डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>येथे संपादक हा केवळ निमीत्त आहे.<< +१

आशा करुया कि ट्रंप कल्प्रिटस्ना बाहेरचा रस्ता दाखवेल, रिगार्डलेस ऑफ द एक्स्टेंट (स्मॉल ऑर बिग) ऑफ डॅमेज डन...

संबंधित व्यक्ती जर ट्र्म्प च्या बाजूचा असता तर त्याने वेळीच संबंधित व्यक्तींना ह्या लीकबद्दल सावध केले असते. असला कट्टर शत्रू असल्यामुळे त्याने ह्या लीकचा भरपूर राजकीय फायदा करून घेतला. सरळ सोपी गोष्ट आहे!

नक्की कुणी आणि का ह्या माणसाला कोंटॅक्ट मधे घातले ते शोधून त्याला समज देणे आवश्यक आहे.

प्रत्येक निरोपाकडे निरखून पहाणे आणि योग्य लोक आहेत की नाही हे तपासणे अव्यवहार्य आहे.
उगीच समस्त मंत्रीमंडळाला झोडपणे चूक आहे. ज्याने हे नाव घातले तोच दोषी आहे.

>>>
प्रत्येक निरोपाकडे निरखून पहाणे आणि योग्य लोक आहेत की नाही हे तपासणे अव्यवहार्य आहे.
उगीच समस्त मंत्रीमंडळाला झोडपणे चूक आहे
<<<
टाळ्या!!
हशासुद्धा, पण मुख्य म्हणजे टाळ्या!

पण मी काय म्हणतो : एवढ्या कोलांट्याउड्या मारुन एखाद्या माणसाच्या जिवाला त्रास होत नाही का..?

“आशा करुया कि ट्रंप कल्प्रिटस्ना बाहेरचा रस्ता दाखवेल,”
“ज्याने हे नाव घातले तोच दोषी आहे.”

In an interview Saturday with NBC News, Trump says he doesn't "fire people because of fake news and because of witch hunts."

पण मी काय म्हणतो : एवढ्या कोलांट्याउड्या मारुन एखाद्या माणसाच्या जिवाला त्रास होत नाही का..?>> Rofl

माझ्यामते जरी वाकलेल्या मणक्यामुळे कोलांट्याउड्या मारायला तसा त्रास होत नसेल तरीही निदान पोटात तरी नक्कीच ढवळायला हवे... Biggrin

<< संबंधित व्यक्ती जर ट्र्म्प च्या बाजूचा असता तर त्याने वेळीच संबंधित व्यक्तींना ह्या लीकबद्दल सावध केले असते. असला कट्टर शत्रू असल्यामुळे त्याने ह्या लीकचा भरपूर राजकीय फायदा करून घेतला. सरळ सोपी गोष्ट आहे! >>

------ विषयाशी काहीच संबंध नसलेल्या व्यक्तीला सिग्नल थ्रेड मधे सामिल करुन घेण्यात आले होते. अशी व्यक्ती ट्रम्पचा समर्थक असली तरी त्याला सामिल करुन घेण्याची कृती अक्षम्य हलगर्जीपणाच आहे. मार्को रुबियोने म्हणायचे धारिष्ट्य दाखविले.

<< नक्की कुणी आणि का ह्या माणसाला कोंटॅक्ट मधे घातले ते शोधून त्याला समज देणे आवश्यक आहे. >>
------ सर्व तपास यंत्रणा भ्रमिष्ट नसलेल्या, चिरतरुण, कल्पक आणि हजरजबाबी ट्रम्पच्या मजबूत हातात आहे. लावा शोध आणि द्या "समज".

<< प्रत्येक निरोपाकडे निरखून पहाणे आणि योग्य लोक आहेत की नाही हे तपासणे अव्यवहार्य आहे. >>
------ प्रत्येक निरोपाकडे निरखून पहाणे फार लांबची गोष्ट आहे, आधी एका अशा महत्वाच्या थ्रेड कडे तर लक्ष जायला हवे होते.
थ्रेड मधल्या १७ लोकांची नावे प्रसिद्ध झालेली आहेत. हे सर्व लोक मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत. एखादा अनाहूत व्यक्ती या थ्रेड मधे सामिल केला जातो आणि या ३४ डोळ्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही हे अनाकलनीय आहे.
या १७ पैकी काही लोक युक्रेन-रशिया, चीन- तैवान , हमास- हिजबुल्ला- इराण अशा मोठ्या प्रश्नांवरही काम करत आहेत. ज्याला थ्रेड मधे सामिल केले जाते , तो व्यक्ती चांगला असेल पण त्या व्यक्तीचा डिवाईस १०० % सुरक्षित नाही. मोठा रेड फ्लॅग आहे.

