळ जाणारी.

@ आर्च

पुणे कँपात आहे की सुलेमान उस्मानची ब्रांच. East Street. २०२२ पर्यंत तरी होते.

चालू असेल दुकान तर सध्या ईद जस्ट झालीच आहे ; अफलातून मिळावे तिथे.

@ धनि,

जिथे तुम्ही हलीम चाखला तिथे अफलातून बद्दल चौकशी करा. You may get lucky.

मिरारोड चं अफलातून मीपण खाल्लय एकदम भारी,
अस्मिता तू अफलातून च्या नावाखाली नक्किच दुसरंच काहीतरी खाल्लय किंवा त्यांनी फसवलंय.

अफलातुन नाव भारी आहे, चविलाही भारिच असणार...पहिल्यादा माहिती झाली..यु ट्युबवर रेसिपि बघितली तर आवाक्यातली वाटतेय फक्त ताजा मावा किवा खवा मिळण ट्रिकी आहे.

बरोबर अनिंद्य. सुलेमानच. अफलातून खाया नही तो तु जिंदगी जिया नही असे आम्ही पण म्हणायचो.
पुण्यातले बेकार आहे. फ्रानचाईजी आहे ती. बंडल लागते अफलातून तिकडचे. कँपात पण आहे पुण्याला. पण मुंबईतले ओरीजिनल आहे.
-----------------------------------
पण ते मोहम्मदअली रोडवरचे अंड्यातले मालपुवे खुपच तेलकट , गोड , जड आणि खुपच अंड्याचा वास येणारे वाटायचे. खुपच अंडी, साखर घालतात मैद्यात.
अंड्याने पदार्थ नक्कीच हलका होतो.
मी घरी एकदा केलेले बर्‍याच वर्षापुर्वी. छान जमली म्हणून रेसीपी लिहून ठेवली व त्यावेळी नातेवाईकात फेमस झालेली. पण आता कोण खाईल?
त्यात २ वाटी मैदा, १ चमचा रवा, एकच अंड, केवडा एसेन्स/ रो़झ एसेन्स (अंड्याचा वास जातो बर्‍यापैकी), पाव वाटी मावा, पाव वाटी फेटलेली मलई, मीठ, साखरेचा एकतारी पाक, बेकींग सोडा. रंग नाही घालायचा. मावा व मलाई फेटून घेवून त्यात बाकी जिन्नस घालून चार तास मिश्रण ठेवायचे. व तळायचे तूपात. बेसिकली मावा जिलबीची रेसीपी फेरफार करून केलेले. हाच माझा एकमेव गोड पदार्थातील पहिला प्रयोग. मस्त होतात. मिश्रण उरले की केक करायचा.

जिथे तुम्ही हलीम चाखला >> अनिंद्य .. ते हैदराबादी ठिकाण आहे त्यामुळे त्यांच्याकडे शाही तुकडा असतो. तो मस्त असतो पण इतर जास्ती मिठाया नाहीत त्यांच्याकडे. आपले नेहमीचे गुजा, रसमलाई वगैरे आहेत.

आता रमजान संपला तर हलीम पण देणार नाहीत ते. Lol

झंपी- रेसिपी आवडली, सुटसुटीत वाटतेय. मला सरळ केकच करून बघावासा वाटतोय.

अनिंद्य आणि सिमरन, शक्य आहे. मी पुन्हा जाऊन बघून घेईन तेथे पण रोट लिहिलेले नव्हते हे पक्कं आठवतंय. तरीही दुसरेच काही तरी असण्याची शक्यता आहे.

इथे हैदराबादला एकदा मिसळ पाव मेनुत लिहिलंय म्हणुन ऑर्डर दिली तर मटार उसळ पाव दिला शेव घालुन. आणि म्हणे मिसळ पावच तर आहे! मुंबईची स्पेशल डिश आहे.
म्हटलं बरं बाबांनो माझंच चूक.

दाबेली.

पाव तेव्हढे आज बाहेरचे. बाकी मसाल्यासकट सर्व होम मेड.

8a2d5cd4-aff2-410d-8a5e-567f4f4366f3.jpeg

# ગુજરાતી વાનગી
# खाईल त्याला खवखवे

अप्रतिम दिसतेय दाबेली >> हेच म्हणतो. अगदी तोंपासु

मटार उसळ पाव >> बरेचदा मुंबई मध्ये अशीच मिसळ खाल्ली आहे. मटार उसळची मिसळ. भायखळ्याला पहिल्यांदा खाल्ली तेव्हा मला पण ही काय मिसळ आहे असे झालेले. पण बरेच ठिकाणी नंतर अशीच मिसळ दिसली. मला वाटते ठाण्यात वगैरे आपली मटकीची मिसळ दिसते पण मुंबईत नाही.

वाह मस्त!. घरच्या घरी..
दाबेली फार आवडीचा प्रकार. पण घरी बनवण्याचा करू सुद्धा शकत नाही विचार.

सातवी सुट्ट्यांमध्ये दादरच्या एका मित्राकडे कॉम्प्युटर शिकायला जायचो तेव्हा कबूतरखान्याजवळ आयुष्यातली पहिली दाबेली खाल्ली होती. सुदैवाने ती मस्तच असल्याने कायमचा आवडीचा झाला हा प्रकार.
तेव्हा तिला आम्ही डबल रोटी बोलायचो. शॉर्ट मध्ये DR. त्यामुळे डॉक्टरकडे जायचे हा आमचा कॉर्डवर्ड होता. तेव्हा वडापाव दोन रुपयाचा होता आणि दाबेली अडीच रुपये. आम्ही रोज खायचो. म्हणजे निम्मा पॉकेटमनी त्यावरच खर्च Happy

मी कांदिवलीला पहिल्या जॉबला असताना वडाळा स्टेशनला एके ठिकाणी मुद्दाम दाबेली खायला उतरायचो आणि मागची ट्रेन पकडून मग घरी जायचो. पण तो दाबेलीवाला पक्के दुकान नसल्याने फार काळ टिकला नाही तिथे.

आताही वाशीला सासुरवाडीला गेलो की तिथून एका ठिकाणची घेऊन येतोच. कारण दहा पैकी नऊ जागी ती बंडल मिळते हा माझा अनुभव. त्यामुळे जिथली आवडते तिथली सोडत नाही.

मुंबईत मटार उसळ? पांढरे वाटाणे असतील. म्हणजे माझ्या पाहण्यात मटार फार आली नाही..
तसेही मी बाहेर मिसळीत कडधान्ये कमीच खातो आणि फरसाण जास्त. त्यामुळे मला मिसळीत फरसाण छान लागते. घरी करतो तेव्हा मिक्स कडधान्ये वापरतो.. परिपूर्ण मिसळ Happy

बाकी मिसळमध्ये काही ऑथेंटिक नसावे. नाव मिसळ आहे तर ज्याला जसे हवे तसे बनवायला मोकळा आहे.

हो, म्हणजे तुम्ही म्हणता तर असतीलच.. फक्त माझ्या पाहण्यात फार आले नाही इतकेच म्हणायचे होते.

बाकी मुंबईत बरीचशी हॉटेल उडुपी आणि पंजाबी स्टाईल असतात, तिथे मिळणाऱ्या मिसळ मध्ये बरेचदा काही अर्थ नसतो. फक्त एक मेनू भरायला म्हणून असते असे वाटते. जिथे लोक मिसळ खायला म्हणून जातात अश्याच ठिकाणी शक्यतो खावी.

यावर माझा एक किस्सा आहे..
नंतर शेअर करतो.

Pages