इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
शहातातील रहदारीतही स्मूथ आणि
शहातातील रहदारीतही स्मूथ आणि हायवेलाही चांगले माइलेज हे दोन्ही auto transmission मध्ये मिळणार नाही बहुतेक. AMT ला जर्क्स येतात, सवयीने कमी करता येतात. यात माईलेज चांगले मिळते.
Torque converter ला सगळ्यात कमी.
शहरातच वापरायची असेल तर मला CVT ठीक वाटते.
Altroz मध्ये dual clutch technology आहे.
शहरात performance कसा आहे माहीत नाही, कधी चालवली नाही DCT.
भारतातील लक्झरी सेगमेंट सोडता
भारतातील लक्झरी सेगमेंट सोडता वीडब्लू गृप ची बिल्ड क्वालीटी द बेस्ट च आहे. होंडा अन यात तुलना होणे नाही.
अर्थात हे ही विचारात घेतले पाहिजे की बिल्ड क्वालिटी अन ग्लोबल एन्कॅप रेटिंग यात गल्लत नको. अमेझ ची बिल्ड जरी फ्लिम्झी वाटत असली तरीही ती ४ स्टार रेटेड कार आहे. सेम विथ सिटी, ट्रायबर, ब्रेझा. अजून एक उदा क्रेटा, सेल्टोस अमेझ अन ब्रेझ्झा पेक्शा सरस वाटतात बिल्ड मध्ये पण केवळ ३ स्टार रेटेड गाड्या आहेत.
आता ऑटो गिअर बॉक्स विषयी जरा -
क्रम सगळ्यात स्वस्त गिअर बॉक्स ते महाग आणि अर्थात क्लिष्ट टेक -
आयएमटी - यात हातात गिअर्स तर असतात पण पायात क्लच नसतो. ए पेडल रिलीज केलं की मॅन्युअल गाडीसारखे गिअर्स बदलायचे. २५-३० हजार कॉस्ट नॉर्मली. (जुनी हिरोहोंडा स्ट्रीट गाडी आठवत असेल तर ती सेम अशी होती.)
एएमटी - अर्थात ऑटो मॅन्युअल गिअर - यात नावाप्रमाणे क्लच ऑटो असतो (कंप्युटराईज्ड). यात गाडीनी गिअर्स बदललेले लक्षात येतात (हेड नॉड) ओव्हरटेक इ. करतांना हा बॉक्स कन्फूज होतो कधीकधी. गिअर्स बदल होताना स्पीड ड्रॉप होऊ शकते किंवा आपल्याला तो पुढल्या गिअर मध्ये जायला हवा असतांना तो जात नाही असे अनुभव येतात. त्यामुळे ओव्हरटेक्स प्लॅन करून करायला लागतात. सिटी मध्ये वापरायला बेस्ट.
बाकी मग कंपनी नुसार पॅड्ल शिफ्टर्स, मॅन्युअल/ स्पोर्ट मोड इ. एड्स असतात
सिविटी - सरळ सरळ अॅक्टिव्हा सारखा गिअरबॉक्स फक्त कार चा असल्यानी ऑईल मध्ये असतो.
यात मुळात गिअर्स असे नसतातच त्यामुळे सुपरस्मूथ चालते गाडी. पॅडलशिफ्टर्स शक्यतो असतात ज्यामुळे जरा रेशो बदलून जास्त पॉवर मिळते (असं वाटतं पण केवळ इंजिन आरपीएम्स वाढ्तात त्यामुळे पॉवर जास्त... सेम लाईक अॅक्टिव्हा). यामुळे सिटीत जरी ठिक मायलेज असला तरी हायवेज वर डिमांडिंग पॉवर मध्ये हे मायलेज देत नाहीत.
टॉर्क कन्व्हरटर
नावाप्रमाणे इंजिन चा टॉर्क अर्थात पुलिंग पॉवर गतीत बदलते. नॉर्मली जास्त टॉर्क देणार्या इंजीन्स ना असतो उदा. बिग डिजल्स. यात याच्या कार्यपद्धतीमुळे थोडा टॉर्क वाया जातो (अर्थात मायलेज कमी) म्हणून जे इंजन मुळात टॉर्की (उदा डिझेल अन डिझेलच जास्त मायलेज् देतात) तिथे हा फायद्याचा.
