निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
तो पुतिन आता गार पडलाय पण हा
तो पुतिन आता गार पडलाय पण हा झेलेन्स्कि आता पेटलाय. त्याच्याबद्दल पुळका यायचे काहीही कारण नाही. तीसर्या महायुद्धाच्या खाईत जगाला ढकलायला निघालाय. कसलं डेकोरम धरायचं.
अजुन एक युक्रेन व युरोपिअन युनिअन यांनी रशियाकडुन तेल घेउ नका म्हणुन भारतावर दबाव किती आणला होता. मोदी डिन्ट नकल डाउन. जय शंकर यांनी छान हँडल केलेले.
<< त्याच्याबद्दल पुळका यायचे
<< त्याच्याबद्दल पुळका यायचे काहीही कारण नाही>
अहो, पुळका कसला. तात्या राजेंनी लील मार्को ला रशिया - युक्रेन वारच्या पिस नेगोशिअॅशन्स साठी पाठ्वलं. पण युक्रेन्ला बोलावलच नाही. कुठ्ला देश हे सहन करणार आहे?
आणि हे सर्व बाजूला ठेवून जर कालची कॉन्फरंस पाहिली, तर ज्याप्रकारे झेलेन्स्कीला थर्ड ग्रेडर प्रमाणे बुली केलं गेलं दॅट वॉज एमबॅरसिंग.
ह्या पेक्षा आधिचा म्हातारा बरा होता, असं म्हणायची वेळ राजेंनी अपेक्षेपेक्षा फारच लवकर आणली.
बाकी तात्या राजेंच्या स्लो लर्नर समर्थकांची होणारी दमछाक बघण्यात मजा येते. अगदी इंडिया पाक मॅच हारल्या नंतर पाकिस्तान च्या रिअॅक्शन बघण्यात येते तशी. त्यांना माहित असतं की त्यांची साइड पुर्णपणे बोंबललिये पण फेस ठेवावा लागतो.
जीडीपी प्रोजेक्शन पाहिलं का?
जीडीपी प्रोजेक्शन पाहिलं का? ट्रेड वॉर मधला अजून ट ही चालू व्हायला चार दिवस आहेत, अन एम्प्लॉयमेंटला अपलाय अजून व्हायचं आहे आणि तरी निगेटिव्ह ग्रोथ फोरकास्ट आहे. आता मज्जा चालू होईल.
हे म्हणजे युद्धखोरी नाकारायची
हे म्हणजे युद्धखोरी नाकारायची आणि बुलींग्च झोडपत बसायचं.
>> हे कुठल्याही सार्वभौम
>> हे कुठल्याही सार्वभौम देशाला मान्य होणार. भारत देखील काश्मीर प्रश्न इतर कुठल्या देशाच्या मध्यस्तीशिवाय सोडवण्याच्या बाजूने आहे.<<
तुलना चूकिची आहे. बिसाइड्स, युक्रेन इज नॉट इक्विप्ड टु फाइट द वॉर ऑर निगोशिएट विथ रश्या ऑन देर ओन..
व्हॉट ट्रंप डिड यस्टर्डे इन ओवल ऑफिस वॉज प्रेसिडेंशियल. ज्या माणसाला तुम्हि मदतीचा हात दिला आहे तोच माणुस तुमच्या घरी येउन धमकि द्यायला लागला तर त्याला त्याची जागा दाखवुन देणं गरजेचं आहे. व्हेदर यु लाइक ऑर नॉट...
रुबियोचि हि क्लिप बघा.
रुबियोची हि क्लिप बघा. कालच्या डिबाकल मागची पार्श्वभूमी समजायला मदत होइल...
<< हे म्हणजे युद्धखोरी
<< हे म्हणजे युद्धखोरी नाकारायची आणि बुलींग्च झोडपत बसायचं.>>
म्हणजे ते बुलिंगच होतं हे तुम्ही मान्य करता तर.
बेसिकली, अमेरिकेला जे पाहिजे (मिनरल डील) ते युक्रेन ने बिनबोभाट मान्य करावं, त्या बदल्यात सिक्युरिटी गॅरेंटी पण मागू नये, तात्याचा मित्र ज्याने युक्रेन वर युद्ध लादून अनन्वित अत्याचार केले त्याचा बद्दल एक शब्दही काढू नये. आणि जेव्हा झेलेंस्कीने तात्याच्या तोंडावरती सांगितलं की तुझ्या नाकासमोर पुतिन नी अनेक वेळा पिस डील मोडलंय, तेव्हा त्याच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.
पण तुम्ही म्हणता झेलेंस्की युद्धखोर. बरोबर आहे, दरबारात आल्या पासून अर्धा तास झाला तरी त्याने मुजरा केला नाही, थँक यू म्हणाला नाही. केवढी मोठी गुस्थाखी.
लाँग लीव्ह द किंग अँड हिज प्रेसिडेंट
तुम्हाला कळतय का, की जेव्हा
तुम्हाला कळतय का, की जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात शिवाजींचा अपमान झाला होता तेव्हा तुम्ही औरंगजेबाच्या बाजूने उभे आहात. शिवाजी कडे काही पर्यायच नाही, त्याने राजाच्या पायावर लोटांगण घालावे , सर्व अटी बिनशर्त मान्य कराव्या. अन्यथा तो युद्धखोर, स्वतःच्या मुकूटासाठी प्रजेच्या जीवाशी खेळतोय वगैरे….
यु आर नॉट स्टैंडिंग ऑन द राइट साईड ऑफ द हिस्टरी माय फ्रेंड
हिटलरने ऑस्ट्रिया काबीज केला
हिटलरने ऑस्ट्रिया काबीज केला (५१ राज्य)
सुदेतनलॅन्ड घशात घातला तेव्हा चेम्बर्लेन आणि इतर देश झेकोस्लावाकिया आणि पोलंडलाच सांगत होते की जरा सबुरीने घ्या, तुमच्याकडे कार्ड नाहियेत, हिटलरला तेव्हडा तुकडा दिला की डील झालेच.
वरती कीबोर्ड बडवायला
वरती कीबोर्ड बडवायला धावलेल्यांपैकी किती जणांनी ती प्रेस कॉन्फरन्स पूर्ण पहायची तसदी घेतली आहे?
पटापट आणि खरं खरं सांगा.>>>
सार्वभौम देशावर युद्ध लादलं,
सार्वभौम देशावर युद्ध लादलं, लचके तोडले, त्याचीं माणसं मारताहेत, तो त्याच्या देशासाठी लढतोय
>>>
सार्वभौम देशावर युद्ध लादलं हे खरं असलं तरी याला नाटो कारणीभूत नाही असं म्हणता येणार नाही. नजिकच्या भविष्यात युक्रेन नाटोमध्ये सामिल होणे आणि क्युबामध्ये रशियन मिसाईल्स डिप्लॉय होणे या दोन्ही थ्रेट लेव्हलमध्ये मला गुणात्मकदृष्ट्या फरक वाटत नाही. क्युबाही सार्वभौम देश होता. परंतु या डिप्लॉयमेंटमुळे तिसऱ्या विश्वयुद्धाची शक्यता निर्माण झाली होती. इथे समोर लोकशाही देश नव्हता. (लोकशाही देशांतल्या राज्यकर्त्यांनाही युद्ध नको असते हे ही काही फारसं खरं नाही. उदा. वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन)
युक्रेनमधला नाटो बेस हे रशियन राज्यकर्त्याचे वैयक्तिक फेल्युअर (पर्यायाने राजकिय अंत) हे स्पष्ट असताना यावर रिटॅलीएशन होणार नाही हे शक्यच नव्हते.
कुठल्याही महासत्तेने किंवा रिजनल पॉवरने इतर देशांवर राजकिय दादागिरी करू नये हे विचार चांगले आहेत. पण प्रत्यक्षात असं होत नाही. याचा अर्थ महासत्तांनी इतरांना बुली करावं, त्यांचे प्रदेश हिसकावून घ्यावेत असा नक्कीच नाही. पण सुजाण राज्यकर्ते भौगोलिक वास्तविकता ध्यानात घेऊन राज्य करतात.
