इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
योगी९०० या फिचर ला फॉलो मी
योगी९०० या फिचर ला फॉलो मी हेडलॅम्प्स असं नाव आहे.
योकू धन्यवाद हे सांगितल्याबद्दल... मला हे माहित नव्हते.
2009 ला हे फीचर होते का?~|||
2009 ला हे फीचर होते का?~||| माझ्या २००४ ची optra मधे चावी काढली की hedlamp त्यासोबतच बंद होत होती
थार चा फीडबॅक एकंदरीत
थार चा फीडबॅक एकंदरीत आउटडोअर्स आणि योकु यांनी दिलाय तसाच दिसला. ग्राउंड क्लिअरन्स सोडला तर एकंदरीत सेडान जास्त प्रॅक्टिकल वाटते आहे एसयुव्ही पेक्षा.
चिडकू, हे मी थारच्या बाबतीत
चिडकू, हे मी थारच्या बाबतीत लिहीलंय. बाकी एसयूव्ही इतक्या गयागुजऱ्या असतील असं अजिबातच नाही. किया कॅरेन्सचा रिव्ह्यू लिहीलाय ना मागच्या पानावर
बाकी एसयूव्ही इतक्या
बाकी एसयूव्ही इतक्या गयागुजऱ्या असतील असं अजिबातच नाही. किया कॅरेन्सचा रिव्ह्यू लिहीलाय ना मागच्या पानावर
धन्यवाद, सेल्टॉस, क्रेटा, नेक्सान या खरोखर चांगल्या एसयूव्ही आहेत. कॅरेन्सला एसयूव्ही म्हणता येणार नाही. ती MPV कॅटेगिरीत येते.
मी माझी नवीन नेक्सन मॅन्युअल
मी माझी नवीन नेक्सन मॅन्युअल पेट्रोल टॉप मॉडेल घेऊन नुकताच तिरुपती बालाजी ला जाऊन आलो सातारा ते तिरुपती ते सातारा टोटल अंतर जाऊन येऊन २२०० किलोमीटर झाले. खूप छान कंफोर्ट आहे एवढ्या लांबचा प्रवास तेही २ दिवसात केला तरी अजिबात थकवा किंवा अंगदुखी जाणवली नाही. आम्ही गाडी बऱ्याचदा sprots मोड वर चालवली त्यामुळे मायलेज खूपच कमी मिळाले १३ किलोमीटर पर लिटर. गाडी अजिबात रस्ता सोडत नाही ब्रेक मारल्यावर.
KIA बद्दलचा हा व्हिडीओ.https:
KIA SELTOS बद्दलचा हा व्हिडीओ.
https://www.youtube.com/watch?v=9VE1otPUY9I
विडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. सध्याची परिस्थिती माहिती नाही.
२००९ साली मी शेवर्लेटच्या
२००९ साली मी शेवर्लेटच्या गाड्या पाहिल्या होत्या. त्या वेळी मायक्रो अलाईडस्टील वापरायची सुरूवात झालेली होती. धनकवडीच्या शोरूम मधे एक्स्पर्ट उपलब्ध नसल्याने त्या वेळी सूस - बाणेर ला हायवेला असलेल्या शो रूम मधे कंपनीने एका स्ट्रक्चरल इंजिनीयरबरोबर माझी मिटींग फिक्स केली होती. तिथे मी कंपनीचे मॅन्युफॅक्चरर्स इन्स्पेक्शन रिपोर्ट पाहिले. प्रत्यक्ष टेस्ट करणे हे अव्यवहार्य होते. खरे तर असा कायदा हवा. ग्राहकांची संघटना असेल तर कंपनीच्या टेस्ट्स अधून मधून ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी पाहू शकतील.
शेवर्ले ने जी तयारी दर्शवली ती अन्य कुठल्याही कंपनीने त्या वेळी दिली नव्हती. त्या वेळी मुंबई पूरात एका सॅन्ट्रो मधे पुराच्या पाण्यामुळे सेंट्रल लॉकिंग + पावर विंडोजचं माल्फंक्शनिंग होऊन आतमधे चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या बातम्या असल्याने ती सुविधा मला नको होती. मी फक्त पावर स्टिअरिंग, एसी इतक्याच सुविधा असलेले व्हेरिअंट घेतले होते. त्या वेळी हेडलाईटची सुविधा असती तरी घेतली नसती. डेक बाहेरूनच बसवला. मायक्रोअलाईड स्टीलला कमर्शिअली प्रत्येक कंपनी वेगवेगळे नाव देते.
