चित्रपट "छावा" च्या निमित्ताने .... !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 February, 2025 - 10:31

नवा आहे.. पण छावा आहे.
लहानपणापासून छावा हा शब्द एखाद्या स्मार्ट तरतरीत तरण्याबांड मुलांसाठी वापरत आलोय. बॉयफ्रेंडचा समानार्थी शब्द छावा आणि गर्लफ्रेंड असेल तर छावी..
पण मला नाही वाटत हा शब्द पुन्हा या अर्थाने माझ्याकडून वापरला जाईल.

निमित्त चित्रपट छावा - बघायला सात दिवस उशीरच झाला. पण या सात दिवसात जवळपास सत्तर परीक्षणे अधाश्यासारखी वाचून काढली. आणि या चित्रपटावर आधारीत सातशे रील्स बघितल्या. चित्रपटाची कथा ही ईतिहासाची जितकी आवड आहे त्यानुसार माहीत होतीच. पण ते दाखवणार कसे याची उत्सुकता होती.

गेले काही वर्षात जे काही मोठ्या बॅनरचे वीएफएक्सयुक्त ऐतिहासिक चित्रपट आले ते पाहता अपेक्षा फार नव्हत्या. ट्रेलर देखील तितका भारी वाटला नव्हता. विकी कौशलचे नाचणे सुद्धा रुचले नव्हते. त्यामुळे चित्रपट आल्यावर, चार लोकांचे रिव्ह्यू वाचल्यावर थिएटरला जावे की ओटीटी रीलीजची वाट बघावी हा निर्णय घ्यावा असे ठरवले होते. कारण वेळ आणि पैसा खर्च करताना विचार करावा लागतोच. पण वैयक्तिक आवड काहीही असली तरी आपल्या मातीतील पराक्रमी वीरांवर चित्रपट येत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा ईतिहास पोहोचत आहे हे चांगलेच घडतेय असे वाटत होते.

देर आये दुरुस्त आये. गाणे चित्रपटातून उडवले गेले. वीएफएक्सचे पराक्रम कमीत कमी होते. संभाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या अभिनयाच्या आणि दमदार संवादांच्या ताकदीवर उभे करायचे शिवधनुष्य विकी कौशलने लीलया पेलले. अन्यथा ट्रेलरमध्ये ओरडतानाच फार दाखवले होते. खरे क्षण आणि संवाद थिएटरसाठी राखून ठेवले होते.

येसूबाई म्हणून रश्मिका ऐवजी दुसरी कोणीतरी (श्रद्धा, शर्वरी, मृणाल) हवी होती अशी बरीच मते ऐकली. त्यात तथ्यही वाटले. पण असो, ते जर तर झाले. रश्मिका फार कमी पडली असे वाटले नाही. तिच्या ईतर दुसर्‍या कुठल्याही चित्रपटापेक्षा ती यात छान दिसली.

औरंगजेब साकारणार्‍या अक्षय खन्नाने व्हिलन कॅटेगरीतील अभिनय वेगळ्याच उंचीला नेला. ना त्याने थयथयाट केला, ना तो निव्वळ थंड डोक्याचा खूनशी वाटला, ना तो विकी कौशलशी अभिनयाची जुगलबंदी करायला गेला. पण यापुढे औरंगजेब म्हटले की अक्षय खन्नाचे ते रुपच आठवावे असे काम करून गेला.

चित्रपटाची पटकथा प्रामुख्याने संभाजी राजे विरुद्ध औरंगजेब यावरच फोकस ठेवून लिहीली गेली होती. त्यामुळे या दोघातील एक अभिनेता जरी कमी पडला असता तर पुर्ण चित्रपट सपक झाला असता. पण तसे व्हावे ही श्रींची ईच्छा नव्हती.

या दोघांनी संवाद छान म्हटले पण मुळात ते होतेही तितकेच दमदार. कवी कलश यांनाही छान संवाद मिळाले जे गरजेचे होते. चित्रपटाच्या शेवटी कथानायक संभाजीराजे हे जग सोडतात आणि खलनायक औरंगजेब जिवंत राहतो. पण तरीही विजय संभाजीराजे यांचाच होतो आणि औरंगजेब हरतो हे प्रेक्षकांपर्यंत त्या संवादातूनच परीणामकारक पोहोचते.

