नवा आहे.. पण छावा आहे.
लहानपणापासून छावा हा शब्द एखाद्या स्मार्ट तरतरीत तरण्याबांड मुलांसाठी वापरत आलोय. बॉयफ्रेंडचा समानार्थी शब्द छावा आणि गर्लफ्रेंड असेल तर छावी..
पण मला नाही वाटत हा शब्द पुन्हा या अर्थाने माझ्याकडून वापरला जाईल.
निमित्त चित्रपट छावा - बघायला सात दिवस उशीरच झाला. पण या सात दिवसात जवळपास सत्तर परीक्षणे अधाश्यासारखी वाचून काढली. आणि या चित्रपटावर आधारीत सातशे रील्स बघितल्या. चित्रपटाची कथा ही ईतिहासाची जितकी आवड आहे त्यानुसार माहीत होतीच. पण ते दाखवणार कसे याची उत्सुकता होती.
गेले काही वर्षात जे काही मोठ्या बॅनरचे वीएफएक्सयुक्त ऐतिहासिक चित्रपट आले ते पाहता अपेक्षा फार नव्हत्या. ट्रेलर देखील तितका भारी वाटला नव्हता. विकी कौशलचे नाचणे सुद्धा रुचले नव्हते. त्यामुळे चित्रपट आल्यावर, चार लोकांचे रिव्ह्यू वाचल्यावर थिएटरला जावे की ओटीटी रीलीजची वाट बघावी हा निर्णय घ्यावा असे ठरवले होते. कारण वेळ आणि पैसा खर्च करताना विचार करावा लागतोच. पण वैयक्तिक आवड काहीही असली तरी आपल्या मातीतील पराक्रमी वीरांवर चित्रपट येत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचा ईतिहास पोहोचत आहे हे चांगलेच घडतेय असे वाटत होते.
देर आये दुरुस्त आये. गाणे चित्रपटातून उडवले गेले. वीएफएक्सचे पराक्रम कमीत कमी होते. संभाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या अभिनयाच्या आणि दमदार संवादांच्या ताकदीवर उभे करायचे शिवधनुष्य विकी कौशलने लीलया पेलले. अन्यथा ट्रेलरमध्ये ओरडतानाच फार दाखवले होते. खरे क्षण आणि संवाद थिएटरसाठी राखून ठेवले होते.
येसूबाई म्हणून रश्मिका ऐवजी दुसरी कोणीतरी (श्रद्धा, शर्वरी, मृणाल) हवी होती अशी बरीच मते ऐकली. त्यात तथ्यही वाटले. पण असो, ते जर तर झाले. रश्मिका फार कमी पडली असे वाटले नाही. तिच्या ईतर दुसर्या कुठल्याही चित्रपटापेक्षा ती यात छान दिसली.
औरंगजेब साकारणार्या अक्षय खन्नाने व्हिलन कॅटेगरीतील अभिनय वेगळ्याच उंचीला नेला. ना त्याने थयथयाट केला, ना तो निव्वळ थंड डोक्याचा खूनशी वाटला, ना तो विकी कौशलशी अभिनयाची जुगलबंदी करायला गेला. पण यापुढे औरंगजेब म्हटले की अक्षय खन्नाचे ते रुपच आठवावे असे काम करून गेला.
चित्रपटाची पटकथा प्रामुख्याने संभाजी राजे विरुद्ध औरंगजेब यावरच फोकस ठेवून लिहीली गेली होती. त्यामुळे या दोघातील एक अभिनेता जरी कमी पडला असता तर पुर्ण चित्रपट सपक झाला असता. पण तसे व्हावे ही श्रींची ईच्छा नव्हती.
या दोघांनी संवाद छान म्हटले पण मुळात ते होतेही तितकेच दमदार. कवी कलश यांनाही छान संवाद मिळाले जे गरजेचे होते. चित्रपटाच्या शेवटी कथानायक संभाजीराजे हे जग सोडतात आणि खलनायक औरंगजेब जिवंत राहतो. पण तरीही विजय संभाजीराजे यांचाच होतो आणि औरंगजेब हरतो हे प्रेक्षकांपर्यंत त्या संवादातूनच परीणामकारक पोहोचते.
