जागतिकीकरणामुळे ज्या अनेक बर्यावाईट गोष्टी झाल्या त्यातली एक म्हणजे पेहरावात आलेले साधर्म्य. आजमितीला Traaditional Day/ Ethnic Day वगळता चार वेगवेगळ्या प्रदेशांतील चार व्यक्ती जवळपास उभ्या असल्यं, तर त्या कोणकोणत्या प्रदेशांतील आहेत ते ओळखताही येणार नाही. प्रत्येक प्रदेशाच्या पोशाखांची काही वैशिष्ट्ये असतात. महाराष्ट्रात तर नुस्त्या पगड्यांचेसुद्धा अनेक प्रकार आहेत.
पोशाखांचा विषय आला की दागिन्यांचाही त्यासोबत येणारच ना!
महिला वर्गाला अतिप्रिय असणारा विषय म्हणजे कपडे व दागिने, त्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. पण आता पुरुषमंडळीही कमी नाहीत हो. ! पुरुष पण हौसेने छान छान पेहराव करतच असतात.
या धाग्यावर टाका तुमच्याकडील आपल्या पारंपरिक मराठी पेहरावांचे, कपड्यांचे, दागिन्यांचे, किंवा ते सगळे परिधान केलेले असतानाचे तुमचे प्रकाशचित्र /छायाचित्र.
प्रकाशचित्र टाकताना कृपया खालील नियम व अटी पाळाव्यात.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
२. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा गौरव दिन २०२५' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचा स्वतःचा प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्याकडची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपात नसावे.
८. एक सदस्य एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो ; मात्र सलग दोन झब्बू देऊ नयेत.
९. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीचे प्रकाशचित्रांबद्द्लचे धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
काय मस्त फोटो आहेत? मुलं तर
काय मस्त फोटो आहेत. मुलं तर फारच गोड दिसतायत. सगळ्यांनी ट्रॅडिशन टिकवून ठेवली आहे.
अह्हा!! अस्स्ल सौंदर्य!
अह्हा!! अस्स्ल सौंदर्य! पूर्वीचे फोटो किती सुरेख येत असत नो फिल्टर !
>>>
धन्यवाद आणि हो.. ब्लॅक आणि व्हाईट फोटो मध्ये सात्विक भाव जरा जास्त उठून दिसतो असे वाटते. म्हणून घरचे जुने अल्बम बघायला फार आवडतात.
ओह!
ओह!
कधी आला धागा? आणि लगेचच सुपरहीट पण!!!
मस्त! मस्त!! मस्त!!!
एक से एक फोटो आहेत..
बच्चे कंपनीचे फोटोज तर माईंड ब्लोइंग!!
हौशी पालक मिळालेत छोटे कंपनी. मजा करा आणि अजून येऊ द्या.
ह्याला पारंपारिक म्हणता येईल
ह्याला पारंपारिक म्हणता येईल का..?
(No subject)
फारच सुंदर आहेत सगळ्यांचे
फारच सुंदर आहेत सगळ्यांचे फोटो...
निरूसर, तुम्ही आहत काय...गोड आहे फार..
(No subject)
मस्त!
मस्त!
अरे वा वा मस्त मस्त फोटो सगळी
अरे वा वा मस्त मस्त फोटो सगळी बच्चेकंपनी छानच. आणि बाकीच्या सुंदऱ्या पण मस्तच.
लेकीचा फोटो शेअर केला त्याने
लेकीचा फोटो शेअर केला त्याने लेकाला वाईट वाटू नये म्हणून आमच्या अपारंपारीक मुलाचा पारंपारीक भगव्या वस्त्रातील एक फोटो..
(No subject)
लहान मुलांचे व लहानपणीचे
लहान मुलांचे व लहानपणीचे दोन्ही प्रकारचे फोटो गोड आहेत.
परिसची गोडुली, छोटा ऋ आणि
परिसची गोडुली, छोटा ऋ आणि साधनातै फोटो मस्त आहेत.
Pages