एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत अवैध रितीने प्रवेश मिळविणार्‍यांत गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. २०२४ मधे ९०, ४१५ भारतीयांना अटक झाली होती, पैकी ५० % तर गुजरातचे रहिवासी होते असे या बातमीत म्हटले आहे.
https://www.business-standard.com/india-news/10-indians-per-hour-caught-...

एन्डीटीव्ही म्हणतंय - त्यांना लष्करी विमानाने पाठवणार. यात दीडशे की अडीचशे लोकांना एकच टॉयलेट असतं.
जंबो डायपर द्यायचे की प्रत्येकाला.

ज्या मार्गे लोकं अमेरिकेत जातात त्यात डेरियन पास बोलतात. बहुतेक लोकं साहसाचा फिल घ्यायला तिकडे जातात अमेरिकेत त्यांना जायचं नसतं. तिकडे गेल्यावर भारताची आणि मोदींची आठवण येऊन लोकं रडतात. मोदींचे मित्रों वाले भाषण ऐकले की लोकांचे दुःख लांब पळून जातात.भारतीय लोकं धाडसी बनलेत. याचं श्रेय मोदींना जातं. विंचू साप लुटेरे यांचा सामना करायला लागतो. विमानात बसून जाण्यात ती मजा नाही.

दिल्लीत रात्री आठ वाजताही मतदारांच्या रांगा आहेत असं स्वतः निवडणूक आयोग सांगतोय. रांगा - त्याही थेट मतदान कक्षात.

https://x.com/CeodelhiOffice/status/1887146464926937223

<< मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी याच मुद्द्यांवर आक्षेप घेतला होता ना? >>

------ मेक्सिको तसेच कोलंबियाने लष्करी विमानाने परत पाठविण्याच्या प्रकाराबद्दल आक्षेप घेण्याचे धारिष्ट्य दाखविले.

एखाद्या राष्ट्राने त्यांच्या " लष्करी " विमानाने भारतीय नागरिकांना मुसक्या बांधून परत पाठविण्याचा प्रकार भारताच्या इतिहासांत पहिल्यांदाच होत आहे. मोदी किंवा जयशंकर यांनी काही तरी हालचाल करुन भारतीय नागरिकांची अशा प्रकारची अवहेलना टाळायला हवी होती.

आज मोदी गंगास्नान चित्रीकरणांत व्यस्त आहेत. पुढच्या आठवड्यात ट्रम्पसमोर भेटीमधे या बेकायदा वास्तव्य करणार्‍या भारतीयांचा ( २२००० ? ) प्रश्न धसास लावतील अशी अपेक्षा.

अपेक्षेनुसार जय्शंकरने राज्यसभेत '२००९ साली पण असेच पाठवले गेले होते' वगैरे टेप वाजवली. 'नेहरु के जमाने मे... ' असं रेकल्या स्वरात ऐकणं बाकी आहे

विमानांत गुजरात, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्राचे लोक होते. परतणार्‍या लोकांत पंजाब तिसर्‍या क्रमांकावर होता.
अपयशी गुजरात मॉडेल लोकांच्या नजरेत यायला नको म्हणून अमृतसरला पसंती? येथे मोदींनी वजन वापरले आणि बातमीमधून गुजरात मागे पडले.

अवैध रितीने मानवी तस्करी करण्याच्या व्यावसायांत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे दुकाने थाटलेली आहेत. ५० लाख - १ कोटी रुपये असा भाव आहे.

pewresearch च्या आकडेवारीनुसार , २०२२ पर्यंत अनधिकृत स्थलांतरित भारतीयांची संख्या ७२५,००० आहे.
https://www.pewresearch.org/short-reads/2024/07/22/what-we-know-about-un...

प्रत्येक जण अगदी १ कोटी नाही पण ५०, २५ लाख मोजून आला असला तरी २.० ते ३.५ लाख कोटी रुपयांचा मानवी तस्करीचा व्यावसाय आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा केवळ पोकळ घोषणाच आहे.

ED, CBI च्या नजरेंत हा एव्हढा मोठा व्यावहार येत कसा नाही? चार लोकांचे भारतीय कुटुंब कॅनडात -३५ सें मधे गारठून प्राण सोडतात, फ्रान्स मधे ३०० भारतीयांची मानवी तस्करी पकडली जाते, किंवा अमेरिकेतून हात- पायांत साखळ्या टाकलेले लोक भारतात परत येतात तेव्हाच भारताच्या नेतृत्वाला जाग यायला हवी का?

भारत मानवी तस्करीचा सोर्स आहे पण कॅनडा/ अमेरिकेची पण जबाबदारी तेव्हढीच आहे. जगाला स्वस्तात काम करायला लोक हवे आहेत आणि भारताने आपल्या नागरिकांचे मानवी तस्करीपासून संरक्षण करायला हवे.

