निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
कालची गम्मत.
कालची गम्मत.
एक्स फॉक्स होस्ट असणे हे मेजर क्वालिफिकेशन असलेल्या हेगिसेथ ने करियर जनरल्सना वोक असण्यासाठी फायर केलं.
मज्जाच मज्जा. असो….आले राजाजीच्या मना!!
लाँग लिव्ह द किंग !
वोक टेस्ट काय असते बाकी?
वोक टेस्ट काय असते बाकी? लिटमस टेस्ट सारखी अभ्यासक्रमात घालून टाकू.
अरर.. डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनला आधीच सुरुंग लावला ना! मरो!
अंडी आणि गॅसचे भाव कमी झाले
अंडी आणि गॅसचे भाव कमी झाले का हो ? २ डॉलर वर अंडी आली का ?
एखाद्या चित्रपटाचा रिमेक बघत
एखाद्या चित्रपटाचा रिमेक बघत असल्या सारखे फिलिंग येत आहे मला.
)
(बहुतेक मला स्वतःला जाणवते त्यापेक्षा बराच जास्त बायस्ड झालोय मी.
When Modi, Trump and I talk,
When Modi, Trump and I talk, we are called threat to democracy :Meloni
तिकडे काय रिऍक्शन आहे यावर?
अंडी आणि गॅसचे भाव कमी झाले
अंडी आणि गॅसचे भाव कमी झाले का हो ? २ डॉलर वर अंडी आली का ?
>>> अंडी ५ डॉलरला डझन मिळाली परवा ट्रेडर जोज् ला . गॅस साडेचार झालाय . कधी स्वस्त होणार?
१ डाउन, २+ टु गो...
१ डाउन.. २+ टु गो...
अंडी इतक्या लवकर स्वस्त होतील
अंडी इतक्या लवकर स्वस्त होतील अशी लक्षणे दिसत नाहीत. त्यावरून भरपूर रडून घ्या!
आमच्यासारखे ह्या गोष्टींवर खूश आहोत.
सीमारेषा सुरक्षित होत आहे. गुन्हेगार घुसखोरांच्या मुसक्या बांधून हाकलून दिले जात आहे.
बेबंद सरकारी खर्च तपासणारी एक यंत्रणा काम करत आहे आणि नको त्या खर्चाला कात्री लावत आहे.
सरकारी पातळीवर फक्त दोन लिंगे पुरुष आणि स्त्री इतकीच मानली जात आहेत.
वोकिज्म, डी ई आय ही विशेषणे शिव्या बनू लागली आहेत.
<< कॅनडाचे बरे चालू आहे? अनेक
<< कॅनडाचे बरे चालू आहे? अनेक लोक रडत आहेत की जन्मभर दोन तीन जॉब करत राहिले तरी एक घर विकत घेता येईल अशी परिस्थिती नाही. युट्युबवर अनेक कॅनडाचे रहिवासी यावरून शिव्या शाप देत आहेत. कॅनडात येऊ इछुकांना धोक्याचे इशारे देत आहेत!
चांगले आहे! करा एन्जॉय! >>
----- गेल्या चार आठवड्यांतला सावळा गोंधळ बघितल्या नंतर अनेक अमेरिकन नागरिक पण शिव्या देत आहेत. लाज वाटत आहे आणि सॉरी फिल करत आहेत. पण आता पश्चाताप करुन काय उपयोग?
<< को लॅटरल डॅमेज किती होईल
<< को लॅटरल डॅमेज किती होईल ते फक्त बघायचं. >>
------ कॅनडाचे माजी पंतप्रधान हार्पर " Canada should accept any level of damage to preserve its independece ... "
<< अंडी आणि गॅसचे भाव कमी झाले का हो ? २ डॉलर वर अंडी आली का ?
>>> अंडी ५ डॉलरला डझन मिळाली परवा ट्रेडर जोज् ला . गॅस साडेचार झालाय . कधी स्वस्त होणार? >>
------ मस्क च्या हाती कारभार आहे, कार्यतत्परता वाढल्यावर घरटी $५००० DOGE Divident check मिळणार आहे. आता संडे हो या मंडे रोज खओ अंडे अशी परिस्थिती असेल.
शुक्रवारी मेल पाठविला होता ना, मागच्या आठवड्यांत काय केले याबाबत ४८ तासांत रिपोर्ट करा म्हणून , “Please reply to this email with approx. 5 bullets of what you accomplished last week and cc your manager.” हे खरे असेल तर तो चेक आता धावत येणार आहे. कित्ती पैसे वाचतील.
आणि सगळ्यांनी मेल आयडी HR@opm
आणि सगळ्यांनी मेल आयडी HR@opm.gov ला मेल पाठवायची आहे. तुमच्या बॉसला नाही. सगळा येड्याचा बाजार आहे. मेल वाचून, तिचा उगम पडताळून, त्यातील कामाची छाननी करून डायरेक्ट फायर केल्याच्या मेल्स उलट टपाली एआय कडून पाठवल्या जाणार आहेत.
एफबीआयला पण मेल गेलेल्या. काय काम केलं त्याचा रिपोर्ट भलत्या ठिकाणी पाठवा.
या मस्कला काही ऑथोरिटी नाही असं व्हाईट हाऊस कोर्टात सांगते. 
<< तुमच्या बॉसला नाही. >>
<< तुमच्या बॉसला नाही. >>
----- बॉस cc मधे आहे ना?
ती ईमेल स्पॅम ईमेल असेल असेच
ती ईमेल स्पॅम ईमेल असेल असेच वाटले मला
इतकी मूर्खपणाची आहे.
खरोखरच ५ बुलेट पॉइन्ट्स मागवलेत ? सरकारी नोकर किती लाखांनी असतील , या सग़ळ्यांनी अगदी खरोखर पाठवल्या ईमेल्स असे धरले तरी त्या पाठवलेल्या लाखो ईमेल्स चे हे लोक करणार काय? कसे व्हेरिफाय करणार खरे की खोटे, योग्य की अयोग्य ? बाकी गोपनीयता , ऑथॉरिटीसंदर्भात प्रोटोकॉल्स वगैरे आता चुलीतच गेले आहे असे धरून चालू. धन्य धन्य!!
इथल्या ट्रंप सपोर्टर्स ना इलॉन मस्क, त्याला कुठेही कसाही अॅक्सेस, अधिकार असणे याबद्दल काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल. की "ट्रंप साहेबांनी नेमलाय म्हणाजे योग्यच असणार" असे लॉजिक (?) आहे?
पण नेमलाय का नक्की? तो DOGEचा
पण नेमलाय का नक्की? तो DOGEचा हेड नाही म्हणतायत ना?
शेंडा ना बुडखा प्रकार आहे.
शेंडा ना बुडखा प्रकार आहे.
किती मल्टिपल लेव्हल्सवर हे यडचाप ते क्रिमिनल आहे. ते असो. डिसरप्टिव्ह आहे ना? बास!
>>तो DOGEचा हेड नाही म्हणतायत ना? >> ते फक्त कोर्टात सांगायला हो! बाकी नॉन डिमविट लोक सांगतीलच.
कॉमन सेन्स आहे कि महिनाभरात
कॉमन सेन्स आहे कि महिनाभरात मस्क नि टेक ब्रो लोकांना आयुष्यभरात माहित नसलेल्या सिस्टीममधले दोष सापडले ह्यातच काहितरी गंडते आहे असे वाटत नाहि का ?
अमेरिकन सरकारमधे अंदाधुंद आहे
अमेरिकन सरकारमधे अंदाधुंद आहे. प्रचंड भ्रष्टाचार आहे. ढिसाळपणा आहे. करदात्यांचे अब्जावधी डॉलर्स कचर्यात ओतून दिल्यासारखे वाया जात आहेत.
कुणीतरी हे हातात घेणे आवश्यक आहे. मस्क जे काही शोधून काढतो आहे त्याबद्दल बोलण्याऐवजी त्याने निळे ग्लोव्ह न घालता पांढरे घालून हे का शोधले? ३०-३५ वर्षाचे लोक न नेमता १८-२५ वयोगटातले तरुण का नेमले वगैरे अगदी गैरलागू मुद्दे काढून आकांडतांडव करत आहेत.
राजकीय दलदलीत रुतलेले राजकीय नेते अशा कामासाठी नेमले असते तर त्यांनी ह्यात सुधारणा केली नसती. त्यामुळे बाहेरचा कुणीतरी आणूनच ही घाण साफ केली पाहिजे.
इथे कितीही बोंबा मारणारे मायबोलीकर असले तरी बहुतेक अमेरिकन या गोष्टीबद्दल समाधानी आहेत. आणि ट्रंपने निवडणुकीत हे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन तातडीने पाळताना पाहून अनेक ट्रंप विरोधकांचे पित्त्त खवळलेले दिसते आहे. हरकत नाही. इथल्या बहुतेकांनी ट्रंपला मतच दिलेले नाही त्यामुळे अपेक्षाभंगाचा प्रश्नच येत नाही!
>>> करदात्यांचे अब्जावधी
>>> करदात्यांचे अब्जावधी डॉलर्स कचर्यात ओतून दिल्यासारखे वाया जात आहेत.
मस्कच्या टीमला शून्ये मोजता येत नाहीत हे दिसलं आहेच, आता कोट्यावधी म्हणा नाहीतर अब्जावधी - कोण मनावर घेणार?
" We will make mistakes..."
