डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

A French scientist was denied entry into the United States earlier this month after immigration officials found text messages on his phone criticizing U.S. President Donald Trump, which they reportedly said “could be considered to be terrorism.”
ट्रम्प च्या रिसर्च फंडिंग बद्दलचे क्रिटीसाईज करणारे मेसेजेस होते. Lol
आता ही पोस्ट वाचून मला ही तुरुंगात टाकतील.
मेकिंग ऑफ ए बनाना रिपब्लिक.
शेंडे थेरडा वगैरे लिहिता, जपून हो. आईस वाल्यांना कोणाबद्दल आहे हे समजेल अशा भ्रमात राहू नका. होत्याचं न्हवत व्हायचं. त्यात स्कीन कलर पांढरा नाही.

<< असे तुम्ही लिहिता आहात पण नासा नि दोन्ही अंतराळवीरांनी हे नाकारले होते.>>

<< अमेरिकेत साऊथवेस्ट, डेल्टा, अमेरिकन, युएस सगळ्यांची पुढच्या दोन तिमाह्यांची फोरकास्ट खाली गेली आहेत. फेडएक्सने ही फोरकास्ट रिवाईज केलं आहे.>>

अहो झक्की, अमित तुम्ही कुठे फॅक्टस मधे शिरलात. तात्याच्या समर्थकांना ट्रुथ शी वावडं आहे. शेंडे परत तुमच्या तोंडावर एखादा ऍक्चुली अपोझिट पॉइंट प्रूव करणारा व्हिडीओ फेकून मारतील. Lol Lol

डोन्ट लेट द फॅक्टस गेट इन द वे ऑफ गुड नॅरेटीव!!

अमेरिकेचा बट्ट्याबोळ होणार म्हणून इथले लोक अगदी देव पाण्यात घालून वाट बघत आहेत. पण तसे काही होणार नाही.
अमेरिकन व्हिसा मिळणे हा जगातील सर्व लोकांचा जन्मसिद्ध अधिकार असल्याचा गैरसमज भ्रमिष्ट थेरड्याने पसरवला होता. तो दूर केला जाणे गरजेचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे नागरिकांना दिलेले आहे..कुठल्याही उपर्या व्यक्तीला ते मिळत नाही.
Department of Education नामे एक खर्चिक आणि उपद्रवी विभाग कार्टर ने निर्माण केला होता तो Trump ने रद्द केला. हे एक विकतचे दुखणे होते. Trump च्या शिरपेचात अजून एक तुरा! सॉरी!

कै च्या कै.....तात्या नी त्याचे भक्त जिवंत असताना असल्या फुटकळ कार्यासाठी देव पाण्यात घालायची कुणाला गरजचं काय मी म्हणतो?? Rofl

ज्या प्रकारे हुरळून जाऊन लोक आता नेब्रास्का चे दिवाळे वाजणार, आता फ्रान्स अमेरिकेवर हल्ला करणार, इंग्लंड अमेरिकेचा कट्टर शत्रू आहे, कॅनडा तर इतका क्रुद्ध आहे की सगळे कॅनडा वासी रोज अमेरिकेच्या ध्वजावर थयथया नाचून तो पेटवून मगच आपला दिवस सुरू करतात वगैरे गोष्टी सांगत आहेत म्हणून असे वाटले की ते डोळ्यात प्राण आणून अमेरिकेच्या विध्वंसाची चातका सारखी वाट पाहत आहेत!

वसुधैव कुटुम्बकम् संस्कृती आहे आपली.
कुठल्याही देशाला अनादर म्हणुन त्याचा अनादर करत नाही आम्ही.

मिनिसोटा आणि व्हर्जिनियातील ६०० आयर्न ओर कामगारांना सध्यातरी कामावरुन काढून टाकलं आहे. बाहेरच्या देशांवर टेरिफ लावून नवे जॉब आणण्या ऐवजी जे आहेत तेच जॉब गायब होत आहेत. दुसरं होणार तरी काय होतं!

