डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह नो!! Sad

सहावीतल्या मुलीला बुली करणं हे वाईटच आहे व तिने आत्महत्या करणं हे तर वर्स्ट. डिपोर्ट होताना किमान फॅमिलीज् सेपेरेट होणार नाहीत याची खात्री केली गेली पाहिजे. तसं होणार नाही हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे.

बुलिंग आणि त्यामुळे झालेली आत्महत्या अगदीच वाईट. शाळेच्या ॲडमिनिस्ट्रेशनवर त्वरित कारवाई झाली पाहिजे.

प्रश्न राहिला फॅमिली सेपरेशनचा, तर या व्हिडिओनुसार टॉम होमनच्या (Acting director of the U.S. Immigration and Customs Enforcement) मते फॅमिली सेपरेशनऐवजी zero tolerance policy तो वापरणार आहे. त्यात फॅमिली सेपरेशनची शक्यता आहे जशी DUI च्या वेळीसुद्धा असते.

बेकायदेशीरपणे रहाणार्‍यांना हाकलून देणे ठीक आहे, पण त्यांना नोकर्‍या देणे हेहि बेकायदेशीरच करायला पाहिजे, नि त्यांना नोकर्‍या देणार्‍यांवरहि काहीतरी कारवाई करायला पाहिजे.
अर्थात् सध्याच्या राजवटीत रिपब्लिकन राज्यातील लोकांना हा कायदा लागू होणार नाही.
फक्त न्यू यॉर्क, न्यू जर्सी नि कॅलिफोर्निया मधील जे लोक अश्या बेकायदेशीर लोकांना काम देतात, त्यांना शिक्षा करावी. (किंवा त्यांनी भरमसाठ रक्कम त्रंप्याच्या बिट कॉइन, किंवा बायबल मधे गुंतवला पाहिजे.

किंवा त्याने उद्या वापरलेला टॉयलेट पेपर विकायला काढला तर तोहि घेतला पाहिजे.)
शेल्डनने नाही का स्पॉक (लिओनार्ड निमॉय) ने वापरलेला पेपर नॅपकिन घेतला?

फोर नेशन्स हॉकी मध्ये फायनल युएसए वि. कॅनडा मध्ये कॅनडा जिंकली. गेम एक्स्ट्रॉ टाईम मध्ये गेला आणि एडमंटन ऑयलर्स च्या मॅकडेव्हिडने शेवटचा गोल करून कप घेतला. युएस मस्त खेळले, डिफेन्स आणि गोली तर भारीच!
हे या धाग्यावर लिहायचं कारण म्हणजे या गेमला व्हाईट हाऊस आणि ट्रंप ने बुली रँटस मधून सोडलं नाही!
अमेरिका जिंकली असती तरी आमच्या सिनेटर्सचा कचक (Brady Tkachuk) होता, लिफ्स चा मॅथ्यूज होता. तर ५१ स्टेटने तात्याला धूळ चारली. आता उद्या गटारगंगेतून काही मुक्ताफळं आली तर बघू.

आणखी एक गंमत... ओ कॅनडा म्हणताना आज Chantal Kreviazuk ने एक बारीक बदल केला . True patriot love, in all of us command” च्या ऐवजी ती “that only us command.” म्हणाली. Lol

दुसर्‍या ट्वीटमध्ये व्हाइट हाउसने llegal Alien Deportation Flight चा व्हिडियो आहे. साखळदंड वगैरे घालताना. त्याला मस्कने Haha wow म्हणत रिट्वीट केलं आहे. हे व्हाइट हाउसने रिट्वीट केलं आहे.

पहिल्या ट्वीटमध्ये dan scavino एफ बी आयचा संचालक झाल्याबद्दल काश पटेलचे अभिनंदन केले आहे. जोडीला बाजीराव मस्तानीमधलं गाणं दुश्मनची वाट लावली - आहे. त्यात रणवीर सिंगला काश पटेलचा चेहरा लावला आहे.

आणखी काही गमती.
तात्याराजेंच्या पहिल्या टर्म मधे ओबामा पेक्शा कमी डिपोर्टेशन्स झाले. आणि दुसर्या टर्म मधे पहिल्या महिन्यात बाय्डेन अ‍ॅडमिन पेक्षा कमी झालेत.
पण तात्याराजेंच्या स्लो लर्नर सपोर्टर्सना फॅक्ट डेटाशी वावगं आहे...त्यामुळे लाँग लिव द किंग!!

