निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
<< Trump सरकारने गाझाला
<< Trump सरकारने गाझाला पाठवले जाणारे ५ कोटी डॉलर रद्द केले. कशासाठी होते हे? चांगला प्रश्न आहे! हे होते गाझा च्या नागरिकांना कंडोम घेता यावेत म्हणून! बहुधा हे ठरलेल्या कामासाठी न वापरता कुठलेसे शस्त्र बनवायला वापरले जात होते असे कळते.
काहीही असले तरी अमेरिकन करदात्यानी ह्या बहुमोल कामात योगदान द्यावे असे काहीही दिसत नाही.
Submitted by shendenaxatra on 28 January, 2025 - 15:44. >>
------- २८ जानेवारीचा प्रतिसाद. बातमी च्या सत्यतेबद्दल शंका आहे.
५० दशलक्ष... मग पुढे वाढवून १०० दशलक्ष केले... दोन आठवडे खोटे फिरवत होते. $५० दशलक्ष कंडोम साठी नव्हते.
पैसे दिल्या गेलेले गाझा वेगळेच आहे.... मोझांबिक मधला प्रांत. "...condoms were not for the Palestinian territory of Gaza but for the African country of Mozambique, which has a province called Gaza.... " पण मोझांबिकच्या या गाझामधे ही $ ५० दशलक्ष पैसा कंडोम साठी दिला गेला नाही. CNN ची बातमी शेवटपर्यंत वाचा.
https://www.cnn.com/2025/02/12/politics/some-of-the-things-that-i-say-wi...
$२१ दशलक्ष भारतातल्या निवडणूक
$२१ दशलक्ष भारतातल्या निवडणूक मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दिला गेला असे ट्रम्प महाशय अनेक वेळा म्हणाले आहेत. हा पैसा कुठल्या माध्यमाने/ मध्यस्थीने, आणि कुणाला दिला गेला हे कोण सांगणार ?
https://youtu.be/cgojeb8bzwk?t=36
जर देशाचे नागरिक नसाल तर
जर देशाचे नागरिक नसाल तर कागदपत्रे, त्यांची फोटोकॉपी काहीतरी जवळ ठेवा.>>
काल कामानिमित्त USA वरून मे्सीको ला गेलेली सून usa ला परतली. तिला immigration मधे दोनतीन तास बसवून ठेवले. सगळी कागदपत्र व्यवस्थित होती तिचा फोन काढून घेतला होता.
पुढच्या १५ दिवसात तिला परत दोनदा जायचं आहे मे्सीकोला. जाम वैतागलीय.
<<जर देशाचे नागरिक नसाल तर
<<जर देशाचे नागरिक नसाल तर कागदपत्रे, त्यांची फोटोकॉपी काहीतरी जवळ ठेवा. >>
शेन्डे, तुमच्या बिनबुडाच्या आणि द्वेषपूर्ण पोस्ट्स्ना उत्तर देण्याची तसदी मी एरवी घेत नाही. पण इथे देतो.
कागदपत्रांची कॉपी मी गेल्या दोन दशकांपासून जवळ ठेवतो (आज काल फोन वरती). मुद्दा तो नाहीये. मुद्दा तुमच्या लक्षात आला नसण्याची शक्यता नाही. पण तुम्ही ज्या प्रकारे वरवर सोपे वाटणारे उत्तर दिले की, कागदपत्र कॅरी करा, त्यात काय एवढं? त्यावरून क्लियरली कळतंय की मुद्दा तुमच्या लक्षात आलाय आणि तुम्ही तो डाउनप्ले करायचा अटोकाट प्रयत्न करताय. फॉक्स न्युज ने दिलेलं ट्रेनींग चांगलंच कामी येतंय.
१. मुद्दा हा आहे की कागदपत्र कॅरी करणे आणि करावी लागणे ह्यात फरक आहे.