<<उगीच समस्त मंत्रीमंडळाला झोडपणे चूक आहे. ज्याने हे नाव घातले तोच दोषी आहे.>>
---- हा विचार आवडला. Happy
अगदी असाच न्याय स्थलांतरितांना, काळ्या लोकांना, DEI लोकांना का लावला जात नाही.
एखाद्या स्थलांतरित व्यक्तीने गुन्हा केल्यावर समस्त स्थलांतरित समुदायाला ( मेक्सिकन, हैती, होंडुरस, नायजेरिया... ) झोडपले जाते. गुन्हा एक व्यक्ती करतो ( गुन्ह्याचे समर्थन नाही ) पण शिक्षा म्हणून समस्त समुहाला जबाबदार धरुन झोडपण्याचा प्रकार होतो.
हे असे ब्लँकेट झोडपणे योग्य असेल तर समस्त मंत्रीमंडळाला झोडपणे चूक कसे?

हया प्रकरणात पत्रकाराला ग्रुप मध्ये ऍड केले इतकेच लक्षवेधी नाहीये. सिग्नल सारख्या ऍप वर असल्या चर्चा करणे हेच मुळात खुप रिस्की आणि बेकायदेशीर आहे. सिग्नल वर दिसापीअरिंग मेसेज पाठवता येतात.

हिलरी च्या मेल सर्वर साठी लॉक हर अप म्हणणारे आज गप्प गार आहेत.

>>
अगदी असाच न्याय स्थलांतरितांना, काळ्या लोकांना, DEI लोकांना का लावला जात नाही.
एखाद्या स्थलांतरित व्यक्तीने गुन्हा केल्यावर समस्त स्थलांतरित समुदायाला ( मेक्सिकन, हैती, होंडुरस, नायजेरिया... ) झोडपले जाते. गुन्हा एक व्यक्ती करतो ( गुन्ह्याचे समर्थन नाही ) पण शिक्षा म्हणून समस्त समुहाला जबाबदार धरुन झोडपण्याचा प्रकार होतो.
हे असे ब्लँकेट झोडपणे योग्य असेल तर समस्त मंत्रीमंडळाला झोडपणे चूक कसे?
<<
हा प्रश्न आवडला Happy
स्थलांतरित लोकांचा प्रश्न असा आहे की कुठलीही विचारपूस, तपास न करता लाखो लोकांना देशात घुसू देणे आणि त्यातले कुणी गुन्हेगार नसतील असे डोळे मिटून गृहित धरणे ह्याला आक्षेप आहे. जगातील समस्त अमेरिकेत येऊ इच्छिणार्‍या लोकांना घुसू देणे, त्यांचा पाहुणचार करणे, त्यांचे गुन्हे दुर्लक्षित करणे ह्या सरकारी धोरणाला आक्षेप आहे.
कुठल्या पदासाठी, कॉलेजसाठी उमेदवार स्वीकारताना त्याच्या / तिच्या त्वचेचा रंग काय आहे, त्याचे/ तिचे लिंग काय आहे, तो/ती कुठल्या प्रकारचे लैन्गिक संबंध ठेवते अशा गोष्टींकडे पाहून त्यांना झुकते माप देणे ह्या वृत्तीला विरोध आहे. अशा प्रकारे भरती केलेले लोक जास्त गुणी असतात असा पुरावा नाही. उलट अशा रंगीबेरंगी व्यक्ती भरती करता याव्यात म्हणून नोकरीच्या भरतीच्या कसोटीत थोडी सूट दिली जाते. ह्या वृत्तीला विरोध आहे.
कुठल्या प्रगल्भ व्यक्तीने आपले स्तन कापून पुरुष बनावे, कुणी आपले लिंग कापून स्त्री बनावे ह्याला कुणाची आडकाठी नाही.पण तसे केले म्हणून ती व्यक्ती कुठल्याशा पदाचा गरिमा वाढवणार आहे म्हणून त्या व्यक्तीला झुकते माप द्यावे ह्याच्या विरोधात ट्र्म्प आणि त्याचे समर्थक आहेत.

