नवा आहे.. पण छावा आहे.
लहानपणापासून छावा हा शब्द एखाद्या स्मार्ट तरतरीत तरण्याबांड मुलांसाठी वापरत आलोय. बॉयफ्रेंडचा समानार्थी शब्द छावा आणि गर्लफ्रेंड असेल तर छावी..
पण मला नाही वाटत हा शब्द पुन्हा या अर्थाने माझ्याकडून वापरला जाईल.
निमित्त चित्रपट छावा - बघायला सात दिवस उशीरच झाला. पण या सात दिवसात जवळपास सत्तर परीक्षणे अधाश्यासारखी वाचून काढली. आणि या चित्रपटावर आधारीत सातशे रील्स बघितल्या. चित्रपटाची कथा ही ईतिहासाची जितकी आवड आहे त्यानुसार माहीत होतीच. पण ते दाखवणार कसे याची उत्सुकता होती.
गेले काही वर्षात जे काही मोठ्या बॅनरचे वीएफएक्सयुक्त ऐतिहासिक चित्रपट आले ते पाहता अपेक्षा फार नव्हत्या. ट्रेलर देखील तितका भारी वाटला नव्हता. विकी कौशलचे नाचणे सुद्धा रुचले नव्हते. त्यामुळे चित्रपट आल्यावर, चार लोकांचे रिव्ह्यू वाचल्यावर थिएटरला जावे की ओटीटी रीलीजची वाट बघावी हा निर्णय घ्यावा असे ठरवले होते. कारण वेळ आणि पैसा खर्च करताना विचार करावा लागतोच. पण वैयक्तिक आवड काहीही असली तरी आपल्या मातीतील पराक्रमी वीरांवर चित्रपट येत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा ईतिहास पोहोचत आहे हे चांगलेच घडतेय असे वाटत होते.
देर आये दुरुस्त आये. गाणे चित्रपटातून उडवले गेले. वीएफएक्सचे पराक्रम कमीत कमी होते. संभाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या अभिनयाच्या आणि दमदार संवादांच्या ताकदीवर उभे करायचे शिवधनुष्य विकी कौशलने लीलया पेलले. अन्यथा ट्रेलरमध्ये ओरडतानाच फार दाखवले होते. खरे क्षण आणि संवाद थिएटरसाठी राखून ठेवले होते.
येसूबाई म्हणून रश्मिका ऐवजी दुसरी कोणीतरी (श्रद्धा, शर्वरी, मृणाल) हवी होती अशी बरीच मते ऐकली. त्यात तथ्यही वाटले. पण असो, ते जर तर झाले. रश्मिका फार कमी पडली असे वाटले नाही. तिच्या ईतर दुसर्या कुठल्याही चित्रपटापेक्षा ती यात छान दिसली.
औरंगजेब साकारणार्या अक्षय खन्नाने व्हिलन कॅटेगरीतील अभिनय वेगळ्याच उंचीला नेला. ना त्याने थयथयाट केला, ना तो निव्वळ थंड डोक्याचा खूनशी वाटला, ना तो विकी कौशलशी अभिनयाची जुगलबंदी करायला गेला. पण यापुढे औरंगजेब म्हटले की अक्षय खन्नाचे ते रुपच आठवावे असे काम करून गेला.
चित्रपटाची पटकथा प्रामुख्याने संभाजी राजे विरुद्ध औरंगजेब यावरच फोकस ठेवून लिहीली गेली होती. त्यामुळे या दोघातील एक अभिनेता जरी कमी पडला असता तर पुर्ण चित्रपट सपक झाला असता. पण तसे व्हावे ही श्रींची ईच्छा नव्हती.
या दोघांनी संवाद छान म्हटले पण मुळात ते होतेही तितकेच दमदार. कवी कलश यांनाही छान संवाद मिळाले जे गरजेचे होते. चित्रपटाच्या शेवटी कथानायक संभाजीराजे हे जग सोडतात आणि खलनायक औरंगजेब जिवंत राहतो. पण तरीही विजय संभाजीराजे यांचाच होतो आणि औरंगजेब हरतो हे प्रेक्षकांपर्यंत त्या संवादातूनच परीणामकारक पोहोचते.
पण, चित्रपट परीपुर्ण नाहीये. अडीच तासाच्या चित्रपटात संभाजी राजेंचा ईतिहास बसवणे तसे अवघडच होते. कदाचित म्हणून सुरुवात शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीपासून केली. पण त्यानंतरही पुढच्या दोन अडीच तासात जे दाखवले त्यातले बरेच काही कमी करून ईतर बरेच काही दाखवता आले असते. ज्यातून संभाजी राजेंचे व्यक्तीमत्व आणखी चांगल्या प्रकारे खुलून आले असते. तसेच ईतिहासाची अजून चार पाने लोकांपर्यंत पोहोचली असती. त्यामुळे एकंदरीत विचार करता काही इन्डिविज्युअल पर्फॉर्मन्सेस एकत्र आले आहेत, पण एक चित्रपट म्हणून बरेच काही कमी पडले असेही वाटले.