२. अनेक वर्ष एथे राहून झाल्यानंतर, अनेक वेळा विजा रिन्यु करून प्रचंड स्क्रुटीनी झाल्यानंतर, अनेक वेळा विना सायास परदेश प्रवास केल्यानंतर, अचानक तुम्ही कसे दिसता ह्या निकषावर सि बि पी ओफ्फिसर जेव्हा तुम्हाला थांबवतो आणि दोन दोन तास थांबवून ठेवतो तेव्हा तो फक्त तुम्हाला कुठल्या तरी कारणाने बाहेर ढकलता येईल हे बघत असतो.
३. ह्या रेजीम मधे सर्व गोरी कातडी नसलेली लोकं गिल्टी अनटील प्रुवन इनोसंट असतात. सि बि पी ओफिसर हा फक्त एक लिगल इम्मिग्रंट्स ना गाठायचा टच पॉईंट आहे.
४. माझ्या एका कलीगला मागच्या आठवड्यात एस एफ ओ विमानतळावर, एका टी एस ए ओफिसर! ने जॉब रोल, कुठे रहातो, कुठे चाल्लाय, का बरं वगैरे प्रश्न विचारून थांबवून ठेवलं. आता तुम्ही म्हणालंच की हा वन ऑफ इंसिडंट होता. पण अगेन, मुद्दा तो नाहीये.
४. आज काल पहिल्यांदा मि माझ्या मुलाच्या गाडीमधे सर्व कागद्पत्रांची कॉपी आहे की नाही ह्याची खात्री करून घेतली.
आता तुम्ही वरचे सर्व मुद्दे आयदर डिसमीस तरी कराल किंवा छोटे तरी कराल, कारण ह्यातली कुठलीही गोष्ट तुमच्या बाबतीत झालेली नाही. त्यामुळे ति होतच नसावी. नाही का?
लाँग लिव्ह द किंग अँड हिज प्रेसिडेंट.
म्हणजे?? अमेरिकेतल्या
म्हणजे?? अमेरिकेतल्या अमेरिकेत फिरताना कागदपत्र जवळ बाळगायची? ती तुम्ही चेक केलीत, किंवा करावी वाटली?
लॉंग लिव्ह द किंग!
बापरे! स्वतःच्याच देशांत चोरासारखं रहायची वेळ!
आम्ही ब्राऊन स्किन नॉन नागरिकांनी नुसती भेट देताना काय कायम पासपोर्ट बाळगू म्हणता! बॉर्डर क्रॉस केली पासपोर्ट दाखवला विषय संपला असं नाही का हल्ली!
भारताचं तिकिट काढलं त्यात युएस ट्रांझिट ऑप्शन होता तो घेतला नाही बरंच झालं. नसता ताप.
शत्रु की मित्र?
शत्रु की मित्र?
मित्र.
जा.
तसा Legal or illegal? असा कोड वर्ड का ठेवत नाहीत?
बापरे! स्वतःच्याच देशांत
बापरे! स्वतःच्याच देशांत चोरासारखं रहायची वेळ! >> अर्ध्या हळकुंडांनी पिवळ्या झालेल्यांना आपण मागावाले आहोत म्हणजे आपल्याला कोण कागदपत्र विचारणारच नाही असे वाटत असावे रे !
<<जर देशाचे नागरिक नसाल तर
<<जर देशाचे नागरिक नसाल तर कागदपत्रे, त्यांची फोटोकॉपी काहीतरी जवळ ठेवा. >>
थोडक्यात "गोरे नसाल तर " असे म्हणा.
कारण नुसते पाहून काय कळणार की नागरिक आहे की एच १ आहे, की ग्रीन कार्ड आहे?
कित्येक दक्षिण अमेरिकन, अफ्रिकन, आशियन यांनी वैध मार्गाने नागरिकत्व घेतले आहे. त्यांचे नागरिकत्व रद्द करणार की काय?
का त्यांनीहि महागडी अंडी विकत घ्यायला जाताना सगळे कागद जवळ ठेवून जायचे?
