डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
वॉशिंग्टन पोस्ट ६४ बिलियन म्हणतंय. पण तितकी तर कळ सोसलीच पाहिजे ना!
>>
वॉशिंग्टन पोस्ट म्हणजे कसे रामशास्त्री बाण्याचे निःपक्षपाती. पण एवढे सगळे मायनर लीग हॉकी वाल्या लोकामुळे होत असेल तर चिंता वाढते नक्कीच!
तरी त्यांनी आकडा ट्रिलियन पर्यंत नेला नाही ह्याबद्दल आभार मानले पाहिजेत!
एकंदरीत काय? अमेरिकेची ठार राखरांगोळी होणार. मग काय कॅनडात दिवाळीच दिवाळी!

कॅनडा मेक्सिको इयू कोणीही पत्रास न ठेवल्याने एप्रिल २ ची गोल पोस्ट झाली रद्द. आता खूप साऱ्या देशांवर खूप सारे टेरीफ नाही लावणार म्हणतोय. गर्जेल तो पडेल काय! आता जुनं प्ले बुक नाही काम करत राजा.
आता इलॉन चा काडीमोड कसा होतो याकडे लक्ष देऊया. उरलेले भुईनळे आता त्या देव दिवाळीला.

मार्को रुबिओ, जेडी व्हांस, माईक वॉल्ट्स, पीट हेक्झेथ ... हे इनकॉम्पिटंट आहेत हे तर सिद्धच झालं. म्हणजे ते DEI असणार. त्यांना बाहेरचा रस्ता कधी दाखवायचा?
हिलरी आठवते का? Wink
इतके गणंग असतील तर राखरांगोळी व्हायला आमचे शाप कशाला हवेत. ती होणार ते दिसतेच आहे. कधी आणि कशी तेवढं फक्त बघायचं.

>>
मार्को रुबिओ, जेडी व्हांस, माईक वॉल्ट्स, पीट हेक्झेथ ... हे इनकॉम्पिटंट आहेत हे तर सिद्धच झालं. म्हणजे ते DEI असणार. त्यांना बाहेरचा रस्ता कधी दाखवायचा?
<<
सिद्ध झालं? कसं? कुठे? कॅनडात कुणी कांगारू कोर्ट चालवून त्यांना दोषी ठरवले का? बापरे! सगळे घाबरले आहेत अमेरिकेत! कॅनडात बसून हवे ते सिद्ध केले की अमेरिकन मंत्र्यांना बाहेरचा रस्ता का? छान छान!

काही म्हणा, हा अत्यंत वाचनीय धागा आहे. माझ्यापुरते यात मनोरंजक काय असेल तर ट्रम्प, बायडेन हे दोन शब्द, काही मराठी क्रियापदे आणि काही तिरकस शेरेबाजी या गोष्टी सोडल्या तर काहीही न कळणे!

<< सिग्नल सारख्या प्लॅटफॉर्मवर मार्को रुबिओ, जेडी व्हांस, माईक वॉल्ट्स, पीट हेक्झेथ येमेन वरच्या वॉर प्लॅन्सची चर्चा करतात आणि ती अटलांटिकच्या एडिटरला ठिकाण, वेळ, टार्गेट, साईझ सगळी बाँब टाकायच्या आधी २ तास पाठवतात. >>

----- राष्टीय सुरक्षा सल्लागार ( national security advisor ) मयकेल वाल्ट्झ यांनी हे नांव टाकले होते.
सरकारच्या नियंत्रणात नसल्याने signal जास्त सुरक्षित अ‍ॅप वाटत असेल.