शेवर्लेच्या स्ट्रक्चरल डिझाईन मधे आणखी एक गोष्ट होती. ती म्हणजे मायक्रो कॉरिग्युशन. कॉरिग्य्शन मुळे सरफेस एरिया वाढतो, ज्यामुळे स्ट्रेंग्थ वाढते. त्या वेळी चार सिलिंडर इंजिन घेतले. पण खरं सांगायचं तर तीन सिलिंडरपेक्षा त्याचं बॅलन्सिंग चांगलं असतं इतकंच माहिती होतं. आत्ता जेव्हढी माहिती आहे तेव्हढी तेव्हां नव्हती. इंजिनचा आवाज एकाही गाडीत येत नव्हता. काही वर्षांनी फोक्सवॅगनच्या कार्स पाहिल्या. त्यांचंही इंजिन आवडलं. पण खूप खाली बसावं लागतं आणि खूप वेळ बसल्यावर पाय दुखून येतात हा अनुभव आला.
त्या वेळेला टाटाची फक्त इंडीका बाजारात होती, जिच्या इंजिनला पहिल्यापासून प्रॉब्लेम्स होते. त्यांचा फिएटशी करार होता. फिएट टाटाच्या शोरूममधे कार्स विकायचे. पण शोरूमवाले फिएटची कार बघायला आलेल्या ग्राहकाला सुद्धा इंडीकाच दाखवायचे. फिएट दाखवायाला उत्साह नव्हता. डिस्काउंट जबरी द्यायचे. मात्र इंडीकाचं रूपडं, इंजिन बकवास होतं. त्यांची एक स्टेशन वॅगन सारखी मरिना कार आली होती. मित्राच्या भावाने ती घेतली. रस्त्यावर ब्रेक मारल्यावर पलट्या मारून साईडच्या ट्रेंच मधे पडली होती. त्या गाडीच्या अशा अनेक केसेस पाहण्या / ऐकण्यात लाया होत्या. नंतर टाटाने अनेक मॉडेल्स आणले. पण प्रत्येकाला समोरून इंडीकाचा लुक द्यायचे. टियॅगोपासून टाटाच्या गाड्या आधुनिक झाल्या.
पण आजचा त्यांचा युएसपी ग्लोबल एन कॅपचे फाईव्ह स्टार रेटिंग हा आहे. सेफ्टी अर्थातच महत्वाची आहे. पण तीन सिलींडर इंजिनचा इश्यू कायम आहे. मला स्मूथ वाटले नाही. पुढच्या वर्षी चार सिलिंडर १.२ लि आणि १.५ लि जीडीआय इंजिन येणार आहे. त्या वेळी सेफ्टी + इंजिन मुळे टाटाला अॅव्हॉईड करणे अशक्य असेल.
कियाची केस हॉरीबल आहे. अजूनही सुधारणा झाली नसेल तर फसवणूकीची केस व्हायला पाहिजे यांच्यावर.
कियाची केस हॉरीबल आहे. अजूनही
कियाची केस हॉरीबल आहे. अजूनही सुधारणा झाली नसेल तर फसवणूकीची केस व्हायला पाहिजे यांच्यावर.
मी किया कॅरेन्स वापरतो म्हणून कियाचे समर्थन करतोय असे नाही पण गाडीचे बरोबर मध्ये दोन तुकडे होणे हे अवघड आहे. या अपघातावर त्या काळात बरेच काही वाचले होते. उलटे सुलटे बरेच काही लिहीले जात होते. पण बर्याच एक्सर्ट लोकांचे म्हणणे असे होते की पॅसेजरना बाहेर काढण्यासाठी गाडी मधोमध कट केली व त्यानंतर हे फोटो काढले गेले. खरे खोटे माहीत नाही.
किया बोलली असेल तव्हां किया
किया बोलली असेल तव्हां किया बिया कुछ नही बिल फटा एनकॅपका
त्या व्हिडीओत पोलीसांनी गाडी
त्या व्हिडीओत पोलीसांनी गाडी कट केलेली नाही असे म्हटले आहे.
खाली सर्व लिंक्स दिलेल्या आहेत.
चांगली चर्चा!
चांगली चर्चा!
वर धीरज ची पोस्ट म्हणजे एकदम चपखल उदाहरण आहे टर्बो पेट्रोल च्या मायलेज साठी.
Submitted by फिल्मसुख बांगडू
Submitted by फिल्मसुख बांगडू on 23 January, 2024 - 12:59 >>> फिबां, हो Isuzu तशी महाग गाडी आहे, बोलेरो पिक अप आता मिळत नाही का. आणि टाटा Ace long बॉडी बद्दल हि एकदा विचारून करून बघा.