तुमची बाजू जेव्हा निवडून येईल तेव्हा गुणवत्ता ही गौण मानली जावी आणि बाकी अन्य गोष्टी त्वचेचा रंग, लैन्गिक कल, लिंगबदल वगैरे पाहूनच उमेदवार निवडले जावेत असे नियम पुन्हा लागू करा.

>>
हया प्रकरणात पत्रकाराला ग्रुप मध्ये ऍड केले इतकेच लक्षवेधी नाहीये. सिग्नल सारख्या ऍप वर असल्या चर्चा करणे हेच मुळात खुप रिस्की आणि बेकायदेशीर आहे. सिग्नल वर दिसापीअरिंग मेसेज पाठवता येतात.

<<
सरकार दरबारी सिग्नल अ‍ॅप वापरायची सुरवात ट्रंप सरकारने केलेली नाही. ह्या आधी ही हेच होत होते.
ह्या प्रकरणात कुणी सिग्नल सर्व्हर हॅक केला आहे आणि त्यातून माहिती लीक झाली आहे असे दिसत नाही. त्यामुळे सिग्नल अ‍ॅप आणि इकोसिस्टम ला दोष देण्याला आधार नाही.
सिग्नल वापरणे कायदेशीर आहे का ह्याचे उत्तर कोर्ट देऊ शकेल. पण ट्रंपने हे अ‍ॅप वापरा असा वटहुकुम काढला नव्हता.

>>
प्रत्येक निरोपाकडे निरखून पहाणे फार लांबची गोष्ट आहे, आधी एका अशा महत्वाच्या थ्रेड कडे तर लक्ष जायला हवे होते.
थ्रेड मधल्या १७ लोकांची नावे प्रसिद्ध झालेली आहेत. हे सर्व लोक मोठ्या जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत. एखादा अनाहूत व्यक्ती या थ्रेड मधे सामिल केला जातो आणि या ३४ डोळ्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही हे अनाकलनीय आहे.
<<
अहो चार वर्षे नाममात्र मेंदू असणारे, जराजर्जर, मरणासन्न व्यक्तिमत्व राज्य करत होते. आपण काढलेल्या अनेक हुकुमांचा ह्या सोंगाला पत्ताही नसे. म्हणजे त्याच्या आडून दुसरेच कुणीतरी राज्य कारभार चालवत होते. हे जर चालवून घेतले. समस्त माध्यमांनी हे जाणीवपूर्वक झाकून ठेवले तर एक सिक्युरिटी लीक किस झाड की पत्ती आहे!

सरकार दरबारी सिग्नल अ‍ॅप वापरायची सुरवात ट्रंप सरकारने केलेली नाही. ह्या आधी ही हेच होत होते.

>>> उदाहरण? सरकारी लोकं कोणत्याही गोपनीय (नॉन पब्लिक) माहितीसाठी सिग्नल वापरायचे असे? खासकरून राष्ट्रीय सुरक्षेसारख्या चर्चेसाठी?

<<<असे झाले म्हणून ट्रंप सरकार रद्द करून कमलाबाईला सरकार स्थापन करायला बोलवा???
अरे वा! ही फारच छान कल्पना आहे.

२०१६ मधे हिलरीच्या इमेल्स बद्दल शेंडे आणि राज यांचे काय म्हणणे होते? त्या धाग्यावर पोस्टी सापडतील शोधल्या तर. कोणी शोधल्या तर नक्की लिंक द्या. मजा येईल वाचायला Proud

<< तुमची बाजू जेव्हा निवडून येईल तेव्हा गुणवत्ता ही गौण मानली जावी आणि बाकी अन्य गोष्टी त्वचेचा रंग, लैन्गिक कल, लिंगबदल वगैरे पाहूनच उमेदवार निवडले जावेत असे नियम पुन्हा लागू करा. >>

----- गुणवत्तेने भरलेले १७ लोक त्या चॅटमधे असतांना काय आणि किती दिवे लावले ? त्या बिचार्‍या प्रामाणिक पत्रकारालाही खोटे ठरविले जाण्याचे प्रकार झाले. शेवटी त्याने सबंध चॅट च प्रसिद्ध केले.

आता लोकांनी ठरवायचे या चॅटला classified information समजायचे अथवा military action plan.

