निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
https://www.theguardian.com
https://www.theguardian.com/us-news/2025/jan/30/trump-washington-dc-plan...
>>>>>https://www.theguardian
>>>>> https://www.theguardian.com/us-news/2025/jan/30/trump-washington-dc-plan...
पीट हेग्सेथ म्हणतायत: “विविधता/एकात्मता म्हणजे DEI चे युग संपले. आता फक्त उत्तम लोकांनाच संधी मिळणार. ”
जे डी व्हान्स म्हणतायत, "लोकं काम करण्यास सुयोग्य व प्रशिक्षित हवे. ट्राफिक कन्ट्रोलर्स जॉब करत बर्याच जणांनी अप्लाय केलेले पण त्वचेचा रंग/वंश आदि कारणांमुळे त्यांना डावलले. आणि आता शेकडो लोक त्या विमान कंपनी वरती खटला दाखल करतायत."
-------------------
What are the criticisms of DEI?
Critics say DEI programs are discriminatory and attempt to solve racial discrimination by disadvantaging other groups, particularly White Americans. But supporters and industry experts insist the decades-old practice has been politicized and is widely misunderstood.
--------------------
बिझनेस स्कुल्स मध्ये 'DEI' बिझनेस केस म्हणुन अभ्यासली गेली तर नवल वाटायला नको.
' पाथ' ट्रेन्स, बसेस, अन्य सबवे आदि दळणवळनाच्या साधनांमध्ये एक फ्लॅट रेट असतो. तुम्ही $३ चे तिकीट काढा व पहीला ते शेवटचा स्टॉप कुठेही उतरा. तर ही बिझनेस केस मुलीला होती. या 'फ्लॅट रेट' वाल्या उपक्रमामागे बराच विचार आहे. सहसा ज्या लोकांना भर सिटीत वगैरे जागा परवडत नाहीत असेच लोक दूर दूर विखुरले जातात. पण त्यांनाच सवलतीची जास्त गरज असते. त्यामुळे 'फ्लॅट रेट' ठेवलेले आहेत की ज्यायोगे निम्न मध्यम वर्गिय आदि लोकांना कमी पैसे पडावेत.
छान. आता काहीही वाईट घडले की
छान. आता काहीही वाईट घडले की ते बायडन च्या डिइआय धोरणामुळेच झाले ( कोण म्हटले काही प्रुफ लागते बोलायला? प्रेसिडेन्ट असला तर काय झालं ) आणि जे काही बरे घडेल ते माझ्यामुळे झाले हा सुंदर सोयिस्कर पावित्रा पुढची ४ वर्षे बघायचा आहे.
वान्स काय म्हणतोय ? त्वचेच्या रंगामुळे डावलले ? म्हणजे गोर्यांना ते गोरे म्हणून डावलले का
"उत्तम लोकांनाच" नोकर्या मिळणार - उत्तम म्हणजे कोण हे बघणे इन्टरेस्टिंग असावे. अमूक इतके लोक डिईआय च्या कोट्यातले भरलेच पाहिजेत हे एक टोक धरले तरी अमक्या नोकरीत स्त्रिया नकोत, गे/लेस्बियन, काळे, ब्राउन्स नकोत असे खुले आम डिस्क्रिमिनेशन चे परवाने दिले तर ते लंबकाचे दुसरे टोक !! ह्म्म, असो.
ते येडं डीईआय म्हणतंय तर आपण
ते येडं डीईआय म्हणतंय तर आपण हे लिहू.
On your 2ND DAY, you 1. Fired the head of the Transportation Security Administration, 2. Fired the entire Aviation Security Advisory Committee, 3. Froze hiring of all Air Traffic Controllers, 4. Fired 100 top FAA security officers.
धुर आणि जाळ संगटच होऊन जाऊ द्या. तिकडे अजुन प्रेतं ही निघालीत का नाही. नातेवाईकांना खबर पोहोचवली का नाही.. आपलं काय घेणं. आपण शिमगा खेळायचा! दे धमाल!
सरकारी डी ई आय म्हणजे एखाद्या
सरकारी डी ई आय म्हणजे एखाद्या विभागात नोकर भरती करताना व्यक्तीचे लिंग, त्वचेचा रंग, लैंगिकता अशा गोष्टी आधी विचारात घ्यायच्या.
वरून आदेश येतो की ह्या वर्षी इतके गे, इतके लेस्बो, इतके ट्रान्स, इतके काळे भरती झाले पाहिजेत. मग वरिष्ठांना खुश करायला त्या पदाची गुणवत्ता खाली आणली जाते. उदा. पोलिसात भरती व्हायला अमुक वेगाने अमुक अंतर धावता आले पाहिजे अशी अट असेल तर ती शिथिल करा. पण असे लोक नोकरीवर आहेत म्हणून गुन्हेगार कमी वेगाने धावत नाहीत.
