डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळ्या व्यक्तीस मारले हे झाले टोकाचे उदाहरण. त्या टोकापर्यंत जाणार्‍या अगणित केसेस दुर्लक्षित रहातात. . On the Run: Fugitive Life in an American City हे पुस्तक आफ्रिकन अमेरिकन तरुणांवर, पोलिस करत असलेल्या अन्यायाचे, विदारक आणि सत्य चित्र रेखाटतं, असे ऐकून आहे. जरुर वाचावे असे.

पोलिस सरसकट तमा न बाळगता, गुन्हा असो नसो, काळ्या तरुणांना डांबतात. हा टेड टॉक - https://www.ted.com/talks/alice_goffman_how_we_re_priming_some_kids_for_...
एकदा तुरुंगाचा शिक्का लागला की त्या तरुणाचे भविष्य धोक्यात येतेच. मग ते फ्युचर जॉब करता असेल, किंवा कसेही. पोलिसांवरचा वचक काढून टाकला तर रक्षक, भक्षक व्हायला वेळ लागणार नाही.
--------------------- अवांतर -------------------------------
मी मधे स्टेट जॉब करत असतेवेळी हा नकारात्मक पैलू वाचनात आला - काळ्या मुली वयापेक्षा मोठ्या दिसतात (आपल्याकडे थोराड म्हणतात का? की थोराड शब्दाला नकारात्मक छटा आहे?). त्यांना तसे वागवलेही जाते. या प्रकाराला म्हणातात - अ‍ॅडल्टिफिकेशन बायस.

The phenomenon of adultification involves perceiving African American girls as more mature than their actual age, leading to expectations of greater responsibility, less need for protection, and harsher disciplinary actions. Black girls are perceived as being more responsible for their actions, aggressive, angry, and more knowledgable about sex.

माझ्या मते त्यांनी गुन्हा केला आणि दुसऱ्या देशाचा कायदा तोडला त्यामुळे आम्हाला ठराविक एका प्रकारेच डिपोर्ट करायला हवे होते हे सांगायचा अधिकारच त्यांना उरत नाही...उरता उरला प्रश्न भारताने मध्यस्थी करुन अधिक सोईची व्यवस्था करण्याची तर माझ्या मते इतर कोणत्याही देशाचे कायदे तोडून अनधिकृतपणे तिथे रहाणाऱ्यांसाठी भारताचे पंतप्रधान म्हणून मोदींनी बिलकूल शब्द टाकू नये अथवा आपण अशा लोकांची पाठराखण करतो हे कोणत्याही कृतीतून दाखवू नये ( इथे हे ओपन ॲंड शट प्रकरण आहे हे खास करुन लक्षात घेणे गरजेचे आहे, unlike Quatar incident ) त्या लोकांना ते जे करत होते त्या गुन्ह्याची आणि त्याच्या परिणामांची पुरेपूर कल्पना होती, जेव्हा होणाऱ्या परिणामांची कल्पना असूनही व्यक्ती एखादा गुन्हा करतो तेंव्हा एक तर तो निर्ढावलेला गुन्हेगार असतो अथवा त्याने त्याअन्वये होणाऱ्या परिणामांचे पुर्ण दायित्व स्विकारलेले असते.... त्यामुळे इतर कुणालाही (खासकरुन या बाबतीत स्वदेशाला) त्या परीणामांच्या दायित्वाचे ओझे बाळगण्याचा प्रश्नच उरत नाही.

>>> माझ्या मते त्यांनी गुन्हा केला आणि दुसऱ्या देशाचा कायदा तोडला त्यामुळे आम्हाला ठराविक एका प्रकारेच डिपोर्ट करायला हवे होते हे सांगायचा अधिकारच त्यांना उरत नाही

अचूक! अनुमोदन!

अवैधरित्या आलेल्या बद्दल सहानुभूती नाही पण, ५० लाख ते १ कोटी रुपये करून त्या लोकांना पाठवणारी दुकानदारी सरकार ने कारवाई करून बंद करायला हवी.

ह्या लोकांचे पैसे ही गेले आणि स्वप्नही गेलं.

दोन्ही देशातील सरकारांनी थोडी मानवीय वागणूक द्यायला हवी होती असाही वाटत.

दोन्ही राईट विंग सरकारं. लॉजिकची बोंब आणि दिखाव्याची हाव. मग दहापट जास्त पैसे गेले तरी चालेल, पण डिफेंसची विमानं वापरणार आणि गाजावाजा करणार. असं विमानाने बेकायदा नागरिक परत पाठवणे कायम होतच होतं. पण त्याची अशी बातमी होती का? नाही.
त्याच्या मतदारांना ते आवडतं तर तो तेच करणार ना? मूल्ये आणि नीतितत्त्वे याबाबत आता न बोललेलंच बरं.
याने जरब बसली तर! असा विचार करुन वाईटात चांगले शोधायचे आपण.

