कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.२ ली - ४ सिलिंडर वैगन आर पेक्षा इग्निस् बरी ना ? सिमिलर बजेट मध्ये नेक्सा सर्विसचा अनुभव उपभोगण्यासाठी

इग्निस्
छोटी आहे, मागे ३ जण आरामात नाही बसू शकत.
पण गाडी मस्त आहे otherwise

मारुतीनी ही गाडी बंद केलेय आता...
>>
फेसलिफ्ट वर काम चालू आहे. पण कॉस्मेटिक चेंजेस सोबत ग्राउंड क्लिअरन्स वर थोडं काम करून पंच / एक्स्टर टाईप लुक मधे रीलाँच होईल...

माझ्या चुलत भावाने टाटा सफारी ब्लॅक , माझ्याकडे Nexon ब्लॅक , पुतण्याकडे altroz ब्लॅक , आणि भाच्याकडे harrier ब्लॅक असा टाटाच्या ब्लॅक एडिशनचा संच झाला आहे .
सध्या तरी चौघेही समाधानी आहोत .
ब्लॅक कलर ची गाडी रोज तुम्हाला साफ ठेवावीच लागते , पुसण्याचा कंटाळा येवू न देता साफ करावी लागते .
ब्लॅक एडिशन ला ppf कोटिंग ( खर्च ६० ते ९० हजार रु )करून घेतल्यास गाडीला स्क्रॅच पडण्याचे प्रमाण पूर्णपणे नाहीसे होते .
पण खर्च जास्त आहे तरी सफारी आणि harrier वाल्यांनी फक्त ppf कोटींग करून घेतले .
असूयेने त्यांच्या कोटिंग चे तारीफ करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय शिल्लक राहत नाही Happy

नवीन creta facelift version सह बाजारात आली आहे. कुणाला त्याबद्दल काही updates असतील तर सांगा. आणि safety ratings बद्दल काही माहीत झाल्यास ते ही सांगा. जुन्या creta la ratings नव्हते. आमचे अजूनही तळ्यात मळ्यात चालू आहे. असो.

नव्या क्रेटाच्या कालच्या लाँच स्पीच मध्ये ते लोक गाडीच्या स्ट्क्चरल रिजिडिटी बद्दल बर्‍यापैकी बोलले, सो असं सध्यातरी वाटतंय की क्रॅशटेस्ट मध्ये चांगला परफॉर्मन्स देइल. यांच्याच नव्या वर्ना ला तर अरेडाडी ५ स्टार मिळालेले आहेत.
क्रेटा ला कंपीट करणार्‍या इतर गाड्या - होंडा एलेव्हेट, मारूती सुझुकी ग्रँड व्हिटारा, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर आणि या बाकी च्या डायरेक्ट कंपीट करतील असं म्हणता येणार नाही पण काही साईझ मध्ये लहान तर काही प्राईस मध्ये जवळपास जाणार्‍या म्हणून या लिस्टीत - महिंद्रा एक्सयूव्ही ७००, एक्स्यूव्ही ३००, टाटा नेक्सॉन, टाटा हॅरीअर, श्कोडा कुशाक, फॉक्स्वागन तायगुन इ.

मारूती सुझुकी ग्रँड व्हिटारा, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर >> दोन्ही एकच ना ?

व्हिटारा आणि इलेव्हेट मधे चार सिलिंडर इंजिन आहे. होंडाचे सिटीचेच इंजिन इलेव्हेट मधे असल्याने रनिंगमधे खात्रीशीर वाटते ही गाडी. महिंद्राच्या गाड्या बघायला पाहिजेत. तीन सिलिंडर इंजिनचे बॅलेन्सिंग चांगले असेल, टर्बो पावर असेल तर हरकत नाही. थोडा पावर लॉस होईल पण मायलेज मिळेल. किंमत पण कमी राहील. इलेव्हेट मधे पण साईड एअर बॅग्ज आहेत.

फिबां, बरोबर आहे.
हे ही लक्षात घ्या की हायरायडर-ग्रँड व्हिटारा च्या नॉन हायब्रिड मॉडेल मध्ये ४ सिलिंडर इंजिन आहे (सेम मारूतीचे इंजिन जे एक्सेल ६, एर्टिगा, सियाझ मध्ये आहे) तर स्ट्राँग हायब्रीड मध्ये (इलेक्ट्रिक मोटर सोबतच) टोयोटाचं ३ सिलिंडर इंजिन आहे.