कुठेही ले ऑफ झाले की त्याचा टेरिफशी संबंध लावून बघणे खूपच मनोरंजक आहे.
टेरिफ बाबत जैसे थे परिस्थिती ठेवणे अन्य देशांना फायद्याचे आहे आणि अमेरिकेला नुकसानीत ढकलणारे आहे. कधीतरी कुणीतरी ते बदलायला हवे होते. अमेरिका फर्स्ट म्हणणारा ते करतो आहे ह्यात आश्चर्य नाही.
बघू या who blinks first.

लॉस एंजेलिस मधे भूकंप झाला दोन दिवसांपूर्वी तोही बहुधा टेरिफ मुळेच असणार!

Who blinks first की who faints first?? Rofl

<<<लॉस एंजेलिस मधे भूकंप झाला दोन दिवसांपूर्वी तोही बहुधा टेरिफ मुळेच असणार!??
छे:, छे: , तो DEI मुळे झाला!

>>> भारतीय नोकरी व व्यवसायानिमित्त मोठ्या संख्येने कायमस्वरूपी अमेरिकेत स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे त्यांचे पालकही त्यांच्याकडे राहण्यासाठी जातात. त्यांच्याकडे ग्रीन कार्ड म्हणजेच अमेरिकेचे नागरिकत्व असते. अमेरिकेतील हिवाळा हा या ज्येष्ठांना न मानवण्यासारखा असल्याने ते या काळात भारतात परत येतात. आता ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत परतणाऱ्या अशा भारतीयांचे नागरिकत्व जबरदस्तीने काढून घेण्याची कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेच्या विमानतळावर अशा नागरिकांवर तेथील सीमा संरक्षण विभागाचे अधिकारी दबाव आणून त्यांना आय-४०७ या अर्जावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडत आहे. तुम्ही या अर्जाद्वारे अमेरिकी नागरिकत्व स्वेच्छेने सोडता. याला नकार देणाऱ्या भारतीय नागरिकांना डांबून ठेवण्याची अथवा भारतात परत पाठविण्याची धमकी दिली जात आहे. यामुळे अमेरिकेचे नागरिकत्व असलेल्या भारतीय ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.>>>

आज हे लोकसत्ता मधे वाचले. त्यातील 'ग्रीन कार्ड म्हणजे नागरिकत्व' ह्या विधानाकडे दुर्लक्ष करु.. पण बाकिच्या बातमी मधे आय ४०७ बद्दल जे म्हटले आहे ते खरच घडत आहे का?
टुरीस्ट व्हीसा धारक पालकांना पोर्ट ऑफ एंट्रीलाच रीटर्न तिकिट नसल्यामुळे परत पाठवल्याच्या केसेस ऐकल्या आहेत. एका ओळखीच्याच मित्राच्या पालकांना तीन वर्षापुर्वी कोव्हीडच्या वेळी डी एस डेट पेक्क्षा जास्त राहिले म्हणून ह्या वेळी ३-४ तास चौकशी साठी थांबवून ठेवले व मुलाने शेवटी ऑफीसरशी बोलल्यावर दोन महिन्याचा डी एस व वॉर्नींग देऊन सोडले, ही केस ऐकली. एकूणच लीगल एंट्री बद्दल कोणता कायदा असा केला नसला तरी, इमिग्रेशन खूपच कडक झाले आहे असे कळतय. " तोंडी / अनरीटन" सूचना आहेत का ऑफीसर्स स्वतःच्या बोधानुसार असे करत आहेत ह्याची कल्पना नाही. त्यामुळे वरील बातमी वाचून अजुनच काळजी वाटली.

इमिग्रेशन ची समस्या इतकी मोठी केल्याबद्दल बायडन साहेबांचे आभार माना.
ग्रीन कार्ड, व्हीजिटर व्हिसा हे देताना हे नियम लागू होतात ते गुमान पाळावेत. जर नियम तोडले तर जाऊ द्या, एकदाच तोडला आहे वगैरे बोलून चूक माफ होईल ही अपेक्षा अवास्तव आहे.
अशा प्रकारचे व्हिसा धारक हे नागरिक नाहीत. त्यांचे अधिकार नागरिकांच्या बरोबरीचे नाहीत. बरेच कमी आहेत. हे लक्षात घ्यावे.
बाय डनने व्हिसा चे नियम पाळताना ढिसाळपणा केला म्हणून Trump देखील तो करावा ही अपेक्षा गैर आहे.

