इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
टायगूनची पण खूप कमी विक्री
टायगूनची पण खूप कमी विक्री आहे.
Volkswagen ची माॅडेल्स कंटिन्यू होत नाहीत, एव्हरग्रीन रहात नाहीत.
मग पार्टस् महाग, उपलब्ध व्हायला वेळ लागतो.
आणि Discontinued Model ला Resale Value फार कमी मिळते. माझ्या Jetta ला हेच झालं.
पसाट ही बंद झाली.. पोलो, व्हेंटो सेम केस.
https://www.v3cars.com/jeep-cars/compass/monthly-sales
https://www.v3cars.com/volkswagen-cars/taigun/monthly-sales
Tata Currv टेस्ट ड्राइव्ह
Tata Currv टेस्ट ड्राइव्ह करून बघा एकदा
Tata Currv टेस्ट ड्राइव्ह
टायगूनची पण खूप कमी विक्री आहे. <>>>> हो, कल्पना आहे.
Tata Currv टेस्ट ड्राइव्ह करून बघा एकदा <<>>> हो, बघितली. फार नाही आवडली.
हॅरीयर, एलिव्हेट पण नाही आवडल्या.
७ सिटर हवी असेल तर किया
७ सिटर हवी असेल तर किया कॅरेन्स चेक करा. मी वर्षभर वापरत आहे आणि फार उत्तम आहे. गंमत म्हणजे मागच्या आठवड्यात एकाने XUV ७०० घेतली. ती पण फार छान आहे पण तिसर्या रो चा विचार केला तर कॅरेन्समध्ये XUV ७०० पेक्षा जास्त लेग स्पेस आहे.
कॅरेन्स बद्दल आधी लिहीले होते याच ग्रुपवर...
टायगूनची पण खूप कमी विक्री
टायगूनची पण खूप कमी विक्री आहे.>>> टिग्वान आहे उच्चार!!
टायगूनची पण खूप कमी विक्री
टायगूनची पण खूप कमी विक्री आहे.>>> टिग्वान आहे उच्चार!!
Taigun आणि Tiguan ह्या फोक्सवॅगनच्या दोन वेगवेगळ्या गाड्या आहेत.
Taigun @ 20+ L आणि
Tiguan @ 40+ L या रेंजची आहे.
७ सिटर हवी असेल तर <>>>> ५
७ सिटर हवी असेल तर <>>>> ५ च च हवी आहे.
Taigun आणि Tiguan ह्या फोक्सवॅगनच्या दोन वेगवेगळ्या गाड्या आहेत. <<<>>>>> बरोबर
गाडी ५ लाखाच्या आताच पाहिजे.
गाडी ५ लाखाच्या आताच पाहिजे. विनाकारण मोठ्या १० १५ लाखाच्या गाड्या घ्यायच्या आणि स्वतःच्या जीवापेक्षा गाडीलाच जपायचं. गाडीला खरचटायला नको, खड्यातून नेताना गाडीला जास्त गचके लागायला नको म्हणून गाडी हळू हळू चालवायची आणि मागे गाडी चालवत असणाऱ्या लोकांचे आशीर्वाद घ्यायचे.
Taigun आणि Tiguan ह्या
Taigun आणि Tiguan ह्या फोक्सवॅगनच्या दोन वेगवेगळ्या गाड्या आहेत>>> ओह ओके, थॅन्क्स फॉर द इन्फो!! हे माहिती नव्हत..इकडे व्होल्सवॅगनची टिग्वानच आह इतर मग अॅटलस्,जेटा, पासट वैगरे ...
आम्ही आत्ता बघत एस यु व्ही तेव्हा टिग्वान पण बघितल्या होत्या पण मग जरा मोठि एस यु व्ही हवी म्हणून अॅक्युरा एम डी एक्स घेतली.
फोक्सवॅगन विभक्ती चालवल्या
फोक्सवॅगन विभक्ती चालवल्या प्रमाणे मॉडेल्सची नावे ठेवतेय की काय?
टिग्वान् टायगौ टायगून्
टायगूनची पण खूप कमी विक्री
टायगूनची पण खूप कमी विक्री आहे. > Taigun आवडलेली पण डिक्की लहान आहे. म्हणून रिजेकट केली
मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र
मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र (https://transport.maharashtra.gov.in) यांनी दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्रातील जुन्या/नव्या सर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली आहे. >>>
जुन्या नव्या की फक्त २०१९ आधीच्या?? कुणीतरी स्पष्ट करा कृपया? नव्या गाड्यानाही लागणार आहे का?
नव्या गाड्यानाही लागणार आहे
नव्या गाड्यानाही लागणार आहे का?>> २०१९ नंतरच्या नव्या गाडीला जर गाडी घेताना लावून दिली नसेल तर लावून घ्यावी लागेल.
आता ३० एप्रिल पर्यंत वाढ दिली आहे. २ दिवसांपुर्वी पेपर मध्ये जाहिरात पाहिली ज्यावेळपासून HSRP ची बातमी आली.
नव्या नंबर प्लेटचा भुर्दंड सामान्यांना का? Lawच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन
आता मनसेने पण उडी घेतली आहे.
Pages