खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरिये केक.

आम्ही आयते लाव्हा केक खाल्ले मागच्या आठवड्यात

नव्या धाग्यावर कालचे रविवार स्पेशल ब्रंच --- नो ऑईल छोले ( अमृतसरी छोले) सावर्डो डिस्कार्ड नान ( गव्हाचे पीठ + २०-२५% मैदा)
IMG-20250216-WA0004.jpgIMG-20250216-WA0001.jpg

रात्री नवऱ्याने केलेल्या चिकन बरोबर लेकाला उरलेल्या थोड्या पिठाचे त्याच्यापुरते गार्लिक नान बनवून दिले.

वाह कडक!
अंडा करी तर तोंपासू आहेच.. पण हे पराठा प्रकरण फार भारी दिसत आहे.

शर्मिला, धनि, धन्यवाद Happy

लाच्छा पराठा मस्त दिसतोय एकदम.
काल त्या नान च्या कणकेचा नवऱ्याने त्याच्यापुरता एक लच्छा पराठा बनवला होता, पण ती थोडी फर्मंटेड कणिक असल्याने तितका चांगला नव्हता बनला तो पराठा.
चॉको लाव्हा केक एकदम tempting आहे.

Screenshot_20250217_180736_WhatsApp.jpg

लच्छा पराठा आणि नान मस्त झालेत.

नो ऑईल छोले मात्र एकदा केले होते तेव्हा आवडले नव्हते. ते काही तरी राहून गेल्याचे फिलिंग होते.

नो ऑईल छोले ( अमृतसरी छोले) सावर्डो डिस्कार्ड नान , अन्डा करी--लेयर पराठा मस्त आहे सगळं. आणि मी सूप पिताना हे फोटो बघत्येय. त्यामुळे सूप पातळ होत चाललं आहे.
मोरबा, मस्त डिश.

अरे मला ते वर नान पराठे एकाच घरचे वाटले होते. आता पुन्हा पाहिले तर दोन्ही वेगळे आहेत. नान कधी आमच्या घरी बनवले नाहीत, बघायला हवे कोणाला जमतात का.. कारण बाहेरून काही नॉनव्हेज ऑर्डर केले तर मी कधीच रोटी शोटी मागवत नाही. तांदळाच्या भाकऱ्या मागवतो किंवा त्या नसल्या तर नान मागवतो. पण बाहेरचे मैद्याचे नान फार नको वाटतात.

A chit - 'chat' evening !!!

IMG-20250218-WA0012.jpg

मस्त!
काल की परवाच विषय काढला होता घरात...बरेच दिवस झाले पाणीपुरी + चाट पार्टी झाली नाही म्हणून..

मिडनाईट स्नॅक्स
शेफ अर्थातच लेक Happy

IMG-20250218-WA0021.jpg

ऋ, हे कसले जळवणारे फोटो टाकतोस रे! Happy ( आणि ते काय आहे हे पण सांगत नाहीस Proud )

अश्विनी, सकाळ सकाळ पाणीपुरी खायचा मूड लागला ना राव आता! Proud

अंडा करी, पराठा, पाणीपुरी, चाटचे बॉल्स, लाव्हा केक, चिकनच्या ढु वर मारणारे टोफू - सगळेच मस्त दिसत आहे. Happy

अस्मिता Lol
सगळ्या डिशेस तोंपासू आहेत

आणि ते काय आहे हे पण सांगत नाहीस
>>>>
काहीतरी चीज बटाटा वगैरे बॉल होते.. शॉट्स वगैरे नाव होते.. रवा वगैरे लाऊन तळले होते. ते सोडा, महत्त्वाचे म्हणजे मला फार भूक लागली होती पण घरात असलेले पर्याय खायची इच्छा नसल्याने आज उपाशीच झोपावे लागते की काय असे वाटत होते तेव्हा ती हे घेऊन मदतीला धावून आली Happy

पाणीपुरी मस्त.

आजचा मेन्यू, चिकन लाक्सा सूप. बऱ्याच भाज्या, फ्राईड तोफू, अंडी, फ्लॅट राईस नूडल्स घातलेलं हे सूप दोनेक महिन्यांपूर्वी पहिल्यांदा एका रेस्टॉरंट मध्ये चाखले. खूपच आवडले होते. आज पहिल्यांदा घरी रिक्रिएट केलं. जमलं होतं.

IMG_20250219_222033.jpg

अल्पना, सूप कातिल दिसतंय टोटली!!! लगेच फोटोतून काढून घ्यायची इच्छा होते आहे Happy

चीज बटाटा वगैरे बॉल >>> ओह ओके Happy लेक सुगरण आणि प्रेमळ दिसतेय तुझी, ऋ .

अल्पना,
सूप एक नंबर आहे एकदम.
पाणीपुरी मस्तच.
चीज बटाटा बॉल्स
ऋ, तुमची कन्या खरंच सुगरण आहे.

चिकन लाक्सा ऑथेंटिक दिसत आहे. ईथला फूडकोर्टात सहज मिळणारा पदार्थ आहे. लाक्सा असेच म्हणतात, सूप नाही म्हणत.
ह्यात नारळ दूध, लेमनग्रास वगैरे घातलेस ना अल्पना?

Pages