नाटोच्या भरवश्यावर रशियाला चॅलेंज करणे हे फारसे राजकिय हुशारीचे लक्षण मानता येणार नाही.
बंद दाराआड याच दर्जाच्या चर्चा शतकानुशतके होत असतील पण पब्लिक चर्चा आणि तिचे थेट प्रक्षेपण अतिशय वाईट होते. पब्लिक ह्युमिलिएशनमधून २ परस्परविरोधी शक्यता निर्माण होतात. झेलेन्स्की यांची युक्रेनमधली प्रतिमा उजळून त्यांना ग्रेसफुल एक्झिट करण्याचा मार्ग मोकळा होईल किंवा युक्रेनमध्ये राष्ट्रवाद उफाळून युद्ध काही दिवस लांबेल. युद्ध थांबवण्याचा दृष्टीने यातलं काहीच फायदेशीर नाही.
<< वरती कीबोर्ड बडवायला
<< वरती कीबोर्ड बडवायला धावलेल्यांपैकी किती जणांनी ती प्रेस कॉन्फरन्स पूर्ण पहायची तसदी घेतली आहे>>
हो. व फ्रॉ हो असल्यामुळे पूर्ण कॉन्फरन्स, इंक्लुडिंग क्वेशन अबाउट सूट, लाइव बघितली. पुढे काय?
तुमच्यापैकी कोणाला रशियाने
तुमच्यापैकी कोणाला रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेय हे मान्य आहे हे पटापट आणि खरं खरं सांगा बरं.
अरे, मूळात मुद्दा सबळ्/दुर्बळ
अरे, मूळात मुद्दा सबळ्/दुर्बळ हा नाहिच आहे. तुला आठवत असेल (फर्स्ट टर्म कँपेनिंग) ट्रंप सुरुवाती पासुन सांगतोय, वी डोंट वांट टु बी वर्ल्ड पुलिस >> सॉरी राज. वर्ल्ड पोलिस व्हायचे नाहिये तर पुतिनशी बोलायला कशाला गेले होते युक्रेनबद्दल नक्की ? सरळ मिअरल्स हवी आहेत , ती द्या नि त्याबदल्यात शस्त्रे देऊ असे सांगायचे होते युक्रेनला. आपला तुल्यबळ दिसला कि वाटाघाटी नि बाकिच्यांवर दादागिरी ह्यापलीकडे काय बेस आहे. पुतिनला असे झापायची हिम्मत आहे का तात्यामधे प्रेससमोर कि तू युक्रेनवर आक्रमण केले चुकीचे आहे असे ठणकावून सांगायची ? तिथे माय गूड फ्रेंड वगैरे मधे गुर्हाळ अडकते का नेहमी ?
<<मोदी आणि ट्रम्प निवडूनच
<<मोदी आणि ट्रम्प निवडूनच नाही यायला पाहिजेत>>
काही हरकत नाही.
सगळ्या देशातले सगळे राजकारणी हलकटच. जो कुणि निवडून येईल त्याला मनसोक्त शिव्या देणे आम्ही थांबवणार नाही.
इतक्या लोकांमध्ये ॲक्चुअली ती
इतक्या लोकांमध्ये ॲक्चुअली ती प्रेस कॉन्फरन्स पूर्ण पाहून बोलणारा फक्त एक मायेचा पूत निघाला. That tells me all I wanted to know. धन्यवाद. इथल्या बऱ्याच लोकांना युक्रेनबद्दल ट्रम्पवर तोंडसुख घ्यायला आणखी एक निमित्त, यापलिकडे काही फिकीर पडली आहे असं वाटत नाही. अनलाईक दिज पीपल, आय ॲक्चुअली केअर अबाऊट युक्रेन अँड झेलेन्स्की. म्हणून मी सुरवातीपासून शेवटपर्यंत कॉन्फरन्स पाहिली. अँड आय ॲम सॉरी टू से, बट झेलेन्स्की स्क्रूड अप. रिपीटेडली. आय डोन्ट ब्लेम ट्रम्प वन बिट हियर. ॲट ऑल.