ट्रान्स अग्निशमन कर्मचारी आहे म्हणून वारे कमी वाहत नाहीत.
कालच्या घटनेबद्दल अनेक प्रश्न आहेत. ह्या अत्यंत वर्दळीच्या विमान तळाजवळ सैनिकी सराव करणारे हेलिकॉप्टर का उडवत होते?
प्रशिक्षण करणारा /री चूक करण्याची शक्यता खूप असतें. तरी ह्या विमानतळावर रात्री हेलिकॉप्टर उड्डाणाचा सराव करण्याचा बिनडोक पणा का ?
त्या पायलट ने आत्मघातकी हल्ला करायचे ठरवले होते का?
त्या कंट्रोल टॉवर मधे पुरेसे कर्मचारी नव्हते. हे तिथल्या डी ई आय धोरणाचे फलित आहे का?
डी ई आय बद्दल जितका तिरस्कार निर्माण करता येईल तितका कमी आहे.
शेंडेनक्षत्र, तुमचे मुद्दे
शेंडेनक्षत्र, तुमचे मुद्दे वॅलिड आहेत, पण काल प्रेस काँफरंसमधे ट्रंपने डिइआय्चा विषय काढणं गरजेचं न्हवतं. आता दोन्हि कडुन या दुर्घटनेचं राजकारण केलं जातंय...
काल प्रेस काँफरंसमधे ट्रंपने
काल प्रेस काँफरंसमधे ट्रंपने डिइआय्चा विषय काढणं गरजेचं न्हवतं>>> +१
शेम ऑन एव्हरीवन हू इज पॉलिटिसाईजिंग धिस ट्रॅजेडी.
हेच जर दुसर्या बाजुच्या
हेच जर दुसर्या बाजुच्या प्रेसिडेंट नी गन वायोलेंस नंतर काही म्हटलं की लगेच बघा डेम्स कसे सगळं पोलिटिसाईझ करतात. पण तात्या म्हणाले की लगेच त्याचे महामुर्ख सपोर्ट्स लागले डि ई आय वर बोलायला.
मज्जाच मज्जा.
महामूर्ख म्हणण्यापूर्वी विचार
महामूर्ख म्हणण्यापूर्वी विचार केलाय का? ५०% हुन जास्त अमेरिकी लोकांबद्दल बोलताय तुम्ही.
अमित, माफ करा, स्लो लर्नर्स
अमित, माफ करा, स्लो लर्नर्स म्हणायला पाहीजे का?
फरक हा आहे की Democrats
फरक हा आहे की Democrats बंदुकांवर बंदी घालू धजत नाहीत. कितीही मोठे मताधिक्य असले तरी ते बंदीचे बिल पास करत नाहीत.
Trump ने पदावर येताच त्याने डी ई आय चे खूळ बंद केले..निदान त्याच्या अधिकारात येते तिथे.
ब्लॅक हॉक ऐकून बहुतेक
ब्लॅक हॉक ऐकून बहुतेक ट्रम्पला वाटले असेल डी ई आय अंतर्गत येत असतील ही हेलिकॉप्तर किंवा चालक. व्हाइट हॉक असते तर त्याने वेगळे स्टेटमेन्ट दिले असते.
हा हा हा! हसून हसून गडाबडा
हा हा हा! हसून हसून गडाबडा लोळू लागलो हा विनोद वाचून!
<<ब्लॅक हॉक ऐकून बहुतेक
<<ब्लॅक हॉक ऐकून बहुतेक ट्रम्पला वाटले असेल डी ई आय अंतर्गत येत असतील ही हेलिकॉप्तर किंवा चालक. व्हाइट हॉक असते तर त्याने वेगळे स्टेटमेन्ट दिले असते.>>
दुर्दैवाने हा विनोद नसून स्टेबल जिनिअस ने खरोखरच असं म्हटलं तरी नवल वाटणार नाही
ओल्याबरोबर सुकंही जळतं या
ओल्याबरोबर सुकंही जळतं या न्यायाने, काळ्यांबरोबर आपलाही बँड वाजणार आहे. आणि आपण सहसा, मुजोर नसतो. (सहसा लिहीतेय कारण परत कोणीतरी म्हणणार घाऊक तिरस्कार / प्रेम करु नका वगैरे वगैरे)
माझ्या अनुभवातील काही काळे मुजोर, बेमुवर्तखोर व एनटायटल्ड होते. अश्या लोकां मुळे DEI एक्स्प्लॉईट होत होते हे खरे आहे. माझा डेटा २० वर्षातील, २ पॉइन्टसचा फक्त आहे. पण ठोस आहे म्हणजे ह्युमन नेचर नव्हे तर आम्हाला कोणी हात तर लावुन दाखवा अशी अॅटिट्युड असलेला आहे.