>>आणि दुसर्या टर्म मधे पहिल्या महिन्यात बाय्डेन अ‍ॅडमिन पेक्षा कमी झालेत
<<
ही माहिती कुठे मिळाली? आणि भ्रमिष्ठ म्हातार्याने सीमा रेषा खुली ठेवली होती त्यामुळे प्रचंड प्रमाणात लोक येत होते. ट्रंपने सीमेवरची आणीबाणीची परिस्थिती ओळखून तिथे जय्यत नाकेबंदी केली आहे. आता येणार्या लोकांचा ओघ कमी झाला आहे.
म्हातार्‍याने पहिल्या महिन्यात काही लोकांना डिपोर्ट केले होते ही माहिती नवीन आहे. इन्ग्रजीत टू गुड टु बी ट्रु म्हणतात तशी वाटते. असो.
कश्यप पटेल अर्थात काश पटेल एफ बी आयचे प्रमुख झाले आहेत. आता बघू कुठकुठली लफडी कुलंगडी बाहेर येतायत ते.
ट्रंपवरील दोन जीवघेण्या हल्ल्यांचा नक्की काय तपास केला गेला आणि काय निष्पन्न झाले ते कळले तर बरे होईल.

>>आणि दुसर्या टर्म मधे पहिल्या महिन्यात बाय्डेन अ‍ॅडमिन पेक्षा कमी झालेत
<<
ही माहिती कुठे मिळाली? आणि भ्रमिष्ठ म्हातार्याने सीमा रेषा खुली ठेवली होती त्यामुळे प्रचंड प्रमाणात लोक येत होते. ट्रंपने सीमेवरची आणीबाणीची परिस्थिती ओळखून तिथे जय्यत नाकेबंदी केली आहे. आता येणार्या लोकांचा ओघ कमी झाला आहे.
म्हातार्‍याने पहिल्या महिन्यात काही लोकांना डिपोर्ट केले होते ही माहिती नवीन आहे. इन्ग्रजीत टू गुड टु बी ट्रु म्हणतात तशी वाटते. असो.
कश्यप पटेल अर्थात काश पटेल एफ बी आयचे प्रमुख झाले आहेत. आता बघू कुठकुठली लफडी कुलंगडी बाहेर येतायत ते.
ट्रंपवरील दोन जीवघेण्या हल्ल्यांचा नक्की काय तपास केला गेला आणि काय निष्पन्न झाले ते कळले तर बरे होईल.

कॅनडा प्रकरणी ट्रंप ट्रूडोची जी टवाळी करतो आहे त्याचा घातक परिणाम म्हणजे पुन्हा एकदा ट्रूडो दणदणीत मतांनी निवडून येईल आणि कॅनडाचे पुरते वाटोळे करेल! काही दिवसांपूर्वी त्याने लोकप्रियता रसातळाला पोचली म्हणून राजीनामा दिला होता.
अ तिरेकी इमिग्रेशन, आकाशाला भिडलेली महागाई यामुळे कॅनेडियन त्रस्त आहेत. पुन्हा हा कम्युनिस्ट कॅस्ट्रोपुत्र निवडून आला तर कॅनडा हे अमेरिकेचे नाही तर चीनचे नवे राज्य बनू शकेल!

कॅनडा प्रकरणी ट्रंप ट्रूडोची जी टवाळी करतो आहे त्याचा घातक परिणाम म्हणजे पुन्हा एकदा ट्रूडो दणदणीत मतांनी निवडून येईल आणि कॅनडाचे पुरते वाटोळे करेल! काही दिवसांपूर्वी त्याने लोकप्रियता रसातळाला पोचली म्हणून राजीनामा दिला होता.
अ तिरेकी इमिग्रेशन, आकाशाला भिडलेली महागाई यामुळे कॅनेडियन त्रस्त आहेत. पुन्हा हा कम्युनिस्ट कॅस्ट्रोपुत्र निवडून आला तर कॅनडा हे अमेरिकेचे नाही तर चीनचे नवे राज्य बनू शकेल!

ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं!
चीन, जपान, मेक्सिको सगळ्यांशी आम्ही आता डील करतो आहोत. विश्वासघातकी आततायी शेजार्‍यांपेक्षा ते परवडलेच. तात्यामुळे कॅनडात राष्ट्रपेमाचं इतकं भरतं आलं की इथल्या कॉन्झर्वेटिव्हना काय बोलावं कळेना होऊन पोल्स मध्ये ३० पॉईंटची आघाडी मावळून आता लिबरल्स बरोबर स्टॅटिस्टिकली बरोबरी आली आहे. ट्रिड्यू जाऊन मार्क कार्नीचा उदय झाला. वुई आर गुड! अमेरिकन उत्पादनं बॅन/ अघोषित ट्रॅव्हल बंदी मुळे जे काही जॉब लॉस होत आहेत अमेरिकेत तिकडे बघा तुम्ही. आमचं बरं चालू आहे.
शिवाय शेकडो हजारो लोकांची प्रेसिडंट मस्क गंच्छंती करतोय. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला, मार्चचा एम्प्लॉयमेंट रिपोर्ट आला की बघा काय होतं.
आता इतकं करुन ऑस्ट्रेलियाला अल्युमिनम जास्त पाठवा सांगत आहेत. ते थोडी स्वस्तात पाठवणार. अमेरिकेत महागाई वाढते बघा आता कशी. नाहीतर शेपुट घालू प्रकार करेलच तात्या. आता कोणी त्या लांडग्यावर विश्वास ठेवत नाही बघा.