पण, चित्रपट परीपुर्ण नाहीये. अडीच तासाच्या चित्रपटात संभाजी राजेंचा ईतिहास बसवणे तसे अवघडच होते. कदाचित म्हणून सुरुवात शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीपासून केली. पण त्यानंतरही पुढच्या दोन अडीच तासात जे दाखवले त्यातले बरेच काही कमी करून ईतर बरेच काही दाखवता आले असते. ज्यातून संभाजी राजेंचे व्यक्तीमत्व आणखी चांगल्या प्रकारे खुलून आले असते. तसेच ईतिहासाची अजून चार पाने लोकांपर्यंत पोहोचली असती. त्यामुळे एकंदरीत विचार करता काही इन्डिविज्युअल पर्फॉर्मन्सेस एकत्र आले आहेत, पण एक चित्रपट म्हणून बरेच काही कमी पडले असेही वाटले.
पण, हे ही नसे थोडके. चित्रपट संपल्यावर भले लोकं साश्रू नयनांनी मूकपणे बाहेर पडली असतील, पण घरी जाऊन प्रत्येक कुटुंबात यावर चर्चा झाली असेल. मोठ्यांनी आपल्याकडील ईतिहासाच्या ज्ञानाची देवाणघेवाण केली असेल. तर लहानग्यांनी ते ऐकले असेल. या चित्रपटाचा प्रभाव तितका नक्कीच पडला आहे आणि हे सुद्धा महत्वाचे आहे. अन्यथा स्वानुभावावरून सांगतो, शाळेत असताना गणित, विज्ञान, भाषा, भूगोल अश्या जीवनोपयोगी विषयांसोबत ईतिहास हा तितकासा महत्वाचा नसलेला विषय दरवर्षी का शिकवला जातो हा प्रश्न मला नेहमी पडायचा. ईतिहास शिकण्याचे महत्व कधी कोणी सांगितलेच नाही. पण कालांतराने स्वत:हून समजले की खरे ज्ञान हे पुस्तकी नसून जे आयुष्य आपल्याला शिकवते ते असते, आणि ते आपण ईतिहासातील चुका आणि अनुभवातूनच शिकत असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपला ईतिहास माहीत हवाच.
पटकथा संकलन वगळता ईतर कमतरता या चित्रपटाच्या प्रभावापुढे मला तरी गौण वाटल्या. पण तरीही ए आर रेहमानच्या संगीताबद्दल मात्र असे का झाले किंवा त्याने असे का केले हा प्रश्न अजूनही सतावत आहे. पार्श्वसंगीताच्या नावावर सतत काही अरेबियन बायका व्हिवळत होत्या. औरंगजेबाच्या द्रुश्यांना ते चालून गेले. त्याकडे बघून चीड यावी म्हणून असे चीड आणनारे संगीत वाजवले गेले असावे. पण आपल्याकडच्या दृश्यांना का हे आचरट प्रयोग केले? लढाईच्या दृश्यांना सुद्धा वेगवेगळे शब्द वापरून असाच आरडाओरडा चालू होता. ऊपकार एकच केले ते म्हणजे क्लायमॅक्स दृश्यात कुठले प्रयोग न करता संयम बाळगला. पण सर्वात महत्वाचे म्हणजे अपवाद वगळता संगीत कुठे मराठमोळे, आपल्या मातीतील वाटलेच नाही आणि हा अक्षम्य अपराध ठरावा. ज्याला जबाबदार केवळ ए आर रेहमानच नाही तर दिग्दर्शक सुद्धा तितकाच ठरतो. आणि म्हणूनच छावाचे परीक्षण अजय-अतुल यांची आठवण काढल्याशिवाय अपुर्णच!