पण, चित्रपट परीपुर्ण नाहीये. अडीच तासाच्या चित्रपटात संभाजी राजेंचा ईतिहास बसवणे तसे अवघडच होते. कदाचित म्हणून सुरुवात शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीपासून केली. पण त्यानंतरही पुढच्या दोन अडीच तासात जे दाखवले त्यातले बरेच काही कमी करून ईतर बरेच काही दाखवता आले असते. ज्यातून संभाजी राजेंचे व्यक्तीमत्व आणखी चांगल्या प्रकारे खुलून आले असते. तसेच ईतिहासाची अजून चार पाने लोकांपर्यंत पोहोचली असती. त्यामुळे एकंदरीत विचार करता काही इन्डिविज्युअल पर्फॉर्मन्सेस एकत्र आले आहेत, पण एक चित्रपट म्हणून बरेच काही कमी पडले असेही वाटले.

पण, हे ही नसे थोडके. चित्रपट संपल्यावर भले लोकं साश्रू नयनांनी मूकपणे बाहेर पडली असतील, पण घरी जाऊन प्रत्येक कुटुंबात यावर चर्चा झाली असेल. मोठ्यांनी आपल्याकडील ईतिहासाच्या ज्ञानाची देवाणघेवाण केली असेल. तर लहानग्यांनी ते ऐकले असेल. या चित्रपटाचा प्रभाव तितका नक्कीच पडला आहे आणि हे सुद्धा महत्वाचे आहे. अन्यथा स्वानुभावावरून सांगतो, शाळेत असताना गणित, विज्ञान, भाषा, भूगोल अश्या जीवनोपयोगी विषयांसोबत ईतिहास हा तितकासा महत्वाचा नसलेला विषय दरवर्षी का शिकवला जातो हा प्रश्न मला नेहमी पडायचा. ईतिहास शिकण्याचे महत्व कधी कोणी सांगितलेच नाही. पण कालांतराने स्वत:हून समजले की खरे ज्ञान हे पुस्तकी नसून जे आयुष्य आपल्याला शिकवते ते असते, आणि ते आपण ईतिहासातील चुका आणि अनुभवातूनच शिकत असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपला ईतिहास माहीत हवाच.

पटकथा संकलन वगळता ईतर कमतरता या चित्रपटाच्या प्रभावापुढे मला तरी गौण वाटल्या. पण तरीही ए आर रेहमानच्या संगीताबद्दल मात्र असे का झाले किंवा त्याने असे का केले हा प्रश्न अजूनही सतावत आहे. पार्श्वसंगीताच्या नावावर सतत काही अरेबियन बायका व्हिवळत होत्या. औरंगजेबाच्या द्रुश्यांना ते चालून गेले. त्याकडे बघून चीड यावी म्हणून असे चीड आणनारे संगीत वाजवले गेले असावे. पण आपल्याकडच्या दृश्यांना का हे आचरट प्रयोग केले? लढाईच्या दृश्यांना सुद्धा वेगवेगळे शब्द वापरून असाच आरडाओरडा चालू होता. ऊपकार एकच केले ते म्हणजे क्लायमॅक्स दृश्यात कुठले प्रयोग न करता संयम बाळगला. पण सर्वात महत्वाचे म्हणजे अपवाद वगळता संगीत कुठे मराठमोळे, आपल्या मातीतील वाटलेच नाही आणि हा अक्षम्य अपराध ठरावा. ज्याला जबाबदार केवळ ए आर रेहमानच नाही तर दिग्दर्शक सुद्धा तितकाच ठरतो. आणि म्हणूनच छावाचे परीक्षण अजय-अतुल यांची आठवण काढल्याशिवाय अपुर्णच!