एका व्यक्तीने नको त्यांना लीक केले ह्याचा अर्थ हौती बंडखोरांविरुद्धची सगळी मोहिम फसली का?
हवे तिथले तळ उध्वस्त केले गेले नाहीत का? हवे ते बंडखोर मारले नाहीत का? उगीच काहीच्या काही!
आपला नावडता माणूस सत्तेत आहे म्हणून वाट्टेल ते तारे तोडू नका.
त्या पत्रकाराने अनेक खोट्या गोष्टी प्रसारित केल्या आहेत. तो पत्रकार (आपल्याइतका नसेल कदाचित) पण ट्रंप द्वेष्टा आहे असे इतिहास सांगतो.
ट्रंप द्वेष्टा असल्यामुळे तो बिचारा, सत्यवादी, हरिश्चंद्राचा आधुनिक अवतार वगैरे मानला जाणार ह्यात आश्चर्य ते काय?

<< त्या पत्रकाराने अनेक खोट्या गोष्टी प्रसारित केल्या आहेत. >>

----- अगदी याच दृष्टीकोनाने घात झाला.... स्वत: ची मोठी चूक झाली असतांना त्या बिचार्‍या पत्रकाराला उगाचच डिवचत बसले, थोडा मुत्सद्दीपणा दाखवून त्याला शांत ठेवता आले असते. यथावकाश या १७ लोकांना मस्क मार्फत classified information कशी हाताळायची याचे प्रशिक्षण द्यायचे.

खोट्या बातम्यांचा प्रसार ट्रम्प आणि त्याची टिम पदोपदी करत असतेच. बातम्यांची खातरजमा ट्रम्प स्वत: करत नसतो, किंवा प्रेस सेक्रेटरी पण करत नाही. उदाहरण म्हणून गाझाची आर्थिक मदत थांबविणे. आकडे खोटे होते आणि उल्लेख केलेले गाझा हे पॅलेस्टाईन मधे नव्हतेच.... ते कुठे मोझांबिकमधे होते. अकार्यक्षमता म्हणायचे का खोटेपणा ?

डोजच्या घोटाळ्यांची माळ मागच्या पानांवर आली आहेच. आधी खोटे चूकीचे आकडे आधी घोषित करायचे, शून्यामधे गडबड करायची , आकडेवारी मॅच होत नाही मग आधी घोषित केलेली माहिती संकेत स्थळावरुन काढून टाकायची असे प्रकार. पण हे किती वेळा करायचे? अकार्यक्षता म्हणायचे का खोटेपणा?

China, Japan, South Korea will jointly respond to US tariffs, Chinese state media says

जपान आणि कोरिया म्हणजे भारत पाकिस्तान सारखे हाड वैरी. चायना आणि जपान परत काही सख्य नाही.
आता हे खरं का एप्रिल फूल ते तात्याला विचारा.
तात्यामुळे कॅनडात क्यबेकचे लोक कॅनडाचा झेंडा घेऊन ओ-कॅनडा म्हणू लागले, ते पण इंग्रजी मधुन. Wink Lol (क्यबेक फ्रेंच सेपरेटिस्ट राज्य आहे)
वर्ल्ड पीस करुननच रहाणार तात्या. अ‍ॅट द कॉस्ट ऑफ अमेरिकन जॉब्ज्स!

>>
डोजच्या घोटाळ्यांची माळ मागच्या पानांवर आली आहेच. आधी खोटे चूकीचे आकडे आधी घोषित करायचे, शून्यामधे गडबड करायची , आकडेवारी मॅच होत नाही मग आधी घोषित केलेली माहिती संकेत स्थळावरुन काढून टाकायची असे प्रकार. पण हे किती वेळा करायचे? अकार्यक्षता म्हणायचे का खोटेपणा?
<<
माध्यमे फक्त चुकीचे आकडे सांगणारी माहिती जास्त ठळक करून सांगते त्यामुळे डोज म्हणजे खोटारडे अशी प्रतिमा तयार करणे सोयीचे जाते.
जगाच्या कोपर्‍यात कुठेही गाझा असला तरी अमेरिकन करदात्यांनी त्यांच्या कंडोम वापराची सोय करणे तेही अवाच्या सवा पैसे ओतून हे चूकच आहे. गाझा इथला का तिथला ही त्या मानाने किरकोळ चूक आहे. एक घोडचूक झाकायला ह्या किरकोळ चुकीचा गवगवा करणे ही माध्यमांची आवडती ट्रिक आहे.