असो,
कित्येक चित्रपटगृहात लोकं महाराजांचा जयघोष करत आहेत, तर चित्रपट संपल्यावर खणखणीत आवाजात महाराजांची गारद म्हटली जात आहे. याचे विडिओ सोशल मिडीयावर वायरल होत आहेत. यामागे काही प्रमाणात फॅड सुद्धा असावे पण महाराजांप्रती तितकेच प्रेम आणि आदर असलेल्या लोकांची या महाराष्ट्रात वानवा नाही. राष्ट्रगीत संपताच जसे उत्स्फुर्तपणे भारतमाता की जय म्हणावेसे वाटते, कोणी गणपती बाप्पा म्हटले की आपसूक तोंडातून मोरया बाहेर पडते, तीच ताकद "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणेत आहे. त्यामुळे हे निव्वळ फॅड नसून कित्येकांना खरेच हे एका उत्सवासारखे वाटत असावे.
कित्येक दिवसांनी सकाळचा पहिला शो पहिल्या रांगेपासून हाऊसफुल झालेला पाहिला. तिकीट बूक करताना आदल्या रात्रीचा साडे अकरा वाजताचा शो जो मध्यरात्री अडीच वाजता संपला असता तो सुद्धा हाऊसफुल झालेला पाहिला. राष्ट्रगीत संपल्यावर भारतमाता की जय पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून लोकांनी चित्रपट बघायला सुरुवात केली. संभाजी राजेंनी सिंहाचा जबडा फाडताच लोकांनी टाळ्या वाजवल्या. अजून काही मोजक्या प्रसंगी त्या आल्या पण त्यात कुठेही नेहमीच्या टपोरी शिट्ट्या नव्हत्या. आपण जवान चित्रपट नाही तर छावा बघत आहोत याचे भान लोकांना कायम होते.
क्लायमॅक्सला मात्र एकाही संवादावर टाळी आली नाही. टाळी तर दूर कोणी एक शब्द तोंडातून बाहेर काढला नाही. कारण पुढे आपण काय बघणार आहोत आणि याचा शेवट काय होणार आहे हे लोकांना माहीत होते. चित्रपट अगदी योग्य फ्रेमवर थांबला. जरी लोकं मूक झाले असले तरी ती प्रत्येकाला स्वराज्य अभिमानाची गाथा वाटावी असाच शेवट होता. आणि मग जे आपल्या थिएटरमध्ये देखील घडावे अशी ईच्छा होती ते घडले. एका लहान मुलाने गारद म्हणायला सुरुवात केली आणि ती पुर्ण होईपर्यंत लोकं शांतपणे आपल्या जागी ऊभे राहिले. ज्या संभाजी राजेंवर शालेय ईतिहासाच्या पुस्तकाने देखील अन्याय केला त्यांच्या छावा चित्रपटानिमित्त हे दृश्य बघणे आणि अनुभवणे नशिबी आले...
धन्यवाद,
- ऋन्मेऽऽष
“ ते ब्रह्मदेवापेक्षा दोनेक
“ ते ब्रह्मदेवापेक्षा दोनेक दिवसांनीच लहान आहेत”
नक्की ना?
आणि हे ब्रह्मदेवाला माहितीय ना? 
मग "झेंडा" नक्कीच पाहा. १००%
मग "झेंडा" नक्कीच पाहा. १००% रेको. त्यातले संतोष जुवेकरचे काम चांगले आहे
>>>> झेंडा चा रेको मीपण देते. जुवेकर व चांदेकर दोघांचीही कामं चांगली आहेत. टायटल सॉंगही उत्तम आहे.
जुवेकर चित्रपटात कोणाच्या
जुवेकर चित्रपटात कोणाच्या लक्षात असेना नसेना..
एक मुलाखत देऊन मात्र खूप फेमस झालाय.. बघावे तिथे त्याचेच मीम
माझेमन आणि फा,
माझेमन आणि फा,
'झेंडा' नोट केला आहे.
झेंडा चा रेको मीपण देते.
झेंडा चा रेको मीपण देते. जुवेकर व चांदेकर दोघांचीही कामं चांगली आहेत. टायटल सॉंगही उत्तम आहे.
>>>>
+७८६
झेंडा अस्पष्ट आठवत आहे.. पण छान होता.
त्याच काळात मोरया आलेला त्यातही होता ना जुवेकर.. तो सुद्धा छान होता वाटते. तो सुद्धा किंचित पुसटच आठवत आहे
हे गाणे आता ऐकले...