<< सिग्नल सारख्या प्लॅटफॉर्मवर मार्को रुबिओ, जेडी व्हांस, माईक वॉल्ट्स, पीट हेक्झेथ येमेन वरच्या वॉर प्लॅन्सची चर्चा करतात . >>
सिद्ध झालं? कसं? कुठे? >>>> अरे चक्क शेंडे विचारतायत " कसं? कुठे?" Happy मला वाटले अटलांटिक एडिटर प्रमाणे लॉयल फॅन्स नाही त्या ग्रुप चॅट मधे जाता येत असेल!!
हा धमाल किस्सा आहे खरंच Lol किती हा ट्रान्स्परन्ट कारभार!
मार्को रुबिओ, जेडी व्हांस, माईक वॉल्ट्स, पीट हेक्झेथ ... हे इनकॉम्पिटंट आहेत हे तर सिद्धच झालं. म्हणजे ते DEI असणार. त्यांना बाहेरचा रस्ता कधी दाखवायचा? >>>
यापेक्षा कितीतरी लहान गोष्ट - काही प्रोप्रायटरी इन्फर्मेशन चुकीच्या ईमेल आयडी ला पाठवल्यामुळे कंपनीत अगदी वरच्या पदावरचा ऑफिसर तत्काळ फायर झाला होता ते आठवलं. पण तात्याचं अ‍ॅडमिनिस्ट्रशन या सगळ्याच्या वर आहे.

हे हिलरीच्या गलथानपणाच्या सहापट झालं. हिलरीच्या वेळी काय आकाशपाताळ एक झालं होतं! Lol
फॉक्स न्यूज वरच्या रिपोर्टरला अशा जागी बसवलं तर दुसरं तरी काय होणार म्हणा!

राष्टीय सुरक्षा सल्लागार ( national security advisor ) मयकेल वाल्ट्झ यांनी हे नांव टाकले होते.
सरकारच्या नियंत्रणात नसल्याने signal जास्त सुरक्षित अ‍ॅप वाटत असेल. >> हा सिक्सर आहे.

हिलरी आठवते का? >> Lol

ट्रम्प minor glitch होती असे म्हणत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सहकार्‍याची टोकाची अकार्यक्षमता झाकण्यासाठी आता मस्क , ट्रम्प, वाल्ट्झ द अटलान्टिकच्या जेफ्री गोल्डबर्ग वर टिका करत आहे. त्याने सांगितले म्हणून मायनर ग्लिच लोकांपर्यंत पोहोचली तरी. या आधी असे झालेच नसेल असे म्हणता येत नाही.

नव्याने स्थापन झालेल्या आणि नावातच efficiency असलेल्या डोजच्या अखत्यारित अशा मायनर ग्लिच शोधून मग त्यांच्या दुरुस्तीचे काम आहे का?

जे जे होईल ते ते पहावे म्हणताना अजून काय काय बघायला लागणार आहे कुणास ठावूक.
आमच्याकडचे झोपी गेलेले हळूहळू जागे होत आहेत. जो पर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोवर 'यू आर फायर्ड' वाले लोकांना भारी वाटतात. तसेच सोशल सेफ्टी नेट आणि इतर फंडिंगचे. जोवर सर्व सुरळीत सुरु असते तो वर हे बेनिफिट कुणी 'दुसरे' वापरत आहेत असा समज असतो. कट्स सुरु झाले की आपल्याही हस्ते परहस्ते मदत मिळत होती याची जाणीव होते.

अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट्स नाही तेव्हा कामगारांची तूट भरुन काढायला फ्लोरीडा म्हणे चाईल्ड लेबर लॉज शिथील करायचे म्हणत आहे. https://www.cnn.com/2025/03/25/business/florida-child-labor-laws/index.html
कामगारांची तूट भरुन काढायला दुसरा कुठलाच पर्याय यांच्याकडे नाहीये का?

allowing children as young as 14 years old to work overnight shifts. If the new law is passed, teenagers would be able to work overnight jobs on school days. They are currently prevented from working earlier than 6:30 am or later than 11 pm per state law.
आमचे जॉब घेतले म्हणत होते ना. करा आता कामं म्हणावं! हवे तेवढे मिनिमम वेज जॉब्स आहेत आता.

