म्हणी - कोणत्याही भाषेचा सगळ्यात सुंदर अलंकार. एकच वाक्य, पण समयोचित आणि नेमके! म्हणतात ना की, a picture is worth a thousand words; तसेच म्हणींचे आहे. एक म्हण ही एका परिच्छेदापेक्षा अधिक परिणामकारक असते. मराठी भाषेत तर कित्येक सुंदर सुंदर म्हणी आहेत.
पण अडचण अशी आहे की आजच्या या Gen Z, Gen Alpha ला जुन्या म्हणी कळत नाहीत. एक म्हण सांगितली, तर त्यातल्या शब्दांचे अर्थ, त्यांच्या छटा, स्थळकाळाचे संदर्भ हे सगळे त्यांना माहीत असेल व कळेलच असे नाही. म्हणींचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाच असेल तर जरा आजच्या पिढीला समजतील, 'क्लिक' होतील अशा म्हणी तयार करायला काय हरकत आहे?
आपल्या जुन्याच म्हणी आणू या, नवीन रूपांत, नव्या रंगात!
तुम्ही वापरत असलेल्या, तयार केलेल्या आधुनिक म्हणी या धाग्यावर द्या.
जुन्या म्हणींच्या आधारावर तुमची कल्पनाशक्ती वापरून नवीन म्हणी तयार करा.
ही स्पर्धा नाही . फक्त एक गंमत उपक्रम आहे .
इथे कोणतेही बंधन नाही व नियम नाहीत. फक्त तुम्ही जर आंतरजालावरून उचलून इथे डकवणार असाल तर त्याचा स्रोत द्या.
चला तर मग! तुमच्या कल्पनाशक्तीचा वारू चौफेर उधळू द्या! उडू द्या हास्याचे तुषार आणि चालू द्या मनोरंजनाचा धबधबा !
उचलला फोन, काढली सेल्फी!
उचलला फोन, काढली सेल्फी!
दोन दिवसाच्या ट्रीपला सतराशे फोटो
उचलली पर्स, निघाली पार्लरला
उचलली पर्स, निघाली पार्लरला
मस्त धम्माल धागा आहे!
मस्त धम्माल धागा आहे!
लिहिता येईना कागद वाकडे
लिहिता येईना कागद वाकडे
गाता येईना करावके ला साकडे
दुरून कुंभमेळे साजरे..
दुरून कुंभमेळे साजरे..
लेखणीत नाही बळ, मग एआय घेऊन
लेखणीत नाही बळ, मग एआय घेऊन पळ.
वेमा ने उडवल्यावर..
वेमा ने उडवल्यावर..
उडावे परी पोस्ट रुपी उरावे..
SharmilaR मस्त
SharmilaR मस्त
करायला गेला प्रेझेंट आणि आली
करायला गेला प्रेझेंट आणि आली ब्लू स्क्रीन ऑफ डेथ
अती तेथे सगळेच पुढती
मस्त म्हणी आहेत!
मस्त म्हणी आहेत!
एक से एक भारी म्हणी आल्यात
एक से एक भारी म्हणी आल्यात इथे!
प्रेक्षकां कमी मंचावर जास्ती!
प्रेक्षकां कमी मंचावर जास्ती!
फॉलोअर्स बघून रिल्स टाकावे.
कार्यकर्ता राबतो अन नेता मलई खातो.
धागालेखकाशी जमेना अन त्याचे वाचल्याशिवाय करमेना.
टेंडरे टेंडरे नोटा साचे.
धागालेखकाशी जमेना अन त्याचे
धागालेखकाशी जमेना अन त्याचे वाचल्याशिवाय करमेना. >>
:हाहा
ओरिजिनल गेले रजेवर , त्यांचे
ओरिजिनल गेले रजेवर , त्यांचे ड्युआय माबोवर
नखभर ईमेलला हातभर डिस्क्लेमर
नखभर ईमेलला हातभर डिस्क्लेमर
'उथळ आयडीचे धागे फार' ही झाली
'उथळ आयडीचे धागे फार' ही झाली का?
पाहुणे येतो घरा, WiFi चा
पाहुणे येतो घरा, WiFi चा password शेअर करा.
कुठेही जा, मागतात WiFi चा पिन
कुठेही जा, मागतात WiFi चा पिन
वाचन नखभर धागे हातभर
वाचन नखभर धागे हातभर
पीपीटी बनवता येईना आणि म्हणे
पीपीटी बनवता येईना आणि म्हणे व्हर्जन अपडेटेड नाही
मस्त म्हणी आहेत
मस्त म्हणी आहेत
फोटो काढ आणि इन्स्टा वर ढकल
फोटो काढ आणि इन्स्टा वर टाक
उचलला ऐरपॉड , लावला कानाला
आपलेच डेव्हलपर आपलेच टेस्टर
आपलेच डेव्हलपर आपलेच टेस्टर
कस्टमरला मॅनेजर साक्षी
रिलीज सरो टीम मरो
फीचर्स नको पण बग्स आवर
Database मध्ये नाही ते view
Database मध्ये नाही ते view त कुठून येणार
बडा घर पोकळ वासा
बडा घर पोकळ वासा
आणि माबोवर ...
मुद्दा नाही पण शब्द भसाभसा
अविचारवंताला टक्कल नसते
अविचारवंताला टक्कल नसते
प्रतिसाद नको पण रिक्षा आवर
ड्युआयडीसारखी ग्वाही आख्ख्या माबोवरी नाही
लुंगी नेसून प्रतिसाद द्यावेत, कोट घालून धागे काढू नयेत
भारीच म्हणी आल्यात इथे
भारीच म्हणी आल्यात इथे
मस्तच.
लुंगी नेसून प्रतिसाद द्यावेत, कोट घालून धागे काढू नयेत>>>>
मोठ्याघरी जाऊन बारीक पिनचा
मोठ्याघरी जाऊन बारीक पिनचा चार्जर मागू नये
आपलाच मोबाईल आणि आपलाच ओटिपी
आपलाच मोबाईल आणि आपलाच ओटिपी
पडलो तरी नाक वर
पडलो तरी नाक वर
( माबोवर )
मुद्दा चुकला तरी शब्द फिरव
Pages