३ सिलिंडर एनए इंजिन असेल तर ते मायलेज चांगलं देइल. पण ३ सिलिंडर टर्बो असेल तर मायलेज मार खातेच. हेच इंजिन जर डीसिटी किंवा टीसी गिअर्बॉक्स मध्ये असेल तर मायलेज रबराखाच मिळते.

१ लिटर टर्बॉ पेट्रोल डीसीटी ऑटो - सोनेट डीसीटी/आयएम्टी, ह्युंदाई व्हेन्यू
१ लिटर टर्बॉ पेट्रोल टीसी ऑटो - श्कोडा स्लावीया, कुशाक, फोक्सवागन व्हर्तस, तायगुन.

SUV 1000 cc नसावी ( Turbo चालेल). . Wagon R, Zen, Matiz, Spark या कार्स 1000 cc होत्या. किमान 1200 cc असावी.
परदेशात वेट टू पावर रेशों पाहतात. सिलेक्शन साठी हा प्रायमरी फॅक्टर असतो.
आपल्याकडे सिलेक्ट करण्याचा क्रायटेरिया अजब आहे.
मोठी गाडी ओढायला बैल जास्त नाहीत का लागणार?
10 लाखाच्या आतल्या SUV अशाच आहेत. त्यातच 3 cylinder असेल आणि सीएनजी वर असेल तर घाटात एसी बंद करावा लागेल.
सेफ्टीत तडजोड नकोच. पण परफॉर्मन्स महत्त्वाचा.
Aesthetics, Aero Dynamics, Boot Space, Cosmetic Features हे नंतर आलं पाहिजे.
काही जण तर infotainment अमक्या गाडीची बेस्ट आहे म्हणून ठोकून देतात. कार कंपनीचा तो धंदा आहे का? ज्या गोष्टी नसल्याने कारला फरक पडत नाही त्यावर कार सिलेक्ट करतात.

मायलेज कि पावर हा एक तिढा भारतात तरी आहे.
टर्बो इंजिन ने मायलेज कमी होत नाही असं मला वाटतं. पण किंमत वाढत जाते.
कंपनीचा सेल्समन तुम्हाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे तर्क देतो.
एकदा सांगेल कि तुम्ही 1 ते 2 लाख रूपये टर्बो मॉडेलला जास्त देताय. ते वसूल करायला तुम्हाला 5 वर्षे लागतील. ते पैसे बँकेत ठेवले तर व्याज येईल. म्हणजे अजून एक वर्ष.

दुसऱ्या वेळेस सांगेल आज पैसे वाचवण्यासाठी स्वस्त गाडी घ्याल. घाटात बंद पडली तर? सतत स्ट्रेस राहील. Overtake करताना confidence नसेल. इंजिन लवकर काम काढेल. वाचवलेले पैसे दुपटीने जातील. रिसेल व्हॅल्यू कमी.

आपल्याला आधीच काय पाठवावे लागेल.
मायलेज महत्त्वाचे असेल तर मग तडजोड करावी.

पंच चांगली गाडी आहेच. पण या ही बाबतीत माझे २ पैसे - काही गाड्या फक्त 'एसयूव्ही टाईप' आहेत म्हणून त्यांना जास्त पैसे द्यावेत हे मला स्वतःला अजिबात पटत नाही.
उदा. पंच आणि टियागो मध्ये सगळं (एंजिन, गिअरबॉक्स इ. मेकॅनिकल्स) मोस्टली सेम आहेत, पण तरीही त्यांच्या किंमतीत बराच फरक आहे. पंच च्या मिड व्हेरीअंट च्या किंमतीत टियागोचं टॉप मॉडेल सहजच येते. व्हॅल्यू पाहाता हे डील उजवं हे माझं मत.

Honda elevate घ्यायचे फायनल करतोय. Taigun आवडलेली पण डिक्की खूप छोटी आहे. Elevate सेम आहे City सारखीच . इंजिन सारखे आहे .
1498 cc Petrol engine, 1.5 L 4-cylinder आहेत.
ADAS technology ची गरज नाही. drawbacks जास्त वाटले सध्या भारतात तरी उपयोग नाहीय .
पण ते नको असेल तर airbags ६ वरून दोन होतात.
भारतात sun roof ची गरज नसताना सगळ्या variant मध्ये का देतात कळत नाही.

पंच आणि टियागो मध्ये सगळं (एंजिन, गिअरबॉक्स इ. मेकॅनिकल्स) मोस्टली सेम आहेत
>>
ग्राउंड क्लिअरन्स अन् सीट पण (एसयूव्ही टाईप लुक मुळे हेड रूम मिळते पण एरोडायनॅमिक्स बिनसल्यानी अन् वजन वाढल्यानी मायलेज गंडतं)

पंच मधे मिसिंग फीचर्स (जी या प्राइस पॉइंट ला असली पाहिजेत):
- DCA गियर बॉक्स
- रिअर एसी वेंट

वर योकु नी लिहिल्या प्रमाणे पंच मिड वेरियंट पेक्षा टियागो टॉप वेरियंट अन् पंच टॉप वेरियंट पेक्षा आल्ट्रोज टॉप वेरियंट बेटर डील आहेत.
दोन्ही ऑप्शन मधे बेटर फीचर्स कमी किमतीत मिळतील. एसयूव्ही टाईप लुक वर तेवढं कॉम्प्रोमाईज होईल. ते नको असेल तर nexon बेस+१ किंवा बेस+२ वेरियंट पण कन्सिडर करता येतील.

सामी अभिनंदन.
iV tech इंजिन आहे. टेस्ट ड्राईव्ह घेतल्यावर कळवा इथे.

मारूती, होंडा आणि ह्युंदाई यांचे एंट्री-मिड व्हेरिअंट्स कंपेअर केलेत तर असं लक्षात येते की इसेंशिअल + सेफ्टी फिचर्स हे होंडात नेहेमीच जास्त मिळतात आणि ब्युटी फिचर्स हे ह्युंदाई मध्ये.
उदा. एलेव्हेट मध्ये एडॅस हे बेस पासूनच मिळतं तर रायव्हल्स मध्ये फक्त टॉप ला. सेम बात एअरबॅगची सिटी-एलेव्हेट मध्ये बेस मॉडेल ला सुद्धा ४ एअरबॅग्स आहेत तर बाकीना मिड मॉडेल्स मध्ये फक्त २

ADAS technology ची गरज नाही. drawbacks जास्त वाटले सध्या भारतात तरी उपयोग नाहीय . >> काल एका महिलेचा अनुभव वाचला. थरारक अनुभव आहे. निर्मनुष्य रस्त्यावर त्यांच्या कारपुढे रस्ता अडवणारा मनुष्य आला. ADAS technology मुळे भरधाव कार जागच्या जागी थांबली. त्याने आतले लोक जखमी झाले. कार थांबल्यावर झाडीत लपलेले त्याचे साथीदार बाहेर आले.

इलेव्हेट आणि सिटी ला टॅक्सेस किती लागतात ? पूर्वी कमी पॅसेंजर्स ला लक्झरी समजून जास्त एक्साईज ड्युटी असायची. त्याच्यावर सेल्स टॅक्स.
आताचे स्ट्रक्चर माहिती नाही. पूर्वी १००० सीसी जाहीर केल्यावर वेगळा कर लागायचा म्हणून झेन ९९९ सीसी लिहायचे.

इथे पेट्रोल/डिझेल गाड्यांना त्यांच्या इंजिन कॅपॅसीटीच्या अनेक वेगवेगळ्या स्लॅब्स ना नक्की किती जीएसटी आहे हे व्यवस्थित दिले आहे. Wink (मी आधी तिथे दिलेला compensation cess नोट नव्हता. Total tax खरंच वेगवेगळा आहे.)

रोड टॅक्स मात्र राज्यांप्रमाणे आणि इंजिन कॅपॅसीटी प्रमाणे खरेच वेगळा आहे.
थर्ड पार्टी इन्शुरन्स सुद्धा इंजिन कॅपॅसिटी प्रमाणे तीन स्लॅब्स मध्ये वेगळा आहे. (थर्ड पार्टी इंशूरन्स गाडी नवी किंवा कीतीही जुनी असली तरी तेवढाच असतो.)