मुळात अमेरिकेच्या केंद्र सरकारात बजबजपुरी आहे. पैसा पाण्यासारखा खर्च केला जातो आहे. नको त्या कामासाठी नको तितके पैसे खर्च केले जात आहेत. ट्रान्स अमुक, गे तमुक असल्या प्रकल्पाच्या नावाखाली पैसा उधळला जात आहे. हे खरे आहे. कुणीतरी ते ठीक केलेच पाहिजे. असे केल्यामुळे अनेक बड्या धेंडांच्या पोटावर पाय आल्यामुळे ते शक्य ते मार्ग वापरून डोजची बदनामी करत आहेत. बघू कोण जिंकते ते.

तुम्हाला सरकार अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आणि सचोटीने कारभार करणारे वाटत असेल तर आनंद आहे. आमच्या बाजूला काही तसे वाटत नाही.

>>
तात्यामुळे कॅनडात क्यबेकचे लोक कॅनडाचा झेंडा घेऊन ओ-कॅनडा म्हणू लागले, ते पण इंग्रजी मधुन. Wink Lol (क्यबेक फ्रेंच सेपरेटिस्ट राज्य आहे)
<<
स्प्रिंग आला तरी कॅनडात रात्रच चालू आहे बहुतेक. लोक स्वप्नातच रममाण आहेत. आनंद आहे!

बघू कोण जिंकते ते.>> डोज दोन वर्षांसाठी होतं तर इलॉन चार महिन्यातच पळ काढतोय.
तात्या गव्हर्नर ट्रूडो करुन करुन आता शेपुट पोळल्यावर प्रायमिनिस्टर कार्नी/ मार्क वर आला, ५१ स्टेटचा उच्चार गायब झाला. थोडक्यात कुठे स्प्रिंग आलाय आणि कोण गुहेत जातंय ते समजुन घ्या. उद्या जागतिक तोंडावर पडायचा दिवस आहे. त्यासाठी शुभेच्छा!

बजबजपुरी, खर्च, परराष्ट्रनीती आणि धुतले तांदूळ बाजूला ठेवले तरी या सरकारला माणूसकी नावाची चीज माहीत नाही हे मला सर्वात भयंकर वाटतं. ज्या पद्धतीने अनेक सरकारी कर्मचार्‍यांना तडकाफडकी - कुठलीही पूर्वसूचना वा पर्याय शोधण्यासाठी अवधी न देता अनसेरेमोनिअसली काढून टाकण्याचा धडाका लावला आहे, ते अमानुष आहे. ती माणसं आहेत, पगारांचे आकडे नाहीत. त्यांना कुटुंबं आहेत, त्यांच्या दैनंदिन आणि बाकी वैद्यकीय वगैरे गरजा आहेत याचा काही सेन्स नसल्यासारखं सुरू आहे. डाउनसाइझ करण्याचीही एक पद्धत असते. तुम्ही रोजच्यासारखं ऑफिसला जाताना बॅज चालला नाही म्हणजे तुम्हाला काढून टाकलं असं समजायचं हा काय प्रकार आहे?!

कॅनडाला ५१ वे राज्य बनवावे हा एक विनोद होता. ट्रूडो नामक विदुषकाची थट्टा होती. ट्रंपने कॅनडाच्या सीमेवर ना सैन्य आणून ठेवले आहे ना अन्य कुठल्या सैन्यदलाला त्या सीमेवर आणून ठेवले. निव्वळ एक ट्वीट केले होते. आणि त्यावर सगळा निरर्थक गदारोळ चालू आहे.
अर्थात फार थंडी असल्यामुळे कॅनडावासी मंडळींची विनोदबुद्धी गोठत असेल! चालायचंच!
चीन आणि अमेरिका दोघांनी जोरदार टॅरिफ लावली आहेत. बघू कॅनडावासी आपल्या हिवाळी निद्रेतून कधी जागे होतात का?
समजा मस्कने डोज सोडले तर त्यात कॅनडावासयाना हुरळून जावे असे काय आहे? त्यामुळे कॅनडात घरे स्वस्त होणार आहेत की सरकार व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार आहे?

नंदनवनात तुम्ही रहा खुषाल!
'जोक आणि निव्वळ ट्विट होतं' असा किमान १०० वेळा बोलून झाल्यावर मुलामा द्यायची वरुन आज्ञा असेल तर फाटलेली आहे हे आम्ही समजुन घेतो. जे आम्ही करतोय ते वर्क होतंय! Wink बाकी 'वल्गना केल्या' ला टेरिफ लावली म्हणतात का हल्ली. बरं तसं!
आम्ही मात्र टेरिफ न लावता अमेरिकन उत्पादने वापरणे बंद केले. परिणाम देहबोलीत दिसू लागले. तुम्हाला ते करणे शक्य नाही. Lol का विचारा बरं!