आऊटडोअर,
आऊटडोअर,
नवीन गाडी साठी अभिनंदन.
Xuv ५०० घेतली तेव्हा इथे लिहिलं होतं बहुतेक.
दीड वर्षापूर्वी xuv ७०० डिझेल , मॅन्युअल घेतली.
बुकिंगच्या पहिल्या दिवशी बुक करता आली नाही. दुसऱ्या दिवशी बुक झाली आणि ६/७ महिन्यात मिळाली. बहुतेक मॅन्युअल डिझेल घेतल्याने लवकर मिळाली असावी.
Highway वर मायलेज १६, १७ च्या आसपास मिळतं.
एकंदर गाडी खूप छान आहे, आम्हाला आवडली. डिस्प्ले एकदम वाइड आणि छान वाटतो, त्यावर मॅप बघायला सोपं जातं. म्युझिक सिस्टिम सोनी ची आहे आणि छान आहे.
Seats Comfortable आहेत. दोन्ही रो ना लेग स्पेस भरपूर आहे. तिसऱ्या रो ला नाहीये. बूट स्पेस नाहीये. तिसरी रो फोल्ड केली तर चांगली जागा होते पण एकूण बुटस्पेस सेदान किंवा ertiga पेक्षा खूप कमी वाटते.
आता Mapple चे maps आहेत ते जास्त चांगला रस्ता दाखवतात. म्हणजे ब्रीज चढायचा असेल तर तसे क्लिअर दिसते. गुगल मॅप मध्ये कधी कधी फार गेस वर्क करावे लागते.
ADAS फीचर मधले काही खूप उपयोगी आहे.
High beam assist हे रात्री हायवे किंवा इतर दिवे नसलेल्या रस्त्यावर फार उपयोगी आहेत. समोरून गाडी किंवा लाईट आला की आपोआप लो बिम होते आणि ते पास झालं की पुन्हा high beam.
Forward collision alert, ड्रायव्हर असिस्ट छान आहे.
स्ट्रीट sign recognition, cruise control छान आहे.
लेन चेंज वाले फीचर आम्ही बंद केले आहे . ऑटो पायलट कधी ट्राय केलं नाहीये.
३६० डिग्री व्ह्यू आवडला आहे.
अलेक्सा फीचर आहे. आणि अजून पण काही ॲप आहेत ते कधी वापरले नाहीत.
Adrenox मुळे गाडी पूर्णवेळ लाईव्ह ट्रॅक करता येते. कितीवेळ, कुठे, किती स्पीडने गाडी गेली , जाते आहे हे बघता येतं. Sim कार्ड दोन वर्ष फ्री ऑफ चार्ज आहे. नंतर त्याचे रिचार्ज करावे लागेल...
सावली, महिंद्रमध्ये
सावली, महिंद्रमध्ये अॅड्रेनॅाक्स आहे तसं टाटामध्ये ‘आयरा’ आहे. गाडीचं लोकेशन ट्रॅक करता येतं. ट्रीप हिस्ट्री बघता येते. मला आवडतं . प्रत्येक ट्रीपनंतर मी माझं ड्रायव्हिंगचं रेटिंग तपासते.
आडो,
आडो,
अल्ट्रोज ओनर्स ग्रूप ची लिंक पाठवणार का?
मोबाईल नं संपर्कातून मेल करतो
सावली, महिंद्राच्या रिव्ह्यू
सावली, महिंद्राच्या रिव्ह्यू बद्दल धन्यवाद.
अॅंकी, नंबर पाठव, तुला त्या
अॅंकी, नंबर पाठव, तुला त्या ग्रूपमध्ये अॅड करायला सांगते.
आडो,
आडो,
मला देखील अल्ट्रोज ओनर ग्रुप मध्ये ऍड व्हायचे आहे, मोबाईल नं संपर्कातून मेल करतो.
धन्यवाद
नरेन, अल्ट्रोझ डिसीए आहे नां?
नरेन, अल्ट्रोझ डिसीए आहे नां?
ओके, अल्ट्रोज डीसीए नाही,
ओके, अल्ट्रोज डीसीए नाही, मॅन्युअल आहे.
ओके, सॅारी मग नाही अॅड करता
ओके, सॅारी मग नाही अॅड करता येणार. फेसबुक वापरत असाल तर दोन्हीचं (मॅन्युअल व डिसीए) फेसबुक ग्रूप आहे. टाटा अल्ट्रोझ अॅाल इंडिया ग्रूप व टाटा अल्ट्रोझ डिसीए ओनर्स
टाटा अल्ट्रोझ डिसीए चा
टाटा अल्ट्रोझ डिसीए चा लाँगटर्म अनुभव लिहा कुणी, असल्यास. सिटी- हायवे बिहेविअर्स, मेंटेनन्स, मायलेज, स्मूथ्नेस इ. इ.
