मभागौदि २०२५ - प्रकाशचित्रांचा झब्बू - १ पारंपरिक मराठी पोशाख आणि दागिने

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 24 February, 2025 - 03:57

जागतिकीकरणामुळे ज्या अनेक बर्‍यावाईट गोष्टी झाल्या त्यातली एक म्हणजे पेहरावात आलेले साधर्म्य. आजमितीला Traaditional Day/ Ethnic Day वगळता चार वेगवेगळ्या प्रदेशांतील चार व्यक्ती जवळपास उभ्या असल्यं, तर त्या कोणकोणत्या प्रदेशांतील आहेत ते ओळखताही येणार नाही. प्रत्येक प्रदेशाच्या पोशाखांची काही वैशिष्ट्ये असतात. महाराष्ट्रात तर नुस्त्या पगड्यांचेसुद्धा अनेक प्रकार आहेत.

पोशाखांचा विषय आला की दागिन्यांचाही त्यासोबत येणारच ना!
महिला वर्गाला अतिप्रिय असणारा विषय म्हणजे कपडे व दागिने, त्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. पण आता पुरुषमंडळीही कमी नाहीत हो. ! पुरुष पण हौसेने छान छान पेहराव करतच असतात.

या धाग्यावर टाका तुमच्याकडील आपल्या पारंपरिक मराठी पेहरावांचे, कपड्यांचे, दागिन्यांचे, किंवा ते सगळे परिधान केलेले असतानाचे तुमचे प्रकाशचित्र /छायाचित्र.

प्रकाशचित्र टाकताना कृपया खालील नियम व अटी पाळाव्यात.

१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
२. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा गौरव दिन २०२५' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचा स्वतःचा प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्याकडची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपात नसावे.
८. एक सदस्य एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो ; मात्र सलग दोन झब्बू देऊ नयेत.
९. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.

मायबोलीचे प्रकाशचित्रांबद्द्लचे धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

Group content visibility: 
Public - accessible to all site users

9wari old pic.jpg

मी कॉलजात शिकत असताना काढलेला, (बहुतेक) २००५ मधला फोटो.
ही नेसलेली साडी आहे, शिवलेली नाही. ऐन वेळी ठरलं, त्यामुळे थोडक्यात आवरलं. हॉस्टेलला होते, दागिने वगैरे नव्हतेच फार. एक ठुशी मिळाली. काचेच्या बांगड्या होत्या त्या घातल्या.

9wari latest pic.jpg

हा २ वर्षांपूर्वीचा, कॉलजात शिकवत असताना मुलांच्या ट्रॅडिशनल डे ला स्टाफने पण मज्जा केली तेव्हाचा. ही शिवलेली नऊवारी आहे.

क्युट!

तेजो तुमची लेक जरा जयश्री गडकर सारखी दिसतेय फोटोत.

इकडे मुलांचे फोटो जरा कमीच आलेत नाही!
हा बघा जगातला सर्वात सुंदर मुलगा
वारकरी वेषात!Screenshot_20250227_165145_Gallery.jpg
तुळशीमाळ
झांज
टिळा
शुभ्र धोतर कुर्ता
आणि निरागस हसू

सगळेच मस्त !!
इथे तर मुलांच्या ट्रेडिशनल डे ला आल्यासारखे वाटत आहे Happy

जर हा पारंपारिक मराठी पोशाख असेल तर हाच झब्बू

FB_IMG_1740675881812.jpg

आणि जिचे रूप ती घेऊन आली आहे तिचाही पारंपारिक फोटो याच झब्बूत Happy

FB_IMG_1740676387894.jpg

अह्हा!! अस्स्ल सौंदर्य! पूर्वीचे फोटो किती सुरेख येत असत नो फिल्टर !
सगळे फोटो मस्त आहेत वरती आलेले!

Pages