चिनीमातीची भांडी - क्रॉकरी

Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20250406_131904_Gallery_0.jpgह्या दोघी बहुदा पार्टीमध्ये कोणकोण येईल ग ... कोणता बरे ड्रेस घालूयात याचा विचार करत असाव्यात.
/>Screenshot_20250406_131944_Gallery.jpg

पार्टी साठी तयार पण तर व्हायचे असते ना.... You need to look your best... ह्या porceline फिगरिन मधे एक insert karata येण्याजोगा आरसा आहे त्यात त्या ललनांचा सुंदर मुखडा दिसतो.Screenshot_20250406_132305_Gallery.jpgScreenshot_20250406_132109_Gallery.jpgScreenshot_20250406_132018_Gallery.jpg

हे सगळे porceline figurines जवळ जवळ 100 वर्षांपासून, म्हणजे माझ्या आजेसासर्यांपासून आमच्या घरात आहेत.
काही भुभू माऊ बाळे पण आहेत.
Let's invite them for party. प्रभु रामचंद्रांच्या कामात त्यांना वानर, अस्वले, खारूताईनी पण मदत केली होती...

आहाहा !!!

इतकेच शब्द ह्या धाग्यावर आल्यावर बाहेर येतात
गंधकुटी तुम्ही हजार चांद लावले धाग्याला
Happy

गंधकुटी, रामनवमीचे निमित्त केलेच आहे तुम्ही. ह्या सगळ्या पोर्सेलीनच्या बाहुल्या व प्राणी चैत्रगौरी भोवती मांडा.

अश्विनी हे चैत्रगौरीचेच सजावटीचे सामान आहे, पूर्वी आरास मांडली जायची. Not anymore. आमची गौरी तृतीयेला बसते आणि अक्षय तृतीयेपर्यंत असते. कोणे एके काळी घरात खूपसारी आणि खूपच हौशी माणसे होती... मी सजावट नाही करत आता.

गंधकुटी,
Porceline फिगरिन चे कलेक्शन जबरदस्त आहे.
गंधकुटी तुम्ही हजार चांद लावले धाग्याला>>>>>> +११११

@गंधकुटी >>> तुमचं सगळंच पोर्सेलीन कलेक्शन फार सुंदर आहे. त्यातही एवढी प्रेमळ दिसणारी कालीमाता क्वचितच पाहिली असेल.

बाबा युरोपला गेले होते तेव्हा नातीसाठी कौतुकाने पोर्सेलीन डॉल घेऊन आले होते. तेव्हा ती ३ वर्षांची होती. बाहुल्यांची तोंडं स्केच पेनने रंगवणे, माझं नेलपेंट त्यांना मेकप म्हणून लावणे वगैरे उद्योग जोरात होते. त्यामुळे दिली नव्हती तिला. या वाढदिवसाला आजोबांचं गिफ्ट म्हणून दिली. पण तिच्या सगळ्या खेळण्यांत नाही ठेवू देत. खेळून झालं की ती परत देते.
IMG_8553.jpeg

Wade pottery, इंग्लड ची ही कंपनी आता बंद पडली आहे. Again, ह्या धाग्याच्या निमित्ताने मला माझ्याच घरातली vintage pottery नव्याने सापडली. मला त्याचा घाट आणि पाणी भसकन पडू नये म्हणूनच डिझाइन आवडायचे... पण हा जग ५० वर्षे जुना आहे व आता हा कलेक्टर्स आयटेम बनलाय याची सुतराम कल्पना मला नव्हती. मी त्याला किचन मधे जास्तीचे उलथने पळ्या ठेवायला वापरत होते... कर्म Sad

पिवळा जग मस्तय.
त्याला किचन मधे जास्तीचे उलथने पळ्या ठेवायला वापरत होते... कर्म Sad >>> Lol गंधकुटी असंच शोधत राहिलात तर तुमच्या घरात एखादा जीन वाला दिवा भेटण्याची शक्यता ही खूप आहे . Happy

माझेमन बाहुली मस्त. युरोपियन वाटतेय.
गंधकुटी
जग मस्त आहे.
मी त्याला किचन मधे जास्तीचे उलथने पळ्या ठेवायला वापरत होते...>>>> आता नशीब फळफळल त्याच.

गंधकुटी असंच शोधत राहिलात तर तुमच्या घरात एखादा जीन वाला दिवा भेटण्याची शक्यता ही खूप आहे .>>>>> अगदी Lol
शोधा म्हणजे सापडेल.

गंधकुटी असंच शोधत राहिलात तर तुमच्या घरात एखादा जीन वाला दिवा भेटण्याची शक्यता ही खूप आहे . >>> Lol सिमरन

पण हा जग ५० वर्षे जुना आहे व आता हा कलेक्टर्स आयटेम बनलाय याची सुतराम कल्पना मला नव्हती. मी त्याला किचन मधे जास्तीचे उलथने पळ्या ठेवायला वापरत होते >>>> गंधकुटी, तुम्ही मलय पर्वतातील भिल्ल पुरंध्री आहात.

मामी, हा म्हणजे त्या हिरव्या कँडी जार ला Narnia Pursian Delight Treat शी compare करण्याइतकाच मार्मिक comment आहे. Wink

ह्या सगळ्या गोष्टी माझे अज्ञान आणि सतत त्यांना पहात
असल्याने 'अती परिचयात अवज्ञा' या सदरात मोडतात... म्हणूनच मला या धाग्याचे कौतुक आहे कारण त्यामुळे मी जास्त aware डोळस झाली आहे

आता ह्या बरणीबाई आणि त्यांची पोरं माझ्यासमोरच घरात आलीत त्यामुळे त्यांची इमोशनल व्हॅल्यू खूप असली तरी ते मूल्य काहीच नाहीये (असलेच तर उपद्रव मूल्य आहे... साफसफाईचे) याची मला कल्पना आहे. पण आधीपासून घरात असलेली पोर्सेलीन आणि सिरॅमिक मंडळी... ते जस्ट एक्झिस्ट. मी कधी त्यांचा सिरीयसली विचारच केला नव्हता.
I am glad I am doing so.
Screenshot_20250409_175639_Gallery.jpg

Pages