बाकी सध्याच्या वेगाने भारतात इल्लीगल लोकांची विमानं जात राहिली तर बायडनच्या वार्षिक डिपोर्टेशन आकड्याच्या जवळपास आकडा जाण्याची शक्यता आहे. इतका फोकस थोडी रहाणार आहे बाळराज्यांचा. Biggrin

कॅनडा प्रकरणी ट्रंप ट्रूडोची जी टवाळी करतो>>>

टवाळी?? अहो तो तर कॅनडाचे अस्तित्वच संपवून टाकायच्या मागे लागला आहे. आणि त्याच्या आणि त्याच्या स्टाफर्सच्या वक्तव्यांवरून तो मजा करतोय असे दिसत नाही. बाकी ट्रम्पमुळे कॅनडात युएस विरोधी जनमानस तयार झाले आहे. स्वतःच्या सगळ्यात जवळच्या शेजार्‍याला आणि साथीदाराला आपल्या विरोधात भडकाउन काय मिळवले कोण जाणे.

कॅनडाचे बरे चालू आहे? अनेक लोक रडत आहेत की जन्मभर दोन तीन जॉब करत राहिले तरी एक घर विकत घेता येईल अशी परिस्थिती नाही. युट्युबवर अनेक कॅनडाचे रहिवासी यावरून शिव्या शाप देत आहेत. कॅनडात येऊ इछुकांना धोक्याचे इशारे देत आहेत!
चांगले आहे! करा एन्जॉय!

>>. कॅनडात येऊ इछुकांना धोक्याचे इशारे देत आहेत!>> वी कॉल दॅट इमिग्रेशन पॉलिसी! Lol
तुम्ही पण द्या की अमेरिकेत येऊ इच्छिणार्‍यांना धोक्याचे इशारे. तुमचं पण इमिग्रेशन बंद होईल! कसल्या भिंती बांधताय युट्युब व्हिड्यू काढायचे सोडून!
अर्थात तुम्ही गटारगंगा अवतीर्ण करून तुमचे प्रयत्न करतच असता. पण कोणी विश्वास ठेवत नाही. कसं होणार राव तुमचं!
पण बाळराजे कॅनडाविरुद्ध बोंबलत आहेत ते एकून आमच्या पथ्यावर पडलंय यात तुमचं आणि आमचं एकमत होणार बहुतेक. Lol गर्जेल तो पडेल काय हे ही आहेच. आणि राज्यांनी गहाण टाकलं तरी आम्रविका अजुन तरी लॉंग लिव्ह किंग झालेली नाही. लोकच हाणुन पाडतील. ते काय कॉमन सेन्स परव्हेल वगैरे म्हणतात ना!

लोकच हाणुन पाडतील. ते काय कॉमन सेन्स परव्हेल वगैरे म्हणतात ना! >> इथली काही मुक्ताफळे वाचून तुला असे खरच वाटते ?

मेन चे फेडरल फंडिंग जातंय. अशीही मेनची एक बाजू सोडली तर चहूकडून कॅनडाच आहे. ११ वे प्रोव्हीअस ची ऑफर द्यावी काय?

ट्रंप चे सिक्रेट टॅलेंट ८०/२० आहे. एखाद्या भूमीकेला ८०% लोकांचा पाठिंबा असेल तर ट्रंप ती घेतो व मग डेमोक्रॅट्स २० % वाली भूमिका घेतात.
न्यूयॉर्क च्या गव्हर्नर नी कॉन्जेशन प्रायसिंग सुरू केले. तो अतिशय अलोकप्रिय निर्णय होता. आधी १५$ होते मग ते उदारपणे कमी करून ९$ केले. आता ट्रंप ने तो रद्द केला तर त्या विरुद्ध या कोर्टात जाणार म्हणे ! ऑप्टिक्स ! तो रद्द केल्यानी झालेले नुकसान फेडरल ने द्यावे म्हणून कोर्टात गेल्या तर निदान ते लोकांना पटवून तरी देता आले असते !

मेन चेही तेच . मेन च्या गव्हर्नर ट्रंप विरुद्ध कोर्टात जाणार म्हणे, कारण काय ? त्याला किती लोकांचा पाठिंबा आहे ?

यावरून फेडरल फंडिंग काढणे हे न्यायालयात टिकणार असेल तर हरतील नाहीतर जिंकतील. इतकं साधं आहे ते. सतत अरेरावी आणि ऐकत नाही काय ! टेरीफ लावतो किंवा फंडिंग काढतो tantrum सहन करा! राजे साहेबांचं आहेत ते! अरे हाsड!

Pages