मभागौदि २०२५ - गंमतखेळ - आधुनिक म्हणी

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 14 February, 2025 - 22:32

म्हणी - कोणत्याही भाषेचा सगळ्यात सुंदर अलंकार. एकच वाक्य, पण समयोचित आणि नेमके! म्हणतात ना की, a picture is worth a thousand words; तसेच म्हणींचे आहे. एक म्हण ही एका परिच्छेदापेक्षा अधिक परिणामकारक असते. मराठी भाषेत तर कित्येक सुंदर सुंदर म्हणी आहेत.

पण अडचण अशी आहे की आजच्या या Gen Z, Gen Alpha ला जुन्या म्हणी कळत नाहीत. एक म्हण सांगितली, तर त्यातल्या शब्दांचे अर्थ, त्यांच्या छटा, स्थळकाळाचे संदर्भ हे सगळे त्यांना माहीत असेल व कळेलच असे नाही. म्हणींचा वारसा आपल्याला पुढे न्यायचाच असेल तर जरा आजच्या पिढीला समजतील, 'क्लिक' होतील अशा म्हणी तयार करायला काय हरकत आहे?

आपल्या जुन्याच म्हणी आणू या, नवीन रूपांत, नव्या रंगात!

तुम्ही वापरत असलेल्या, तयार केलेल्या आधुनिक म्हणी या धाग्यावर द्या.

जुन्या म्हणींच्या आधारावर तुमची कल्पनाशक्ती वापरून नवीन म्हणी तयार करा.

ही स्पर्धा नाही . फक्त एक गंमत उपक्रम आहे .

इथे कोणतेही बंधन नाही व नियम नाहीत. फक्त तुम्ही जर आंतरजालावरून उचलून इथे डकवणार असाल तर त्याचा स्रोत द्या.

चला तर मग! तुमच्या कल्पनाशक्तीचा वारू चौफेर उधळू द्या! उडू द्या हास्याचे तुषार आणि चालू द्या मनोरंजनाचा धबधबा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोस्टींचे भांडार
मुर्खांचा बाजार
मी तो ट्रोल भारवाही

फ्युचर बरोबर ऑप्शन्सची यात्रा

Rofl

क्रेडिटकार्डच्या जिवावर अंबानी

मल्ल्याने बुडवले, (ललित) मोदी ने लुटले तर वसुली कुणाकडे करणार?

अंगात नाही बळ, ट्रोल करून पळ

आपलं ते कॅंडीड कटेंट, दुसऱ्याचं ते प्रमोशन

लॉकडाऊनच्या दिवसांत स्वयंपाक फार

भांडी आठवून स्वयंपाक करावा

किंवा
नावडतीच्या पोस्टी नजरेआड

चॅटाचॅटी >> Lol
पेटंट घ्या या शब्दकळेचे

पांचट झबा,
दुनियादारीत वाढला
मुंपुमुं त स्थिरावला
समांतर मधे पिकला
तरी तो झबाच

मस्तच म्हणी सगळ्या
मजा सुरुय

सर आली धावून
रस्ता गेला वाहून

प्रत्येक पावसाळ्यानंन्तर

रस्त्यावर खड्डे
त्याला कोण भरे

Pages