टाटा अल्ट्रोझ डिसीए चा
टाटा अल्ट्रोझ डिसीए चा लाँगटर्म अनुभव लिहा कुणी, असल्यास. सिटी- हायवे बिहेविअर्स, मेंटेनन्स, मायलेज, स्मूथ्नेस इ. इ. +१
कारण मी पण ही गाडी घेण्याचे जवळजवळ नक्की केले आहे. फर्स्ट हॅण्ड रेको मिळाल्यास बरे होईल.
मी नवशिकीच आहे अजूनही कारण
मी नवशिकीच आहे अजूनही कारण खूप काही चालवणं होत नाही. अॅंकी नं.१ जास्त छान व टेक्निकल रिव्ह्यू लिहू शकेल. मी पहिल्या/दुसऱ्या इयत्तेतला रिव्ह्यू लिहीते.
गाडी घेतानाचा क्रायटेरिया आधीच लिहीलाय मी. सेफ्टी, कम्फर्ट, मागच्या रोमध्ये तीन मोठ्या व्यक्तिंना नीट बसता यावं, मुंबईच्या हवेत मला रिअर एसी व्हेंट्स असायला हवेत ही इच्छाही होती तसंच गाडीचे लूक्सही माझ्यासाठी मॅटर करतात. नव्यानेच गाडी चालवायला घेणार होते त्यामुळे मी काही मायलेज वगैरे काढू शकणार नाही याची पूर्ण कल्पना होती मला. अल्ट्रोझचा पिकअप थोडा स्लो आहे त्यामुळे ज्यांना स्पीड हवा, फास्ट पिकअप हवा त्यांना अल्ट्रोझ नाही आवडणार. माझा तो ही प्रश्न नव्हता.
अल्ट्रोझचे मेन कॅाम्पिटिटर्स आय २० व सुझुकीची बलेनो. मला दोन्ही गाड्यांमध्ये इंटरेस्ट नव्हता. वर जे पॅाईंट्स लिहीले त्या सगळ्यात अल्ट्रोझ पास झाली.
अॅाडिओ क्वालिटी (हर्मन) चांगली आहे. माझं टॅाप व्हेरियंट आहे. मला ८ स्पीकर्स मिळाले आहेत.
मला गाडी स्मूथ वाटते. माझं जे काय ड्रायव्हिंग असतं ते सिटीमध्ये असतं (९०% बंपर टू बंपर) त्यात काय डोंबल मायलेज मिळणार. तरी कधीतरी १५-१६ च्या मध्ये मिळतं. बऱ्याच जणांनी २०-२२ पण काढलंय. हायवेवर गाडी मस्त स्टेबल आहे अगदी रोडला धरून चालते.
ए पिलर जाडा आहे त्यामुळे जरा ब्लाईंड स्पॅाटची भिती वाटते. वळणावर किंवा रस्ते मिळतात त्या स्पॅाटला खूपच लक्ष ठेवायला लागतं.
गाडीमध्ये क्रीप/क्रॅाल फीचर आहे. चढावर मला खरं सांगायचं तर टेन्शन येतं कारण हे फंक्शन अॅक्टिव्हेट होताना गाडी किंचित मागे जाते. आपल्याकडे लोकांना दोन गाड्यांमध्ये पुरेसं अंतर ठेवायचं असतं याच्याशी देणंघेणं नसतं. त्यामुळे गाडी मागे जाताना मागच्या गाडीवर आपटणार तर नाही याची भिती वाटते.
गाडीच्या एरोडायनॅमिक डिझाईनमुळे खूप धूळ जमते गाडीवर. डस्ट मॅग्नेट म्हणतात गाडीला.
गाडीच्या बूट स्पेस मला पुरेशी वाटते. ग्राऊंड क्लिअरन्स फार ग्रेट नसला तरी अजूनपर्यंत तरी खालून घासली नाहीये.
ग्लोव्हबॅाक्स कूल्ड आहे. हे फीचर सगळ्या गाड्यांमध्ये नसतं.
आत्ता इतकंच आठवतं आहे.
अल्ट्रोझ इव्ही येऊ घातली आहे. तसंच अल्ट्रोझ फेज २ च्या गाड्यांना जरा प्रॅाब्लेम येतोय असं वाटतं मला. माझी सप्टेंबर‘ २२ ची आहे (फेज १).