आणि आठवला मोरया पूर्ण
https://youtu.be/2EprrIWK_VY?si=WUEDjWIDkzB3KjhR
फारेण्ड, मलाही आता तो शब्द
फारेण्ड, मलाही आता तो शब्द उर्दू वाटायला लागला
डिसक्लेमर : भूमिकेत शिरणे बद्दलची कमेण्ट संतोष जुवेकरच्या वक्तव्याला धरून नाही लिहीलेली. कुणी तरी राजशेखर यांचे वक्तव्य दिले आहे कि असं काही नसतंच म्हणून प्रतिसाद दिला होता तसा. राजशेखर व्हिलन होते ना ? साधी माणसं पाहिला. फार काही भारी अभिनय नाही वाटला. हातखंडा म्हणता येईल असा. जिसने कभी जन्नत देखी ही नही वोह जन्नत के बारे मे क्या जाने !
संतोष जुवेकरची मुलाखत पाहिलेली नाही, छावा मधे खूपच छोटा रोल असल्याने असे वक्तव्य टॉल क्लेम वाटतं.
जुवेकरच्या सस्पेन्स/ थ्रिलर/ मर्डर मिस्ट्री मूवीजची यादी मचिकवा वर दिली आहे.
शिवाजी /संभाजी महाराजांचे
शिवाजी /संभाजी महाराजांचे सर्वधर्म समभाव हे धोरण नव्हते. ते दोघेही निःसंशय हिंदू राजे होते. त्यांचे राज्यही हिंदवी (हिंदू) राज्य होते.
- शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हिंदू विधिपूर्वक झाला होता. मुस्लिम किंवा इतर धर्मीय विधींनी नाही.
- अष्टप्रधान मंडळात "पंडितराव" हे हिंदू धार्मिक बाबतींचे मुख्य असे पद होते. इतर कुठल्याही धर्माचे असे पद (मौलवी, पाद्री वगैरे) अष्टप्रधान मंडळात नव्हते
- शिवाजी महाराजांनी अनेक मंदिरे बांधली. नवीन मशीद एकही बांधली नाही. नवीन मंदिरांना सरकारी grant दिल्या गेल्या. मशिदींना नवी grant एकही दिली गेली नाही (काही जुन्या असतील तर त्या continue केल्या असू शकतात ) - हे मेहेंदळेंनी सांगितले आहे
- शोणाचलपती हे मंदिर पाडून तेथे मशीद केली होती. ती मशीद पाडून शिवाजी महाराजांनी पुन्हा मंदिर बांधले.
- गोव्यातल्या चार पाद्र्यांनी हिंदूंना जबरदस्तीने बाटवण्याचा फतवा गव्हर्नरला काढायला लावला होता. त्यांचा शिवाजी महाराजांनी शिरच्छेद केला. स्वतःच्या हद्दीत सप्तकोटीश्वराचे मंदिर पोर्तुगिझांच्या नाकावर टिच्चून बांधले.
- गोव्याजवळच्या संभाजी महाराजांच्या एका शिलालेखात (किंवा पत्रात - बहुतेक हरसूलच्या कुलकरण्याच्या संदर्भात )"आता हे हिंदू राज्य झाले आहे " असे लिहिलेले आहे.
- फारसीमुक्त राज्यव्यवहार कोष करणे , प्रधानांची नावे, राजमुद्रा संस्कृत मध्ये करणे, नेताजी पालकरांसारख्यांना हिंदू धर्मात परत घेणे, काशी विश्वेश्वर मुक्त करण्याचा संकल्प करणे इत्यादि गोष्टींवरून हे दिसते की शिवाजी महाराजांना इस्लामिक आक्रमण पूर्व भारताच्या हिंदू संस्कृती प्रमाणे राज्यव्यवस्था (अर्थात नव्या प्रशासकीय आणि सामाजिक सुधारणांना अंगीकारून) प्रस्थापित करायची होती.
अर्थात धर्ममार्तंडाची राजकारणात ढवळाढवळ ते खपवून घेत नसत. Executive branch पुरते तरी separation of religion and state त्यांनी काही प्रमाणात केले होते. पण एखादी गोष्ट हिंदू धर्मात आहे म्हणून प्रशासनाला वर्ज्य आहे असे अजिबात नव्हते.
हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णू आहे. जरी हिंदू राज्य असले तरी कुणी जर नियमांत राहून मुसलमान किंवा इतर कुठला धर्म पाळत असेल तर त्याला त्यांची आडकाठी नव्हती. विनाकारण कुठल्या धर्माच्या लोकांना केवळ त्यांच्या धर्मामुळे त्रास द्यायचे त्यांचे धोरण नव्हते. हा सर्वधर्मसमभाव नसून हे परधर्मसहिष्णू हिंदू राज्य होते.
झेंडा मध्येही संतोष जुवेकर ने
झेंडा मध्येही संतोष जुवेकर ने ओव्हरएक्टिंग च केली आहे. विशेषतः वर्गणी मागायच्या दृश्यात.
>>"तो कॅरेक्टरमधे शिरला का
>>"तो कॅरेक्टरमधे शिरला का याबद्दल मला प्रत्यक्षात मत असायला त्या कॅरेक्टरला जरा तरी फुटेज हवे. तो एक दोन सीन मधे दिसला इतकेच लक्षात आहे." >>
+१
त्याला कमी 'फुटेज' आहे तेच एकप्रकारे बरं आहे! बुऱ्हाणपूरच्या लढाईत मराठा सैन्याची वाट अडवण्यासाठी मुघलांनी रस्त्यात आडवारलेल्या अडथळ्यांवरुन शंभुराजांचा घोडा उडी मारत असतानाच्या प्रसंगात त्यांच्या समोर असलेले मुघल सैनीक आणि मागे असलेल्या मावळ्यांच्या भुमिकेतल्या कलाकारांनी एखादे चमत्कारीक दृष्य पाहुन थक्क झाल्याचे / आश्चर्यचकित झाल्याचे किंवा अशा प्रसंगी एखाद्याच्या चेहर्यावर येउ शकतील असे भाव आपापल्या कुवतीनुसार आपल्या चेहर्यावर आणलेले दिसतात, परंतु रायाजीच्या "कॅरेक्टरमधे शिरलेल्या" संतोष जुवेकर साहेबांनी मात्र जे 'भोकाड पसरुन रडल्यासारखे' विलक्षण भाव आपल्या मुखकमलावर दर्शवलेत त्याला तोड नाही... इसके वास्ते २०२५ का 'बेस्ट सपोर्टींग अॅक्टर'का नॅशनल या फिल्मफेअर अॅवॉर्ड तो बनताच हैं बॉस 😂
संतोष जुवेकरची हीच काय तर कुठलीच मुलाखत मी अद्याप बघितलेली नाही, पण सध्या समाज माध्यमांवर त्याची 'लाल'गंधर्व म्हणून टिंगल-टवाळी कशासाठी होत आहे ते इथली चर्चा वाचल्यावर समजले आणि पठ्ठयात 'महागुरुंचा' वारसदार होण्याचे पोटेंशिअल असल्याचीही जाणीव झाली 😀
एकतर पुढे 'रश्मिका मंदाना'ला सहन करायला लागणार आहे ह्याचे बर्यापैकी टेंशन होतेच. त्यात आता तिच्या बरोबरीने ह्यालाही सहन करावा लागणार की काय असा विचार मनात चमकून गेला होता परंतु वरच्या प्रसंगात सुरुवातीलाच त्याने कपाळावर हात मारून घ्यायला लावला असला तरी (माझ्या) सुदैवाने सिनेमात त्याच्या वाट्याला अत्यल्प फुटेज आल्याने पुढची भूमिका कशीबशी निभावून गेली असे म्हणता येईल फारतर... आणि 'पुष्पा द राईज' आणि 'पुष्पा द रुल' ह्या दोन्ही चित्रपटांमध्ये रश्मिकाला कसेबसे सहन करून झाल्यामुळे निर्माण झालेली इम्युनिटी कामी आल्याने तिला झेलणेही फारसे अवघड नाही गेले 😀
बाकी दोन-चार अपवाद वगळता विकी कौशल सकट अन्य भूमिकांसाठी केलेली कलाकारांची निवड मलातरी ठिकठाक वाटली.
