जागतिकीकरणामुळे ज्या अनेक बर्यावाईट गोष्टी झाल्या त्यातली एक म्हणजे पेहरावात आलेले साधर्म्य. आजमितीला Traaditional Day/ Ethnic Day वगळता चार वेगवेगळ्या प्रदेशांतील चार व्यक्ती जवळपास उभ्या असल्यं, तर त्या कोणकोणत्या प्रदेशांतील आहेत ते ओळखताही येणार नाही. प्रत्येक प्रदेशाच्या पोशाखांची काही वैशिष्ट्ये असतात. महाराष्ट्रात तर नुस्त्या पगड्यांचेसुद्धा अनेक प्रकार आहेत.
पोशाखांचा विषय आला की दागिन्यांचाही त्यासोबत येणारच ना!
महिला वर्गाला अतिप्रिय असणारा विषय म्हणजे कपडे व दागिने, त्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. पण आता पुरुषमंडळीही कमी नाहीत हो. ! पुरुष पण हौसेने छान छान पेहराव करतच असतात.
या धाग्यावर टाका तुमच्याकडील आपल्या पारंपरिक मराठी पेहरावांचे, कपड्यांचे, दागिन्यांचे, किंवा ते सगळे परिधान केलेले असतानाचे तुमचे प्रकाशचित्र /छायाचित्र.
प्रकाशचित्र टाकताना कृपया खालील नियम व अटी पाळाव्यात.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
२. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा गौरव दिन २०२५' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचा स्वतःचा प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्याकडची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपात नसावे.
८. एक सदस्य एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो ; मात्र सलग दोन झब्बू देऊ नयेत.
९. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीचे प्रकाशचित्रांबद्द्लचे धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
मी कॉलजात शिकत असताना काढलेला
मी कॉलजात शिकत असताना काढलेला, (बहुतेक) २००५ मधला फोटो.
ही नेसलेली साडी आहे, शिवलेली नाही. ऐन वेळी ठरलं, त्यामुळे थोडक्यात आवरलं. हॉस्टेलला होते, दागिने वगैरे नव्हतेच फार. एक ठुशी मिळाली. काचेच्या बांगड्या होत्या त्या घातल्या.
श्रीशैल
श्रीशैल
हा २ वर्षांपूर्वीचा, कॉलजात
हा २ वर्षांपूर्वीचा, कॉलजात शिकवत असताना मुलांच्या ट्रॅडिशनल डे ला स्टाफने पण मज्जा केली तेव्हाचा. ही शिवलेली नऊवारी आहे.
(No subject)
छान फोटो येत आहेत
छान फोटो येत आहेत
पारंपारिक दागिने-कोल्हापुरी
पारंपारिक दागिने-कोल्हापुरी साज
(No subject)
शाळेच्या गॅदरींग मधील जिजाऊ
शाळेच्या गॅदरींग मधील जिजाऊ
(No subject)
आषाढी एकादशीला नटलेलं आमचं
आषाढी एकादशीला नटलेलं आमचं पिल्लू.

क्युट!
क्युट!
तेजो तुमची लेक जरा जयश्री गडकर सारखी दिसतेय फोटोत.
सुंदर सुंदर फोटो आहेत सगळेच
सुंदर सुंदर फोटो आहेत सगळेच रिना, तेजो, चिन्मयी, प्रज्ञा,इंद्रधनुष्य..
खूप सुंदर फोटो सगळ्यांचेच!
खूप सुंदर फोटो सगळ्यांचेच!
मानव,तुम्ही लिहिल्यावर मलाही तसा भास झाला खरा.
इकडे मुलांचे फोटो जरा कमीच
इकडे मुलांचे फोटो जरा कमीच आलेत नाही!
हा बघा जगातला सर्वात सुंदर मुलगा
वारकरी वेषात!
तुळशीमाळ
झांज
टिळा
शुभ्र धोतर कुर्ता
आणि निरागस हसू
सगळे प्रचि सुंदर.
सगळे प्रचि सुंदर.
किल्ली, माऊली खूप छान.
खूप सुंदर फोटो सगळ्यांचेच!
खूप सुंदर फोटो सगळ्यांचेच!
ही आमची झोपाळू झाशीची राणी
ही आमची झोपाळू झाशीची राणी

हे आमचं शेंडेफळ...शिवजयंतीला
हे आमचं शेंडेफळ...शिवजयंतीला शाळेत dance होता...तर मला शिवाजी महाराजांच्या birth day ला जायचंय म्हणे

हा आमच्या घरचा तुकाराम महाराज
हा आमच्या घरचा तुकाराम महाराज !

मस्त फोटो सगळे
मस्त फोटो सगळे
सगळ्यांचे फोटो मस्तच आहेत.
सगळ्यांचे फोटो मस्तच आहेत.
विशेषतः छोट्या दोस्तांचे फोटो खूप खूप आवडले
मस्त फोटो.
मस्त फोटो.
बच्चे कंपनी भारी गोड गोड आहे.
बच्चे कंपनी भारी गोड गोड आहे. फोटो एकदम झक्कास आहेत.
सगळ्यांचे फोटो मस्तच आहेत.
सगळ्यांचे फोटो मस्तच आहेत.
विशेषतः छोट्या दोस्तांचे फोटो खूप खूप आवडले>>>> + १०००
माझ्या आजीची मोहनमाळ मी घातली
सगळे बच्चेकंपनी गोड दिसतायत..
सगळे बच्चेकंपनी गोड दिसतायत..
(No subject)
सगळेच मस्त !!
सगळेच मस्त !!
इथे तर मुलांच्या ट्रेडिशनल डे ला आल्यासारखे वाटत आहे
जर हा पारंपारिक मराठी पोशाख असेल तर हाच झब्बू
आणि जिचे रूप ती घेऊन आली आहे तिचाही पारंपारिक फोटो याच झब्बूत
अह्हा!! अस्स्ल सौंदर्य!
अह्हा!! अस्स्ल सौंदर्य! पूर्वीचे फोटो किती सुरेख येत असत नो फिल्टर !
सगळे फोटो मस्त आहेत वरती आलेले!
सर्व फोटो सुरेख. लहान मुलांचे
सर्व फोटो सुरेख (माणसं, दागिने, दुपटी), लहान मुलांचे तर फार गोड.
Pages