भारतात पाठवण्याऐवजी कॅनडात एअरड्रॉप करायला हवे होते वाटतं. मग ह भ प त्रुडोबुवा आणि कनवाळू कॅनडावासीयांनी त्यांना कवेत घेतले असते.

फा वि द डि यांना +१! देशी असले तरी कायदे तोडणार्‍यांना किंवा इल्लीगली येऊ पाहाणार्‍यांना सिंपथी नाही. साखळ्यांमधे बांधणे हे ओवर द टॉप वाटते पण विमानात इतक्या जणांत एकच टॉयलेट होते वगैरे तक्रारी वाचून थक्क झाले. व्हॉट वेअर दे एक्सपेक्टिंग ? बिझिनेस क्लास ट्रॅवल ? Proud गल्फ वॉर मुळे भारताने विमाने पाठवून आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणले त्या रेस्क्यू ऑपरेशन चा या घुसखोरांच्या डिपोर्टेशन शी काहीच संबंध नाही.
मिडियाने पण अशा लोकांना विक्टिम दाखवणार्‍या सहानुभूती पूर्ण स्टोर्‍या देऊ नयेत. आजच लोकसत्ताच एक स्टोरी दिसते आहे. कसे मूर्ख लोक असतात! १ कोटी रुपये फक्त कॅलिफिर्निया मधे नातेवाईकांकडे सोडण्याचे दिले म्हणे!!

अवैध स्थलांतरितांना पाठवणारी ही दुकाने कुठे आहेत?
प्रति व्यक्ती पन्नास ते सत्तर लाख रुपये.
https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/india-news/illegal-i...

बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या एक लाख पेक्षा जास्त आहे. गृहीत धरा, एक लाख आहे, तर तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आहे.

जिथे उजळ माथ्याने जिथे राहाता येईल तिथेच राहावे माणसाने. अवैधपणे अमेरिकेत जाऊन राहायचा हव्यास कशाला? अवैधपणे जाऊन नोकऱ्या मिळतात का तिथे? वैध कागदपत्रच नाहीत तर कधी भारतात यायचे असेल तर कसे येतात?

एजंट्सचे पण investigation होणार आहे. त्यांचीही दुकाने बंद होतील.

Civil war किंवा दुष्काळासारख्या कारणामुळे लोक जगण्यासाठी इतर देशात जातात व legally refugee म्हणून राहतात. तसं तर ह्यांचं नाहीये.

तेच लाखो, कोटी रुपये गुंतवून इथे एखादा हमखास चालणारा बिझिनेस करता आला असता. पण नाही! हा गेला तो गेला... मग मी पण जाणार.

फाविदडी ह्यांना पूर्ण अनुमोदन.

मला देवयानी खोब्रागडेची केस आठवते. गुन्ह्याचे समर्थन करू नका, परंतु आपण मानवतेचा आग्रह धरू शकता.

गेल्या वर्षीही अमेरिकेने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या शेकडो भारतीयांना परत पाठवले- त्यांनी नागरी विमाने वापरली.

भारताने आधीच योग्य भूमिका घेतली आहे - या लोकांना स्वीकारण्याची तयारी. आता मुत्सद्देगिरी वापरा.

<<भारतात पाठवण्याऐवजी कॅनडात एअरड्रॉप करायला हवे होते वाटतं. मग ह भ प त्रुडोबुवा आणि कनवाळू कॅनडावासीयांनी त्यांना कवेत घेतले असते.>> अनुमोदन.
पण त्या आधी त्या लोकांना दाढ्या मिश्या नि फेटे घालून पाठवायला हवे होते. मग ट्रुडो स्वतः फुलांचे हार घेऊन त्यांच्या स्वागताला आला असता.

<< अवैधपणे जाऊन नोकऱ्या मिळतात का तिथे? >>
इथे अनेक भारतीयांचे अनेक व्यवसाय आहेत, दुकाने, मोटेल वगैरे. तिथे बरेचसे भारतीय कामाला असतात - बहुधा मालकाचे नातेवाइक, ज्यांना वेगळ पगार, घर वगैरे ची गरज नसते. मुले परदेशी गेल्यावर भारतात रहाण्यापेक्षा मुलांजवळ रहावे म्हणून.

झक्की, पण ते वैध मार्गाने येत असतील ना? मग ठीकच आहे की.