<<तरी त्यांनी आकडा ट्रिलियन पर्यंत नेला नाही ह्याबद्दल आभार मानले पाहिजेत!>>
तशी अतिशयोक्ती हा अलंकार वापरण्याइतके सगळे लोक मस्क सारखे किंवा ट्रंपसारखे विद्वान (की. खोटारडे) नाहीत.

अहो शेंडेनक्षत्र, सांगा ना की जे अ‍ॅटलांटा च्या वर्तमानपत्राला पाठवले त्यात क्लासिफाईड काही नव्हते. खुद्द तुलसी गॅबार्ड बाईने सांगितले. ती रिपब्लिकन, त्रंपसारखीच. म्हणजे ती खोटी कसे बोलेल?

शिवाय जे असे केले ते आमचे अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन कसे ट्रान्सपरंट आहे ते दाखवण्यासाठी केले होते!

किंवा हा सगळा बायडेनचा दोष आहे!

असे काहीतरी लिहा ना - तुम्हाला काय - रिपब्लिकन करतील ते सगळे चांगले, असे म्हणायचे नि मूर्खासारखी कारणे देत रहायचे. बाकी ट्रंपचे मतदार म्हणजे महामूर्ख किंवा शेळपट, ते त्रंप म्हणेल ते सगळे खरे असे धरून चालतातच.

तुमच्या लिहिण्याने या धाग्याला एक मनोरंजकता आली आहे, बेफिकीर म्हणतात तशी. नाहीतर राजकारण म्हणजे रुक्ष.

कसले राजकारण हो - काही अतिशय श्रीमंत लोक गंमत म्हणून हा खेळ खेळतात.
डेमोक्रॅट, रिपब्लिकन नुसते सांगायला. जिथे सता, पैसे तिथे जायचे - तुलसी गॅबार्डसारखे.
किंवा बेसबॉल, फुटबॉल च्या खेळाडूंसारखे. ते आपले गंमत म्हणून खेळतात नि आपण उगाचच मोठमोठ्यांनी एकमेकंशी भांडत बसतो, स्वतःचा पैसा नि वेळ खर्च करून, राजकारण्यांना आपण कोण, आपले हितसंबंध काय याची काहीहि पडलेली नसते.
ते फक्त त्यंची गंमत म्हणून सगळे करत असतात.

>>> तुमच्या लिहिण्याने या धाग्याला एक मनोरंजकता आली आहे, बेफिकीर म्हणतात तशी.

मी एकट्या त्यांच्याबद्दल नव्हते लिहिले, सगळेच खूप रोचक, रंजक लिहीत आहेत असे मला वाटले

त्याहीपेक्षा मला सगळ्यात मजा कधी येते, तर कोण काय म्हणत आहे हेच कळले नाही तरी एकमेकांशी भांडत आहेत हे कळते तेव्हा

. जो पर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोवर 'यू आर फायर्ड' वाले लोकांना भारी वाटतात. तसेच सोशल सेफ्टी नेट आणि इतर फंडिंगचे. जोवर सर्व सुरळीत सुरु असते तो वर हे बेनिफिट कुणी 'दुसरे' वापरत आहेत असा समज असतो. कट्स सुरु झाले की आपल्याही हस्ते परहस्ते मदत मिळत होती याची जाणीव होते. >> एकदम परफेक्ट बोललीस स्वाती ! असे कुंभकर्ण इथेही निघाले आहेत.