१९७७ पूर्वी ऑस्ट्रेलिया फॉर व्हाइट पीपल ओन्ली असे होते. मग या व्हाईट लोकांच्या लक्षात आले की आपण वाटतो तितके हुषार नाही, आपल्याला चिनी, भारतीय लोक यांना येऊ द्यावे लागेल.
वास्तविक अमेरिकन व्हाईट लोकांची अक्कल काय आहे हे उघड आहे, एकजात सगळे बाहेरील देशातून आलेले लोक इथे सि इ ओ, नि राजकारणात नि तंत्रज्ञानविषयक धंद्यात भरले आहेत ते का उगाच? जेफ बेझोस, मस्क ही इमिग्रंट लोकांची मुले! आता बिलियनेअर झाले आहेत.
तेंव्हा शहाणपणे नित्य गरजेच्या वस्तूंचे भाव कमी करणे, औषधांच्या किंमति कमी करणे, वगैरे उपयुक्त कामांकडे लक्ष द्या नि मग बाकीचे करा.
थोडक्यात "गोरे नसाल तर " असे
थोडक्यात "गोरे नसाल तर " असे म्हणा. >> झक्की असे ओपनली बोलायचे नसते हो.
>>> झक्की असे ओपनली बोलायचे
>>> झक्की असे ओपनली बोलायचे नसते हो.
का? आता कोणाची भीती आहे?!
शेंडे दाजी गोरे आहेत दिसायला.
शेंडे दाजी गोरे आहेत दिसायला. त्यामुळे त्याना काळजी नाही. तुम्ही देशी दिसतात याला ते काय करतील. घेऊन फिरायची कागद पत्रे. उगाच कागज नाही दिखायेंगे कशाला.
गोल्ड कार्ड - तुमच्याकडे ५
गोल्ड कार्ड - तुमच्याकडे ५ दशलक्ष डॉलर्स असतील तर ट्रम्पलँडमध्ये तुमचे स्वागत आहे.
पूर्वी ते पैसे गुंतवून १०
पूर्वी ते पैसे गुंतवून १० लोकांना कामाला वगैरे ठेवावे लागत असे. आता मारालागोला इ-ट्रान्सफर केले की अॅमेझॉन नेक्सडे रेड कार्पेट पोस्टाने येते म्हणे.
गोल्ड कार्ड मिळाले तरी त्याची
गोल्ड कार्ड मिळाले तरी त्याची कॉपी सतत कॅरी करायला लागायला कोणाची हरकत नसावी… काय समजलीव
<<< घेऊन फिरायची कागद
<<< घेऊन फिरायची कागद पत्रे. उगाच कागज नाही दिखायेंगे कशाला. >>> बरोबर आहे,
नाहीतर ५ दशलक्ष डॉलर्स मारालागोला इ-ट्रान्सफर करा!
असे येथील डोके फिरलेले मागा वाले लिहितील.
सध्याच्या इन्वेस्टमेण्ट बेस्ड
सध्याच्या इन्वेस्टमेण्ट बेस्ड इबी-५ प्रोग्रॅम पेक्षा यात नक्की काय फरक आहे - पैसे ५-१० पट वाढवले आहेत याव्यतिरिक्त? जे काय वाचले त्यावरून सध्याच्या कार्यक्रमात पाच की दहा लाख "गुंतवणूक" करावी लागते व काही जॉब्स त्यातून निर्माण करावे लागतात. हे ऑलरेडी आहे.
ते बदलून ५ मिलियन वर ते लिमिट नेले आहे तो एक फरक आहे. पण पैसे द्यायचे म्हणजे सरकारी फंडात द्यायचे की सध्यासारखीच कमर्शियल गुंतवणूक करायची ते अजून समजले नाही.
असा फरक बिरक म्हणजे रंग!
असा फरक बिरक म्हणजे रंग! गोल्ड ईज न्यू ग्रीन!