लोकसत्ता ने नागरिक आणि ग्रीन कार्ड धारक ह्यांच्यात जाणीवपूर्वक गफलत केली आहे. Trump हा रेसिस्ट आहे. नागरिक गोरा नसेल तर त्या विरुद्ध भेदभाव केला जातो असे दाखवायला हे केले जात असावे असे वाटते. लोकसत्ता संपादक Trump चा खूप तिरस्कार करतात हे त्यांचे संपादकीय वाचल्यास सहज कळते..

ग्रीन कार्ड म्हणजेच अमेरिकेचे नागरिकत्व असते. >> हा मोठा गैरसमज आहे. ग्रीनकार्ड म्हणजे परमनंट रेसिडंसी. ही परमनंट रेसिडंसी तुम्हाला त्यांचे नियम पाळून टिकवावी लागते. तुम्ही किती काळ अमेरीकेबाहेर सलग राहू शकता त्याचे नियम आहेत, जोडीला जास्त काळ बाहेर रहाणार तर वेगळे पेपरवर्क करावे लागते. हे न पाळल्यास तुम्ही ग्रीनकार्डचा प्रीविलेज सोडून देत आहात, green card abandon करत आहात असे धरले जाते. हे नियम नवे नाहीत, पूर्वी पासूनचे आहेत. मुलाचे/मुलीचे घर हा परमनंट अ‍ॅड्रेस दाखवणे, इथे टॅक्स फाईल करणे वगैरे करुन रेसिडंन्सी एस्टॅब्लीश करणे अपेक्षित असते. पूर्वीही याची अंमलबजावणी होत होतीच. क्लिंटन काळात हा सलग रहाण्याचा नियम पाळू न शकल्याने लोकांची ग्रीनकार्ड गेलेली/ स्वतःहून सोडून दिलेली बघितली आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे एअरपोर्टवर 'फॉर्मवर सह्या कराच म्हणून अडवणे' वगैरे करता येत नाही मात्र ग्रीनकार्ड होल्डर जास्त काळ बाहेर राहून परत येत असल्यास ते त्याबद्दल चौकशी नक्कीच करु शकतात. अशावेळी घाबरुन न जाता नीट उत्तरे देणे गरजेचे. तुमचा लॉयर असेल तर तो देखील मार्ग काढायला मदत करतो.

लोक(जोक)सत्ता हा एक मठ्ठ पेपर आहे हे त्याच्या क्लिकबेट बातम्या स्टाइलवरुनच लक्षात येते..त्यातही ते सगळ्या बातम्या इन्डियन एक्स्प्रेस वरुन कॉपी करतात..जे वॉशिग्नट्न डेलि वरुन कॉपी करतात.
ग्रिन कार्ड होल्डर्स फक्त १८० दिवस अमेरिकेबाहेर राहु शकतात, ज्याना अडवल जातय ते यापेक्षा बराच जास्त पिरियड काही केस मधे वर्श-दिड वर्श बाहेर राहुन परत येत आहेत..अशावेळेस तुम्हाला ग्रिन कार्डची गरज नाही अस मानल जाण्यात काय चुक आहे?
टुरिस्ट व्हिसा वाले साइट सिइगला येणार तर परत जाण्याच तिकिट हवच! हे आत्ता नाही आधिपासूनच आहे..किबहुना ६ महिन्याच लिमिट असेल तर त्याच्यापेक्षा किमान १५ दिवस कमिच राहाव असा अलिखित नियम आहे नाहितर भविष्यात एन्ट्रिला त्रास होतो..कुठल्याही कारणाने जास्त राहणार असाल तर तशी पुर्व कल्पना देवुन एक्स्टेशन घेता येते..पण यातल काहिही न करता सिस्टिमला ग्रुहित धरु नये!