असो,
कित्येक चित्रपटगृहात लोकं महाराजांचा जयघोष करत आहेत, तर चित्रपट संपल्यावर खणखणीत आवाजात महाराजांची गारद म्हटली जात आहे. याचे विडिओ सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. यामागे काही प्रमाणात फॅड सुद्धा असावे पण महाराजांप्रती तितकेच प्रेम आणि आदर असलेल्या लोकांची या महाराष्ट्रात वानवा नाही. राष्ट्रगीत संपताच जसे उत्स्फुर्तपणे भारतमाता की जय म्हणावेसे वाटते, कोणी गणपती बाप्पा म्हटले की आपसूक तोंडातून मोरया बाहेर पडते, तीच ताकद "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणेत आहे. त्यामुळे हे निव्वळ फॅड नसून कित्येकांना खरेच हे एका उत्सवासारखे वाटत असावे.

कित्येक दिवसांनी सकाळचा पहिला शो पहिल्या रांगेपासून हाऊसफुल झालेला पाहिला. तिकीट बूक करताना आदल्या रात्रीचा साडे अकरा वाजताचा शो जो मध्यरात्री अडीच वाजता संपला असता तो सुद्धा हाऊसफुल झालेला पाहिला. राष्ट्रगीत संपल्यावर भारतमाता की जय पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून लोकांनी चित्रपट बघायला सुरुवात केली. संभाजी राजेंनी सिंहाचा जबडा फाडताच लोकांनी टाळ्या वाजवल्या. अजून काही मोजक्या प्रसंगी त्या आल्या पण त्यात कुठेही नेहमीच्या टपोरी शिट्ट्या नव्हत्या. आपण जवान चित्रपट नाही तर छावा बघत आहोत याचे भान लोकांना कायम होते.

क्लायमॅक्सला मात्र एकाही संवादावर टाळी आली नाही. टाळी तर दूर कोणी एक शब्द तोंडातून बाहेर काढला नाही. कारण पुढे आपण काय बघणार आहोत आणि याचा शेवट काय होणार आहे हे लोकांना माहीत होते. चित्रपट अगदी योग्य फ्रेमवर थांबला. जरी लोकं मूक झाले असले तरी ती प्रत्येकाला स्वराज्य अभिमानाची गाथा वाटावी असाच शेवट होता. आणि मग जे आपल्या थिएटरमध्ये देखील घडावे अशी ईच्छा होती ते घडले. एका लहान मुलाने गारद म्हणायला सुरुवात केली आणि ती पुर्ण होईपर्यंत लोकं शांतपणे आपल्या जागी ऊभे राहिले. ज्या संभाजी राजेंवर शालेय ईतिहासाच्या पुस्तकाने देखील अन्याय केला त्यांच्या छावा चित्रपटानिमित्त हे दृश्य बघणे आणि अनुभवणे नशिबी आले...

धन्यवाद,
- ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हपा, मी मार्केटिंग फंडा असेही एक कारण लिहिले आहे. त्यात दिग्दर्शकाच्या नंतरच्या मुलाखती येत असतील. मी फक्त अनेक शक्यता वर्तवल्या आहेत. त्यातले काहीही असू शकते. फरक आपल्या आयुष्यात यातले काहीही असले तरी पडत नाहीच Happy

बाकी मुलाखतीत वाहवत जाणे हे फार कॉमन आहे.. भलेभले काहीतरी बोलून फसतात तिथे याच्याबाबत झाल्यास नवल नाही. त्यामुळे विकू यांचा मुद्दा योग्यच आहे.

जाऊद्याहो आता… सोडा हे झाड..

तिकडे विकी मोठ्यांसोबत बसुन मराठी कविता वाचतोय… लोक संभाजी महाराज परतले या आनंदात आहेत. तिथे कुठे एवढीशी गोष्ट धरुन बसणार..

विकीचा पुढचा चित्रपट लवकर येवो म्हणजे तो संभाजीच्या वलयातुन बाहेर पडेल. तसा पोरगा काम मस्त करतो, मसानपासुन पाहतेय त्याला

हा अर्थ कसा वाटतोय?