रशियन ओलागार्कना विचारुन सांगणार आहे तात्या पैसे कसे ट्रान्सफर करायचे ते.
गोल्ड कार्डाला इन्वेस्ट्मेंट
गोल्ड कार्डाला इन्वेस्ट्मेंट लागेल कि नाही माहीत नाही. म्हणजे नुसते पैसे भरले कि झाले. जॉब क्रिएशन रिक्वायर्मेंट बद्दल राजे काही बोलले नाहीत. त्यामुळे, नुसतं फी भरुन मिळेल असं वाटते.
गोल्ड कार्ड्ला कंट्री कोटा अप्लाय होईल की नाही माहीत नाही.
तसेच राजे म्हणतात तसं पाथ टू सिटीझन शिप कसा असेल माहीत नाही. कारण नॅशनॅलिटी अॅक्ट क्म्स अंडर काँग्रेस कंट्रोल.
आत्ताच्या इबी५ मध्ये
आत्ताच्या इबी५ मध्ये गुंतवेलेले पैसे नंतर परत मिळतात. गोल्ड कार्डाला त्याच्या १०पट डॉलर भरायचे ते फी म्हणून जे कधीच परत मिळणार नाहीत. ज्याच्या कडे ५ मिलिअन असतील तो मग इबी५ घेउनच येईल ना, १०पट पैसे फी म्हणून का भरेल? न्युटनच्या मांजरासाठी केलेल्या भिंतीतल्या भोकासारखे झाले हे.
आणि म्हणे यातून सरकारला रेवेन्यु मिळणार तो सुद्धा बिलिअन्स! मौज्जा ही मौज्जा आहे सगळा!
सरकारी नोकर्यांच्या डोज कपातीबद्दल - मला वाटते की ट्रम्प कोअर बेसमध्ये याचे प्रचंड स्वागतच होत आहे. सरकारी कामे प्रचंड इनएफिशिअन्ट आहेत विशेषतः अमेरिकेत. सरकारी प्रोजेक्ट्सवर आयटीमध्ये मी काही बिड्स वर काम केले आहे. प्रायव्हेट सेक्टर मध्ये जे काम समजा १ मिलिअन च्या आसपास अवार्ड होते आणि समजा ६ महिन्यात पूर्ण होते तेच काम सरकारी प्रोजेक्ट्समध्ये किमान १० मिलिअन आणि ३ वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट साइन होते. आणि मग ते अजून पुढे ही ढकलले जाते. लोकांनाही याची कल्पना आहे. आता या प्रश्नाचे उत्तर चेन सॉ नसेल. पण जनसामान्यांमध्ये कोणीतरी या प्रश्नाला भिडतो आहे ह्याचेच कौतुक होईल. त्यामुळे स्वतःच्या जीवनावर, सोशल सिक्युरिटी/मेडिकेड वर काय परिणाम होईल वगैरेची कोणाला पडली आहे.
ज्याच्या कडे ५ मिलिअन असतील
ज्याच्या कडे ५ मिलिअन असतील तो मग इबी५ घेउनच येईल ना, १०पट पैसे फी म्हणून का भरेल? न्युटनच्या मांजरासाठी केलेल्या भिंतीतल्या भोकासारखे झाले हे. >>> हे सध्याचे इबी-५ रिप्लेस करणार असे वाचले. त्यामुळे हाच एक मार्ग राहील पैसे देऊन यायचा.
पैसे सध्याच्या पद्धतीत परत मिळू शकतात हे लक्षात आले नव्हते - गुंतवणूक जशी असेल त्याप्रमाणे असेल ते पण तो महत्त्वाचा फरक दिसतो. नवीन कार्यक्रमात सरकारला द्यायचे (फी सारखे?) असे एका ठिकाणी वाचले व सरकारी प्रोजेक्ट्स करता द्यायचे असेही दुसरीकडे वाचले.