१ लि टर्बो पेट्रोल + हा गिअर बॉक्स म्हणजे मायलेज फार कमी कारण टर्बो पेट्रोल्स मायलेज च्या बाबतीत फार सेन्सिटीव्ह असतात.
डीसीटी ड्युअल क्लच
हे बॉक्सेस बरेच क्लिष्ट असतात. म्हणूनच महागही आणि भारतीय वातावरणात (धूळ आणि अँबीअंट टेंपरेचर्स मुळे) लवकर इश्यूज येतात. रिपेअर कॉस्ट बरीच असते (शक्यतो लाखात). नेहेमी होणारे ट्रॅफिक जॅम्स हे यांचे नंबर एक चे शत्रू.
यात ७ गिअर्स असतात आणि ते एंगेज-डिसेंगेज करायला दोन क्लच - सम गिअर्स ला एक अन विषमास दुसरा. यामुळे लायटनिंग फास्ट अॅक्सिलरेशन मिळतं अर्थात.
टाटाच्या याच पद्धतीच्या बॉक्स मध्ये मात्र ऑईल बेस्ड क्लच आहेत आणि मी तरी त्याचे इतके इश्यूज पाहीले वाचले नाहीत अजूनतरी. पण व्हिड्ब्लू स्कोडाचे हे बॉक्सेस टाटाच्या डिसिटी ला अगदी सहज धूळ चारतील इतके उजवे आहेत.
हुश्य!
योकू चांगली माहिती दिलीत.
योकू चांगली माहिती दिलीत.
मारुतीने सेलेरिओ मध्ये AMT दिले आणि हळूहळू त्याचा।प्रसार झाला. नाहीतर ऑटो गियर नकोच हा इन जनरल लोकांचा attitude होता.
एकतर कितना देती है मध्ये मार खातंय, आणि कंट्रोल आपल्याकडे नाही ह्याची भिती किंवा कंट्रोल फ्रिक असणे.
AMT लो कॉस्ट असल्याने बऱ्याच गाड्यात आहेच हल्ली.
प्रिमियम गाड्यात मात्र आधीपासून DCT जास्त वापरले जायचे असे वाचून आहे.
Overtaking बाबत बर्याच जणांनी अनुभव सांगितले आहेत विशेषतः स्विफ्ट डिजायर amt
DCT आपल्या बंपर टू बंपर
DCT आपल्या बंपर टू बंपर ट्राफिकमध्ये कसे चालेल याबद्दल कुतूहल व शंका आहे.
Altroz DCT बद्दल काही ऑनलाईन रिव्ह्यूज वाचले. वर्षभरानंतर प्रॉब्लेम आला आणि गिअर बॉक्स रिप्लेसमेंटला एक सव्वा लाख खर्च असे काही रिव्ह्युज आहेत.
प्रीमियम गाड्या पळवायला DCT बेस्ट असे वाचून आहे.
योकु, छान माहिती.
योकु, छान माहिती.
ऑटोमेटीक ची गरज वाटत नाही. मॅन्युअल वर विश्वास आहे. क्रूझ कंट्रोल हे फीचर सुद्धा नको वाटते.
मुलगी पहायला जाताना लिपस्टीक,लाली, पावडर, मेक अप, वॉर्डरोब बघायचे कि गुण बघायचे कि दोन्हीही असा प्रकार आहे कार, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना.
Also automatic should be at
Also automatic should be at least 1500 CC or more. You will fill too much power loss in 1000 / 1200 CC automatic vehicles as compared to manual cars.
होंडा एलिव्हेट आवडली , तरीही
होंडा एलिव्हेट आवडली , तरीही कन्फ्युजन आहेच
DCT माझ्या i20 त आहे. तो गरम
DCT माझ्या i20 त आहे. तो गरम झाला तर dashboard वर warning येइल अशा आशयाच एक कुपन साइझ च कार्ड दिलं होतं. तसं झालं तर warning जाईपर्यन्त गाडी चालवायची नसते. थोडक्यात DCT प्लेट्स थंड होईपर्यंत आपण पण ब्रेक घ्याय्च.