आता स्प्रिंग पासून खूप लोक भारतातून यायला सुरूवात होईल तेव्हा कळेल नक्की किती कडक झाले आहे. व्हिसाहोल्डर्सच्या बाबतीत परतीचे तिकीट असणे व ठरलेल्या तारखेपेक्षा एकही दिवस जास्त न राहणे हे सहसा बघितले जातेच. अनेक वर्षे होत आहे पण इतकी वर्षे इमिग्रेशन वाल्यांना त्यात थोडेफार "डिस्क्रीशन" असावे अशा बाबतीत निर्णय घ्यायला. वरचे कोव्हिडचे उदाहरण युनिक आहे पण ओळखीच्या लोकांमधे व्हिसा एक्स्टेन्शन अ‍ॅप्लाय केले होते, ते नाकारले गेले पण तोपर्यंत इथे राहून वाट पाहिल्याने मूळची तारीख उलटून गेली - अशांना नंतर व्हिसाही नाकारल्याचे उदाहरण ऐकले आहे. हे सगळे काही वर्षांपूर्वीचे. ऐकीव माहितीत इव्हन शेवटच्या दिवशीची फ्लाइट होती व ती रद्द झाल्याने तारीख उलटली, अशीही केस ऐकली आहे.

हे दोन्ही नियम वेळोवेळी कमीजास्त प्रमाणात एन्फोर्स केले गेले आहेत. सध्याच्या परिस्थितीत ते जास्त कडकपणे राबवले जातील हीच शक्यता जास्त आहे.

“ ग्रिन कार्ड होल्डर्स फक्त १८० दिवस अमेरिकेबाहेर राहु शकतात” - ग्रीनकार्ड होल्डर्सना एक वर्षापेक्षा जास्त, सलग, देशाबाहेर राहता येत नाही- जर रहायचं असेल तर त्यांना अ‍ॅडव्हान्स परोल लागते.

श्री. shendenaxatra,
१. माझ्या प्रश्नाच्या सुरुवातीलाच मी म्हणालो कि ग्रीन कार्ड म्हणजे नागरिकत्व ह्या विधानाला सोडून देऊ. ते तसे नसते हे मलाही माहिती आहे.
२. मी दिलेला संदर्भ बातमीचा आहे, संपादकीयाचा नाही. लोकसत्ताचे संपादक काय लिहितात व त्यांचे काय पुर्वग्रह आहेत इ. शी मला घेणे देणे नाही. त्यांची अनेक मते मलाही पटत नाहीत.
३. ग्रीन कार्ड, व्हिसिटर व्हीसा इ. देताना नियम असतात व ते पाळावे ह्यात दुमत नाही. व्हीसा धारक नागरिक नाहीत व त्यांना नागरिकां प्रमाणे अधिकार नाहीत हे ही मान्य. परंतु सगळेच लोक नियम पाळत नाहियेत व बायडेन ने सगळ्यांना रान मोकळे सोडले होते असे अध्यारुत धरणे योग्य नाही.
३. अ. ग्रीन कार्ड होल्डर लोकांना दिल्या जाणार्‍या फॉर्म आय ४०७ बद्दल मी विचारले कारण मला त्याबद्दल माहिती नव्हती.
३. ब. टुरीस्ट व्हीसा बद्दल दिलेल्या उदाहरणात कोव्हीड काळामधे झालेला ओव्हरस्टे आहे. तो नियमबाह्य नाही. ते सांगण्यामागे उद्देश सद्ध्या इमिग्रेशला काय काय अनुभव येत आहेत हे नमुद करणे हा होता.
असो. तुमच्याशी वाद घालायची ईच्छा नाही, फक्त माझी भुमिका सांगावीशी वाटली. प्रतिसादाबद्दल आभार.

@स्वाती२ - धन्यवाद. रेसीडन्सी एस्टॅब्लीश करण्याबद्दल नीट माहिती नव्हते, ते कळाले.
प्राजक्ता, फेरफटका, फारएण्ड - धन्यवाद.