" We will make mistakes..." मस्क उवाच
https://youtu.be/UNiuL0_CGio?si=AeswXvKQc8D4_CJz
>>
>>
मस्कच्या टीमला शून्ये मोजता येत नाहीत हे दिसलं आहेच, आता कोट्यावधी म्हणा नाहीतर अब्जावधी - कोण मनावर घेणार?
>>
एक हिशेब चुकला. मान्य. पण बाकीच्या हिशेबांचे काय? त्यात तर चूक नाही?
एखाद्या छिद्रान्वेषी कावळ्याप्रमाणे निव्वळ दोषच बघणार का?
कुठल्याशा परक्या देशात ट्रान्स आणि lgbtqa+-/* विचारांचा प्रसार करायला लक्षावधी डॉलर ओतणे ह्यातून अमेरिकेचे काय भले होणार आहे? आणि असल्या वाया जाणार्या अनेक लक्षावधी डॉलर थेंबांचे अब्जावधी कधी बनतात ते कळणारही नाही!
नेहेमी प्रमाणे निर्णय मागे
नेहेमी प्रमाणे निर्णय मागे घेतला. आता त्या इमेलला रिप्लाय करायची गरज नाही. आणि केलात तर तो रिप्लाय परदेशी शत्रू वाचत असेल हे लक्षात ठेवून करा असं आता अॅडमिनिस्ट्रेशन सांगतंय.

ट्रंपने घेतलेला एक तरी निर्णय टिकलेला कोणाला आठवतो का हो? सगळी बडबड आणि मग वॉक बॅक. पहिल्या चार वर्षा प्रमाणे आता ही एकही मिनिंगफुल बिल पास होईल याची शक्यता शून्य आहे. इक्झिक्युटिव्ह ऑर्डर ही टिकेना.
काय फरक पडतो! घोषणाच काय ती
काय फरक पडतो! घोषणाच काय ती महत्त्वाची, तीच लक्षात राहते ! तेवढ्याने त्याच्या भाबड्या वोटर्स ना रामराज्य आल्याचे स्वप्न पडतेय ते वाचले ना वर
बाकीच्या हिशेबांचे काय? त्यात
बाकीच्या हिशेबांचे काय? त्यात तर चूक नाही? >> शेकडो हजारो सरकारी यच्चयावत खात्यात काम करणार्या वरपासून खालपर्यंतच्या लोकांना तुम्ही काय करता हे साक्षात राजा एका फडतुस मेलवर पाठवायला सांगतो. आणि यात काहीच चूक नाही. अशी मेल आली तर ती स्मॅम म्हणून रिपोर्ट करायला आम्हाला तरी शिकवलं आहे. अमेरिका सगळंच ग्रँड करते स्टुपिडिटी ही टेक्सस बिग!
फक्त केओस निर्माण करुन न्युज
फक्त केओस निर्माण करुन न्युज सायकल मधे रहाणे व राजाच्या स्लो लर्नर डिमविट समर्थकाना विदुषकाकरवी गुंतवून ठेवणे एवढाच उद्देश असल्यामुळे सब चलता है.
लाँग लिव्ह द किंग अँड हीज प्रेसिडेंट!!
<< ट्रंपने निवडणुकीत हे
<< ट्रंपने निवडणुकीत हे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन तातडीने पाळताना पाहून अनेक ट्रंप विरोधकांचे पित्त्त खवळलेले दिसते आहे. >>
हे साफ खोटे आहे,,
आश्वासन तातडीने पाळणे याबद्दल विरोधकांना राग नाही, पण दुसरेहि आश्वासन की inflation कमी करून जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करीन, ते पाळण्यासाठी काही होताना दिसत नाहीये. त्याची काळजी आहे.
मस्कसारख्या श्रीमंत लोकांच्या हातात सत्ता गेल्यावर हे असेच होणार. त्यांना काय कल्पना की देशात अनेक गरीब लोक पण रहातात, नि त्रंप्याला मते देणारे गरीब दक्षिणे कडील राज्यांत रहाणारे ( शिक्षणामध्ये फारच मागासलेले) लोक अनेक. ते बहुधा welfare नि food stamps वर जगणारे ( ज्यासाठी लागणारा सरकारी पैसा बहुधा पुढारलेल्या डेमोक्रॅटिक राज्यांतूनच येतो.) असे आहेत, त्यांना पण वाढलेल्या भावाचे देणे घेणे नाही. पण जे इमाने इतबारे नोकरी करतात, कर भरतात, त्यांची काय ओढाताण होते ते मस्क सारख्यांना काय कळणार?
<< इक्झिक्युटिव्ह ऑर्डर ही
<< इक्झिक्युटिव्ह ऑर्डर ही टिकेना.>> अहो, गल्फ ऑफ मेक्सिको चं गल्फ ऑफ अमेरिका झालंना. केवढा महत्वाचा निर्णय घेतला बरं राजांनी.
बाकी महत्वाच्या ईओ आणि टेरीफ मागे घ्यावे लागले किंवा कोर्टाने हाणून पाडले ते सोडा. त्याच्या मूर्ख समर्थकांना काही दिवस मजा आली. त्यानी टाळ्या वाजवल्या, अजून काय पाहिजे असतं
विदूषकालाराजाला!फक्त गुन्हा असलेले इल्लिगलच डिपोर्ट करू अस म्हणाले होते. पण सरसकट सगळे गोरी कातडी नसलेले इलिगल्स पकडले जातायेत. आतातर ग्रिन कार्ड होल्डर्सना सुद्धा जर गोरी कातडी नसेल तर एयरपोर्ट वर एक्स्ट्रा क्वेस्शनिंग केलं जातंय. आणि त्याच्या इथल्या समर्थकांना वाटतय की आपण सुरक्षित आहोत. पण ही मागाची द्वेषाची आग कधीतरी त्याच्यापर्यंत पोहोचणारच आहे.
<<मस्कच्या टीमला शून्ये मोजता
<<मस्कच्या टीमला शून्ये मोजता येत नाहीत हे दिसलं आहेच, >>
तसे नाहीये, ते अलंकारिक वाक्य आहे - त्याला अतिशयोक्ति अलंकार असे म्हणतात. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असे करतात. आचार्य अत्रे हा अलंकार नेहेमी वापरत. पण लोकांना ते कळत नाही. जसे त्रंप्याने करोनाबद्दल जे काय (उपहासाने) म्हंटले होते तेहि लोकांना न कळल्यामुळे टीका झाली होती.
लक्षात ठेवा - त्रंप्याचे लोक स्टेबल जिनियस आहेत. तसे खुद्द त्रंप्यानेच म्हंटले आहे. म्हणजे straight from the horse's rear end (sorry), mouth.
विनायक, सहमत.
विनायक, सहमत.
<< मस्कच्या टीमला शून्ये
<< मस्कच्या टीमला शून्ये मोजता येत नाहीत हे दिसलं आहेच, आता कोट्यावधी म्हणा नाहीतर अब्जावधी - कोण मनावर घेणार?
>>
एक हिशेब चुकला. मान्य. पण बाकीच्या हिशेबांचे काय? त्यात तर चूक नाही? >>
----- येथे चूक करणारा DEI उमेदवार नव्हता, नाहीतर त्यांच्या विरुद्ध रान उठविले गेले असते.
बेकायदा घुसखोरांची समस्या
बेकायदा घुसखोरांची समस्या बायडन नामक भ्रष्ट आणि बुद्धीभ्रष्ट माणसाने निर्माण केली. आता त्यावर उपायही जालीम असणार. जर कुठल्या ग्रीन कार्ड होल्डरला त्याची/तिची कागदपत्रे दाखवायला सांगितली तर काय आकाश कोसळते काय? उगाच निरर्थक बागुलबुवा करायची काय गरज आहे?
जर देशाचे नागरिक नसाल तर कागदपत्रे, त्यांची फोटोकॉपी काहीतरी जवळ ठेवा. प्रत्येक माणसाकडे स्मार्ट फोन असतो. त्यात आपल्या ग्रीन कार्ड किंवा अन्य कुठल्या अधिकृत कागदाचा फोटो बाळगणे म्हणजे अशक्य कष्टाचे काम वाटू लागले काय? कमालीचा ट्रंप डिरेंजमेंट सिंड्रोम बरा व्हायला तयार नाही उलट बळावतोच आहे.
युक्रेनमधील निरर्थक, अनंतकाळ चालणारे, अमेरिकेच्या खिशावर बोज टाकणारे युद्ध संपवायला मागच्या म्हातार्याने काही केले नाही. हा म्हातारा काहीतरी प्रयत्न करतो आहे. तरी त्यावरही टीका.
एकंदरीत डेमोक्रॅटिक पक्ष डोके गमावलेले कोंबडे जसे वेड्यासारखे वाट्टेल तिथे धावते तसे (आणि त्या पक्षाचे समर्थक) वागतो आहे. नक्की कशाला विरोध करतो तेच त्यांना कळत नाही. पारंपारिक डेमोक्रॅट युद्ध विरोधी आहेत. पण ट्रंप युद्ध थांबवतो आहे त्याला विरोध.
अतिरेकी ट्रान्स, गे, लेस्बियन विचार लोकांन्च्या माथी मारणे लोकांना आवडत नाही असे वारंवार दिसत असून त्यालाच चिकटून बसणे. ट्रंपने आश्वासन दिल्यानुसार खणखणीत पावले उचलून हा आचरटपणा थांबवला आहे.
Pages