चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्रिकोणी प्लेट?
अंड्याची प्लेट आणि दगडी अंडी भारीच आहेत.
ती दगडी अंडी कुठून घेतली. रंग काय तजेलदार आहेत.
ती कोंबडी पण...
माझ्या एका मित्राकडे मी काहीसा वेगळा egg container पाहिला होता.
तेव्हापासून घ्यायचा मनात आहे.
https://www.flipkart.com/ixora-2-dozen-ceramic-egg-container/p/itme2cebb...

ऋतुराज .... म्हणजे ती sort of त्रिकोणी आहे with rounded edges.
ती दगडी अंडी कधीतरी आणलीत, ती अशीच पडली होती घरात, पण उत्तराखंड चारधाम यात्रेमध्ये एक जेम स्टोअर्स मध्ये ती विकताना पाहिले चक्रम किमतीमध्ये... मग त्यांचा शोध घेऊन त्यांची पुनर्स्थापना केली गेली. शोध घेऊन अशासाठी म्हणते की माझ्या घरात हत्ती सुद्धा हरवू शकतो आणि कुठलीही गोष्ट शोधणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्याइतके कठीण काम आहे.

So Dutch !

Well just found something so very Japanese.
घरात गेली अनेक वर्षे एक बोल आहे, ज्याच्या कडावरचा सोनेरी रंग उडून गेला आहे, आणि तो "जुना" असल्याने त्याचा कधी सर्व्हिंग साठी वापर झाला नव्हता. या धाग्याच्या निमित्त त्याचा मागोवा घेतल्यावर ही मौल्यवान माहिती मिळाली ज्यामुळे तो बोल किती अमूल्य आहे हे कळले. हा जवळजवळ १०० वर्षे जुना बोल आहे.
Screenshot_20250326_071039_Gallery.jpgScreenshot_20250326_070959_Gallery.jpg

Screenshot_20250326_072656_WhatsApp_0.jpg

इति गुगल लेन्स.... जय गुगलमाता

अनेक धन्यवाद ऋतुराज... तुमच्यामुळे मला माझ्याच घरातल्या जुन्या वस्तू नव्याने भेटत आहेत. माझे आजे सासरे एका जपानी कंपनी मध्ये काम करत हे मला माहीत होते, पण this bowl is connecting me tothe glorious past of my family.

आणि आता हे स्पेशल मामी साठी. त्यांनी porceline क्रॉकरी आणि त्यांचा सुंदर नाद याविषयी लिहिले होते... या porceline मग मधे कसा कोण जाणे एक खडा आतमध्ये फिट केलेला आहे, ज्यामुळे प्रत्येक हालचालीनंतर एक सुंदर नाजूक किणीकिनाट ऐकू येतो. This I am sure is not a mass produced item, it has potter's signature at the bottom, which google could not identify... त्या अनामिक कुंभार किंवा कुंभारणीला भेटू शकले असते तर तिचे खूप कौतुक केले असते मी.
Screenshot_20250326_070756_Gallery.jpgScreenshot_20250326_070829_Gallery.jpgScreenshot_20250326_071111_Gallery.jpg

Well just found something so very Japanese.
घरात गेली अनेक वर्षे एक बोल आहे, ज्याच्या कडावरचा सोनेरी रंग उडून गेला आहे, आणि तो "जुना" असल्याने त्याचा कधी सर्व्हिंग साठी वापर झाला नव्हता. या धाग्याच्या निमित्त त्याचा मागोवा घेतल्यावर ही मौल्यवान माहिती मिळाली ज्यामुळे तो बोल किती अमूल्य आहे हे कळले. हा जवळजवळ १०० वर्षे जुना बोल आहे.

>>>>>>>

गंधकुटी हा फारच अनमोल पीस आहे. हॅन्ड पेंटेड. वॉव. जपून ठेवा. अँटिक आहे. It is a family heirloom.

तुमच्याकडे इतके जुने आणि युनिक पीसेस त्या आजेसासर्‍यांमुळे आले आहेत का?

आणि आता हे स्पेशल मामी साठी. त्यांनी porceline क्रॉकरी आणि त्यांचा सुंदर नाद याविषयी लिहिले होते... या porceline मग मधे कसा कोण जाणे एक खडा आतमध्ये फिट केलेला आहे, ज्यामुळे प्रत्येक हालचालीनंतर एक सुंदर नाजूक किणीकिनाट ऐकू येतो. This I am sure is not a mass produced item, it has potter's signature at the bottom, which google could not identify... त्या अनामिक कुंभार किंवा कुंभारणीला भेटू शकले असते तर तिचे खूप कौतुक केले असते मी.>>> धन्यवाद. आईशप्पथ. हे अमेझिंग आहे.

ऋतुराज ने परवानगी दिली तर राज रविवर्मा यांच्या पेंटिंग पासून प्रेरणा घेऊन बनवलेले काही सुंदर porceline figurines आहेत त्यांचे फोटो टाकील... It's not crockery though.

सोव्हेनियर कटलरी>>>> बेस्ट
गंधकुटी,
ती माहिती वाचून, तुमच्याकडचा तो जपानी बोल किती दुर्मिळ आहे ते जाणवले.
जपान साठी माझ्या हृदयात एक प्रेमाचा हळवा कोपरा आहे. Happy
तुमच्यामुळे मला माझ्याच घरातल्या जुन्या वस्तू नव्याने भेटत आहेत. माझे आजे सासरे एका जपानी कंपनी मध्ये काम करत हे मला माहीत होते, पण this bowl is connecting me tothe glorious past of my family.>>>>>> _/\_ Happy
खरं तर तुम्हालाच धन्यवाद. तुमच्या घरातील दुर्मिळ कलेक्शन इथे पाहता आले. त्याविषयी अधिक माहिती मिळाली. धाग्याची शोभा वाढवली.

त्या अनामिक कुंभार किंवा कुंभारणीला भेटू शकले असते तर तिचे खूप कौतुक केले असते मी.>>>> खरच.

राज रविवर्मा यांच्या पेंटिंग पासून प्रेरणा घेऊन बनवलेले काही सुंदर porceline figurines आहेत >>> intresting. टाका इथे. I am sure that will be really unique.

मामी आधी आजे सासरे, मग सासू सासरे मग नवरा आणि मी सगळ्यांनाच ही आवड आहे, जुन्या वस्तू जपायचा नाद आहे.
धाकटी पाती पण.... हा मुलाचा लहानपणाचा कप, तो वापरण्याचे वय कधी च सरले आहे.... कप मात्र आवर्जून ठेवायचाच आहे.
Screenshot_20250326_084559_Gallery.jpgScreenshot_20250326_084454_Gallery.jpg
त्याचे लहानपण आठवते हे हाताळताना.

वरच्या गंधकुटीच्या पोस्टमधल्या कप बद्दल -

तो सोनेरी बॉल सारखा असलेला दांडा पोकळ आहे आणि त्याच्या आत एक छोटा क्ले चा गोळा आहे ज्यामुळे तो किणकिण आवाज येतो.
तो हासामी चा कप आहे बहुधा.

Hasami?

ऋतुराज, जपानविषयी तुमच्या हळव्या कोपऱ्यासाठी खास
जपानी वारुनी साके सर्व करायचे आणि प्यायचे वाडगे

Screenshot_20250326_130308_Gallery.jpgScreenshot_20250326_130300_Gallery.jpgScreenshot_20250326_130300_Gallery.jpg

Pages

नवीन प्रतिसाद लिहा