नवीन Submitted by भरत. on 26 March, 2025 - 13:07>>>> तुम्हालाही मी तोच डायलॉग फेकून मारतो थांबा....

घटकेगणिक धाग्यावर धागे काढून दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरी वरच्या बुरशीला कसा कळणार ??  Rofl

गुप्तेच्या मेंदूवर दगडफुल उमललेत. >>>>> अशक्य हसलो Rofl

दगडफूल - एक अनोखे सहजीवन

>> अशोक शिंदेंनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. मलाही या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण जाणता राजामध्ये राजांची भूमिका केल्यावर मुघलाची भूमिका करणं पटत नाही , इ. >>
कोण हे अशोक शिंदे?
मी सुहास शिरवळकरांच्या एका अप्रतिम कादंबरीवर आधारीत असलेला 'दुनियादारी' हा अत्यंत भिकार चित्रपट पाहिल्यापासुन मराठी चित्रपट पहाणे बंद केले आहे (अपवाद - धर्मवीर - मु. पो. ठाणे... अर्थात तो पण मित्रांनी खुप शिफारस केली होती म्हणुन पाहिला होता ), 'नाटक' आणि दुरचित्रवाणी मालिकांचा प्रचंड तिटकारा असल्याने मराठीच काय पण इतर कुठल्याच भाषेतली नाटके, मालिका पहात नाही. त्यामुळे 'अशोक शिंदे' हे नाव माझ्यातरी बिलकुल परिचयाचे नाही.
(गुगल करुन शोधण्याएवढे मला ते नाव महत्वाचे वाटत नाही ह्याला माझा आळस न समजता त्यांची महती सांगायची कृपा करावी 😀)

१९९० च्या मागे पुढे ते मराठी चित्रपटांत नायकाच्या भूमिकेत असत. पण मला आता त्यांचा एकही चित्रपट आठवत नाहीए. हल्ली एक दोन मालिकांत दिसले होते.

OK...

गुप्तेच्या मेंदूवर दगडफुल उमललेत. >>>>> Rofl

संत्या मुद्दामून जवळीक वाढवतोय. जवळीक वाढवून वाढवून एक दिवस विकीच्या घरी जायचं आणि कतरीनाच्या हाताची बिर्याणी चेपायची असा प्लॅन आहे आपल्या संत्या भाऊचा. >>> Lol

ताईंना हे नवीन नाव २४ तासाच्या आत १०००० वेळा मराठी आणि इंग्रजीत लिहून दाखवण्याची गोड शिक्षा >>> Proud

अशोक शिंदे म्हटलं की मला 'एकापेक्षा एक' नावाचा सिनेमा आठवतो. त्यात त्याने विजयकुमार नावाच्या गुन्हेगाराची भूमिका केली होती.

अशोक शिन्देची मुलाखत मला आवडली, त्याचा आक्षेप व्हिलनचा रोल करायला नाही, मराठी कलाकारांना घरगडी किंवा तत्सम रोल देतात किंवा छोटासा नोटिस होणार नाही असा रोल देतात, डेस्परेट असल्या सारखा ‘छोटासा रोल‘ का म्हणून करु हा त्याचा मुद्दा आहे ( सिनेमां मधे लिड रोल केले असताना, सध्या चालु असलेल्या टि.व्ही सिरीयल मधेही लिड रोल करत असताना ).
व्हिलन/मुघल /मुस्लिम रोल न करणे याबद्दल नाही बोलला अशोक शिन्दे.
यातल्या कोणाची हिंमत नसती झाली जर औरन्गजेब/ अल्ल्लौद्दीन खिल्जी अशा लिड व्हिलनचे रोल करायला.
चिन्मय मांडलेकरचा कश्मीर फाइल्स मधला ‘बिट्टा कराटे‘ रोलही त्याच्या अभिनयाला १००% जस्टिस देणारा होता.