नेहमी प्रमाणे राजाने गोल्ड
नेहमी प्रमाणे राजाने गोल्ड कार्ड ची फुसकी सोडली, न्युज सायकल मधे राहण्यासाठी, आणि त्याची सगळी माकडं नाचायला लागली.
गोल्ड कार्ड हे इ बी -५ रिप्लेस करणार म्हणे. पण इ-बी ५ प्रोग्रॅम हा काँग्रेस नी अॅक्ट करून पास केलेला प्रोग्राम आहे. तो असा अचानक एक्झिक्युटीव ब्रँच बंद करू शकणार नाही. तसेच, गोल्ड कार्ड होल्डरस्ना सिटिझन्शीप साठी काँग्रेस् मधे अॅक्ट पास करून घावा लागेल.
पण ह्या गोष्टींबद्दल काहिही अक्कल नसलेला राजा काँग्रेसशनल अप्रुवल लागणार नाही हे ठोकून मोकळा झाला.
नेहमीप्रमाणे हाही प्रोग्राम कोर्ट सायकल मधे अडकेल. पण आपल्याला काय... ठोको ताली...
लाँग लिव्ह द किंग अँड हिज प्रेसिडेंट.
अमेरिकेत दशकानंतर गोवरामुळे
अमेरिकेत दशकानंतर गोवरामुळे (मिझल्स) बालकाचा मृत्यू झाला. अर्थात बालक लस न घेतलेलं होतं. दुसरं काय होणार!
मेकिंग न्हवे मेडच अमेरिका ग्रेट अगेन! लॉंंग लिव्ह द किंग! लॉंग लिव्ह हिज हेल्थ सेक्रेटरी!
<<सरकारी नोकर्यांच्या डोज
<<सरकारी नोकर्यांच्या डोज कपातीबद्दल - मला वाटते की ट्रम्प कोअर बेसमध्ये याचे प्रचंड स्वागतच होत आहे>>
सर्वांनाच आनंद होईल, फक्त त्रंप्याच्या कोअर बेसलाच नव्हे.
पण इतक्यातच आनंद साजरा करू नका. सध्या त्या कार्यक्रमात काही अतिरेकी प्रकार व चुका घडताहेत. ते थांबल्यावर वर्षभराने बघा.
<<त्यामुळे हाच एक मार्ग राहील
<<त्यामुळे हाच एक मार्ग राहील पैसे देऊन यायचा.>>
एव्हढे पैसे जवळ असतील, तर या अमेरिकेत कशाला नागरिक व्हायचे? कुठेहि आरामात जगता येईल, विशेषतः भारतीयांना तर भारतातच.
<<अर्थात बालक लस न घेतलेलं
<<अर्थात बालक लस न घेतलेलं होतं. दुसरं काय होणार>>
ऑलमोस्ट सर्व जण लस न घेतलेले आहेत. (काही जणांचे लस स्टेटस अननोन आहे)
बट बिगर प्रॉब्लेम इज, आर एफ के धडधडीत खोटं बोलतोयं की अॅडमिट असलेले सर्व जण क्वारंटाईन साठी अॅडमिट आहेत.
त्याचं हे बिनडोक विधान टेक्सास मधल्या हॉस्पिटल नी खोडून काढलंय की सर्व पेंशट सिरिअस असल्यामुळे अॅडमिट आहेत. क्वारंटाईन करायचं झालं तर हॉस्पिटल इस वर्स्ट प्लेस फॉर दॅट.
पण राजाची अक्कल तेवढीच व त्याच्या सपोर्टर्सचीही अक्कल तेवढीच. त्यामुळे खोटं पचून जाईल.
हे आउटब्रेक पुर्णपणे बंद झाले होते. पण ह्या अँटीवॅक्सर्स मुळे गेल्या २० वर्षात ते पुन्हा पुन्हा होउ लागलेत. पण, ही फॅक्ट गोल फिरवून हेल्थ सेक्रेटरी म्हणाला की त्यात काय एवढं, हे आउट्ब्रेक होतच रहातात. फॉक्स न्युज नी तात्याच्या सर्व लोकांचं चांगलंच ट्रेनींग केलंय.