अवैध मार्गाने येवून सरकारी कागदपत्रे मिळवणे सोपे नसावे अमेरिकेत असे वाटले.

पण आता ज्या कठोर पद्धतीने परत पाठवले आहे ते पाहता ह्या पुढे असा विचार करणाऱ्यांना जरब बसावी अशी अपेक्षा.

पण आता ज्या कठोर पद्धतीने परत पाठवले आहे ते पाहता ह्या पुढे असा विचार करणाऱ्यांना जरब बसावी अशी अपेक्षा.>>> जरब बसावी म्हणूनच चाललय हे!! इतर देशाच्या नागरिकाना सुद्धा असच पाठवल आहे.

अवैधपणे जाऊन नोकऱ्या मिळतात का तिथे? वैध कागदपत्रच नाहीत तर कधी भारतात यायचे असेल तर कसे येतात?>>>> लिगल नोकर्‍या वैगरे मिळत नसतातच, इथे पन्जाबी,गुजराथी लोक पेट्रोलपन्प, ग्रोसरी स्टोअर, ढाबे, रेस्टॉरट, मोटेल याच्या चेन ओन करतात तिथे हे लोक काम करतात..असच करुन टिकुन राहतात..पुढे कधितरी मालकच सिटिझन असला/झाला की याच्या व्हिसाचा जुगाड जमवतो..अमेरिकेतही भ्रष्टाचार आहेच..

जे लोक अवैध मार्गाने गेले ते वैध मार्गाने भारतात येतच नाहीत...तिथेच राहतात...परतिचे मार्ग बन्दच असतात.

तेच लाखो, कोटी रुपये गुंतवून इथे एखादा हमखास चालणारा बिझिनेस करता आला असता. >>>>गुजराथी,पन्जाबी आणी आन्ध्राइट या लोकामधे यु एस मधे येण्याची प्रचन्ड क्रेझ आहे..ते इथे येण्यासाठी आणी टिकुन राहण्यासाठी काहीही करतिल.

सरकारी कागदपत्रे मिळवणे सोपे नसावे >> सावळागोंधळ आहे.
उदा. न्यूजर्सी मध्ये काही काळ अवैध लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत होते. इतर अनेक राज्यांत कालपरत्त्वे वेगवेगळे कायदेकानूद आणि केंद्र राज्य असले प्रकार आहेत. कॅश जॉबला कागदपत्रे लागत नाहीत. न्युयॉर्क न्यूजर्सीत रेस्टॉरंट मध्ये काम करणारे, देसी दुकानांत काम करणारे, गॅस भरणारे .... एका वर्षांत कॅनडा आणि मेक्सिको सीमेवरुन अवैध बॉर्डर क्रॉस करताना सव्वा लाखापेक्षा जास्त भारतीय लोकांना पकडलं. न पकडलेले भारतीय आणखी किती असतील? कल्पना करा.
मोस्टली गुज्जू आणि पंजाबचे.

मोरोबा Lol कॅनडातून ती लोकं अमेरिकेत घुसली ठरलं ना? आता बॉर्डर झार नेमला. इतके वर्षे त्याचं नाव पॉल होतं. आता त्या झार म्हणतात. पण नाव बदलल्याने आता सगळं व्यवस्थित झालंय असं तात्या म्हणतोय आणि तुमचं काहीतरी वेगळंच! तात्यामुळे कनेडीअन एकत्र झालेत त्यात फूट नका पाडू ती!

ही केस making an example म्हणतात तशीच दिसते. इथून भारतात पाठवायला नागरी विमानाने इतकी मोठी झुंड पाठवणे रिस्की आहे. पण भारतीय सरकारबरोबर बोलणी करून आधी कोठेतरी जवळपास ड्रॉप करून मग तेथून भारतीय विमानाने देशात परत नेणे करू शकले असते. तशी काही बोलणी केली होती का माहीत नाही.

ट्रम्प व होमन दोघांनीही अनेकदा सांगितले आहे की यात गुन्हेगार लोकांना बाहेर काढण्याला प्राधान्य आहे. प्रत्यक्षात तसे किती होत आहे कल्पना नाही. त्यामुळे हे लोक निवडण्यात त्यांचे रेकॉर्ड हे कारण होते की "फक्त हेच सध्या सापडले" हे होते, ते ही आपल्याला कळणार नाही.