पण, हे ही नसे थोडके. चित्रपट संपल्यावर भले लोकं साश्रू नयनांनी मूकपणे बाहेर पडली असतील, पण घरी जाऊन प्रत्येक कुटुंबात यावर चर्चा झाली असेल. मोठ्यांनी आपल्याकडील ईतिहासाच्या ज्ञानाची देवाणघेवाण केली असेल. तर लहानग्यांनी ते ऐकले असेल. या चित्रपटाचा प्रभाव तितका नक्कीच पडला आहे आणि हे सुद्धा महत्वाचे आहे. अन्यथा स्वानुभावावरून सांगतो, शाळेत असताना गणित, विज्ञान, भाषा, भूगोल अश्या जीवनोपयोगी विषयांसोबत ईतिहास हा तितकासा महत्वाचा नसलेला विषय दरवर्षी का शिकवला जातो हा प्रश्न मला नेहमी पडायचा. ईतिहास शिकण्याचे महत्व कधी कोणी सांगितलेच नाही. पण कालांतराने स्वत:हून समजले की खरे ज्ञान हे पुस्तकी नसून जे आयुष्य आपल्याला शिकवते ते असते, आणि ते आपण ईतिहासातील चुका आणि अनुभवातूनच शिकत असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपला ईतिहास माहीत हवाच.
पटकथा संकलन वगळता ईतर कमतरता या चित्रपटाच्या प्रभावापुढे मला तरी गौण वाटल्या. पण तरीही ए आर रेहमानच्या संगीताबद्दल मात्र असे का झाले किंवा त्याने असे का केले हा प्रश्न अजूनही सतावत आहे. पार्श्वसंगीताच्या नावावर सतत काही अरेबियन बायका व्हिवळत होत्या. औरंगजेबाच्या द्रुश्यांना ते चालून गेले. त्याकडे बघून चीड यावी म्हणून असे चीड आणनारे संगीत वाजवले गेले असावे. पण आपल्याकडच्या दृश्यांना का हे आचरट प्रयोग केले? लढाईच्या दृश्यांना सुद्धा वेगवेगळे शब्द वापरून असाच आरडाओरडा चालू होता. ऊपकार एकच केले ते म्हणजे क्लायमॅक्स दृश्यात कुठले प्रयोग न करता संयम बाळगला. पण सर्वात महत्वाचे म्हणजे अपवाद वगळता संगीत कुठे मराठमोळे, आपल्या मातीतील वाटलेच नाही आणि हा अक्षम्य अपराध ठरावा. ज्याला जबाबदार केवळ ए आर रेहमानच नाही तर दिग्दर्शक सुद्धा तितकाच ठरतो. आणि म्हणूनच छावाचे परीक्षण अजय-अतुल यांची आठवण काढल्याशिवाय अपुर्णच!
असो,
कित्येक चित्रपटगृहात लोकं महाराजांचा जयघोष करत आहेत, तर चित्रपट संपल्यावर खणखणीत आवाजात महाराजांची गारद म्हटली जात आहे. याचे विडिओ सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. यामागे काही प्रमाणात फॅड सुद्धा असावे पण महाराजांप्रती तितकेच प्रेम आणि आदर असलेल्या लोकांची या महाराष्ट्रात वानवा नाही. राष्ट्रगीत संपताच जसे उत्स्फुर्तपणे भारतमाता की जय म्हणावेसे वाटते, कोणी गणपती बाप्पा म्हटले की आपसूक तोंडातून मोरया बाहेर पडते, तीच ताकद "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणेत आहे. त्यामुळे हे निव्वळ फॅड नसून कित्येकांना खरेच हे एका उत्सवासारखे वाटत असावे.
कित्येक दिवसांनी सकाळचा पहिला शो पहिल्या रांगेपासून हाऊसफुल झालेला पाहिला. तिकीट बूक करताना आदल्या रात्रीचा साडे अकरा वाजताचा शो जो मध्यरात्री अडीच वाजता संपला असता तो सुद्धा हाऊसफुल झालेला पाहिला. राष्ट्रगीत संपल्यावर भारतमाता की जय पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून लोकांनी चित्रपट बघायला सुरुवात केली. संभाजी राजेंनी सिंहाचा जबडा फाडताच लोकांनी टाळ्या वाजवल्या. अजून काही मोजक्या प्रसंगी त्या आल्या पण त्यात कुठेही नेहमीच्या टपोरी शिट्ट्या नव्हत्या. आपण जवान चित्रपट नाही तर छावा बघत आहोत याचे भान लोकांना कायम होते.