आशुतोष राणा हे तर फार कसलेले अभिनेते, त्यामूळे हंबीररावांबद्दल काय बोलणार?
'येसाजी कंक' साकारणाऱ्या प्रदीप रावत ह्यांच्या वाट्याला छोटीशी भूमिका आणि खूपच कमी संवाद आल्याने त्यांच्या सारख्या दमदार अभिनेत्याला वाया घालवल्यासारखे वाटले.
'कवी कलश' हे पात्र विनीत कुमार सिंग ह्यांनी चांगले साकारले असले तरी त्या भूमिकेत मला 'रवी किशन' ह्यांना बघायला जास्त आवडले असते. त्यांचे व्यक्तिमत्व, अभिनय, आवाज आणि संवादफेकीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे हे पात्र खूप दमदार झाले असते असे वाटते.
>>"भन्सालीला दिला असता सिनेमा तर त्याने चांगला वनवला असता सिनेमा !" >>
😀
हो ना... त्याने 'खई कें पान बनारसवाला' छाप एखादे गाणे टाकुन त्यावर दिव्या दत्ता (सोयराबाई) आणि निलकांती पाटेकरना (धराऊ) थोडंफार थिरकायला लावुन अंमळ गंमत आणली असती... गेलाबाजार रश्मिका मंदाना (येसुबाई) आणि डायना पेंटीचे (झीनत) एखादे झिंगाट द्वंद्वनृत्य दाखवुन झीनतच्या नीरस भूमिकेत थोडी रंगत आणली असती 😂 😂 😂
संजय भावे अख्खी पोस्ट
संजय भावे अख्खी पोस्ट
धाराऊंच्या भूमिकेत नीलकांती पाटेकर होत्या हे समजले नाही. अर्थात धाराऊ कोण होत्या हे मराठी प्रेक्षक सोडल्यास इतरांना माहित नसेल तर शेंडा ना बुडखा पद्धतीने ते कॅरेक्टर दाखवून काय साध्य केले कोणास ठाऊक.
इथे आणि इतरत्र परीक्षण
इथे आणि इतरत्र परीक्षण वाचताना एक गोष्ट लक्षात आली ती ही कि , काही जणांनी काही भूमिकांसाठी मराठी नावे सुचवली आहेत , संगीतकार साठीहि मराठी नाव सुचवले आहे . पण कुठेहि मध्यवर्ती भूमिकेसाठी मराठी नावे सुचवली नाहीत असे का ? पात्रते बद्दल शंका आहे का ?
विकी कौशलने मध्यवर्ती भूमिका
विकी कौशलने मध्यवर्ती भूमिका चांगली पेलली आहे. अक्षय खन्नाचा औरंगजेब बिलीव्हेबल आहे. रश्मीका मंदाना तोंड उघडत नाही तोवर चांगली वाटते. विकी-रश्मीकाची केमिस्ट्रीही चांगली वाटते. त्यामुळे इतर कुणाला इमॅजिन करायची गरज भासत नाही.
कुठेहि मध्यवर्ती भूमिकेसाठी
कुठेहि मध्यवर्ती भूमिकेसाठी मराठी नावे सुचवली नाहीत असे का ? पात्रते बद्दल शंका आहे का ? >> हो चांगलीच शंका आहे मला तरी
येसूबाईसाठी अलिया भट चांगली
येसूबाईसाठी अलिया भट चांगली दिसली असती असं वाचलं एका ग्रुपवर. तिनं केलं असतं काम चांगलं.
सोयराबाईसाठी मृणाल कुल़कर्णी असंही वाचलं...तिच्या मानाने दिव्या दत्ता परवडली!
>>"अर्थात धाराऊ कोण होत्या हे
>>"अर्थात धाराऊ कोण होत्या हे मराठी प्रेक्षक सोडल्यास इतरांना माहित नसेल तर शेंडा ना बुडखा पद्धतीने ते कॅरेक्टर दाखवून काय साध्य केले कोणास ठाऊक." >>
खरं आहे!