मुम्बई पुण्याच्या घाटात बंपर टू बंपर गाडी चाल्वून देखिल दिड वर्षात मला हा प्रोब्लेम आलेला नाहिय. कारण गाडी उभी असेल बराच वेळ तर सरळ P गिअर मधेय ठेवतो. फक्त ब्रेक दाबून गाडी कंट्रोल केल्यास issue येऊ शकतो.
सध्या जोडून सुट्ट्यांमध्ये
सध्या जोडून सुट्ट्यांमध्ये खूप गर्दी मुळे स्लो ट्रॅफिक मध्ये पुण्याकडे येताना घाटात खूप गाड्यांच्या क्लच प्लेट्स खराब झाल्या असा विडिओ व्हाट्सअप्प वर व्हायरल झालाय.
व्हाट्सअप्प असल्याने कधीचा आणि कुठला विडिओ आहे ते देवच जाणे.
प्रविणपा, अच्छा. धन्यवाद
प्रविणपा, अच्छा. धन्यवाद अनुभव शेअर केल्या बद्दल.
ऑटोमॅटीक ट्रान्स्मिशन साठी
ऑटोमॅटीक ट्रान्स्मिशन साठी प्लॅनेटरी गिअर बॉक्स वापरला जातो. आम्ही असा एक गिअरबॉक्स स्पीड रिडक्शन साठी बनवला आहे. पण त्याचं मॅन्युफॅक्शचरिंग करण्यासाठी भारतात एक्स्पर्ट मिळत नाहीये. त्याची अॅसेम्ब्ली सोपी नाही, तरी आमचा गिअर बॉक्स सिंपल आहे. कार मधे हे तंत्रज्ञान खूपच किचकट आहे. तसेच त्यासाठी मल्टीपल क्लचेस वापरले जातात. डीसीटी म्हणजे पण तेच. कदाचित कर बनवणार्या कंपन्यांमधे गिअर बॉक्स चं वेगळं युनिट असेल आणि ते स्वतंत्र बनवत नसल्याने माहिती नसेल असा विचार केला. पण थोडी जास्त माहिती घेतल्यानंतर खालील वस्तुस्थिती पुढे आली.
१) फोक्सवॅगन ला अमेरिकेत डीसीटी तंत्रज्ञानाच्या फेल्युअर साठी आणि अविश्वासार्हतेसाठी थोडाथोडका नाही तर ३० मिलियन डॉलर एव्हढा दंड झाला आहे.
२) फोर्डच्या कार्स रिकॉल कराव्या लागल्या. यासाठी त्यांना आतापर्यंत ४७.४ मिलिअन डॉलर्सचा तोटा सोसावा लागला आहे.
३) फोक्सवॅगन ने २०१३ मधे २६००० कार्स रिकॉल केल्या आहेत.
४) २०१९ मधे फॉक्सवॅगन, स्कोडा आणि ऑडीसहीत ८०००० कार्स रिकॉल केल्या आहेत.
५) होंडा ने २०१४ मधे सॉफ्टवेअर आणि ट्रान्समिशन फॉल्ट मुळे आपल्या डीसीटी वाल्या सर्व कार्स रिकॉल केल्या होत्या. या कार्स ४०००नंतर ३२००० आणि सरतेशेवटी ८१००० एकूण होत्या.
).२०२२ मधे युएसए आणि कॅनडा मधे ६२००० ह्युंदाई आणि ६९००० किआ कार्स रिकॉल केल्या आहेत.
कार मधे हे तंत्रज्ञान कसं वापरलं आहे याबद्दल कल्पना नाही. तसेच एकूण किती कार्स मागे अशा फॉल्टी कार्स आहेत याचीही कल्पना नाही. कंपन्या कार्स बदलून देत आहेत, त्याची बातमी येऊ देत नाहीत. १००% कार्स बदलून दिल्या आहेत का याचीही कल्पना नाही. वर दिलेल्या कार्सची बेरीज केली तर ती दुर्लक्ष करण्यासारखी संख्या नाही. या सगळ्याच कार्स जर फक्त अमेरिकेत असतील तर इतर देशात काय परिस्थिती आहे ? भारतात याबद्दल आनंदीआनंद असतो. आपल्याकडे रिकॉल केल्याच्या घटना दुर्मिळ आहेत, याचा अर्थ कार्स मधे दोष आहे असा होईल का ? कि ग्राहक सजग नाही ?