स्लो लर्नर्स म्हणायला पाहीजे
स्लो लर्नर्स म्हणायला पाहीजे का? >> किती हा आशावादी विचार! तुम्हा डेम्सना अजुनही हे लोक लर्न करतील ही आशा वाटते???
>>. व्हाइट हॉक असते तर त्याने वेगळे स्टेटमेन्ट दिले असते. >> १००% सहमत. ह्यात विनोद नक्की काय आहे? कोणी समजावेल का?
रिपब्लिकन्स हे दुधसे धुले
रिपब्लिकन्स हे दुधसे धुले नाहीतच. पण आपल्या आपल्या प्राधान्यानुसार/ प्राथमिकतेनुसार प्रत्येक जण (मी) मत देतो. त्यामुळे रिपब्लिकन्स यांचे सर्वच पटते असा अर्थ नाहीच. त्यामुळ इथे दोन्ही बाजूंनी मी ढोल बडवणार आहे.
एकाच पक्षाशी पाप-पुण्य अगदी सर्वच्या सर्व बाबतीत आंधळ्यासारखे एकनिष्ठ राहण्यापेक्षा ते बरे.
ब्लॅक हॉक शब्द नीट लिहा रे
ब्लॅक हॉक शब्द नीट लिहा रे सगळ्यांनी.
नाहीतर टिटटॉक सारखं व्हायचं
रेसिजम चा लंबक उलट्या दिशेने
रेसिजम चा लंबक उलट्या दिशेने नेण्याचा जोरदार प्रयत्न Democrat कडून झाला. त्याचेच डी ई आय मधे रूपांतर झाले.
ह्यातूनच काळ्या लोकांना डोक्यावर बसवले जाते.
लोकसंख्येच्या १५% प्रमाणात असूनही ९०% जाहिरातीत काळे हवेत असा नियम बनला आहे की काय असे वाटते.
अनेक रॅप गाणारे इतके हिडीस आणि अश्लील गाणी गातात की शहारे येतात. पण काळे असले तर बळजबरीने त्याला चांगलेच म्हणायचे.
काळे गँग मेंबर एकमेकांना आणि अन्य उपस्थितांना रोज गोळ्या घालून मारत असतात. शिकागो, ओकलंड इ पण एखाद्या गोऱ्याने, गोऱ्या पोलिसाने काळ्या व्यक्तीला मारले तर जगबुडी आल्यागत बोंब मारणे.
असेच चालू राहिले तर तो लंबक पुन्हा उलट दिशेने जाणार हे नक्की.
शेन्डे, हायरिंग चे तरी समजून
शेन्डे, हायरिंग चे तरी समजून घेऊ म्हटले तरी जाहिराती आणि गाणी यात कसले डिईआय?

काहीं आर्थिक संस्था ज्या
काहीं आर्थिक संस्था ज्या प्रचंड धनाढ्य आहेत त्या कंपन्यांच्या डी ई आय स्कोर कडे बारीक लक्ष ठेवून असतात. जाहिरातीत पुरेसे डी ई आय नसले तर त्या कंपनीचा स्टॉक किंवा अर्थपुरवठा योग्य प्रकारे नियंत्रित केला जाऊ शकतो.
गाण्याचे म्हणाल तर तोंड उघडून ही आणि असली दळभद्री गाणी मला आवडत नाहीत असे म्हणणे रेसिस्ट समजले जाते.
अजून इथे कुणि असे कसे लिहीले
अजून इथे कुणि असे कसे लिहीले नाही, की तो अपघात झाला याचे कारण हेलीकॉप्टरचा पायलट, विमानाचा पायलट नि एअर ट्रॅफिक कॉन्ट्रोलर सगळे काळे , ट्रान्स्जेंडर,डिसेबलेड होते.
असे उगीचच लिहायचे, मग काही लोक हो म्हणतात, काही नाही म्हणतात, मग लग्गेच त्रंप्या म्हणतो "बरेच लोक असे म्हणतात!!"
गाण्याचे म्हणाल तर तोंड उघडून
गाण्याचे म्हणाल तर तोंड उघडून ही आणि असली दळभद्री गाणी मला आवडत नाहीत असे म्हणणे रेसिस्ट समजले जाते. >> गाण्यांबद्दल कशाला बोलायला हवे, शेंडेनक्ष्त्र तुझे नॉर्मल बोलणे ऐकून/vaachUn कोणीही तोच निष्कर्ष काढणार.
