चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गार्डन इंजल्स सुंदर आहेत.

ही छोटीशी बरणी फार हौसेने घेतली इथे चटणी ठेवायला प्लास्टिक डबा वापरावा लागतो( पटकन हाताळायला सोपे म्हणून) पण गावाला चिनीमातीचीच बरणी वापरायची असं ठरवलं आता यात रोजची चटणी असते. फोटोत मोठी वाटली तरी हाताच्या साईज ची आहे.

IMG_20250317_065155.jpg

src="/files/u77094/Screenshot_20250318_171639_Gallery.jpg" width="853" height="1200" alt="Screenshot_20250318_171639_Gallery.jpg" />

@ गंधकुटी

Yes, can see the picture now.

This is a star !

I assume it is visible.
हा बोल किमान ४० वर्षापूर्वी जपानवरून आमच्याकडे आलाय. त्याचा बेस हेच त्याचे झाकण आहे.

हो दिसतोय पण सहा वेळा जोडून बाकीचे पाच एडिट करू शकता संपादन मध्ये जाऊन, हवं असल्यास कसा दिसतोय फोटो, हे पाहण्यासाठी प्रतिसाद तपासून, मग save क्लिक करा.

सुंदर दिसतोय बोल .युनिक आहे बेसचा झाकण म्हणून वापर.

फार सुंदर कलेक्शन आहे इथे.
मला फोटो अपलोड करता येत नाहीत.
मी ही थोडाफार सहभाग दाखवला असता.
आता उन्हाळा सुरू झाला.
छान छान माठ / डेरा वापरात आला असेल.
त्याचेही फोटो येउदेत की.

बोल

बोल

बोल

Screenshot_20250318_195458_Gallery.jpg
ही Royal Albert Bobe China ची एकुलती एक म्हणून जरा लाडाची सर्व्हिंग प्लेट आहे.

Screenshot_20250318_220216_Gallery.jpg

ही सर्व्हिंग प्लेट तिच्या पूर्ण परिवारासोबत म्हणजे डिनर प्लेट, साइड प्लेट, सर्व्हिंग बोल, सूप बोल सह अजूनही शाबुत आहे, आणि तिने गेली ३०हून अधिक वर्षे अनेक पार्ट्या झोडल्या
आहेत.

Screenshot_20250318_220123_Gallery.jpg
फ्राईड आयटेम साठी किंवा सॅलड साठी मोठा ग्रुप असते तेव्हा ही दणकट सर्व्हिंग प्लेट वापरली जाते.... मोठी वजनदार आसामी आहे ही.

@ गंधकुटी

Classics European designs. Loved them.

Best part is, you are using them oftentimes

चिकन किंवा ग्रेव्ही आयटेम साठी ही खोलगट हंडी सारखी डिश वापरते मी, looks very nice. कालोघात
तिचे झाकण फुटलं आहे पण हंडी मस्त मजेत मिरवते पार्ट्या मधे.

Screenshot_20250318_220334_Gallery.jpg
हा मी जनरली भात आणि भाताच्या प्रकारासाठी वापरते... झाकण असल्याने थंड होत नाही, आणि पारदर्शक असल्याने त्यात भात आहे हे कळते.... कारण जनरली सगळे भात सेकंड सर्व्हिंग मधे घेतात. Age... More than ३५ years

Screenshot_20250318_220043_Photo Editor_0.jpg
हा हॅण्डल वाला छोटा वाडगा कोशिंबिरी किंवा वरण, दही सर्व करायला कमी येतो... It always steals the show with that cute handle.

मी गेली अनेक वर्षे मायबोली ची वाचक आहे, कधीतरी काही कविता पोस्ट करण्या व्यतिरिक्त मी कधी काही लिहिले नव्हते... ऋतुराज यांच्या धाग्यामुळे माझं लिहिले गेले... Thanks.

Pages