ताईंना हे नवीन नाव २४ तासाच्या आत १०००० वेळा मराठी आणि इंग्रजीत लिहून दाखवण्याची गोड शिक्षा केली पाहिजे. >>> Lol तसेही बरेचसे हिंदीभाषिक नंतर त्याचे "अरे वो सीएसनगर मे..." वगैरे करतील आणि हिंजवडी/हिंजेवाडी सारखा तोच उच्चार कूल समजून आपलेही लोक तसेच म्हणतील.

वर्षानुवर्षे जे उच्चार प्रचलित होते ते आत्ता अचानक खटकू लागले तर त्यात कोणतातरी कावा असण्यापेक्षा आपल्याला ऑफेण्ड व्हायला दुसरे काहीतरी शोधायची गरज आहे (मे बी एखादा खरा जीवनावश्यक प्रश्न?) हे या पब्लिकला कोण पटवून देणार? "शिवाजी", "संभाजी" मधे जी सहजता होती ती आता अजिबात राहिली नाही. पण त्यात लोकांनी बळंच अपमान उकरून काढला.

त्यांच्या मान-अपमानाचं कुणालाच काही पडलेलं नाही. आयडेंटिटी क्रायसिस आहे. काहीतरी बोंबललं पाहिजे. नाहीतर इतक्या गर्दीत आपण कसे दिसू, आपली पत कशी राहील- असं आहे ते.

आणि हे सगळ्यात सोपं आहे. एखादं मुलगामी, मुलभूत, लोकोपयोगी आणि दीर्घकाळ टिकणारं काम करून त्यातून आयडेंटिटी दाखवणं यात फार एनर्जी, वेळ जाणार. दमसासाची परीक्षा होणार. इतका दम, वेळ आणि ताकद परवडत नाही, कारण तोवर दुसरं कुणी पुढे येईल. त्यापेक्षा हे इंस्टंट आहे. हिटही आहे.

त्यांच्या मान-अपमानाचं कुणालाच काही पडलेलं नाही. आयडेंटिटी क्रायसिस आहे. काहीतरी बोंबललं पाहिजे. नाहीतर इतक्या गर्दीत आपण कसे दिसू, आपली पत कशी राहील- असं आहे ते.
हे इंस्टंट आहे. हिटही आहे.
>>> +१

एक व्हॉट्सॲप फॉरवर्ड मध्ये आलेला लेख
लेखक माहीत नाही.
प्रत्येकाने वाचावे आणि कळत नकळत आपल्याकडून देखील असे होत नाही ना याचे आत्मपरीक्षण करावे म्हणून शेअर करत आहे.
___