ऑटोमॅटीक गिअर बॉक्स साठी ५५ ते ६०हजार रूपये जास्तीचे मोजायला काहीही हरकत नाही. पण..
प्लॅनेटरी गिअरबॉक्स ज्यांना माहिती आहे त्यांना सांगण्याची गरज नाही. ज्यांना माहिती नाही त्यांनी सर्च केले तर मूव्हींग पार्ट्स यात जास्त असतात हे लक्षात येईल. हे तंत्रज्ञान प्रस्थापित आहे का ? वाटत नाही.
भारतात ज्या कार्स
खालील प्रश्न आहेत :
भारतात ज्या कार्स सेमीऑटोमॅटिक किंवा फुल्ली ऑटोमॅटिक म्हणून विकल्या जातात त्यामधे नेहमीचा गिअर बॉक्स आहे कि प्लॅनेटरी गिअर बॉक्स आहे याची कल्पना नाही. डीसीटी म्हणजे अल्टरनेट गिअर्स साठी क्लचचे दोन सेट्स + सॉफ्टवेअर अल्गोरिदम याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन म्हणत असतील तर ते इतर सेमीऑटोमॅटीक पेक्षा थोडे स्मूथ असेल, पण गिअरबॉक्स नेहमीचाच असेल तर मात्र जर्क बसत असावा हा अंदाज आहे. तसेच घाटात उतरणीला लागल्यावर मॅन्युअल मोड असतो का ? नसेल तर मग उतरणीला लागल्यावर हाय स्पीड मधे कार कशी कंट्रोल होते ?
प्लॅनेटरी गिअर बॉक्स मधे मल्टीपल क्लचेस असतील तर हे सर्वात उत्तम ऑटोमॅटीक ट्रान्समिशन आहे. पण त्यासाठी उच्च दर्जाचे मॅन्युफॅकरिंग असायला हवे. असेंब्ली निर्दोष हवी. तरीही मेन्टेनन्स साठी हे किचकट राहील.
भारतातल्या कार्स मधे कोणता गिअर बॉक्स वापरतात ?
मला वाटते torque converter
मला वाटते torque converter मध्ये planetary gearbox असतो.
AMT आणि DCT मध्ये बहुतेकम मॅन्युअल एकाच अक्सिसवर माऊंट केलेले गिअर्स असलेले मॅन्युअल गिअरबॉक्स असतात आणि क्लच/क्लचेस ऑटोमेटेड असतात.
हा त्यांच्या वर्किंग प्रिन्सिपलवरून केलेला अंदाज आहे, तपासून पाहायला पाहिजे माहिती.
प्लॅनेटरी गिअर बॉक्स मधे पण अ
प्लॅनेटरी गिअर बॉक्स मधे पण अॅक्सिज सेमच असतो. मेकॅनिजम वेगळे आहे.
वर दिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते डीसीटीचे आहेत.
आम्ही जो पीजीबी बनवून घेतला त्यात असंख्य प्रॉब्लेम्स येत आहेत. या कार्स कुठून बनवतात ?
रआ, प्लॅनेटरी गिअर बॉक्स
रआ, प्लॅनेटरी गिअर बॉक्स मध्ये सगळे गिअर्स एकाच प्रतलात असतात ना? मेन गिअर आणि आऊटर रिंग गिअर कॉन्सन्ट्रीक असतात पण प्लॅनेट गिअर्सचे वेगवेगळे ऍक्सिस असतात त्या दृष्टीकोनातुन म्हणतोय मी.
मॅन्युअल गिअर्स एकाच ऍक्सिसवर एका बाजूला एक असे वेगववगळ्या प्रतलात माऊंट केले असतात.
AMT आणि DCT मध्ये हा मॅन्युअल गिअर बॉक्स अगदी याच डिझाईनचा असून क्लचेस आणि गिअर शिफ्टींग तेवढे ऑटोमेटेड केलेले असतात की मॅन्युअल गिअरबॉक्स मध्येही बराच बदल केला असतो याची कल्पना नाही.
CVT मध्ये अर्थात बेल्ट पुली सिस्टीम असल्याने गिअर बॉक्स नाही.
गिअर बॉक्स भारतातच बनवतात का आणि असल्यास कुठे कल्पना नाही.
VW मध्ये एक मित्र आहे त्याला विचारून पहातो.
टेक्निकली प्लॅनेटरी गिअर्सचे
टेक्निकली प्लॅनेटरी गिअर्सचे अॅक्सीज वेगवेगळे असतात. पण ट्रान्समिशनचा अॅक्सीज एकच आहे. प्लॅनेटरी गिअर ज्या रिंग गिअरला आणि सन गिअरला जोडलेले असतात त्यांचा ट्रान्समिशन अॅक्सीज हाच त्यांचा अॅक्सीज मानला जातो.
सीव्हीटी व्हेरिओ ड्राईव्हसारखा असेल तर फ्युएल एफिशिअन्सी कमी होईल. पण यात गिअर शिफ्ट करताना स्मूथनेस असेल आणि रिलायबिलिटी सर्वात हाय असेल. सध्याच्या सॉफ्टवेअर वर पूर्ण पणे अवलंबून राहणे तितकेसे कंफर्टेबल वाटत नाही.
तुम्ही नक्की विचारा तुमच्या मित्राला. याबद्दल याआधी कधीच माहिती घेतलेली नाही. डोळे झाकून नव्या फीचर वर विश्वास पण नको टाकायला.
टॉर्क कन्व्हरटर हे त्याच
टॉर्क कन्व्हरटर हे त्याच शाफ्टवर बसवलेले एक टर्बो फ्युईड फ्लायव्हील असते ज्यात आणखी एक व्हील बसवले कि न्युट्रल मधे इंजिनचा आरपीईम डिसएण्गेज करता येतो आणि हवा तेव्हा एण्ग्जेज करता येतो.
यासाठी लागणारे मूव्हींग पार्ट्स पाहिले तर मेकॅनिकल ट्रान्समिशन मधे गिअर बदलणे हे तितकेसे कष्टाचे काम नाही असे मत झाले आहे. तुमची गाडी तुमच्या नियंत्रणात राहते.
बहुतेक ही यादी तुम्ही बघितली
बहुतेक ही यादी तुम्ही बघितली असेल.
यातील भारत गिअर्स हे ऑटोमोबाईल इंडस्ट्री साठी गिअर बॉक्स बनवतात आणि एक्स्पोर्ट सुद्धा करतात असे नमुद केले आहे.
नेहमीचे गिअर बनवणारे अनेक जण
नेहमीचे गिअर बनवणारे अनेक जण आहेत. प्लॅनेटरी बद्दल विचारणा केली.
आम्हाला सुद्धा हवाच आहे.
चांगली टेक्निकल माहीती. मी
चांगली टेक्निकल माहीती. मी इतका टेक वाला नाही सो मला त्यामानानी नवी.
माझ्या माहीतीप्रमाणे कंपन्या एकतर सरळ संपूर्ण गीअरबॉक्स घेतात (उदा. हॅरीअर चा टीसी - टॉर्क कन्वरटर बॉक्स हा हुंदाई चा आहे, नेक्सॉन चा मॅग्नेटी मरेली चा इ)
एखादाच महत्त्वाचा कंपोनंट दुसरीकडून घेत असतील असं वाटत नाही मलातरी, आय मे बी राँग!
त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही
त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही.
तंत्रज्ञान फॅन्सी नावाने माथी मारणे, जुगाड फीचर म्हणून प्रेझेंट करणे यामुळे आपण ज्या कारणासाठी कार घेतोय ते वर्थ आहे का? नेमके आपण काय घेतोय, त्याने सोय होईल कि अंगाशी येईल हे जाणून घेतले पाहिजे.
भले ये पीएसपीओ नही जानता म्हणून लोक हसले तरी चालेल.
रघु आचार्य
रघु आचार्य
तुम्ही प्लानेटरी गियर बॉक्स म्हणजे नेमका कसा म्हणताय ते लक्षात येत नाहीये.
Rear wheel ट्रान्समिशन असलेल्या ट्रक वै मध्ये मागच्या बाजूला एक।मोठा कास्टिंग चा गट्टू असतो ( ज्यावर बरेच ट्रक वाले राक्षस टाइप रेडियम करतात ) त्यात प्लानेटरी गियर असतात पण ते चाकांना ड्राईव्ह देण्यासाठी.
ते बनवणारे बरंच ऑटोमोबाईल vendor आहेत म्हणजे तुमचे काम देखील त्यांच्याकड होऊ शकेल ना?
Rear wheel ट्रान्समिशन
Rear wheel ट्रान्समिशन असलेल्या ट्रक वै मध्ये मागच्या बाजूला एक।मोठा कास्टिंग चा गट्टू असतो >>>
त्याला Differential म्हणतात ना?
झंपु होय
झंपु होय
एक वेगळा प्रश्न विचारतेय.
एक वेगळा प्रश्न विचारतेय. कोणता car insurance घ्यावा आणि कसं ठरवावं कुठला चांगला ते?
अनुभव काय सांगतात?
मी policybazar वर बघत आहे.
गाडी wagon R आहे
माझ्या गाडीचा expire झाला आहे.
तुम्ही प्लानेटरी गियर बॉक्स
तुम्ही प्लानेटरी गियर बॉक्स म्हणजे नेमका कसा म्हणताय ते लक्षात येत नाहीये. >> गुगळदेव,चॅटजीपीटी आहेत दिमतीला. सगळी माहिती हजर करतील.
किल्ली
किल्ली
किती वर्षे झाली आहेत गाडीला?
5 वर्षे पर्यंत zero डिप्रेसिएशन इन्शुरन्स मिळतो.
त्याच्यामध्ये क्लेम केल्यास क्लेम प्रोसेस चार्जेस 1000 रु आणि consumables जसे की ऑइल छोटे स्क्रू वै चे पैसे फक्त आपण भरायचे. बाकीचे क्लेम मध्ये मिळतात.
शक्यतो कॅशलेस क्लेम जिथे सेटल होईल तिथेच काम करून घ्यायचे.
5 वर्षाच्या नंतर zero dept एकतर मिळत नाही किंवा कंपनी त्यासाठी थोडे जास्त चार्जेस लावेल.
इन्शुरन्स घेताना काय बघावे?
1) गाडीची value किती? IDV असे लिहिलेले असते. साधारण वर्षाला 10 टक्के कमी होते ही किमंत
2) zero dept आहे का? असेल तर चार्जेस किती?
3) ज्या कंपनीचा घेणार त्यांचे कॅशलेस सेटलमेंट गॅरेजेस आपल्या शहरात किती? ह्यालाच नेटवर्क गॅरेज देखील म्हणतात.
4) कंपनीचे reputation. अगदीच नवखी कंपनी असेल तर क्लेम सेटलमेंट ला त्रास होईल का वै अंदाज
5) टोटल प्रिमियम किती ते compare करायचे सर्वांचे
6) कोण काय extra फिचर देत आहे का आणि त्यासाठी किती extra पैसे जात आहेत का ते पाहणे.
पॉलिसी बाजार वर हे सर्व आपण नीट तुलना करून बघू शकतो. त्यांच्या सेल्स पर्सनचा फोन आला की त्यालाच हे सगळे विचारू शकतो, हे वेबसाईट वर कुठे नमूद केले आहे ते विचारून खात्री करून घ्यायची.
तुमचा आधीचा प्लान expire झालेला आहे म्हणजे आता नो क्लेम बोनस मिळेल का? किती मिळेल? गाडीचे चेकअप घरी येउन करतील का? की विना चेकअप इन्शुरन्स देतील हे त्या त्या कंपनीवर अवलंबून. हे प्रश्न देखील पॉलिसी बाजार वर बोलताना विचारल्यास उत्तरे मिळतील.
तर अशा प्रकारे आखूड शिंगी बहुदुधी वै वै इन्शुरन्स मिळण्यासाठी शुभेच्छा
गाडी२० मध्ये घेतली होती,
गाडी२० मध्ये घेतली होती, ऑक्टोबर महिना बहुतेक. म्हणजे
३ वर्षे झाली.
मारुती कम्पनी चा इन्शुरन्स असतो का?
Maruti can provide insurance.
Maruti can provide insurance. It ia better to take from them.
Sona Comstar Gurgaon
Sona Comstar Gurgaon ऑटोमोटिव्ह ऍप्लिकेशन साठी planetary gearbox बनवतात असे कळले. त्यांच्या वेबसाईटवर याचा उल्लेख आहे इथे खाली ser no. 11.
ईथे चौकशी करुन बघु शकता.
Pages