>>सरळ मिअरल्स हवी आहेत , ती
>>सरळ मिअरल्स हवी आहेत , ती द्या नि त्याबदल्यात शस्त्रे देऊ असे सांगायचे होते युक्रेनला<<
तेच डील ठरलं होतं, ट्रंप आणि झेलेंस्किमधे आणि तो सहि करण्यासाठिच येणार होता. पण तो आला हिडन अजेंडा घेउन - अमेरिकेने फक्त युक्रेनची साइड घ्यावी. असं होत नाहि ना बाळा आर्ब्रिट्रेशन मधे. पुढे काय झालं ते जगजाहिर आहे..
तु ती चिमणीची गोष्ट ऐकली असशील. थोड्या-फार प्रमाणात ती झेलेंस्किला फिट बसते...
राज गोष्ट भारी आहे.
राज
गोष्ट भारी आहे.
खरंय पण डेम सपोर्टर्सपैकी
खरंय पण डेम सपोर्टर्सपैकी वाचता कितींना येत असेल?
त्यांच्यासाठी हीच गोष्ट ऑडिओ व्हिज्युअल रूपात इथे अधिक चांगल्या पद्धतीने सांगितली आहे - https://youtu.be/DyOdbkXEx9k
Norway fuel giant 'refuses to
Norway fuel giant 'refuses to fill US submarines' after Trump-Zelensky clash.
Citrus harvest 'virtually
Citrus harvest 'virtually halted' as workers fearing Trump order skip work: report
झेलेन्स्कीने बुली ट्रम्पच्या
झेलेन्स्कीने बुली ट्रम्पच्या सापळ्यांत अडकायला नको होते. झेलेन्स्कीसाठी हा ट्रॅपच होता आणि पुतिनला खुश ठेवणे हा उद्देश होता .
झेलेन्स्कीची मजबूत नाही आहे हे सर्वांनाच माहित आहे. युक्रेन-रशिया युद्ध थांबविण्या संबंधातल्या चर्चेमधून युक्रेनला डावलून अमेरिका रशियासोबत चर्चा करत आहे यातच अमेरिका शांती प्रक्रियेबद्दल गांभिर नाही हे दिसून येते.
तुझ्याकडे काहीच नाही आहे, बाजू अगदी कमकुवत आहे.... आणि आता पर्यायच शिल्लक नाही म्हणून आहे तो शांती करार मुकाट्याने मान्य कर असे सांगणे योग्य नव्हते. शांती करारावर सही कर हे धाकाने होणारे काम नाही.
पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१९ मधे झालेल्या व्हर्साय करारांत दुसर्या महायुद्धाची बिजे पेरली गेली होती असे इतिहास म्हणतो. एका राष्ट्रप्रमुखाला एव्हढेही ( मीडिया समोर ) अपमानीत करु नका.
https://en.chateauversailles.fr/discover/history/key-dates/treaty-versai...
France's Macron is ready to
France's Macron is ready to discuss nuclear deterrence for Europe
बेबी राजे ...
सार्वभौम देशावर युद्ध लादलं
सार्वभौम देशावर युद्ध लादलं हे खरं असलं तरी याला नाटो कारणीभूत नाही असं म्हणता येणार नाही. नजिकच्या भविष्यात युक्रेन नाटोमध्ये सामिल होणे आणि क्युबामध्ये रशियन मिसाईल्स डिप्लॉय होणे या दोन्ही थ्रेट लेव्हलमध्ये मला गुणात्मकदृष्ट्या फरक वाटत नाही >>> माझेमन, सहमत आहे. मलाही हा प्रश्न पडला होता आणि यावर उत्तर असण्याइतकी पार्श्वभूमी मला माहीत नाही. या युक्रेन-नेटो प्रश्न ३-४ वर्षांपूर्वी अचानक निर्माण झाला की वर्षानुवर्षे चघळत आहे कल्पना नाही.