मूळ देशात जात, धर्म, टोळ्या ई मुळे हो असलेल्या अन्यायापासून वाचवण्याकरता मैलोनमैल हाल काढत जे बेकायदा येतात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे (पण इव्हन त्यांच्याकरता कॅच अ‍ॅण्ड रिलीज असावे असे वाटत नाही). याउलट कोणालातरी ४० लाख देऊन येणार्‍यांची काही "दुसरी बाजू" असेल का? माहीत नाही. ४० लाख रूपये देऊ शकणारी व्यक्ती पुढच्या ४-५ वर्षांत प्लॅन करून लीगली अमेरिकेत येउ शकणे अवघड नाही (नुसते हैदराबादला राहायला गेले तरी इतके पैसे वापरून ३-४ वर्षांत "टेकी" होऊन आपोआप येतील!) . पण "अन्याय" हा अँगल नसेल तर इतकी काय घाई/गरज आहे हे कोणीतरी एखाद्या आतल्या व्यक्तीच्या मुलाखतीतून वगैरे लोकांसमोर आणले पाहिजे. नाहीतर हे सगळे चोर आहेत हा एक टोन, किंवा "गरीब बिच्चारे", "गोरेसुद्धा अमेरिकेत इल्लिगल आहेत", "आपण सगळेच इल्लिगल आहोत" हा दुसरा, यापेक्षा वेगळे काही समोर येत नाही.

<<झक्की, पण ते वैध मार्गाने येत असतील ना? मग ठीकच आहे की.??
येताना विजिटर्स व्हिसा घेऊन येतात, नि व्हिसा संपल्यावर रहाणे म्हणजे बेकायदेशीरच. बाकी प्राजक्ता यांनी लिहीलेच आहे.
खरे तर त्रंप्याचा रोख गुन्हेगारी करणार्‍या लॅटिनो लोकंवर होता. भारतीयात गुन्हा करणारे अत्यल्प. त्यांना हाकलण्यात भारत नि अमेरिकेचे काहीतरी राजकीय कारण असावे.

<< त्यांना हाकलण्यात भारत नि अमेरिकेचे काहीतरी राजकीय कारण असावे. >>

----- मोदी माझी भेट घेणार आहे ( असे मागच्या भेटीमधे ट्रम्पने जाहिर केले होते) आणि मोदींनी भेटायचे टाळले. म्हणून तर शपथविधीला जयशंकरांनी बरेच प्रयत्न करुनही आमंत्रण दिले गेले नाही. इगो कुणाचा इगो कुठे दुखावला जाईल सांगता येत नाही.

De-dollarization संदर्भात विरुद्ध टोकाची वक्तव्ये आणि बोलण्याच्या एकदम विरुद्ध कृती. आम्हाला काहीच स्वारस्य नाही पण इकडे दोन करारही केले. आता भारतावर १०० % आयात शुल्क लावणार का ?

त्यामुळे हे लोक निवडण्यात त्यांचे रेकॉर्ड हे कारण होते की "फक्त हेच सध्या सापडले" हे होते, ते ही आपल्याला कळणार नाही.
>>>
गुन्हेगार काय किंवा तिथ जाऊन कॅश जॉब करणारे काय, एकदा तुम्ही सापडलात की यु आर जस्ट अ नंबर. त्यांनाही आपण निवडणूकीतल्या वचनांवर ॲक्ट करतोय हे दाखवायचे आहे. व जे पकडले गेलेत त्सांचं लीगल स्टॅंडींगच नाही.

पैस देऊन, जमिनी विकून, हुंडा घेऊन जाणाऱ्या कम्युनिटीज मधे मला वाटतं फोमो + सोशल प्रेशर असावं. आणि हे करता येऊ शकतं, शक्यतो कारवाई होत नाही त्यामुळे भिती नाही असा विचारही असावा. दुसरं म्हणजे नेमक्या याच कम्युनिटी एकमेकाला धरून राहतात. व्यवहारही शक्यतो आपापसात करतात तर इल्लीगल स्टेटस लपवून कॅश जॉब करणं सोप होत असावं.

एकदा तुम्ही सापडलात की यु आर जस्ट अ नंबर >>> ते बरोबर आहे. पण यांचा हेतू पहिले गुन्हेगार पाठवणे हा होता. जाहीर हेतू तरी. सगळ्याच इल्लिगल्सना परत पाठवणार पण गुन्हे केलेले लोक हे पहिले प्राधान्य असे टॉम होमन अजूनही म्हणतो. पण त्याकरता शोधाशोध करताना जे इतर इल्लिगल्स सापडतील त्यांनाही पाठवतीलच.

पैस देऊन, जमिनी विकून, हुंडा घेऊन जाणाऱ्या कम्युनिटीज मधे मला वाटतं फोमो + सोशल प्रेशर असावं >> मलाही तसेच वाटते.