केवळ धाराऊच नाही, तर अनेक पात्रांची कुठलीही पार्श्वभूमी, त्यांचे ऐतिहासिक महत्व/कार्य/पराक्रम ह्या गोष्टी अधोरेखित न करता त्यांना अशा 'शेंडा ना बुडखा पद्धतीने' पेश करण्यातून त्यांची फक्त जुजबी ओळख तेवढी करून दिली असल्याने अद्याप तशी काही अधिकृत घोषणा केली गेली नसली तरी का कोणास ठाऊक, पण बाहुबली प्रमाणे ह्या चित्रपटाचाही प्रिक्वेल आणून त्यात थोडासा थोरल्या महाराजांचा, शंभूराजांचा आणि ह्या चित्रपटातून जेमतेम तोंडओळख झालेल्या काही महत्वाच्या पात्रांचा जीवनपट उलगडून दाखवण्याचे निर्माता/दिग्दर्शकाच्या मनात असावे असे वाटते. चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चांगलाच यशस्वी झाला असल्याने त्यांनी फार कालापव्यय न करता दुसरा भाग आणल्यास माझ्यामते प्रेक्षक त्याचेही उस्फुर्त स्वागतच करतील!
>>"हो चांगलीच शंका आहे मला तरी" >>
मला पण!
तो प्रश्न वाचल्याला आता दोनेक तास तरी उलटले असतील पण दुर्दैवाने 'मध्यवर्ती भूमिकेसाठी' सुचवायला एकही मराठी नाव काही मनःपटलावर आले नाही. जास्तीतजास्त मराठी कलाकार आणि दिग्दर्शकांना नाटक आणि सिनेमा ह्या दोन्ही माध्यमांत प्रचंड फरक असल्याचा साक्षात्कार घडत नाही, तोपर्यंत तरी ह्या परिस्थितीत काही सुधारणा होईल असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या पात्रते बद्दल मला फक्त शंकाच नाही, तर त्यांच्या अपात्रते विषयी खात्रीच आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही 😀
धाराऊ, सोयराबाई, राजाराम (
धाराऊ, सोयराबाई, राजाराम ("राम राजे" - हे नाव का आहे ते ही सांगा कोणीतरी), बहिर्जी, येसाजी, रायाजी या लोकांबद्दल पिचरमधे काही पार्श्वभूमी दिलेली नाही. पाहणार्याला जर ऑलरेडी हे लोक माहीत नसतील तर चित्रपटातून माहिती होत नाहीत. ताराराणीबद्द्लही तसेच.
बहिर्जी इतका बेमालूम आहे की मुघलच काय, प्रेक्षकांच्याही लक्षात येत नाही
मराठी कलाकार लीड रोल मधे नसल्याचे मला खटकले नाही. देशव्यापी अपील असलेले कलाकार घेणे हे कमर्शियल यशाकरता गरजेचे वाटले असेल. मराठीत गश्मिर वगैरे आहेत पण महाराष्ट्राबाहेर त्यांची इतकी ओळख नाही. विकी कौशल त्याकरता चपखल वाटला आहे. रश्मिकाला घेण्याचे कारण च्रप्स यांनी इथे किंवा इतरत्र दिलेले आहे
ते टोटली शक्य आहे. पण तिची संवादफेक खटकते. त्यामुळे माझेमन यांनी म्हंटले आहे तसे "...तोंड उघडत नाही तोपर्यंत" शी पूर्ण सहमत. समोरच्या व्यक्तीवर प्रचंड चिडलेली पण हात उचलता येत नाही त्यामुळे सगळा राग बोलण्यातून व्यक्त करावा लागतो, तेव्हा लोक जसे बोलतात तसे ती बोलते 
>>> "...तोंड उघडत नाही
>>> "...तोंड उघडत नाही तोपर्यंत" शी पूर्ण सहमत.
पण ती तोंड उघडतेच कधी?
समोरच्या व्यक्तीवर प्रचंड
समोरच्या व्यक्तीवर प्रचंड चिडलेली पण हात उचलता येत नाही त्यामुळे सगळा राग बोलण्यातून व्यक्त करावा लागतो, तेव्हा लोक जसे बोलतात तसे ती बोलते
>>>>
रश्मिका दातांवर दात ठेवून बोलत राहते. रामदास पाध्येंच्या अर्धवटराव टाईप. मला अजिबातच आवडत नाही ती, राग येत नाही इतकेच. मला वाटत नाही तिला तेलूगूतही अभिनय येत असेल. सगळीकडेच हेच तोंड असणार ना.