क्लायमॅक्सला मात्र एकाही संवादावर टाळी आली नाही. टाळी तर दूर कोणी एक शब्द तोंडातून बाहेर काढला नाही. कारण पुढे आपण काय बघणार आहोत आणि याचा शेवट काय होणार आहे हे लोकांना माहीत होते. चित्रपट अगदी योग्य फ्रेमवर थांबला. जरी लोकं मूक झाले असले तरी ती प्रत्येकाला स्वराज्य अभिमानाची गाथा वाटावी असाच शेवट होता. आणि मग जे आपल्या थिएटरमध्ये देखील घडावे अशी ईच्छा होती ते घडले. एका लहान मुलाने गारद म्हणायला सुरुवात केली आणि ती पुर्ण होईपर्यंत लोकं शांतपणे आपल्या जागी ऊभे राहिले. ज्या संभाजी राजेंवर शालेय ईतिहासाच्या पुस्तकाने देखील अन्याय केला त्यांच्या छावा चित्रपटानिमित्त हे दृश्य बघणे आणि अनुभवणे नशिबी आले...
धन्यवाद,
- ऋन्मेऽऽष
@ बोकलत,
@ बोकलत,
काय विपरीत परिणाम वैगरे नाही झाला.
>>>>>
हो बोकलत नक्कीच. उगाच ओढून ताणून असले मुद्दे आणले जात आहेत.
ॲनिमल चित्रपटात दाखवलेला हिंसाचार आणि छावा मधील लढाया यांना एका पारड्यात बसवाल तर ते हास्यास्पद होईल.
एक स्वानुभव सांगतो,
जेव्हा मी मायबोलीवरच पहिल्यांदा छावा बद्दल वाचले आणि ट्रेलर बघू लागलो तेव्हा मुलगी शेजारी होती. तिने सुद्धा तो पाहिला. चौकशी केली. आणि म्हणाली हा बघायला जायचा आहे.
त्यानंतर पुष्पा जेव्हा नेटफ्लेक्सवर आला आणि मी त्याचा ट्रेलर बघू लागलो तेव्हा ती लगेच म्हणाली, ए हा घाणेरडा पिक्चर आहे. बिलकुल बघायचा नाही. ज्या पद्धतीने ती उत्स्फूर्तपणे म्हणाली मी लगेच पुढे गेलो आणि आजवर फिरून तो ट्रेलर पूर्ण पाहिला नाही.
शेवटी ज्याचे त्यालाच ठरवायचे आहे मुलाना काय दाखवायचे. इथे कितीही खरा खोटा वाद घाला पण तिथे चुकू नका.
आपण यावर वेगळा धागा काढुया...
@ भरत
@ भरत
या परीक्षणात काही विशेष नाही. मायबोलीवरच जे अभिप्राय आले आहेत, त्यापेक्षा वेगळं काही नाही.
>>>>>>>>
सिरीयसली??
तुम्ही माझा धागा पूर्ण वाचला??
चित्रपट प्रदर्शित होऊन आठ दिवस झाल्यावर पाहून आलेले परीक्षण म्हणजे आता त्याची उपयुक्तताही तशी नाही.
>>>>>>>
पुन्हा एकदा, सिरीयसली??
हा चित्रपट अजून चार आठवडे कुठे हलत नाही. लोकांना तिकीट मिळत नाहीयेत. अजून बरेच लोकांचा बघायचा बाकी आहे आणि बघणार आहेत. त्यांना नक्कीच माझ्या परीक्षणाचा आणि इथे येणारे प्रतिसादांचा फायदा होईल.
अजून एक म्हणजे चित्रपट झाल्यावर इतके प्रतिसाद येतात त्यात आपल्याला हवे त्या चित्रपटाचा प्रतिसाद वेचने अवघड असते. यासाठी छावा सारख्या चित्रपटांची परीक्षणे स्वतंत्र धागा काढून लिहिणे उत्तम!
तुमच्या प्रतिसादात आता फक्त ऋन्मेऽऽष ला विरोध इतकाच अजेंडा उरला आहे. अश्यात चर्चा करायला मजा नाही. थांबूया!
सर इथेसुद्धा अश्लील
सर इथेसुद्धा अश्लील विनोदाचे शो पहा असा आग्रह करीत आहेत का?
>> "शेवटच काय तो एनव्हिजन
>> "शेवटच काय तो एनव्हिजन करून स्क्रिप्ट लिहिली आहे." >>
+१
याला माझेही +७८६
तरीही एकदा मोठ्या पडद्यावर जरूर बघावा असा आहे.
