Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
WOW.. काजू ची भाजी!. एकदा
WOW.. काजू ची भाजी!. एकदा खाऊन बघायची आहे.
ओले काजू भाजी करणार्यांच्या
ओले काजू भाजी करणार्यांच्या घरी धाड टाकावी असा विचार आहे
काय ती ओल्या काजूंची भाजी...
काय ती ओल्या काजूंची भाजी... तोंडांत लाळेचा महापूर आला
कातील फोटो आहे
काजू भाजी बघून त्या दिवशी
काजू भाजी बघून त्या दिवशी पाहिलेली ही रील आठवली.
https://www.facebook.com/share/v/1EfeEMy5xD/
हे कुठल्या शहरात मिळत नाही यासाठी कोकणात जन्म घ्यावा लागतो
सगळ्यांना धन्यवाद..
सगळ्यांना धन्यवाद..

मनिम्याऊ, rmd या एकदा कोकणात
ऋन्मेऽऽष अगदी अगदी!
आता मार्च एप्रिल पर्यंत गेलो तरच मिळतात हे काजू..
मस्तच दिसते आहे काजू ची भाजी
मस्तच दिसते आहे काजू ची भाजी !! ओले काजू पोटाला तितके उष्ण नसतात का ? ही भाजी कधी खाल्ली नाही . पण सध्या ओळखीत इतकी चर्चा आहे तर खाऊन बघायची आहे.
अश्विनी११ थोडी असते उष्ण पण
अश्विनी११ थोडी असते उष्ण पण फक्त याच सिझन la मिळत असल्याने इतका विचार नाही करत आम्ही..
प्रमाणात खाल्ली तर काही नाही त्रास होत.. चव खूप छान लागते.. आम्हा शाकाहारी लोकांना तर पर्वणीच असते..
उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायला
उष्णता कंट्रोलमध्ये ठेवायला मग सोलकढी प्यायची
धन्यवाद जुई , मीही शाकाहारी ,
धन्यवाद जुई , मीही शाकाहारी , त्यामुळे कोकण ट्रिप मध्ये नक्की खाऊन बघेन . ऋन्मेष , सोलकढी तर all time favourite !!!
काजूगरांची भाजी ..... अहाहा,
काजूगरांची भाजी ..... अहाहा, मस्त दिसतेय.
लहानपणी हिरवे काजू तोडून , हात सोलवटून, गर काढून भाजी खात असू त्याची आठवण येतेय. एक प्रश्न आहे, इथे dry fruit काजू मिळतात, त्याची अशी भाजी केली तर कच्च्या काजूगरांच्या भाजीसारखी लागेल काय?
आज वीकडे असल्याने साधासाच बेत
आज वीकडे असल्याने साधासाच बेत केला.
माझा भरगच्च मेनू मग आजचा..
माझा भरगच्च मेनू मग आजचा..

बापरे! एव्हडी मोठी थाळी ,तीही
बापरे! एव्हडी मोठी थाळी ,तीही एकादशीला .हा साधा बेत आहे तर खास बेत काय असेल.
पण भारी आहे स्पेशली ती माश्याची तुकडी.
टायपेपर्यंत मृणालीची डाएट थाळी आली, मस्तय. मीपण आज पनीर च खाल्लंय भाजीत.
एक प्रश्न आहे, इथे dry fruit
एक प्रश्न आहे, इथे dry fruit काजू मिळतात, त्याची अशी भाजी केली तर कच्च्या काजूगरांच्या भाजीसारखी लागेल काय?,>>> नाही लागणार. ओले काजू खूप छान शिजतात आणि चव सुद्धा भन्नाट असते. पण हॉटेलमध्ये बाराही महिने मिळणारा काजू मसाला बहुतेक ड्रायफ्रूटवाल्या काजूचाच असावा.
आमच्याकडचा यंदाचा ओल्या काजूचा सिझन संपला. आता झाडावर आहेत ते सगळे सुकायला आलेत. आई त्यांचे गर काढून घेते फॅक्टरीतून.
इथली काजूची भाजी बघून काल
इथली काजूची भाजी बघून काल केली शेवटी.
भन्नाट झाली होती. नॉनव्हेजला लाजवेल अशी...
थँक्स सिमरन...दही पण होतं
थँक्स सिमरन...दही पण होतं शेवटी छोटी वाटी..
मोरोबांची थाळी संपवायला किती लोक लागतील बरं?
ओल्या काजूगरांची भाजी कधी
ओल्या काजूगरांची भाजी कधी चाखली नाहीय. Special दिसतोय हा प्रकार. 👌
हॉटेलमध्ये मिळणारा काजू मसाला आवडतो तर ही सुद्धा आवडेल असे वाटतेय.
अनिंद्य, नक्की करून बघा.
अनिंद्य, नक्की करून बघा. तुम्हाला आवडेलच.
>>एक प्रश्न आहे, इथे dry
>>एक प्रश्न आहे, इथे dry fruit काजू मिळतात, त्याची अशी भाजी केली तर कच्च्या काजूगरांच्या भाजीसारखी लागेल काय?,>>> नाही लागणार. ओले काजू खूप छान शिजतात आणि चव सुद्धा भन्नाट असते.>>
+१०००
मला ही भाजी खाल्यावर अॅसीडीटीचा त्रास होतो.... पण चव भन्नाट असते म्हणुन (Omez-D SR+ घेउन) खातो आवडीने 😀
(No subject)
पालक वड्या
पालक वड्या
कोथिंबीर वडीचे verification
कोथिंबीर वडीचे verification की अन्य काही?
भाजणीचा बेस की अन्य काही?
Shallow fry की प्रॉपर तळलेच?
सॉरी भोचक चौकश्याच फार बघा मला 😀
असूद्या हो!
कोथिंबीर वडीचेच व्हेरिएशन. फक्त को. वडी आपण वाफवून घेतो तसं न करता उकड काढली आहे. म्हणजे मिरची+लसूण+हिंग+ हळद या फोडणीत पालक+बेसन शिजवून घेऊन वड्या थापल्या आणि तळल्या आहेत. शॅलो फ्राय.
टीप : मी ओवा घातला होता पिठात. आवडत असेल तर नक्की घाला. छान चव आली होती शिवाय पोटाला बाधलं नाही.
>>सॉरी भोचक चौकश्याच फार बघा
>>सॉरी भोचक चौकश्याच फार बघा मला >>
😀
हरकत नाही.... पालक आवडत असल्याने कोथिंबीर वडीचे व्हेरिएशन असले आणि कुठ्ल्याही प्रकारे (Shallo, Deep, Air) 'फ्राय' केलेले असले तरी फोटो पाहुन घरी फर्माईश नक्कीच करण्यात येणार आहे.... 👍
rmd, वड्या अगदी तोंपासू आहेत
rmd, वड्या अगदी तोंपासू आहेत
काय सुरेख आहेत वड्या..पालक
काय सुरेख आहेत वड्या..पालक mixer वर काढला की बारीक चिरला?
धन्यवाद ऋतु, अनिंद्य आणि संजय
धन्यवाद ऋतु, अनिंद्य, संजय आणि केया!
@केया
पालक बारीक चिरला आहे.
dry fruit काजू ची भाजी एक
dry fruit काजू ची भाजी एक दोनदा केलीय पण फार heavy होते..
mrunali साध सुटसुटीत तरीही पोट भरीच ताट छान आहे
okay rmd
okay rmd
समजले, थँक्यू.
समजले, थँक्यू.
.. पालक बारीक चिरला…
हे उत्तम कुकिंगचे लक्षण म्हणून मान्य व्हावे.
पालक tastes better when fine chopped verses when made into a paste. Paste has a faint bitter taste which I dislike somehow. पालक पुरी-पराठे करतांना बारीक चिरलेला पालक आणि मिक्सर मधून काढलेला प्यूरीड पालक - दोन्ही चवी distinctly वेगळ्या लागतात. This soul prefers the former of course.
Pages