Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 01:33
दोन दिवसांनी पेपर आहे.
आजचा सुटीचा दिवस निट अभ्यास करण्यात घालवायचा,
तिने मनात ठरवले होते.
“आज तरी अभ्यास करणार आहेस का?”, या आईच्या वाक्याने दिवसाची सुरवात झाली.
तिने काय ठरवले आहे न विचारता, ती काय करणार आहे हे गृहित धरून असलेले आईचे वाक्य ऐकताच तिचे डोके सटकले.
अभ्यास करण्याची कोणतीच कृती करायची इच्छा किंवा विचाराला तिच्या डोक्यात आता जागाच उरलेली नव्हती.
सगळी जागा रागाने भरलेली.
परिस्थितीवर घरच्यांवर आणि स्वतःवर असलेला रागच आजकाल तिने काय करायचे किंवा नाही, ठरवत असतो.
तिने दिवस भर अभ्यास करायचे ठरवले होते, आता करणारच नाही
रागाने दिवसाचे स्टेयरिंग व्हील नेहमीप्रमाणे हातात घेतले पुन्हा
आजही रागच जिंकला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान ..
छान ..
छान
छान
छान, स्टिअरिंगव्हील ची उपमा
छान, स्टिअरिंगव्हील ची उपमा आवडली .
छान
छान
@कविन, @झकासराव, @माबो,
@कविन, @झकासराव, @माबो, @सिमरन,
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार