कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Valksvagon Taigun कुणी घेतलीय का ? रिव्युज हवे होते

सनरूफ अनावश्यक वाटतं. - १०० % सहमत
आम्ही गाडी बघत आहोत तर सगळ्या गाडयांना आहेच . नको असेल तर खालचे व्हेरियन्त घ्यावे लागेल . मग atomtatic गाड्या त्यात येत नाहीत .
उगाच नको ती गोष्ट घ्यावी लागणार आहे

सान्वि फ्रोन्क्स बघा मस्त वाटेल
माइलेज केबिन स्पेस बूट स्पेस ग्राउंड क्लिअरंस स्मूथ परफॉरमेंस आणि रिलायबेलिटी सर्वच आले कमी बजेट मध्ये

Automatic transmission मधे Sunroof नको असेल तर मारूती मधे (चालत असेल तर) बघा.

स्कोडाच्या एसयूवी मधे मिळते.
या कार्स मधे Non sunroof Automatic आहे. एकदा तपासून पहा.
Toyota Glanza
Skoda Kushaq
Nissan Magnite
Renault Kiger
Maruti Suzuki S-Cross
Maruti Suzuki XL6
Maruti Suzuki Ciaz

हायब्रीड असेल तर अजून चांगले. आणि मायलेज पण देणारी हवी. बजेट 17 पर्यंत आहे.
>>
टोयोटा हायरायडर बेस / बेस+1 मॉडेल किंवा अर्बन क्रूझर टॉप मॉडेल (विथ हायब्रीड) बघता येईल
याचे मारूती अवतार ग्रँड विटारा अन् विटारा ब्रेझा पण बघता येतील

कशी आहे गाडी?
>>
पूर्वीच्या थार च्या तुलनेत खूप स्मूथ
जिम्नी पेक्षा सर्वार्थाने चांगली

वेटींग मात्र खूप आहे

जिम्नी वरती भरघोस डिस्काउंट सुरु आहे (सद्य स्टॉक संपे पर्यन्त असावा) डिसेंबरच्या स्कीम्सचा लाभ घेण्यास छान संधी आहे ह्याचा सुद्धा ४x४ साठी उत्सुक मंडळीनी नक्की विचार करण्यास हरकत नसावी

- बाय डिझाईन एअर डक्ट्स उंदरांना राहायला खूप उपयुक्त आहेत, त्यामुळे जर एरिया मधे उंदीर असतील तर मेश/ अल्ट्रसाऊंड युनिट वगैरे लाऊन घेतलेलं बरं. तसंच वीकली रिपेलंट स्प्रे मारलेला बेटर.
- टाटा ची सर्व्हिस सेंटर लांब असू शकतात, अन् वर्कर आळशी
>>>>>>>>
कालच रिपेलंट घेवून Nexon च्या इंजिन मधील वायरिंग वर मारला .
काही दिवसापूर्वी वायपर साठी च्या पाण्याच्या बाटली चे झाकण उंदरांनी कुर्तडले होते .....

७ सिटर गाडी हवी असेल तर किया कॅरेन्सचा विचार करा. मी नुकतीच घेतली आहे (२ महिने झालेत) आणि खूप खुष आहे.

मी Prestige Manual 1.5 NA petrol हे मॉडेल घेतले. हे एकदम value for money मॉडेल आहे. एनोव्हाच्या अर्ध्या किंमतीमध्ये एनोव्हा सारखी गाडी तुम्हाला मिळेल.

काय आवडले ?
१) गाडी एकदम स्मुथ आहे. माझ्या काही मित्रांनी जे डस्टर, नेक्सान व निस्सान चालवतात. त्यांना ह्या गाडीचा स्मुथनेस खूप आवडला.
२) तिसर्‍या रो मध्ये खूप जागा आहे. सुझूकी अर्टेगा, टोयोटा रुमियन आणि एक्स एल सिक्स ह्या गाड्यांच्या तुलनेत कॅरेन्स फार उजवी वाटते. मी घेतलेल्या व्हर्जनचे पॉवर पण वरील गाड्यांच्या तुलनेत जास्त चांगले आहे. अर्टेगा व रूमियन सेम गाड्या आहेत व तिसरा रो खूपच uncomfortable आहे.
३) कॅरेन्समध्ये मधल्या रो च्या डावीकडील सिटला बटन आहे. ते दाबले की ती सिट ऑटोमॅटीकली फोल्ड होते व तिसर्‍या रो मध्ये जाण्यास जागा मिळते. इतर गाड्यांमध्ये हाताने सिट फोल्ड करावी लागते.
४) सर्व रो मध्ये बसायला भरपूर जागा.
५) बरेचसे फिचर ६ एअर बॅग, up and down hill assist, Traction control and ESC आणि बरेच काही....
६) अवरेज चांगला आहे. शहरात ट्रॅफिकमध्ये ९-१० मिळतो. हायवे ला १८-२० मिळतो.
७) डॅशबोर्ड एकदम सुरेख आहे. अगदी प्रिमिअम लेवलचा डॅशबोर्ड वाटतो. wireless android auto/apple carplay मिळतो.
८) लोड घेऊन सुद्धा गाडी व्यवस्थित चालते. घाट सुद्धा आरामात चढते.
९) दुसर्‍या व तिसर्‍या रो साठी एअर कंडीशन व चार्जिंग पॉईट्स आहेत.
१०) ५ किंवा ६ गिअर ला लो स्पिड जर झाला तर गाडी डुगडुगत नाही. डॅशबोर्डवर फक्त गिअर लो करा अशी वॉर्निंग मिळते. उगाच बंद पडत नाही.
११) सिग्नलला थांबलो तर ऑटोमॅटीकली गाडीचे इंजिन बंद होते व क्लच दाबला की चालू होते.

काय नाही आवडले?
१) हेडलॅंप जरा लो वाटले. पुरेसा प्रकाश वाटत नाही. मी घेतलेल्या व्हर्जनला हॅलोजन लाईट येतात म्हणून तसे वाटत असेल पण LED बसवले तर प्रॉब्लेम वाटणार नाही. higher end versions ला LED आहेत. मी रात्रीचे ड्रायव्हींग शक्यतो टाळतो म्हणून मला जास्त फरक पडत नाही.
२) बुटस्पेस जर तिसरा रो वापरात असेल तर जास्त मिळत नाही (तरी २१६ लिटर आहे). दोन सुटकेस व दोन हॅड्बॅग मावतील . जर तिसरा रो फोल्ड केला तर मात्र भरपूर जागा मिळते. तिसरा रो अर्धा फोल्ड केला तर मागे एक, मध्ये तीन आणि पुढे ड्रायवर धरून दोन असे ६ जण आरामात बसतील व भरपूर सामान पण मावेल.
३) front parking sensor हे चांगले फिचर आहे. पण बंपर टु बंपर ट्रॅफिकमध्ये फार त्रास देते. पुढच्या गाडीच्या जरा जवळ गेले तर हे सेंसर बोंबलायला लागतात. हे सेंसर बंद करायचे बटण पण आहे पण गाडीच्या सॉफ्टवेअर चे लॉजिक असे आहे की थोडा वेळ गाडी चालवली की परत हे सेंसर चालू होतात. बंपर टु बंपर ट्रॅफिकमध्ये ह्याचा त्रास होतो.
४) शंभरच्या वर गाडी चालवली की अ‍ॅवरेज कमी पडतो. अर्थात इतर गाड्यांनाही हाच प्रॉब्लेम असू शकेल.
५) पहिल्या व दुसर्‍या गिअर वर पिक अप कमी वाटला. आधी डिझायर चालवायचो आणि त्यामुळे सिग्नलला एकदम गाडी उचलून पुढे न्यायचो. पण तसे कॅरेन्समध्ये करता येत नाही. पण नंतर लक्षात आले की traction control and ECS मुळे गाडी किती पॉवर द्यायची हे optimize करते व गाडी इंजिनवर आणि ड्रायव्हरवर कंट्रोल ठेवते. traction control and ECS बंद करायचा ऑप्शन आहे. तो बंद करून हा पिकअप वाढवू शकता पण आता सवय झाली त्यामुळे काही वाटत नाही. पण यामुळे सुरूवातीला गाडी underpowered वाटत होती. पण आता तसे वाटत नाही.

मी gravity grey रंगाची गाडी घेतली आणि सिरॅमिक कोटींग करून घेतले. त्यामुळे गाडी खूपच दिसायला छान दिसते. कॅरेन्स मध्ये भरपूर इंजिन व ट्रान्समिशन ऑप्शन्स आहेत त्यामुळे तुम्हाला हवी ती व हवी तशी गाडी मिळू शकते. पेट्रोल मध्ये व डिझेल मध्ये turbo engine चा पण ऑप्शन आहे ज्याची पॉवर व टॉर्क जास्त आहे.

ओवरऑल, किया कॅरेन्स एक छान फॅमिली कार आहे. तुमची ५ किंवा ६ जणांची फॅमिली असेल तर बरचसे सामान घेऊन छान प्रवास करू शकता. जर ७/८ जणांना घेऊन प्रवास करायचा असेल तिसर्‍या रो मध्ये ३ जण मावू शकतात पण बुटस्पेस कमी मिळाल्याने सामान थोडे पुढे पायात ठेऊन प्रवास करावे लागेल.

टोयोटा डिझेल गाड्या बंद करणार आहे पण टाटा अजूनही दिसेल गाड्या बनवते आहे
आम्हला HARRIER आवडली आहे पण ह्या मुद्यामुळे डिसिजन होत नाहीये .
कोणाला काही माहिती आहे का ?
सध्या शॉर्टलिस्टेड गाड्या Harrier , Hyryder , Hector आणि Alkazar
आणि Seltos जस्ट बॉर्डर वर आहे
कोणाचे काही अनुभव असतील तर सांगा

सध्या शॉर्टलिस्टेड गाड्या Harrier , Hyryder , Hector आणि Alkazar
आणि Seltos जस्ट बॉर्डर वर आहे

यात अल्कझार ही ७ सिटर आहे आणि बाकी ५ सिटर.
मला विचारले तर मी Seltos किंवा Harrier यातली एक घ्या असे म्हणेन. मी स्वतः मात्र Seltos च घेतली असती. किया कॅरेन्स गाडीमुळे कियाविषयी चांगले मत झाले आहे.

Seltos NCAP rating - 3/5
Harrier NCAP rating - 5/5

शेवटी आपली आणि कुटुंबाची सुरक्षितता महत्वाची

सेफ्टी रिझनसाठीच Valksvagon Taigun आवडली. पण डिक्की खूप लहान आहे .
Valksvagon virtus आवडली पण mileage कमी देते.

Harrier पुढच्या वर्षी पेट्रोल लॉन्च होतेय पण कधी माहित नाही .
टाटा Nexon च्या मागच्या सीट्स उंच वाटल्या. मला स्वतःला कंफर्टेबल नाही वाटल्या

शेवटी आपली आणि कुटुंबाची सुरक्षितता महत्वाची >>>>>>+१

मी पण दहा ते पंधरा लाखा पर्यंत गाडी बघत होतो, त्यात सेफ्टीला सगळ्यात जास्त प्राधन्य. पण त्या रेंजमधे मला कोणतीच गाडी आवडली नाही. होंडा सिटी, नेक्सॉन, क्रेटा हेच तीन बरे पर्याय आहेत. त्यात पण क्रेटाला Global NCAP चे तीनच स्टार असल्याने ती बाद. राहता राह्यल्या नेक्सॉन आणि होंडा सिटी. त्यात नेक्सॉन बरी वाटत आहे पण टाटाची आफ्टर सेल्स सरवगैरेआणि लाँग टर्म मधे गाडी कितपत मेंटेन राहिल याबाबत शंका असल्याने होंडा सिटी हाच एक पर्याय बरा राहतोय.

सेफ्टी हा महत्वाचा मुद्दा आहेच पण टाटाच्या गाड्या एवढे हाय सेफ्टी रेटींग असून ही बिल्ड क्वालिटीत मार खातात. अगदी पहिल्या दिवसापासून नेक्सान, हॅरीअर गाड्यांना आलेले प्रॉब्लेम व लोकांना झालेला मनस्ताप पाहिला आहे.

मी गेल्या महिन्यात आ पली गरीबापुरती वॅगन आर घेतली.. पेट्रोल मध्ये... माझी लोगन म्हातारी.. १६ वर्षाची झाली अन २.२५ लाख पळाली होती.
वॅगन आर function at() { [native code] }यंत मस्त आहे... २२ चे अ‍ॅव्हरेज देते हायवे वर एसी सह.... मोटराइज्ड साइड मिरर्स... २ एअर बॅग्ज, १२०० सीसी इंजिन आहे ७ च्या आत पडली, मस्त पिक अप आहे, समृध्दी महामार्गावर चालव ली... अफाट परफॉर्म न्स

टाटाच्या गाड्या एवढे हाय सेफ्टी रेटींग असून ही बिल्ड क्वालिटीत मार खातात. >>>>>

बरोबर. दहा पंधरा वर्षे तरी गाडी छान रहायला हवी तर ती घेण्यात अर्थ आहे.