अमित, अहो थांबा. अजुन फारतर ३ ते ४ पोस्ट मधे शेंडे तो रिपोर्टरच कसा खोटारडा आहे वगैरे पोस्ट घेऊन येतीलच.
तात्याच्या कल्ट ने आधी ही फक्त एक मिस्टेक म्हणून सारवासारव केली. मग फॉक्स न्युज ने त्याच्या कल्ट ला ढिसाळपणाकडे दुर्लक्ष करा, आणि हे सगळे कसे टिमवर्क ने पारदर्शी पणे! काम करत आहेत या कडे पहा असे सांगून पाहिले( हो हे खरंय! कांट मेक दिस शी* अप) Happy . आता तो रिपोर्टरच कसा रिलायबल नाही वगैरे सुरू झालंय.
बायडन स्वतः आणि त्याचे ऍडमिन अत्यंत ढिसाळ होते. पण हे ऍडमिन इतक्या लवकर त्याना बरे म्हणायची वेळ आणेल असे वाटले नव्हते. एनिवे, व्हाय वॉज आय एक्सपेक्टिंग एनीथिंग डिफरेंट!!

<<अजुन फारतर ३ ते ४ पोस्ट मधे शेंडे तो रिपोर्टरच कसा खोटारडा आहे वगैरे पोस्ट घेऊन येतीलच.>
रिपोर्टर खोटारडा आहे असे त्रंपच्या लोकांनी म्हंटलेच आहे. आता शेंडेनक्षत्र आणखी कारणे शोधत असतील.
चला आपण त्यांना मदत करू.

अगा हे झालेचि नाही! ही सगळी डेमोक्रॅट्सची कन्स्पिरसि आहे.

बायडेनमुळे हे झाले.
बायडेननेच हे त्या रिपोर्टरला पाठवले.
DEI मुळे झाले.
LGBTI मुळे असे झाले.
ज्युईश लेसरने हे असे केले
तकर कर्ल्सन ने म्हंटले आहे की वाईट हवा ही abortion मुळे येते. तसेच असेल.
डेमोक्रॅटच हे सगळे कंट्रोल करतात, त्यांनीच केले.
कदाचित ओबामा ने सुद्धा केले असेल.
टेसला विरुद्ध निदर्शने करणार्‍या देशद्रोही लोकांनी हे केले.

काहीहि सांगितले तरी शेंडेनक्षत्र नि त्यांचे साथीदार कशावरहि विश्वास ठेवतात.

सगळी नुसती मज्जा न् काय!!

डिफेन्स सेक्रेटरी हेग्सेथ, डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्स तुलसी आणि नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅडव्हाजर माईक वॉल्ट्झ किती इनकाँम्पिटंट असावे!!!
त्यांचे इमेल, पासवर्ड आणि खूप सारी प्रायव्हेट माहिती पब्लिकली सापडली. जर्मन न्यूज आउटलेटला ती कशी सापडली ते इतकं सरळ आणि नाईव्ह आहे की धडकी वगैरे सोडा, मज्जा वाटते.
फोन आणि इमेल मिळाला तर इतकं काय! पासवर्डका, तो कधीच बदलला... असे भोळसट प्रश्न विचाराचे असतील तर नकाच विचारु. लिंक वाचा आणि खेळखंडोबा व्ह्यायची वाट बघा.

आमच्या इथे १००+ फायर फाईटर्सचे स्केड्यूल ट्रेनिंग रद्द झाले आणि एकाएकी मंडळी जागी झाली. तरी अजून निष्ठावंत गुळगुळमुळीत स्टँड घेवूनच आहेत. एका इमेल द्वारा ७ मार्चला फेडरल फंडिंग अभावी नॅशनल फायर फाईटर अ‍ॅकॅडमीचे क्लासेस्/कोर्सेस बंद झाले. हे फेमाच्या कट्स खाली झाले. आता क्लासेसचे स्केड्यूल रद्द होत आहे हे जसे वेगवेगळ्या राज्यांना कळत आहे तसे हळू हळू देशभरातली मंडळी जागी होत आहेत. रोजच्या धकाधकीत फायर फायटर्स आणि इएमटीचा आधारचा , त्यांचा इमरजन्सी रिस्पॉन्स आपण गृहित धरलेला असतो. आता तोच आधार कमकुवत करणे झाले आहे.
https://marylandmatters.org/2025/03/17/advocates-worry-national-fire-aca...

Pages