अवैध मानवी तस्करी करणार्‍यास मदत करणार्‍या काही एजंटांवर EDच्या धाडी पडत आहेत म्हणजे तसे भासविले जात आहे.

https://www.hindustantimes.com/india-news/ed-probing-complex-network-of-...

आधी फ्रान्स मधून आणि आता अमेरिकेतून परतवलेल्या भारतीयांकडून माहिती मिळाल्यावरच ED तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. हे काम आधी झाले असते तर हजारो भारतीयांची मानवी तस्करी होण्याच्या प्रकाराला आळा बसला असता.

लाखो कोटी रुपयांची उलाढाल होत असतांनाही तपास यंत्रणा काय करत होत्या ?

तिकडे ट्रम्पच्या धाग्यावर लिहीले आहे.

नोव्हेंबर २०२४ मधे , अमेरिकेत asylum ( आश्रय ) संबंधात आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. या बातमी नुसार, २०२३ मधे , ४१३३० भारतीयांनी अमेरिकेत आश्रय मागितला होता. ५० % अर्जदार ( २०००० अधिक ) भारतातल्या गुजरात मधून आहे असे या बातमीत म्हटले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/from-4-3k-in-2021-to-41-3k-in-...

हजारो भारतीयांची मानवी तस्करी होण्याच्या प्रकाराला आळा बसला असता. >> स्वतःच्या इच्छेने देश सोडण्याला "मानवी तस्करी" म्हणत नाहीत. एखाद्या व्यक्तीला ओलिस ठेवणे किंवा बळाचा वापर करून त्याची विक्री करणे, धमकावणे, फसवणूक करणे, हिंसा करणे, बालमजुरीसाठी इतर राज्यातून लहान मुलांना बेकायदेशीरपणे आणणे, मुलांना भीक मागायला लावण्यासाठी आणि हॉटेल, घरे, ढाबे आणि दुकानात काम करायला लावण्यासाठी किंवा
वेश्याव्यवसायासाठी पळवणे, इत्यादी प्रकार मानवी तस्करी अंतर्गत येतात.

उपाशी बोका - भारत सरकार या एजंटां विरुद्ध human trafficking असा गुन्हा दाखल करणार आहे. कॅनडामधे तपास यंत्रणा human smuggling म्हणत आहेत म्हणून मानवी तस्करी म्हटले.

कॅनडा, अमेरिका, भारत - अशी साखळी आहे. सर्वांनाच सर्व काही माहित आहे, बिलीयन $$$ चा उद्योग आहे, धुतल्या तांदळासारखे कुणी नाही. ७५०००० अवैध भारतीय लोक अमेरिकेत आहेत म्हणतात, २०००० लोकांचा कॅनडात पत्ता नाही ( गेले कुठे ? Angry ). आमिष दाखविले जाणे , खोटी स्वप्ने विकणे. मग आहे ते विकून ५० ते १०० लाख रुपये पैसा उभा करणे, प्रसंगी त्यासाठी मोठे कर्ज काढणे. आणि एव्ह ढ्या खस्ता खाल्ल्यावर इकडे काही जॉब वाट पहात बसलेला नाही आहे, फार मोठा स्ट्रगल आहे. आणि हा इथला स्ट्रगल सांगूनही तिथल्या व्यक्तीच्या ( जो जाण्याची मानसिक तयारी करत आहे) डोक्यात जात नाही. शुद्ध फसवणूक आहे.
सर्व जग यांच्याकडे आता तिरस्कारानेच बघत आहे पण... माझ्या मते ते बळीचे बकरे आहेत.

https://indianexpress.com/article/india/ed-probing-role-of-canadian-coll...

सेकी(तीच SECI जिने अदानीला उच्च दरात वीज खरेदी करण्याचे कंत्राट दिले आणि मग कोणी ती खरेदी करेना म्हणुन राज्यांना लाच दिली असे आरोप आहेत.) ते अदानी जमीन प्रवास, भारत पाक सीमेवरील जमीन रक्षा विभागाचे नियम शिथिल करून. योगायोग कितवातरी, दुसरे काय.

Work from home??? अरे हटा.....Dip from Home!!!
आहात कुठे?, ....अरे आणखी किती प्रगती हवी आहे या देशातील लोकांना?? Rofl

IMG-20250213-WA0012.jpg

हेत्तरकैचनै..... गेल्या आठवड्यात एका बाईंनी मला विचारलं महाकुंभाचं जल मागवलंस का? मी म्हटलं नाही.... असं पण काही असतं? ती म्हणाली हो. तिने ५०० रुपये भरून मागवलं. मी विचारलं हे सरकारने केलंय? तर गडबडली आणि म्हणाली "नाही. तिकडचे काही काही दुकानवाले ही सर्व्हिस देत आहेत."