युक्रेनला एकटी अमेरिका $१५० बिलियन देते. इतर कोणताही देश याच्या एक चतुर्थांशही देत नाही. आत्ता इतर युरोपिय देशांनी कितीही सपोर्ट जाहीर केला असला तरी अमेरिकेने मदत बंद केली तर इतर लोक तेवढी भरून काढणार नाहीत. पुतिनला युक्रेन सरळ घेउ न देणे अमेरिकेच्या इंटरेस्ट मधे जितके आहे त्याच्या काहीपट युरोपिय देशांच्या इंटरेस्ट मधे आहे. पण तरीही सध्यातरी युक्रेनला अमेरिकेशिवाय पर्याय नाही. अशा वेळेस इथली सत्ता बदलली आहे, नवीन सत्ताधार्यांचे उद्देश वेगळे आहेत. अशा वेळेस आपल्या मुत्सद्देगिरीतही फरक करायला हवा तो झेलेन्स्कीने कितपत केला आहे याची कल्पना नाही. ट्रम्पला "तू किती भारी आहेस, तू करत असलेल्या मदतीबद्दल मी आभारी आहे" वगैरेची "किक्" आहे हे उघड आहे. पण याला जर त्याच्या मदतीची गरज आहे तर ती देऊन आपले काम करून घ्यायला काय हरकत आहे. (संदर्भः तू आमचे एकदाही आभार मानलेले नाहीस हे व्हान्सचे वाक्य)
ही भेट जर मिनरल्स बद्दल होती तर यात मदतीची गॅरण्टी वगैरे मुद्दे का ताणले माहीत नाही. इथे बरेच काही lost in translation मुळे झाले असावे असेही वाटते. इंग्रजी त्याची मूळ भाषा नाही. त्याचा मुद्दा नक्की शब्दांत मांडताना त्याला कष्ट पडत होते हे ही दिसत होते. अशा वेळेस काही वाक्ये अमेरिकन संदर्भात कशी वाटतील याची त्याला कदाचित कल्पना नसेल.
मात्र सीझफायर बद्दल हे लोक त्याला नक्की काय मान्य करायला लावत आहेत माहीत नाही. पुतिनशी चर्चा त्याला साफ मान्य नाही असे दिसते. युक्रेनमधे अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध असतील तर पुतिन तेथे हल्ला करायला धजावणार नाही या ट्रम्पच्या मुद्द्यावर झेलेन्स्की साशंक असणे बरोबर आहे - कारण त्याच्या म्हणण्यानुसार असे पूर्वीही होते व तरीही पुतिन गप्प बसला नव्हता (इथेही ट्रम्प म्हणेल बायडन होता म्हणून केले असेल, मी असताना करणार नाही - झेलेन्स्कीने २०१६-२०२० मधलीही उदाहरणे दिलीत). घोडे याच मुद्द्यावर अडले आहे असे दिसते. अमेरिकेला युद्ध थांबवायची इच्छा आहे व मदतही अव्याहत चालू राहू द्यायला पब्लिक सपोर्ट नाही. पण त्याकरता रशियाने काबीज केलेला प्रदेश जर चर्चेच्या टेबलावर सोडून द्यावा लागला तर झेलेन्स्की तयार होणार नाही. हे लोक शांतता/डिप्लोमसी म्हणजे नक्की काय म्हणत आहेत क्लिअर नाही. अमेरिकेच्या मदतीमुळे का होईना पण पुतिन तीन वर्षे त्याच्या दृष्टीने किरकोळ असलेल्या युद्धात गुंतून पडला आहे. अमेरिकेने मदत बंद केली तर तो युक्रेन काबीज करून अजून इतर ठिकाणी घुसेल ही पण भीती आहे.
ओ मोरोबा, मूळ कॉन्फरन्सच काय पण नंतरची ब्रेट बेअर बरोबरची मुलाखत, मार्क रुबिओची मुलाखत व ट्रम्प मार-आ-लागोला जाण्याआधी त्याने मीडियाला दिलेले अपडेट - हे सगळे पाहिले आहे कालपासून
आता सेकंद न् सेकंद लक्षात नाही. पण तितके तर ऑफिसच्या कॉल्समधलेही नसते 
खरंय पण डेम सपोर्टर्सपैकी
खरंय पण डेम सपोर्टर्सपैकी वाचता कितींना येत असेल? <<
खरंच..??
हा धागा न्यूयॉर्क टाईम्स अथवा तत्सम फोरमवर चालू नाही.