च्रप्स यांनी कोठे लिहीले मला
च्रप्स यांनी कोठे लिहीले मला लक्षात नाही. पण मला ते अफाट पटले लगेच. आता तुम्हाला शोधायला लावत नाही - त्यांची पोस्ट साधारण अशी होती, की तिला घेण्याचे कारण ती निर्मात्यांच्या दृष्टीने लकी आहे. तिला घेतले की पिक्चर तुफान चालतो असा समज आहे.
हे मला पटते. या व्यवसायात हे प्रकार खूप आहेत. लोक पिक्चरच काय इव्हन स्वतःच्या नावाची स्पेलिंग बदलत असतील तर अशा एखाद्या ठोकताळ्यामुळे कलाकारांची निवड होत असेल हे अगदी शक्य आहे.
पण ती तोंड उघडतेच कधी? >>>
प्रत्येक वेळे संभाजीराजे मोहिमेवर निघाले की तो शत्रूच धोक्यात आहे यामुळे मला काळजी नाही हा एक संवाद म्हणण्याचे तिला काम आहे.
त्याव्यतिरिक्त शेवटी सैन्याला तीच थेट हुकूम देताना दाखवली आहे. हे जरा जास्तच झाले. सरसेनापती व सैन्यातील पदे तेव्हा आस्तित्वात होती. सैन्याचे तत्कालीन "स्ट्रक्चर" बनलेले होते. राजाला पकडल्यावर सैन्याला पुढच्या हालचालींकरता राणीने थेट हुकूम द्यायची गरज नसावी. हे म्हणजे सीईओ उपलब्ध नसताना सगळा अधिकारीवर्ग बाजूला ठेवून त्याच्या बायकोने कंपनीचे निर्णय घेतल्यासारखे आहे. मराठी सिरीयलसारखे.
>>> मला काळजी नाही हा एक
>>> मला काळजी नाही हा एक संवाद म्हणण्याचे तिला काम आहे.


नाही नाही, ती तोंडातल्या तोंडात बोलते त्या अर्थी म्हणत होते.
संत्याला टाईम मशीनित बसवून
संत्याला टाईम मशीनित बसवून खरोखरच्या औरंगजेबसोमर पाठवायचं आणि बलोयचं हं बोल काय बोलत होतास.
हे फार वायरल होतेय..
हे फार वायरल होतेय..
(No subject)
मी छावा बघितला नाही अजून.
फारएण्ड, पावनखिंड सिनेमात बहिर्जीची एन्ट्री एवढी वाजतगाजत आहे (कुणीतरी म्हणतं, आता बहिर्जी आले, नक्की काही तरी बातमी घेऊन आले असतील. मग एक गाणं आहे. ) की त्यापेक्षा 'बेमालूम' ठीक असेल.
कलाकार माहीत असणे हि काही
कलाकार माहीत असणे हि काही आवश्यकता नाही. जावेद अख्तर काय म्हणतात आहे ते पहा.
https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/javed-akhtar-says-unknown-...
दाक्षिणात्य कलाकार माहीत नसूनहि त्यांचे चित्रपट उत्तरेत गाजत आहेत असे ते म्हणतात . आपणच नाही नाही त्या अटी आपल्या कलाकारांसाठी घालून ठेवतो . म्हणूनच भंगार हिंदी चित्रपट पण आपल्याकडे चालतात पण चांगले मराठी चित्रपट ओस पडतात.
हिंदी कलाकारांकडे आणि मराठी कलाकारांकडे पाहण्याची आपली दृष्टी वेगळी असते.
आपण दुय्यम असल्याची मानसिकता सोडून दिली पाहिजे .
हे फार वायरल होतेय.. <<<
हे फार वायरल होतेय..

<<<
हे एक नवीन मीम
हे एक नवीन...

(No subject)
(No subject)
D
Pages