आता ते जल आल्यावर फोडून डोक्यावर ओतणार आहे की काय करणार आहे विचारलं नाही Lol

माझ्याकडे देव्हाऱ्यात खूप वर्षांपासूनचे गंगाजळाचे २ sealed गडू आहेत कुणी काशी यात्रेहून आणलेले. प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात असायचे तसेच. घरातील माणसाच्या शेवटच्या क्षणी तो गडू फोडून मुखात गंगाजल घातलं जाई पूर्वी. माझ्या आजोबांच्या मुखात त्यांच्या सुनेने म्हणजे माझ्या आईने घातले होते. माझी आई माझ्या हातातच गेली पण मला ते सुचलेच नाही.

माझ्यासाठी गंगा पूजनीय आहेच.... पण वेगळ्या पातळीवर. अजिबात गर्दी नसेल तेव्हा कधी गेले तर गंगेच्या वाहत्या पाण्यात quick डुबकी मारेनही. पण एवढ्या गर्दीत एवढ्या लोकांनी डुबकी मारलेल्या पाण्यात नकोच वाटते. पाणी साफ करायचे काही औषध पाण्यात घालत असतील का? असेलही. जे जाऊन आले त्यांनी व्यवस्था चांगली आहे असे सांगितले. खूप चालावे लागतेय म्हणे त्रिवेणीवर जायला. आज तीन मैत्रिणी आणि त्यांचे नवरे प्रयागराज मध्ये आहेत.

महाकुंभाची घटिका समीप येऊ लागली तशी पेपरात पूर्ण पान सरकारी जाहिराती येऊ लागल्या. उत्तर प्रदेश सरकार, योगी आणि मोदी. किती गाड्या (ट्रेन्सची व्यवस्था केली, इ.) आणखीही काय काय आकडेवारी होती .मौनी अमावास्येनंतर थोडा खंड पडला. कालच्या पौर्णिमेला पुन्हा जाहिरात. त्यात पुढचं की शेवटचं स्नान महाशिवरात्रीला असेल असं म्हटलंय.
म्हणजे सरकारच लोकांना जाहिरात करकरून महाकुंभाला या असं म्हणतंय.

आणि लोकांना तिथे गेल्यावर किंवा जाताना जो काय त्रास होतोय, त्यासाठी मात्र हे लोक जबाबदार. चेंगराचेंगरीत लोक मेले, त्यालाही लोकच जबाबदार. ते लोक तिथे नदीकिनारीच झोपले होते, कारण निवासव्यवस्था तिथून १०-१२ किमी दूर आणि तिथून स्वखर्चे यायचं. रात्री २ - २:३० चा मुहूर्त होता. पोलिस की प्रशासकीय अधिकारी झोपलेल्यांना भोंग्यावरून घोषणा देत उठवत होते, की आता इथे स्नानाला येणार्‍यांची गर्दी होईल. म्हणजे त्यांना कल्पना होती.
चेंगराचेंगरीत मेलेल्यांची सरकारी संख्या ३० वर फ्रीज केलीय. एका न्युज पोर्टलने हॉस्पिटलात जाऊन मृतांची यादी पाहितीत, तीत ७९ होते. पाहणारे लोक आकडे शेकडा , हजारांत होते. डंपर लावून मातीत गाडून टाकलं, असं काहीही सांगतात.
रेल्वे स्टेशन्सवरची गर्दी, रस्त्यांवरचे जाम यांचे व्हिडियो भरपूर आहेत.

आणि सरकारची तळी उचलणारे यातून इतक्या हजार कोटींची उलाढाल होईल असे फुगे सोडतात.

महाकुंभाच्या आधी मोदींनी नेहरूकाळात आणि कदाचित नेहरूंना पाहायला उसळलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन लोक मेल्याचे आठवण करून दिली होती. त्यांची जीभ त्यांनाच फळली.
अर्थात भाविक लोक त्यासाठी सरकारला दोष देणार नाहीतच. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात दुसरं काय झालं? उलट तिथे मेले म्हणजे मोक्ष मिळाला असं सुद्धा म्हणणारे आहेत.
तसंही आपल्याकडे माणसाच्या जिवाची किंमत आणि त्याच्या जगण्याला डिग्निटी कधीच नव्हती. कुंभ के मेले में बिछडे हुए हे चित्रपटांत यायच्या आधी साहित्यातही आलं असेल कदाचित. यावरून वृंदावनच्या विधवांचीही आठवण झाली. आणि म्हणे आमची महान संस्कृती आणि महान कुटुंब व्यवस्था.

Pages