मायबोलीवर आहे. राज यांनी दिलेल्या लिखित गोष्टीला additional support/better audio visuals देणंही योग्य आहे.
पण जिथे जास्तीत जास्त किंवा खरं तर फक्त मायबोलीकर हेच जर या धाग्याचे वाचक असतील तर हा प्रश्न खटकतो.
हे म्हणजे युद्धखोरी नाकारायची
हे म्हणजे युद्धखोरी नाकारायची आणि बुलींग्च झोडपत बसायचं>>>
धन्यवाद, तुमच्या कॉमेंट मुळे डोळे उघडले की झेलेंस्की नेच आक्रमण केलंय. त्यानेच युद्ध सुरू केलं असणार नाहीतर तो कसा असेल युद्धखोर.
नवीन सत्ताधार्यांचे उद्देश
नवीन सत्ताधार्यांचे उद्देश वेगळे आहेत. अशा वेळेस आपल्या मुत्सद्देगिरीतही फरक करायला हवा तो झेलेन्स्कीने कितपत केला आहे याची कल्पना नाही.
पुतिनशी चर्चा त्याला साफ मान्य नाही असे दिसते
>>> अग्रीड. युक्रेनमधल्या युद्धाला मदत करणार नाही हे स्पष्ट सांगून सत्तेवर आलेल्या लोकांशी डील करताना सुसरबाई तुझी पाठ मऊ करतच पुढे जावे लागणार आहे, पुतिनशी चर्चा न करता युद्ध थांबणार नाही याचा अंदाज आला नसेल तर ते युक्रेनच्या कलेक्टीव्ह पॉलिटीचे फेल्युअर आहे.
अन्याय कुणावर झाला आणि त्यामुळे ॲडव्हांटेज कुणाला मिळाला पाहिजे हे आता पार मागे पडले आहे. आता डॅमेज कंट्रोल/कटेंनमेंट मोडमध्ये काम व्हायची गरज आहे. योग्य इन्सेटीव्ह मिळाल्याशिवाय/वरही रशिया ऑक्युपाईड प्रदेश सोडेल याची खात्री नाही कारण रशियाने तिथल्या लोकांना नागरीकत्व दिले आहे.
व्हर्सायच्या तहात दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली असली तरी जनमत फिरवणारा हिटलर होता. सध्या झेलेन्स्की यांच्या मागे पूर्ण युक्रेन उभा आहे अशी ही स्थिती नाही. कारण परवाच्या चर्चेनंतर तिथल्या विरोधी पक्षाने झेलेन्स्की यांना हटवायची नांदी केलेली आहे. हे त्यांचे वैयक्तिक विरोधक/रशियन किंवा इतर प्रॉप्सही असू शकतात. पण झेलेन्स्की देशाचं नुकसान करताहेत हा मेसेज पसरवणे हा ही एक दबावाचा प्रकार असू शकतो.
बाकी बुलिंग पार्ट जो शेवटी आहे तो सोडल्यास हे स्पष्ट होते की अजूनही अमेरीका आणि युक्रेनमधेच डील काय आहे यावर अग्रीमेंट नाही. दोन्ही देशाच्या परराष्ट्र खात्यांनी डील चॉक आऊट करून पत्रकारांसमोर सह्या व फोटो ऑप अपेक्षित असताना दोन्ही प्रेसिडेंटस् काय अपेक्षित आहे यावर बोलत असतील तर पीस प्रोसेसपासून आपण फार लांब आहोत. आणि रशिया या इक्वेशनमधे उतरलीच नाहीये.
वरती कीबोर्ड बडवायला
वरती कीबोर्ड बडवायला धावलेल्यांपैकी किती जणांनी ती प्रेस कॉन्फरन्स पूर्ण पहायची तसदी घेतली आहे?
पटापट आणि खरं खरं सांगा.>>
अगदी अगदी!