संतोष जुवेकर - soft target
.
काल आमिरखानचा एक इंटरव्यू बघत होतो, जावेद अख्तर साहेब तो घेत होते... त्यात आमिर ने अमुक एक चित्रपट सोडला आणि त्यात सलमानला घ्या सुचवले, अमुक एका चित्रपटात असे बदल करा, नावात असे बदल करा, गाण्यात तसे बदल करा बरेच मी,माझे,माझं चालू होतं... आता कर्म-धर्म सहयोगाने आमिर खानला फुटभर अंतरावरुन ऐकण्याचा, बघण्याचा योग आला... त्यामुळे मी तरी त्याला "स्वतःची लाल करतो, लालगंधर्व" वगैरे म्हणणार नाही पण गंमत म्हणजे कोणीच कमेंट मधे तसे बोलले नाही... सर्वांना ते पटत होते...
राजपाल यादव आणि नवाज़चे इंटरव्यू बघितले ते पण असेच मिळते जुळते... आम्हाला अमुक एका superstar ने सांगितले की मी तुमचा चाहता आहे वगैरे वगैरे... पण इथेही कोणी ट्रोल नाही केले
आत्ता थोड्या वेळापुर्वी गणेश आचार्य यांचा इंटरव्यू पाहिला त्यात ते बोलत होते की अल्लू अर्जुन यांनी स्वतः फोन करून "मास्टरजी thank you, बहोत अच्छा काम हुआ है" बोलले... इथे ही कोणी गणेशजींना "तुम्ही कोण टिकोजीराव, तुम्हाला का तो thank you बोलेल" बोलले नाही... तेच जेव्हा श्रेयस तळपदे बोलले की "अल्लू त्याचे हिंदी डबिन्ग ऐकून शॉक झाला, त्याने मेसेज केला की तुम्ही खूप मस्त काम केलंय, मी मुंबईत आलो की नक्की भेटायचं आपण बोलला" तर त्या खाली कमेंट काय, "यांना ओळखत तरी असेल का अल्लू, नक्की बघा फेक अकाउंट असेल ते, कमीत कमी नोकराचा तरी रोल मिळायचा आता ते पण नाही, एका अल्लू ला विचारा नक्की श्रेयस म्हणजे श्रेयस अय्यर तर नाही, तळपदे ला कशाला ओळखत असेल तो..." इथंपर्यंत ट्रोल केलं लोकांनी...
जो पर्यंत शरद केळकर यांनी मराठीत अधिक काम केलं नव्हतं तो पर्यंत शरद केळकर यांना राजामौली यांनी फोन केला होता की "हिंदीत बाहुबलीला तुम्ही आवाज द्यायचा अशी विचारणा केली होती" हे लोकांना पटत होतं पण जसे ते मराठी 2-3 चित्रपटात दिसले त्यंंच्या त्याच इंटरव्यू खाली कमेंट होत्या "यांना काय भाव देतोय राजामौली, हेच गेले असतील भिकाऱ्यासारखे कामं मागायला" अश्या कमेंट होत्या...
असाच एक रितेश देशमुख यांचा इंटरव्यू होता ज्यात त्यांनी सांगितले की "भारतातील पहिला Iphone माझ्याकडे आला होता ते पण एक सोडून दोन दोन, मग मी त्यातला एक फोन घेऊन srk कडे गेलो कारण तो टेक्नॉलॉजी चाहता आहे, आणि त्याला जेव्हा तो फोन दिला त्याला तो खूप आवडला... आणि शाहरुख म्हणाला की हे जर तुझे लग्नाचे प्रपोजल असेल तर हो मी तयार आहे, इतका खुश झालोय मी..." यावर देखील लोकांच्या कमेंट होत्या "सर त्यानी घेतलं तुम्हाला आत, नक्की srk होता का त्याचा डुप्लिकेट, तुम्ही srk ला फोन द्यावा इतकी त्याला भीक लगलीये की तुम्ही स्वतःला श्रीमंत समजताय, ड्राइवर-माळी-मित्र कोणता रोल मागायला मस्का लावला सर..."
इतकेच काय लक्ष्मीकांत सर आणि अशोक सराफ सरांना सोडलं नाही...
आणि मुख्यत्वे या सर्व मराठी माणसांच्या कमेंट होत्या... वाचताना अर्धा टक्का तरी लाज वाटत असेलच की आपली लोकं अश्या कमेंट करतात म्हणून...
त्या मानाने संतोष जुवेकर , स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव तर खूप स्वस्तातले टार्गेट आहेत...
आत्ता मधे अशोक शिंदे म्हणाले की "छावा चित्रपटातील एक रोल त्यांनी नाकारला कारण तो खलनायकी होता, तो खलनायकी पेक्षा शंभूराजे विरोधी होता म्हणून मी नाकारला, मला नाही वाटला करावासा..." आता त्यांची choice असेल की... का त्यांना पण ट्रोल करणार यावरून... तिथे पण लोकं "यांना दोन मिनिटाच्या रोल साठी पण choice पाहिजे, सर भिकारी को भीक जो मिले सो ठीक मानून रोल accept करायचा ना..." अश्या कमेंट केल्यात... तर मग संतोष का ट्रोल होणार नाही... मी काय संतोषचे 100% समर्थन करणार नाही पण ज्या खालच्या पातळीवर जाऊन लोकं ट्रोल करत आहेत तितकी त्यांची लायकी तरी आहे का...