अनिरुद्ध - बरोबरे. सिटी ला बेस ला ४ आहेत एअर बॅग्ज.
एलेव्हेट ला - २.१३ लाख टॅक्स तर सिटी ला १.५२ तर अमेझ ला ८६ हजार
सेम केस मध्ये ह्युंदाई क्रेटा ला - १.४३ तर व्हर्ना ला १.४३ तर ऑरा ला ७८ हजार
(सगळ्या गाड्यांचे पेट्रोल टॉप सिव्हिटी चे इंडेव्ह्य्जुअल रजिस्ट्रेशन टॅक्सेस, पुणे सिटी करता आहेत हे)

तरीही, क्रेटा पेक्षा एलेव्हेट स्वस्त आहेच (क्रेटा २२.१४ तर एलेव्हेट १९.५५)

गाडी संबंधी एक वेगळा प्रश्न.
OBD स्कॅनर कोणी वापरले आहे का? कोणते चांगले?
(त्याचा नक्की काय उपयोग हे अद्याप ठरवले नाही. वापरून बघायचे आहे कसे उपयोगी पडेल ते.)

केव्हातरी १० वर्षांपूर्वी मी इथे गाडीबद्दल चौकशी केली होती. तर मी मागच्या वर्षी फायनली गाडी घेतली.

गाडी घ्यायचं ठरवलं तेव्हा नवीन की सेकंडहॅंड ते ठरत नव्हतं. कारण इथे गाडी चालवायचा अनुभव नव्हता. सेकंडहॅंड गाड्या बघायला गेले तेव्हा लिस्टवर टॅापला होंडा जॅझ होती. तीन गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेतली. त्यात मारूती स्विफ्ट, फोक्सवॅगनची पोलो आणि बलेनो होती. त्यादिवशी जॅझ नाही मिळाली. तिघांपैकी (त्यातल्या त्यात) स्विफ्ट बरी वाटली मला. बरं मारूतीची गाडी माझ्या लिस्टवर कधीच नव्हती. पण ही गाडी फक्त सव्वा वर्ष जुनी होती आणि फक्त १८०० किमी चालली होती. शेवटी ही गाडीच फायनल केली व चार दिवसांनी घरी आणली. त्याच दिवशी ड्राईवला गेलो असताना समोर डिस्प्लेवर इंजिनची खूण दिसायला लागली. लगेच जिथून गाडी घेतली तिथे फोन करून विचारलं तर तो उद्या गाडी घेऊन या म्हणाला. दुसऱ्या दिवशी गाडी मारूतीच्या सर्व्हिस सेंटरला नेली. तिथे त्यांनी इन्स्पेक्शन केलं व कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मिसींग आहे असं सांगितलं. खर्च ४०-४५ हजार. गाडी घेतल्याला २४ तासही झाले नव्हते. मग ज्या डिलरकडून घेतली त्याच्याकडून पैसे परत मागितले. नशिबाने त्याने दिलेही. असा एक अनुभव आल्यावर मला परत सेकंडहॅंड गाडीकडे वळायची इच्छाही नव्हती.

मग मी नवीन गाड्यांचे रिव्ह्यू बघायला सुरूवात केली. महिंद्रची एक्सयुव्ही ३०० आवडली होती मला. सेफ्टी रेटिंग, ड्रायव्हिंग कम्फर्ट सगळ्या द्रृष्टीने गाडीचे रिव्ह्यूज चांगले होते. पण नवऱ्याने त्या गाडीला फाट्यावर मारलं. मग परत शोधायला सुरूवात. असं करत मग टाटाची अल्ट्रोझ डिसीए घेतली. दीड वर्ष होत आलं आता घेऊन आणि मी एकंदरीतच खुष आहे.

एलेव्हेट बेस माॅडेलला ४ एअर बॅग्ज..? > दोनच एअर बॅग्ज आहेत. elevate zx cvt ला ७ एअर बॅग्ज आहेत.
. कार थांबल्यावर झाडीत लपलेले त्याचे साथीदार बाहेर आले.> यात तथ्य वाटत नाही. ADAS features override करता येतात

चौफुला सोलापुर दरम्यान दरोडेखोरीच्या घटना खुप घडतात आणि त्याही किमान २५ वर्षांपासुन. माझा कलिग बसने येत असताना बसवर दरोडा पडला. रेल्वेने आई, बाबा, बहीण पुण्याहुन हैद्राबादला येत असताना ट्रेनवर दरोडा पडला होता.
ADAS features override करता येतात >> त्यांना संधीही मिळाली नसेल याची. ADAS असो, नसो पहिली reaction ब्रेक दाबुन थांबवणे असते. दरोडेखोरी जिवावर उदार होऊनच केली जाते बहुतकरुन.

Pages