आता तेवढं सि डि सी पुर्ण पणे बंद करून टाका म्हणजे तात्याचं अजून एक कँपेन प्रॉमिस पुर्ण होईल.
लॉग लिव्ह द किंग, हिज प्रेसिडेंट अँड हेल्थ सेक्रेटरी!
एव्हढे पैसे जवळ असतील, तर या
एव्हढे पैसे जवळ असतील, तर या अमेरिकेत कशाला नागरिक व्हायचे? कुठेहि आरामात जगता येईल, विशेषतः भारतीयांना तर भारतातच. <<
मल्ल्या वृत्तीच्या अनेक लोकांचे यावर दुमत असेल.
<<<बळावतोच आहे.
<<<बळावतोच आहे.
युक्रेनमधील निरर्थक, अनंतकाळ चालणारे, अमेरिकेच्या खिशावर बोज टाकणारे युद्ध संपवायला मागच्या म्हातार्याने काही केले नाही. हा म्हातारा काहीतरी प्रयत्न करतो आहे. तरी त्यावरही टीका.>>>>
अक्षरशः हे तुम्ही लिहिले आहे त्याच वेळी तात्यांनी युक्रेन ला "युद्ध सुरू ठेवण्याचा अधिकार" आणि त्यासाठी पैसे जाहीर केले. आमचा अपेक्षाभंग अर्थातच झाला नाही कारण आम्ही काही तात्यांना मत दिले नव्हते.
पण तुमचा झाला की नाही ह्याबद्दल कुतुहल वाटले. की रेअर अर्थ मिनरल डील च्या बदल्यात अजुन लाख दीड लाख लोक मरु घातले ही तुम्हाला मुत्सद्देगिरी वाटली? मग आधीचे प्रशासन नेमके काय वेगळे करत होते? कारण हे डील आधीच्या प्रशासनासमोर ही चर्चेत होते. मग निवडुणीकीच्या आधी एका दिवसात युद्ध थांबविन वगैरे वल्गना केल्या गेल्या होत्या त्या नेमक्या कशासाठी? मिडिया मध्ये भरपुर आक्रस्ताळेपणा करुन नंतर स्टॅट्स को कंटिन्यु करायचा ही तात्यांची मुत्सद्देगिरी ची व्याख्या दिसते आंतरराष्ट्रीय राजकारणात.
<< सि डि सी पुर्ण पणे बंद
<< सि डि सी पुर्ण पणे बंद करू >>
------ National Institutes of Health अंतर्गत काम करणारी National Institute of Allergy and Infectious Diseases ला बंद करायला विसरायचे नाही. कोरोना काळांत घराघरांत पोहोचलेले नाव, डॉ अँथनी फौची , हे NIAID चे डायरेक्टर ( १९८३- २०२२) होते आणि मागाच्या लोकांचे विशेष आवडते. सुटतात बिचार्या फौचीच्या मागे.
मिझल्समुळे बालकाचा मृत्यू वाचून वाईट वाटले.
आजपर्यंत कुठल्या अमेरिकन
आजपर्यंत कुठल्या अमेरिकन अध्यक्षाने WWIII बद्दल सुतोवाच केले आहे ?
हिलरी क्लिंटनने अगदी योग्य शब्द वापरला होता.
नवनिर्वाचित वाणिज्य सचिव
नवनिर्वाचित वाणिज्य सचिव लुटनिक - २५०,००० लोक ट्रम्प कार्डची वाट पाहत आहेत. इतक्या लवकर प्रतीक्षा यादी?
२५० हजार कायदेशीररित्या प्रवेश करू इच्छिणारे लोक × ५ दशलक्ष प्रति गोल्ड कार्ड = १.२५ ट्रिलियन डॉलर्स
https://www.independent.co.uk/news/world/americas/us-politics/howard-lut...
Pages