जर कोणी माझा लेख वाचला ज्यांना संतोषला ट्रोल करायला लय मजा आली त्यांनी मला काही उत्तरं द्या... छावाच्या कोणत्या प्रमोशन मधे अक्षय खन्ना होता, music launch ते trailer launch पर्यंत कुठे तो होता का? बरं रिलीजच्या आधी विनीत कुमार सिंग यांनी किती इंटरव्यू दिले, आशुतोष राणा-दिव्या दत्ता-डायना पेंटि-प्रदीप रावत किती जण होते प्रमोशनला... टिजर launch झाला तेव्हापासुन संतोष वगळता कोणता मराठी कलाकार आहे चित्रपटात हे माहिती होते... music launch ला संतोषला विकी ने स्वतःहून स्टेजवर बोलावून रहमान यांच्याशी ओळख करवून दिली हे पाहिले की सर्वांनी... बरं संतोषने त्याचा आणि विकीचा एक फोटो टाकला होता त्याला विकीने "miss you भाऊ" reply दिला होता... तो विकी संतोषला 6 महीने एकत्र shoot करतोय तर "ये बाबा shoot संपले की timepass करू" बोलला का नसेल... आणि मला सांगा छावा बघताना कोण रडले नाही का? किंवा टोर्चर सिन बघताना शहारे आले नाहीत का?... का प्रेक्षकांना माहिती नाही का तो चित्रपट होता सर्व खोटं खोटं होतं... तरी का रडलात-विव्हळले तुम्ही... तेव्हा तुम्ही समरूप झालात आणि हेच संतोषने केले, की अक्षय खन्नाला बघून बोलावं नाही वाटलं त्याला तर त्यात चुकलं काय... सेट वर कोणीच विकी शंभू राजांच्या वेषात असताना त्याच्या मांडीला मांडी लावून बसायचे नाही, दररोज शिवगर्जना दिली जायची, सेटवर त्याला राजे बोलले जायचे... का?... त्यांना माहिती नव्हते का हा चित्रपट आहे...
"स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज" हा चित्रपट करताना ठाकुर अनुप कुमार यानी south चे चार चित्रपट सोडले कारण ते सर्व खलनायक पात्र होते आणि शंभू राजे करताना खलनायक कसे करायचे म्हणून कोट्यावधी रुपयाचे चार चित्रपट नाकारले... का? त्यांना माहिती नव्हते का की हा चित्रपट आहे म्हणून... पण हे सगळं चालतं आपल्याला... फक्त संतोषने पात्र म्हणून एखाद्याला डावलले तर तो खलनायक झाला... एका कार्यक्रमात आलेल्या सारंग साठ्येला प्रेक्षकातून एका सुशिक्षित प्रेक्षकाने "ए शिर्के गद्दार" म्हणून हाक मारली... हे चालतं का?, तेव्हा कलाकार आणि पात्रं वेगवेगळी असतात हे कळत नाही का?
हा काहीवेळा कलाकार ढासळतात बोलताना पण म्हणून तुम्ही त्यांना इतक्या हीन दर्जाचे ट्रोलिन्ग करणे शोभते का? खरंतर हे सर्व बघताना, वाचताना, ऐकताना प्रेक्षक म्हणून मला लाज वाटते... जितकं तुम्ही चुकल्यावर खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करताना तितकं प्रेक्षक म्हणून कधी डोक्यावर घेऊन नाचत नाही तुम्ही... कारण मराठी कलाकार म्हणजे हलक्या दर्जाचे हे मराठी प्रेक्षकच ठरवून बसले आहेत... आणि त्यामुळे यांना ट्रोल केलं तरी काय करणार आहेत हे ही जी निती आहे ना... ती फक्त प्रेक्षक म्हणून नाही तर मराठी चित्रपटसृष्टीचा अविभाज्य घटक म्हणून घातक आहे... जर मराठी सृष्टीच्या पतनाला निर्माते दहा पावलं पुढे येत आहेत तर 20 पावलं प्रेक्षक पुढे येत आहेत... अश्याने पतन लवकर होणार हे लक्षात असू द्या...
मराठी नाटक, मराठी मालिका, चित्रपट आहेत म्हणून अजून प्रेक्षक म्हणून तुमची किंमत आणि दहशत आहे bollywood मधे... कारण bollywood ला कायम भीती वाटते की कधी एखादा सैराट, वेड, बाईपण येईल आणि मराठी प्रेक्षक आपली वाट लावतील सांगू शकत नाही... पण जर तुम्ही इंडस्ट्री मारली तर तुम्हाला सत ना गत जे माथी मारतील ते गोड मानून घ्यावे लागेल... कारण मराठी प्रेक्षक आजपण key audience आहे... पुष्पा 2ने सर्वाधिक व्यवसाय 297 कोटी एकट्या महाराष्ट्रातून केलाय, छावाने 325 कोटी एकट्या महाराष्ट्रातून कमावले आणि एखाद्या राज्यातून 300 कोटी कमावणारा पहिला चित्रपट ठरला... हे सर्व मराठी जनतेमुळे... पण विचार करा जर तुम्ही असेच मराठी कलाकारांना मारत राहिले तर तुम्हीही लवकरच मराल प्रेक्षक म्हणून...