आज हे लोकसत्ता मधे वाचले. त्यातील 'ग्रीन कार्ड म्हणजे नागरिकत्व' ह्या विधानाकडे दुर्लक्ष करु.. पण बाकिच्या बातमी मधे आय ४०७ बद्दल जे म्हटले आहे ते खरच घडत आहे का? >>> ग्रीन कार्ड वाल्यांच्या बाबतीत ही पोस्ट फेबु व व्हॉअ‍ॅ वर फिरत होती. लोकसत्तेने स्वतः काही यात शोध घेतला आहे की "नेटकरी म्हणत आहेत" छाप पोस्ट आहे कल्पना नाही. अशी चौकशी कोणाची झाल्याचे प्रत्यक्षात ऐकले नाही. पण होणे शक्य आहे. अशा वेळेस येणार्‍याचे अधिकार काय असतात हे ज्येना व इतर व्हिझिटर्सना माहीत करून देण्याची गरज आहे.

अनेक भारतीय ज्येना आधी ग्रीन कार्ड व नंतर नागरिकत्व घेतात. एकदा नागरिकत्व घेतले की मग कोठेही राहिले तरी फरक पडत नाही. पण ग्रीन कार्डची पाच वर्षे जर ते अमेरिकेत रूळले नसतील तर त्यांची अडचण होते, कारण असे सगळे लोक इथे वर्षभर राहू शकत नाहीत - काहींना हा बदल इतक्या लगेच करता येत नाही, काहींची इथे मायग्रेट होण्याची इच्छा नसते पण कधीही येता/जाता यावे अशी सोय हवी असते - बरीच कारणे असतील. अशा लोकांनी पुढची १-२ वर्षे तरी जास्तीत जास्त काळ अमेरिकेतच राहणे चांगले.

ग्रीन कार्ड म्हणजे मला अमेरिकेत राहायचे आहे असे तुम्ही अमेरिकन सरकारला सांगितले आहे. मग तुम्ही ती पाच वर्षे बराचसा काळ बाहेरच राहणार असाल तर तो "रिस्क" इमिग्रेशन लॉयर्सपासून ते देशी इमिग्रेशन वेबसाइटवरच्या सल्लागारांनी वेळोवेळी सांगितलेला आहे. सध्या फक्त तो एन्फोर्स होतोय असे दिसते (ते ही या फिरणार्‍या पोस्टवरून). ज्यांचे ज्येना या बोटीत आहेत त्यांनी तो होईल असेच गृहीत धरावे व त्यांना त्यांच्या अधिकारांची माहिती द्यावी.

टुरिस्ट प्रमाणेच बिझिनेस व्हिसा साठी सुद्धा परतीचे तिकिट बहुतेक सर्वत्र, जिथे आधी व्हिसा काढावा लागतो तिथे गरजेचे आहे. लॅन्ड केल्यावर परतीचे तिकीट चेक करतात. व्हिसा मध्ये दिलेल्या मुदतीच्या आत परतणे बंधनकारक आहे, तसेच ज्या देशाचा व्हिसा आहे तिथे लॅन्ड करतो तिथे तिथल्या तारीख वेळ प्रमाणे एक दिवस सुद्धा आधी लॅन्ड करता येत नाही. टुरिस्ट / बिझिनेस व्हिसावर एक दिवस ओव्हर स्टे सुद्धा सिरीयस मॅटर आहे.

(काही इमिग्रेशन ऑफिसर आगाऊ असतात. एकदा मी भारतातून रात्री 12 च्या आधीच्या फ्लाईटने निघुन फ्रँकफुर्टलाला तिथल्या सकाळी साडे सातला लॅन्ड होणार होतो आणि त्या दिवसापासून माझा व्हिसा सुरू होता. यासाठी भारतातल्या ऑफिसर उगाच घोळ घालत बसला तुम्ही एक दिवस आधीच जात आहात. मी सांगतोय की पण लॅन्ड तर उद्या होणार आहे तरी तेच, पण तुम्ही निघत आहात एक दिवस आधी.
त्याला म्हटलं पण जर्मनीच्या हद्दीत विमान उद्याच पोचणार आहे. एवढंच काय भारताच्या हद्दीतून विमान उद्याच बाहेर पडणार आहे. अशी बरीच हुज्जत घालून झाल्यावर शेवटी म्हणे तुमच्या चांगल्या साठी मी मुद्दा मांडतोय, तुम्हाला तिकडे त्रास व्हायला नको. म्हटलं नाही होणार तेच सांगतोय पण तुम्ही मात्र अगदी बारीक तपासून मुद्दा काढलात हां! असं काहीसं कौतुक केल्यावर जणु काही मीच काळजी करतो होतो अशा थाटात '"काळजी करू नका, काही त्रास होणार नाहीत तुम्हाला" म्हणत ठप्पा मारून सोडले.)