Slavia वापरताय का एकडे कोणी? कसा अनुभव आहे? अजून काही फायनल होत नाहीये. होंडा की ह्युंदाई वरना की vertuous.. कन्फ्युजन ही कन्फ्युजन है!

लोखो, आता नवी गाडी घेताना बजेट नसेल तर थांबा, एखादं माडेल खालचं घ्या पण मॅन्युअल गाड्या घेऊ नका. थँक मी लेटर. ऑटो बॉक्स ला दिलेले पयशे दोन वेळा ट्रॅफिक जॅम मध्ये फसल्याबराबर वसूल झाले असं म्हणाल.

सामी टायगुन आणि व्हर्टस ला एकच एंजिन आहे. मायलेज १९-२० असेल ते ही या दोन्ही गाड्यांच्या शेप मुळे.
अनुभव हे सांगतो की १००० सीसी चं टर्बो पेट्रोल मायलेज कमी देतं त्यात या गाड्यांना टॉर्क कन्वर्टर ऑटो गिअर आहे त्यामुळे इश्यूज कमी आहेत तुलनेनी पण मायलेज अजूनच मार खाते. मी जर विड्ब्लू गृप ची एखादी गाडी घेइनच कधी तर १.५लि च्या इंजिन सोबत मॅन्युअल गिअर घेइन; म्हणजेच स्लाविया कारण हे कॉम्बो व्हर्ट्स मध्ये मिळत नाही. या कंपन्यांचे डिसीटी ऑटो बॉक्सचे रडगाणे सुप्रसिद्ध आहे.

टाटाच्या गाड्या फार छान आहेतच पण जोवर त्यात काही निगल येत नाही तोवरच. त्यांची सर्वीस हिट ऑर मिस आहे. बरेच इश्यूज आहेत टाटाच्या गाड्यांचे अन त्याहून सुरस अन चिमित्कारीक सर्वीस सेटरच्या कथा.
हे माझ्यापुरतं - मला स्वतःला १० लाख + असलेल्या गाडीत मिडीओकर इंजीन आहे हे पटत नाही. उदा. नेक्सॉन टॉप १५+ जाते आणि तरीही १२०० सीसी चं ३ सिलिंडर इं देतं टाटा. ४ सिलिंडर इंजिन चा पर्फॉर्मन्स आणि स्मूथनेस, ३ सिलिंडर इंजिन देऊ शकत नाही.

अतरंगी तू सिटी कधी फायनल करतोयस? Biggrin
रच्याकने, मी त्यादिवशी एलेव्हेट ऑटो ची टेस्ट घेऊन आलोय. अगदी बुक करावीशी वाटत होती ओव्हर सिटी.
माझ्यापुरतं सांगायचं तर एलेव्हेट मध्ये फक्त टॉपलाच क्रूज कंट्रोल आहे त्यामुळे लोअर मॉडेल चा विचार मी तरी करणार नाही घ्यायचीच झाली तर. हायवेज वर क्रूज कंट्रोल सारखं फिचर नाही.

अतरंगी तू सिटी कधी फायनल करतोयस? >>>>

ॲालमोस्ट फायनलच आहे. Proud

कधी घ्यायची ते ठरवतो आता. Proud

मला दहा पर्यंतच गाडी हवी होती. पण त्यात एकही गाडी आवडेना म्हणून पंधरा बजेट केलं त्यात फक्त होंडा सिटी बरी वाटत आहे. खरे तर माझी सिटी अजून टकाटक चालू आहे पण आताशा सर्व्हिसिंगला गेली की काम फार काढते. शिवाय कित्येकदा एक एक स्पेअर पार्ट मिळायला पंधरा वीस दिवस थांबावे लागते. त्यामुळे नविन घ्यायचा विचार होता. पण मार्केटमधल्या गाड्या आणि त्यांच्या किमती बघता गाडी घेणेच कॅन्सल करावे असे वाटते.

एलेव्हेट बघितली. पण तिचा ॲव्हरेज फारच कमी आहे रे. हायवेला १५-१७ आणि सिटी मधे ११-१२ देते असे वाचले. एवढा ॲव्हरेजतर माझी १५ वर्षे जुनी सिटी देते.