शेवटची ओळ वाचून माझ्या एका कलीगची आठवण आली. जास्त भडकला की वैतागून ‘मरू का आता मरू मी’ बोलायचा.>>>> Rofl

<. एका कार्यक्रमात आलेल्या सारंग साठ्येला प्रेक्षकातून एका सुशिक्षित प्रेक्षकाने "ए शिर्के गद्दार" म्हणून हाक मारली... हे चालतं का?, तेव्हा कलाकार आणि पात्रं वेगवेगळी असतात हे कळत नाही का?>

औरंगजेब वेगळा आणि अक्षय खन्ना वेगळा हे जिथे संतोष जुवेकरला कळत नाही, तिथे हे प्रेक्षकांना मात्र कळलं पाहिजे.

<मराठी नाटक, मराठी मालिका, चित्रपट आहेत म्हणून अजून प्रेक्षक म्हणून तुमची किंमत आणि दहशत आहे bollywood मधे... कारण bollywood ला कायम भीती वाटते की कधी एखादा सैराट, वेड, बाईपण येईल आणि मराठी प्रेक्षक आपली वाट लावतील सांगू शकत नाही>

हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपट चालत नाहीत, म्हणून रडणार्‍यांना यापुढे हे दाखले द्यायचे. Wink

हेही ते 'कबरीवरची बुरशी..' च्याच गुणवत्तेचं आहे. एकतर ते रितेश देशमुख, नवाझ, आमिर, गणेश आचार्य इ.शी तुलना सपशेल गंडली आहे. मराठी प्रेक्षकाची काही बाबतीत हजेरी घेतली पाहिजे, हे बरोबरच आहे, पण हा भिडू ती घेण्याआधी भंपक गृहितकं मांडतो आहे. ती तशी हजेरी रंगा गोडबोले, किंवा चंद्रकांत काळे सारख्यांनी कशी घेतली आहे ते मुळातून बघण्यासारखं आहे. मराठी प्रेक्षक हा असं काही ठरवून बिरवून एखाद्या फिल्मची 'वाट' वगैरे लावायला पुढाकार घेत नाही, आघाडी वगैरे उघडत नाही. मात्र कॅरेक्टरात दम असतो तेव्हा हाच प्रेक्षक हिंदुराव, मास्तर, धनंजय माने, आर्ची, परश्या अशा कितीतरी पात्रांना अजरामर करून टाकतो- हे महत्वाचं आहे. बाकी आपण 'की ऑडियंस' आहोत आणि आपण पुष्पा, छावाला तीनतीनशे कोटी मिळवून देतो- हा सेल्फ गोल आहे.

प्रेक्षक म्हणून मराल असा शाप दिला तेव्हाच कळतं की इमोशनली हाय होऊन लिहिलेला लेख असणारे. जुवेकरही बिचारा असंच हाय होऊन बोलून गेला असेल, पण तुमचा पोत अवचित उघडा पडतो तो असा. बाकी ट्रोल वगैरे झूठच. ते काही चिरंतन नसतं.

Pages