आउटडोर योकु
आउटडोर योकु
माझ्याकडे सिटी आहे २०१५ ची. माझा वापर थोडा फार ऑफिस ला जाणे आणि वीकएंड ला रोडट्रीप असा होतो. रोडट्रीप ला ग्रामीण भागात खराब रस्त्यांमुळे जास्त क्लिअरन्स असलेली म्हणून एसयूव्ही पाहत होतो. पण एकंदरीत किंमत आणि बाकी फिचर पाहता १५ + लाख देऊन फार काही मिळत नाही. म्हणून एसयूव्ही मला फार योग्य वाटले नाही. कॉन्टेक्स्ट दिला नव्हता. थार विषयी ची हाइप ऐकून पहिली. पण कंफर्ट आणि बाकी बऱ्याच गोष्टी वर आवडली नाही.
एलेवेट सिटी विथ जास्त ग्राउंड क्लिअरन्स वाटली. हाय राईडर देखील ग्रँड व्हिटारा पेक्षा फार काही वेगळी वाटली नाही. क्रेटा पहिली नाही. बाकी टाईगन वगैरे पण आहेत पण फार काही वेगळ्या वाटत नाही.
एकंदरीत सेडान ला एसयूव्ही ने रिप्लेस करणे मला लॉजिकल वाटत नाही. मात्र नवीन गाडी घेत असेल तर सेडान आणि एसयूव्ही साधारण सारखीच किंमत आहे तेंव्हा तो विचार करू शकतो.
सिटी आहे तशीच ठेवून ऑफ़रोड /
सिटी आहे तशीच ठेवून ऑफ़रोड / वीक एंड्स / गावी जायला सेकण्डहैण्ड टी यु व्ही ३०० किंवा झायलो घेतली तर चालु शकेल का असाही विचार करुन पहाता येईल
आमच्याकडे असा समज आहे की
आमच्याकडे असा समज आहे/होता की सेडान ज्येष्ठ ज्येनांना (७०/७५+) बसायला सोपी, एसयुव्ही कठीण. काही कलिग्ज आणि मित्रही हेच म्हणाले.
२०१८ मध्ये माझा एसयुव्ही घेण्याचा विचार होता त्यावेळी वरील प्रमाणे अभिप्राय मिळाले. मी तेव्हा काही एसयुव्हींची टेस्ट ड्राइव्ह घेतली होती. त्यात फॉर्च्युनरमध्ये ज्येज्येनांना बसायाला त्रास होईल का बघावे म्हणुन आई बाबांना (दोघेही ८०+) घेउन गेलो, सोबत एक ६ इंच स्टूल पण घेउन गेलो खाली. पण त्याची गरजच नाही पडली. सेदान मध्ये बसायाला वेळ लागतो त्यांना. एकी कडे मी आईला खाली स्टुल ठेवुन बसवायचा विचार करत होतो, बाबांना नंतर त्यांना आर्थ्रायटिसचा खुपच त्रास होता. तर दुसरी कडुन बाबा दारातुन आधी सिट वर बुड टेकवुन मग पाय आत घेउन इतक्या सहजतेने बसले. ते पाहुन आम्ही आश्चर्य व्यक्त करे पर्यंत आईही मग पायाने स्टूल सरकवुन पटकन आत बसली. उतरतानाही सेडान तुलनेत सहज उतरले.
लांबच्या प्रवासाला सिट्स उंच असल्याने निट मागे सरकुन टेकुन बसल्यावर गुडघ्याचा कोन काटकोनाच्या जवळपास असतो, सेडान मध्ये लघुकोन. त्यामुळे लांबचा प्रवास सुखकर होतो. तेव्हा ज्येज्येना असतील किंवा अधुन मधुन काही तासांचा लांबचा प्रवास करायचा असेल तर एसयुव्हीचा विचार करावा. आणि अर्थात ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यास त्रास होणारे रस्ते वापरायचे असतील एसयुव्हीला पर्याय नसेल. अन्यथा असलेली चांगली सेडान एसयुव्हीने रिप्लेस करण्याची गरज नाही असे माझे मत.
अर्थात हौसेखातर, फील साठी करायची असेल तर करावीही.
मानव , +१
मानव , +१
मानव,
मानव,
जर suv ला फूट स्टेप लावली नसेल तरच चढायला त्रास होतो. नाहीतर त्रास होत नाही.
लेग स्पेस भरपूर आणि पाय काटकोनात राहणे यामुळे खूप आरामदायी प्रवास होतो.
Xuv मधला अनुभव आहे की धक्के पण कमी बसतात.
Pages