एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत अवैध रितीने प्रवेश मिळविणार्‍यांत गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. २०२४ मधे ९०, ४१५ भारतीयांना अटक झाली होती, पैकी ५० % तर गुजरातचे रहिवासी होते असे या बातमीत म्हटले आहे.
https://www.business-standard.com/india-news/10-indians-per-hour-caught-...

एन्डीटीव्ही म्हणतंय - त्यांना लष्करी विमानाने पाठवणार. यात दीडशे की अडीचशे लोकांना एकच टॉयलेट असतं.
जंबो डायपर द्यायचे की प्रत्येकाला.

ज्या मार्गे लोकं अमेरिकेत जातात त्यात डेरियन पास बोलतात. बहुतेक लोकं साहसाचा फिल घ्यायला तिकडे जातात अमेरिकेत त्यांना जायचं नसतं. तिकडे गेल्यावर भारताची आणि मोदींची आठवण येऊन लोकं रडतात. मोदींचे मित्रों वाले भाषण ऐकले की लोकांचे दुःख लांब पळून जातात.भारतीय लोकं धाडसी बनलेत. याचं श्रेय मोदींना जातं. विंचू साप लुटेरे यांचा सामना करायला लागतो. विमानात बसून जाण्यात ती मजा नाही.

दिल्लीत रात्री आठ वाजताही मतदारांच्या रांगा आहेत असं स्वतः निवडणूक आयोग सांगतोय. रांगा - त्याही थेट मतदान कक्षात.

https://x.com/CeodelhiOffice/status/1887146464926937223

<< मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी याच मुद्द्यांवर आक्षेप घेतला होता ना? >>

------ मेक्सिको तसेच कोलंबियाने लष्करी विमानाने परत पाठविण्याच्या प्रकाराबद्दल आक्षेप घेण्याचे धारिष्ट्य दाखविले.

एखाद्या राष्ट्राने त्यांच्या " लष्करी " विमानाने भारतीय नागरिकांना मुसक्या बांधून परत पाठविण्याचा प्रकार भारताच्या इतिहासांत पहिल्यांदाच होत आहे. मोदी किंवा जयशंकर यांनी काही तरी हालचाल करुन भारतीय नागरिकांची अशा प्रकारची अवहेलना टाळायला हवी होती.

आज मोदी गंगास्नान चित्रीकरणांत व्यस्त आहेत. पुढच्या आठवड्यात ट्रम्पसमोर भेटीमधे या बेकायदा वास्तव्य करणार्‍या भारतीयांचा ( २२००० ? ) प्रश्न धसास लावतील अशी अपेक्षा.

अपेक्षेनुसार जय्शंकरने राज्यसभेत '२००९ साली पण असेच पाठवले गेले होते' वगैरे टेप वाजवली. 'नेहरु के जमाने मे... ' असं रेकल्या स्वरात ऐकणं बाकी आहे

विमानांत गुजरात, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्राचे लोक होते. परतणार्‍या लोकांत पंजाब तिसर्‍या क्रमांकावर होता.
अपयशी गुजरात मॉडेल लोकांच्या नजरेत यायला नको म्हणून अमृतसरला पसंती? येथे मोदींनी वजन वापरले आणि बातमीमधून गुजरात मागे पडले.

अवैध रितीने मानवी तस्करी करण्याच्या व्यावसायांत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे दुकाने थाटलेली आहेत. ५० लाख - १ कोटी रुपये असा भाव आहे.

pewresearch च्या आकडेवारीनुसार , २०२२ पर्यंत अनधिकृत स्थलांतरित भारतीयांची संख्या ७२५,००० आहे.
https://www.pewresearch.org/short-reads/2024/07/22/what-we-know-about-un...

प्रत्येक जण अगदी १ कोटी नाही पण ५०, २५ लाख मोजून आला असला तरी २.० ते ३.५ लाख कोटी रुपयांचा मानवी तस्करीचा व्यावसाय आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा केवळ पोकळ घोषणाच आहे.

ED, CBI च्या नजरेंत हा एव्हढा मोठा व्यावहार येत कसा नाही? चार लोकांचे भारतीय कुटुंब कॅनडात -३५ सें मधे गारठून प्राण सोडतात, फ्रान्स मधे ३०० भारतीयांची मानवी तस्करी पकडली जाते, किंवा अमेरिकेतून हात- पायांत साखळ्या टाकलेले लोक भारतात परत येतात तेव्हाच भारताच्या नेतृत्वाला जाग यायला हवी का?

भारत मानवी तस्करीचा सोर्स आहे पण कॅनडा/ अमेरिकेची पण जबाबदारी तेव्हढीच आहे. जगाला स्वस्तात काम करायला लोक हवे आहेत आणि भारताने आपल्या नागरिकांचे मानवी तस्करीपासून संरक्षण करायला हवे.

अवैध मानवी तस्करी करणार्‍यास मदत करणार्‍या काही एजंटांवर EDच्या धाडी पडत आहेत म्हणजे तसे भासविले जात आहे.

https://www.hindustantimes.com/india-news/ed-probing-complex-network-of-...

आधी फ्रान्स मधून आणि आता अमेरिकेतून परतवलेल्या भारतीयांकडून माहिती मिळाल्यावरच ED तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. हे काम आधी झाले असते तर हजारो भारतीयांची मानवी तस्करी होण्याच्या प्रकाराला आळा बसला असता.

लाखो कोटी रुपयांची उलाढाल होत असतांनाही तपास यंत्रणा काय करत होत्या ?

तिकडे ट्रम्पच्या धाग्यावर लिहीले आहे.

नोव्हेंबर २०२४ मधे , अमेरिकेत asylum ( आश्रय ) संबंधात आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. या बातमी नुसार, २०२३ मधे , ४१३३० भारतीयांनी अमेरिकेत आश्रय मागितला होता. ५० % अर्जदार ( २०००० अधिक ) भारतातल्या गुजरात मधून आहे असे या बातमीत म्हटले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/from-4-3k-in-2021-to-41-3k-in-...

हजारो भारतीयांची मानवी तस्करी होण्याच्या प्रकाराला आळा बसला असता. >> स्वतःच्या इच्छेने देश सोडण्याला "मानवी तस्करी" म्हणत नाहीत. एखाद्या व्यक्तीला ओलिस ठेवणे किंवा बळाचा वापर करून त्याची विक्री करणे, धमकावणे, फसवणूक करणे, हिंसा करणे, बालमजुरीसाठी इतर राज्यातून लहान मुलांना बेकायदेशीरपणे आणणे, मुलांना भीक मागायला लावण्यासाठी आणि हॉटेल, घरे, ढाबे आणि दुकानात काम करायला लावण्यासाठी किंवा
वेश्याव्यवसायासाठी पळवणे, इत्यादी प्रकार मानवी तस्करी अंतर्गत येतात.

Pages