गाडीत मिडीओकर इंजीन आहे हे पटत नाही. उदा. नेक्सॉन टॉप १५+ जाते आणि तरीही १२०० सीसी चं ३ सिलिंडर इं देतं टाटा. ४ सिलिंडर इंजिन चा पर्फॉर्मन्स आणि स्मूथनेस, ३ सिलिंडर इंजिन देऊ शकत नाही. >>>>>>
Nexon ऑटो गियर पेट्रोल ( average 10 ) मध्ये झटका मारल्याचे जाणवते . स्मुथनेस अजिबात नाही , पण हेच भाच्याच्या harrier ला अजिबात त्रास नाही .
तुम्ही सांगताय त्या प्रमाणे ३/४ सिलेंडर च्या फरक मुळेच होत असावे तरी पण दोन चार दिवसांनी सर्व्हिस सेंटर मध्ये दाखवणार आहे ....

अल्ट्रोज बद्दल माहिती दिलेल्या सगळ्यांना धन्यवाद.
या ग्रुपचे सभासदत्व घेतले नव्हते, मायबोलीवर नविन यावर क्लिक आधी न क्लिक केल्याने आता प्रतिसाद बघितला.

काही कारणामुळे नविन गाडी एवढ्यात ( पुढील १ - २ वर्षे) न घेण्याचे ठरलेय.

दरम्यान नेक्सन, अल्ट्रोज, अमेझ टेस्ट ड्राइव्ह केल्या. मी जेटा वरून डाऊनग्रेड करत असल्याने पीक अप आणि पॉवर बद्दल हळहळ वाटली जेटा उगाच विकली की काय म्हणुन. पण तिचे स्पेअर पार्ट्स खूपच महाग झालेत आता, मेंटेनन्स कॉस्ट खूपच वाढली होती.

एलेव्हेट बघितली. पण तिचा ॲव्हरेज फारच कमी आहे रे. हायवेला १५-१७ आणि सिटी मधे ११-१२ देते असे वाचले. एवढा ॲव्हरेजतर माझी १५ वर्षे जुनी सिटी देते >>>> माझी गाडी पण मोअर ऑर लेस तितकं मायलेजच देत्येय अ‍ॅटलिस्ट सिटीमध्ये तर नक्कीच. हायवेला क्रूज वर असेल बर्‍याच वेळाकरता (जे आजकाल समृद्धी एक्स्प्रेसवेमुळे सहजच शक्य होतंय) तर मात्र मस्त मायलेज मिळतो - ऑलमोस्ट १८. (हा कंपनीनी दिल्या मायलेज फिगरच्या फारच जवळ आहे; कंपनी फिगर - १८.५)
मात्र याच्या उलट अमेझ चा अनुभव आहे. २००+ किमी याच रस्त्यावर ऑलमोस्ट पूर्णवेळ १००+ स्पीड ला अमेझ नी फारच वाईट मायलेज दिलाय. ही गाडीही १.२ली सिव्हिटी आहे.

जुन्या Amaze diesel ८० च्या आसपास स्पीड ठेवला तर २५+ माइलेज काढ़तात.
कुठल्याही CNG पेक्षा भारी वाटते हे पण बिल्ड क्वालिटी भंगार एकदम. त्यामुळे नुसत्या माइलेजच्या नादी न लागता कम्फर्ट - हैंडलिंग - सेफ्टी वरती फोकस ठेवत बजेट चेक करणे अधिक श्रेयस्कर.

मला सुद्धा अमेझ बिल्ड क्वालिटी सुमार वाटली. बूट मधील खालचे पुठ्याचे कव्हर वाटले. आतील roof सुद्धा तसेच.

गाडीत मिडीओकर इंजीन आहे हे पटत नाही. उदा. नेक्सॉन टॉप १५+ जाते आणि तरीही १२०० सीसी चं ३ सिलिंडर इं देतं टाटा. ४ सिलिंडर इंजिन चा पर्फॉर्मन्स आणि स्मूथनेस, ३ सिलिंडर इंजिन देऊ शकत नाही. >>>>>>
Nexon ला ऑटो मध्ये AMT गिअर बॉक्स आहे
Harrier ला Torque converter गिअर बॉक्स आहे. दोन्ही technology मध्ये बराच फरक आहे.

Pages