महाराष्ट्रात तेच होत आहे.
<आपण यावर वेगळा धागा काढुया..
<आपण यावर वेगळा धागा काढुया... >
सर, वेगळे धागा सावकाश काढा. आधी कशाकशावर वेगळा धागा काढायचा आहे, त्याची यादी करायला एक धागा काढा.
ती मायमराठी तुमच्याकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसली आहे. मराठी भाषेवर प्रेम असण्यासाठी तिच्यासाठी काही केले पाहिजे असे नाही, हे तुम्ही अशा प्रकारे सिद्ध कराल, असे तिला वाटले नसेल.
छावा बघितला. क्लायमॅक्स येई
छावा बघितला. क्लायमॅक्स येई तोवर युद्ध आणि मारामारीची रँडम दृष्ट्ये आहेत आणि मधेमध्ये संभाजी महाराजांच्या जीवनातील त्रोटक संवाद. ऐतिहासिक सिनेमा असून अत्यंत कमी ऐतिहासिक तपशील आहेत सिनेमात. शेवटच काय तो एनव्हिजन करून स्क्रिप्ट लिहिली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय दाखवायचे असा प्रश्न दिग्दर्शकाला पडलाय आणि हि पोकळी अचाट युद्ध मारामाऱ्यांच्या सिन्सनी भरून काढलीये. >>> अगदी हेच वाटलं चित्रपट बघितल्यानंतर
छावा बघितला. क्लायमॅक्स येई
छावा बघितला. क्लायमॅक्स येई तोवर युद्ध आणि मारामारीची रँडम दृष्ट्ये आहेत आणि मधेमध्ये संभाजी महाराजांच्या जीवनातील त्रोटक संवाद. ऐतिहासिक सिनेमा असून अत्यंत कमी ऐतिहासिक तपशील आहेत सिनेमात. शेवटच काय तो एनव्हिजन करून स्क्रिप्ट लिहिली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय दाखवायचे असा प्रश्न दिग्दर्शकाला पडलाय आणि हि पोकळी अचाट युद्ध मारामाऱ्यांच्या सिन्सनी भरून काढलीये. >>> अगदी हेच वाटलं चित्रपट बघितल्यानंतर
छावा बघितला. क्लायमॅक्स येई
छावा बघितला. क्लायमॅक्स येई तोवर युद्ध आणि मारामारीची रँडम दृष्ट्ये आहेत आणि मधेमध्ये संभाजी महाराजांच्या जीवनातील त्रोटक संवाद. ऐतिहासिक सिनेमा असून अत्यंत कमी ऐतिहासिक तपशील आहेत सिनेमात. शेवटच काय तो एनव्हिजन करून स्क्रिप्ट लिहिली आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय दाखवायचे असा प्रश्न दिग्दर्शकाला पडलाय आणि हि पोकळी अचाट युद्ध मारामाऱ्यांच्या सिन्सनी भरून काढलीये. >>> अगदी हेच वाटलं चित्रपट बघितल्यानंतर
तो मायमराठीचा धागा तो थेट
तो मायमराठीचा धागा तो थेट मराठी भाषा दिनालाच धागा काढेल आता. त्यात तो "मराठीतले 'खचितच' आणि 'क्वचितच' हे जवळजवळ विरुद्धार्थी असलेले शब्द एकाच अर्थाने वापरले (किंवा खरं तर ते तसे विरुद्धार्थी आहेत हेच माहिती नसलं); किंवा 'वानवा'च्या जागी 'वाणवा' वापरलं तरी मायमराठीचं, आणि शिवाय तिच्यावर असलेल्या आपल्या प्रेमाचं काहीही वाकडं होत नाही- हेही सिद्ध करून दाखवणार आहे.
शनिवारी छाया चित्रपट बघणे आणि
शनिवारी छाया चित्रपट बघणे आणि त्यावर लिहिणे
रविवारी भारत पाक सामना यामुळे जमले नाही.
येत्या विकेंडला नक्कीच.
तुमच्या वरच्या पोस्टने अजून एक मुद्दा मात्र दिला मला.
मराठीवर प्रेम असेल तर काय करू नये याबाबत.. त्यालाही लेखात घेतो.
@ छावा शेवट,
@ छावा शेवट,
तोच डोळ्यासमोर ठेवून चित्रपट लिहिला आहे ते तर कळतेच आहे.
पण मग कुठेतरी असेही वाटते की तो शेवटच लोकांसमोर येणे गरजेचे होते.
अन्यथा बरेच ठिकाणी आजही काल्पनिक कथांच्या आधारेच संभाजी राजेंचे चित्र रंगवले जात आहे.
Pages