हे लोक तिकडे बँक अकाउंट कसे उघडतात? की cash job मधून आलेले पैसे घरातच ठेवतात? की तिथल्या नातेवाईकांच्याच अकाउंट मध्ये ठेवतात?

पण हे सगळे का? आपला स्वतःचा देश चांगला आहे की.

हे लोक तिकडे बँक अकाउंट कसे उघडतात? की cash job मधून आलेले पैसे घरातच ठेवतात? की तिथल्या नातेवाईकांच्याच अकाउंट मध्ये ठेवतात?>>> नो बॅन्क अकाउन्ट, त्याला लिगल डॉक्युमेन्ट लागतात..सगळ ज्याच्या भरोश्यावर तिथे जातायत्,राहतायत त्याच्या कडेच!! त्यामुळे एक्सप्लॉयटेशन सर्रास चालत..कमी वेजेस काम करुन घेतात..अगदी हाल होतात की नाही हे तुमच आणी त्याच काय नाते सबध काय आहेत यावर अवलबुन असणार!!
खरच इतका उटा रेटा अजिबात वर्थ नाही...

<< हे लोक तिकडे बँक अकाउंट कसे उघडतात? >>

----- सर्वच फरफट आहे असे वाटत रहाते . बँक व्यावहारांत नाव नाही. काही गंभिर अपघांत झाला किंवा आजारी पडल्यावर वैद्यकीय सुविधा ? पिळवणूक ( सातही दिवस काम, १२- १६ तास काम केल्यावरही $४० हातावर ठेवणे किंवा अनेक लोक उपलब्द आहेत, तुला इतर कुठे जायचे असेल तर जाऊ शकतो असे सांगणे हे त्यातल्या त्यात अगदी सौम्य प्रकार आहेत. ) किंवा लैंगिक शोषण, अत्याचार होत असतील तर भांडे फूटण्याच्या भितीने पोलीसांकडे मदतही मागता येत नसेल. Sad

इकडे भारतात मागे राहिलेल्या आप्तांपैकी कुणाचे बरे वाईट झाल्यावर लागोलग परतणे शक्यच नाही. व्हिसा संपला असेल, कागदपत्रे खोटी असतील तर परतण्याचे मार्गही सहजपणे उपलब्द नसतात. विमानतळावरच थांबविणार.

भारत>> कॅनडा>> अमेरिका किंवा भारत>> युरोप/ निकाराग्वा/ मेक्सिको>> अमेरिका अशा मार्गाने मानवी तस्करी करण्याचे आंतरराष्ट्रिय रॅकेट आहे असे वाटत रहाते. वर उल्लेख केलाच आहे अगदी सहजपणे लाख कोटी रुपयांची उलाढाल आहे.

कॅनडांत शैक्षणिक संस्थांत प्रवेश मिळविला आहे. हे प्रवेश मिळविणे पण रॅकेटच आहे. काही शाळांची नावे पण अस्तित्वात नाही. कॅनडांत आलेले २०,००० विद्यार्थी " बेपत्ता " आहेत. अमेरिकेत गेले असतील, येथेच लपले आहेत पण शाळेत नाही. हे काय गौडबंगाल आहे?
https://economictimes.indiatimes.com/nri/study/where-are-the-20000-india...

त्यामुळे एक्सप्लॉयटेशन सर्रास चालत..कमी वेजेस काम करुन घेतात..अगदी हाल होतात की नाही हे तुमच आणी त्याच काय नाते सबध काय आहेत यावर अवलबुन असणार!! >>>>>

इथे मुंबईत काही पण विकायचा धंदा केला तरी गरिबीत का होईना, मानाने जगता येतं. तिकडे चोरासारखं जाऊन चोरासारखं भीत भीत जगणं... का ही अवदसा आठवते! आपला देश काय सोमलिया किंवा तत्सम देश आहे का की जगणंही मुश्किल आहे?

हव्यास, तुलना, मत्सर, अट्टाहास काहीही करवतो माणसाकडून.

काय वर्थ आणि काय नाही हे आपण कोण सांगणारे?
माझ्या मते एच वन वर रहाणे ही वर्थ नाही. एच वन, फोर मध्ये टोटल पिळवणूक होते. मनासारखं जगता येत नाही. सेकंड क्लास आयुष्य काढणे, सारखी टांगती तलवार, मुलं एच फोर असतील तर ते अमानुष वगैरे मला वाटतं. पण करणारे करतातच ना!
आपण आपलं जगावं दुसऱ्याने कसं जगायचं हे त्याचं त्याला ठरवू द्यावे. कुरकुर मात्र करू नये, परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवावी.
दी एंड!

Pages