व्हाइट हॉक असते तर त्याने वेगळे स्टेटमेन्ट दिले असते. >> टण्या
ब्लॅक हॉक जोक जिमि किमेलचा
ब्लॅक हॉक जोक जिमि किमेलचा आहे, माझा नाही!
>>
>>
गाण्याचे म्हणाल तर तोंड उघडून ही आणि असली दळभद्री गाणी मला आवडत नाहीत असे म्हणणे रेसिस्ट समजले जाते. >> गाण्यांबद्दल कशाला बोलायला हवे, शेंडेनक्ष्त्र तुझे नॉर्मल बोलणे ऐकून/vaachUn कोणीही तोच निष्कर्ष काढणार. Wink
<<
मुद्दे सुचत नसले की एकेरीवर येऊन वैयक्तिक शिवीगाळ करणे हे आपल्या वृत्तीला सुसंगत आहे.
मी लिहिलेल्या प्रकाराला
मी लिहिलेल्या प्रकाराला शिवीगाळ म्हणाल तर तू बायडन बद्दल लिहितो ते नक्की काय आहे ह्याचा कधी विचार करून पहा. शेंडेनक्षत्र इतरांच्या भाषेबद्दल तू आक्षेप घेणे ह्याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. समर्थांनी सांगितलेले आहेच ना कि ठकासि व्हावे महाठक, तसे तुझ्या सारख्या विकृत लिखाण करणार्या व्यक्तीशी तसेच बोलायला हवे.
मी बायडनला शिवीगाळ करणार कारण
मी बायडनला शिवीगाळ करणार कारण तो एक राजकारणी आहे. देशाचा नेता होता. अमुक एक लस घेतली नाही तर माझी नोकरी जाणार हे ठरवणारा होता. अनेक भयानक धोरणे राबवून माझे जगणे नरक करणारा होता. लोकशाहीतील नेत्याला सकारण शिव्या देण्याचा मला हक्क आहे..
बेबंद कारभार, भ्रष्टाचार, खोटारडेपणा ह्या गोष्टीवर टीका करताना मी का म्हणून सौम्य भाषा वापरू? बायडन व्यक्ती म्हणून काय आहे हे मला माहीत नाहीं माझा त्याच्याशी काहीही संबंध नाहीभविष्य. पण नेता म्हणून तो जेव्हा माझे आयुष्य कसे जगावे, माझ्या पोरा बाळांचे उध्वस्त करतो तेव्हा मी जहाल भाषा वापरणार.
किंबहुना विविध धाग्यांचा तो विषयच आहे. एखादा सदस्याला शिव्या घालण्याचा धागा असल्यास तिथे त्याला शिवीगाळ करणे समर्थनीय म्हणता येईल.
मी आपणहून कुठल्याही सदस्याला शिवीगाळ केलेली नाही. पण अंगावर आला तर शिंगावर घेतला जाईल.
“ मी बायडनला शिवीगाळ करणार
“ मी बायडनला शिवीगाळ करणार कारण तो एक राजकारणी आहे. देशाचा नेता होता” - कैसी पवित्र भाषा, कैसे पवित्र विचार!!!
<<<गोऱ्या पोलिसाने काळ्या
<<<गोऱ्या पोलिसाने काळ्या व्यक्तीला मारले तर जगबुडी आल्यागत बोंब मारणे.>>>
मी थक्क झाले हे वाचल्यावर. हे आर्ग्युमेंट असु शकत? ते ही लोकशाही मध्ये?
एखादी व्यक्ती गुन्हेगार आहे अथवा नाही आणि असल्यास सदर गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीला काय शिक्षा व्हायला हवी हे ठरवणे हे पोलिसांचे कर्तव्य नाही आणि ते करण्याचा त्यांना अधिकारही नाही. कायद्याच्या रक्षकांनी कायदा हातात घेऊ नये, घेतल्यास ते कृत्य "गुन्हा" समजले जाते, इतक्या प्राथमिक गोष्टीची कल्पना त्या पोलिसांना आणि त्यांच्यावर अन्याय होतो आहे असे मानणाऱ्या त्यांच्या समर्थकांना नसावी?
<<<मुद्दे सुचत नसले की
<<<मुद्दे सुचत नसले की एकेरीवर येऊन वैयक्तिक शिवीगाळ करणे हे आपल्या वृत्तीला सुसंगत आहे.>>>
हे सगळे असे करणे लोक त्रंप्याकडूनच शिकले हो.
Pages