“ आय ४०७ बद्दल जे म्हटले आहे ते खरच घडत आहे का?” - माझ्या ओळखीच्या एका इमिग्रेशन लॉयरच्या म्हणण्याप्रमाणे त्याने अश्या काही केसेस प्रत्यक्ष ऐकल्या/पाहिल्या नाहीयेत.

खरं खोटं प्रत्यक्ष काय असेल ते असेल. या सगळ्या अनिश्चिततेच्या काळात आमच्या गावातल्या मायनर हॉकी लीगची आजच मेल आली आहे. त्यांनी अमेरिकेत होणार्‍या कुठल्याही सामन्यात कुठल्याही वयोगटातील मायनर हॉकी संघ पाठवणे ताबडतोबिने बंद केले आहे. हे युथ ही नाही तर मायनर हॉकी म्हणजे यु-१५ पर्यंतचेच आहेत. ए, एए आणि एएए चे अनेक संघ अमेरिकेत आणि अमेरिकेतील कॅनडात अनेकदा सामन्यांसाठी येत असतात. आणि अशा असंख्य लीग्स इथे आहेत.
यातील बहुतेक लोक नागरिक असल्याने त्यांना व्हिसा लागतही नाही. तरी या (राजा) रामभरोसे चेक्स, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चेक, डिटेंशन गोंधळात अडकायची हॉकी लिगची आणि पालकांचीही इच्छा नाही.
आणखी टूरिस्ट डॉलर्स तेवढे गमावले. पण त्याची काही अर्थात अमेरिकेला गरज नाहीच आहे.

The Trump Administration Accidentally Texted Me Its War Plans

सिग्नल सारख्या प्लॅटफॉर्मवर मार्को रुबिओ, जेडी व्हांस, माईक वॉल्ट्स, पीट हेक्झेथ येमेन वरच्या वॉर प्लॅन्सची चर्चा करतात आणि ती अटलांटिकच्या एडिटरला ठिकाण, वेळ, टार्गेट, साईझ सगळी बाँब टाकायच्या आधी २ तास पाठवतात. Rofl

बापरे! मायनर हॉकी लीगचे लोक अमेरिकेत येत नाहीत म्हणजे महाप्रचंड आर्थिक आपत्तीच! शेकडो अब्ज डॉलर्स चे नुकसान!
हर हर! Trump ने काय भयंकर दिवस दाखवलेत!

वॉशिंग्टन पोस्ट ६४ बिलियन म्हणतंय. पण तितकी तर कळ सोसलीच पाहिजे ना! रशियन आणि बेलारुसच्या लोकांना व्हिसा फ्री एंट्री देण्याचं घाटताहेत बरोबर ना?

मी महिन्यातून दोनदा अमेरिकेची वारी करतो. टोरोंटो एअरपोर्टवर इमिग्रेशन होते.
गेल्या १-१.५ महिन्यात जाणवण्याइतपत फरक पडला आहे. मागल्या आठवड्यात सुट्टीसाठी बायको व मुलाबरोबर जाताना 'मुलगा अमेरिकेतच का जन्मला' हा प्रश्न व तिथून पुढे उद्धट पणे इतर प्रश्न हे झाले. हाच अनुभव २०१८/१९ मध्ये येत असे.
टोरोंटो एअरपोर्टवर इतके वेळा इमिग्रेशन मधून जात असल्याने एजंटचे चेहरे ओळखीचे झालेले आहेत. एजंट बदललेले नाहीत, त्यांचा प्रश्न विचारण्याचा रोख/टोन, प्रश्नांची खोचकता वाढली आहे. तेव्हा डायरेक्शन वरून आली असावी असा कयास आहे.
कसे प्रश्न विचारायचे, काय पद्धतीने विचारायचे हा अमेरिकेचा एक सार्वभौम देश म्हणून अधिकार आहे. त्याबद्दल काही बोलायचे नाहिये.

Pages

Back to top