ती कॉन्फरन्स पूर्ण पहिली. तात्याने सुरुवात अगदी व्यवस्थित प्रेसिडेन्शिअल पद्धतीने केली होती. पण झेलेअण्णा तमाशा करायच्याच हेतूने आले होते. दोन वेळा झेलेअण्णांनी तात्याला क्रॉस केले. एकदा तात्याने ह्यावर इथे वाद नको म्हणून मुद्दा सोडून दिला, दुसऱ्यांदा सुद्धा तात्या गप्प बसला. पण नंतर ज्या गोष्टी बंद दरवाज्या आड नेगोशिएट करायच्या त्या झेलेअण्णा मीडियासमोर उगाळायला लागले. "काही मुद्द्यांवर आमचे अजून एकमत झाले नाही, आणखी डिस्कस करावे लागेल" इतके कॉन्फरन्स मध्ये सांगिलते असते तरी पुरे होते. नंतर निगोशिएशन्स फेल झाली की मतभेदांमुळे डील होऊ शकले नाही असे सांगता आले असते. पण एकदा झेलेअण्णा तिथेच निगोशिएशन चे मुद्दे काढायला लागले म्हटल्यावर तात्या आणि वन्स बुवांना त्याला त्याची जागा दाखवून देणे भाग होते. वन्स बुवा बोलले सुद्धा की हे मीडियासमोर न बोलता निगोशिएशन मध्ये बोलले पाहिजे .
त्यांच्यावर आक्रमण झाले आहे. त्याचे पारिपत्य करण्याची ताकद नाही, तर अमेरिकेकडे मदत मागताना थोडी तरी decency दाखवायची. त्याचा अविर्भाव असा होता की अमेरिका त्याचे देणे लागते. तो पुतिनला दहशतवादी वगैरे म्हणत होता. ज्याच्याबरोबर डील करायचं त्याला असं बोलून कसं चालेल? पुतीन असेलही तसा, मग एक काय, शंभर वेळा त्याला दहशतवादी म्हण आणि मग निस्तर स्वतःच. हा जर असं बोलत असेल तर अमेरिका कशी आणणार दुसऱ्या बाजूला टेबलवर? एकंदर झेलेअण्णांना डील करायचंच नव्हतं आणि युद्ध असंच चालू ठेवायचं आहे असं वाटलं हा सर्व प्रकार बघून.
अजबराव नी लिटरली माझ्या मनात
अजबराव नी लिटरली माझ्या मनात उतरून लिहिलंय असं वाटलं. प्रत्येक शब्दाशी सहमत.
हा माणूस पुतिनइतकाच युद्धपिपासु वाटला. सिझफायर किंवा डिप्लोमसी शब्द कुणी उच्चारले तरी झुरळ अंगावर पडल्यासारखा उडत होता. रशियाचे किती सैनिक मी मारले त्याच्या वल्गना करत होता. ते सुद्धा माणसंच आहेत. दे डीड नॉट चुझ धिस वॉर. त्याच्या मते दोन्हीकडचे सैनिक मरत राहावेत आणि अमेरिकेने हा नरमेध बँकरोल
करत रहावं.
जवळपास चाळीस मिनिटं ट्रम्प याला सांभाळून घेत होता. या टॅक्टलेस माणसाचे एकदोन faux pas इग्नोर करत होता. पण शेवटी हे बुवा सुटलेच. व्हॅन्सला मध्येच तोडून, डेकोरम मोडून त्याचा व्हाइस प्रेसिडेंट उल्लेख न करता 'जेड्या, जेड्या, ऐक माझं' अशा अत्यंत condescending टोनमध्ये ज्ञानामृत पाजायला लागला तेव्हा ऑल हेल ब्रोक लुझ. युक्रेनच्या ॲम्बेसेडरची त्या वेळची प्रतिक्रिया बोलकी आहे.
पुतीनने अनेक सीझफायर मोडले
पुतीनने अनेक सीझफायर मोडले आहेत. नुसते सीझफायर घेऊन काही उपयोग नाही, सोबत सिक्युरिटी गॅरंटी हवी हे झेलेंसकी त्याच्यापरीने योग्यच बोलतोय.
बाकी ट्रम्प आणि जेडी रशिया धर्जिणे आहेत असे वाटत असले तरी झेलेंसकीने तारतम्य बाळगायला हवे होते.
Pages