कॅनडाची लोकसंख्या आणि इकॉनॉमी, दोन्हीही अमेरिकेपेक्शा आठ पटीने कमी आहे, त्यामुळे साहजिकच अमेरिकेकडून कॅनडा कडे होणारी निर्यात कमी आहे व ट्रेड डेफिसीट आहे.
पण तात्यानी डेअरी प्रॉडक्ट च्या २५०% टेरिफ बद्दल एक धडधडीत खोटी थुंकी पसरवून दिली आणि मागाच्या घाणिने ति चाटून सगळीकडे फिरवली.
https://www.farmprogress.com/farm-policy/the-real-story-behind-canada-s-...

सगळे नुआन्स बाजुला काढून, खर्या माहितीच्या मुळाशी जावून तात्याचे खोटे दावे समजून घेण्यासाठी लागणारे करेज, लॉजिक, आणि लिटरसी मागाच्या मिनियन्स कडे नाही , त्यामुळे असो...

इथे डेअरी, मीट, पोल्ट्री निर्बंध असलेली मार्केट्स आहेत त्याला बरीच कारणं आहेत.
एक सोपा परिणाम म्हणजे पोल्ट्री फार्म लहान असतात त्यामुळे बर्ड फ्लू ने किमती अवाच्यासवा वाढलेल्या ते डर्ट चीप असं कधी होत नाही. अंडी आजही अडीच तीन कनेडीअन डॉलरला डझन मिळतात. कारण मार्केटवर किती प्रोड्युस करायचा हा कन्ट्रोल असतो. ग्रोथ हार्मोनला बंदीच आहे. त्यामुळे सगळ्यांना चांगलंच दूध, मांस मिळतं.
लोकसंख्या कॅलिफोर्नियापेक्षा ही कमी आहे. त्यामुळे अमेरिकेतून लोकसंख्या आणि खप जास्त असल्याने किंमती पाडून पुरवठा चालू झाला तर लोकल बिझनेसला तग धरणे अशक्य होईल.
तरी नॅफ्था/ युएसएमसीए जे तात्यानेच निगोशिएट केले त्यात टेरिफ किक इन होण्या आधी किती लिटर दूध इ. पदार्थ टेरिफ फ्री आहेत ती संख्या आहेत. गेल्या ४ वर्षांत ती संख्या अमेरिकेने एकदाही गाठलेली नाही. थोडक्यात २००% टेरिफ आहे पण ते लावायची वेळ अजुन अमेरिका आणुच शकलेली नाही.
आणखी बरेच नुआन्सेस आहेत.
लंबर कॅनडात स्वस्त आहे, कारण बहुतेक जमिन क्राऊन कॉर्पॉरेशन आहे. त्यावर वर्षाला कर भरुन लाकूड विकतात. अमेरिकेत जवळ जवळ सगळी लंबर तयार करणारी जमिन खाजगी आहे. त्यामुळे तात्या म्हणाला आमच्याकडे भरपूर लाकूड आहे. तरी ते मार्केट मध्ये येणे दुरापास्त आणि स्वस्त तर अजिबात नाही.
अमेरिका शेतीला लागणारे ९०% पोटॅश आयात करते. त्यातील ८०% कॅनडा कडुन येते.
अमरिका जे काही हायड्रोकार्बन आयात करते त्याच्या ६०% कॅनडा कडून येते. त्यात वेस्टर्न कनेडीअन सिलेक्ट हे तुलनेने स्वस्त आणि हेवी ऑईल प्रोसेस करणारे प्लांट अमेरिकेत आहेत. विहिरी खणून ते तिकडे मिळणार्‍या ऑईल साठी री टूल करणे हे एक रात्रीचं काम कोणाला वाटलं तरी तसं नाही.

अहो शेंडेनक्षत्र, तुम्ही लिहीलेले सगळे तुम्हीच पूर्वीच लिहिले होते. परत परत तेच काय सांगताय?
आणी त्यांनी तसे केले म्हणून तुम्ही पुटीनची लाळ घोटणार नि बेजबाबदारीने वागणार का?

Pages