एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळा आणि सरकारी कागदपत्राशिवाय आपंण कुठ्ठे सुद्धा जात वापरत नाहीत. सरकारने हे नियम केले नसते तर जातिव्यवस्था कध्धीच नष्ट झाली असती.

बांग्लादेशचा विषय आज समोर आ वासून उभा असतांना मनमोहनसिंग सरकारची धोरणे आठवावे लागत असतील तर मागच्य १० वर्षात मोदी सरकारने झोपाच काढल्या आहेत.

<< मुद्दा हा नाहीच आहे की मोदी पोजिंग करताहेत (ती वस्तुस्थिती आहे). मनमोहन सिंग ह्यांच्या विरुद्ध चा भाजपचा प्रचार "आदमी अच्छा है पर कमजोर है" (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन्ही कडे) असा होता. त्यामुळे मोदींनी स्वप्रतिमा आक्रमक अशी प्रोजेक्ट करणे हे ओघाने आलेच. "५६ इंच का सीना, घर में घुस के मारेंगे "वगैरे क्लिअर कट पोजिंग आहे. निवडणुका असतील तर त्याचा अतिरेक होणार हे उघडच आहे. >>

------ मनमोहन सिंग कमजोर होते हा भाजपाचा प्रचार होता. मोदी ५६" हा पण भाजपाचा प्रचार आहे. भाजपाचा म्हणजे खोटा प्रचार आहे हे ओघाने आलेच.

निर्भया ( बलात्कार, खून ) प्रकरणांत मनमोहनसिंग यांचे त्या दिवशी रात्रीचे स्टेटमेंट बघा. कुठेही, कुणाला दोष दिलेला नाही आणि जबाबदारीची जाणिव दिसते. "कमजोर" आदमी असे स्टेटमेंट देणार नाही.

मणिपूर मधे महिलांवर बलात्कार होतात, त्यांची सार्वजनिक नग्न धिंड निघते. त्या प्रकाराचे व्हिडिओ निघतांत. बातमी पंतप्रधान. गृहमंत्री यांना कळते आणि ते तब्बल ७५ दिवस यावर मौन बाळगतात. ७५ दिवसांनी बातमी कशीतरी बाहेर पडते आणि मग नाईलाजाने ३२ सेकंदसाठी मोदी तोंड उघडतात . त्यांच्या स्टेटमेंट मधे इतरांचे दोष दाखविण्याचा प्रकार होता. आजही मणिपूरला जाण्याचे धाडस दाखविलेले नाही. कमजोर आदमीच मणिपूरकडे पाठ दाखविण्याचे कृत्य करु शकतो.

मनमोहन यांच्याकडे धाडस होते, दुरदृष्टी होती, प्रामाणिकपणा होता, शिकलेले होतेच पण सर्वात महत्वाचे म्हणजे सुसंस्कृत होते.

<< त्यामध्ये शेवटाला एका गोऱ्याचा लष्करीतळ नाही दिले तर सत्तापालट घडवून आणला जाईल असा धमकीवजा इशारा इम्रान खान व शेख हसीना अशा दोघांना मिळाल्याचा उल्लेख आहे..आणि त्याप्रकारे पुढील घटना घडलेल्या आहेत.. ज्याप्रकारे बांगलादेशात बीएनपी, जमात ए इस्लामी च्या नेत्यांना साईडलाईन करुन मुहम्मद युनुस चे प्यादे नेतृत्वासाठी पुढे करण्यात आले त्यावरुन हा जिओपोलिटिकल वर्चस्वासाठी केला गेलेला एक डावपेच असण्याची शक्यता जास्त दिसते आहे. >>

----- हे गोर्‍याचे स्टेटमेंटबद्दल एकले आहे. इम्रानखानची उचलबांगडी झाल्यावर अशी शक्यता वाटली होती. पण शहानिह शा करता येत नाही. परस्पर विरोधी वाटतील अशा बातम्या लिक केलेल्या असतात जेणेकरुन संभ्रम निर्माण होईल.

अस्थिर शेजारी राष्ट्र हे भारतासाठी डोकेदुखी आहे. पाक - बांग्लादेश हे दोन अस्थिर शेजारी राष्ट्र मनाने जवळ येत असतील तर डोकेदुखी वाढणारच आहे. बांग्लादेशसोबत ४००० कि मी ची सिमा आहे, आणि चीन सोबत उद्या काही वाद झालाच तर बांग्लादेश आपल्या बाजूने हवाच हवा.

मनमोहन यांच्याकडे धाडस होते, दुरदृष्टी होती, प्रामाणिकपणा होता, शिकलेले होतेच पण सर्वात महत्वाचे म्हणजे सुसंस्कृत होते.

मिनिटामिनिटाला वेशभूषा बदलली तरी राजा नागडाच आहे आपला हे प्रियांका गांधींनी संसदेत सत्य सांगितले तेव्हा सत्ताधाऱ्यांची तोंडे बघण्यासारखी झाली होती. मनिपुरला भेट दिल्यास तेथील जनता खराखुरा ' बर्थ डे सुट ' भेट देतील.

मनमोहनसिंग यांच्या भाजपने केलेल्या अपप्रचाराबाबत:
बोलण्यात सॉफ्ट, कसला ऍग्रेसिव्हनेस नसणे, शांतपणे आणि मुद्देसूद उत्तरे देणे, विचारले असताना समस्या आहे हे मान्य करून त्यावर बोलणे पण निर्णय योग्य आणि न डगमगता घेणे (इटॅलियन खलाशांची केस पटकन आठवली, तसेच POSCO कायदा अमलात आणणे ज्यामुळे भामटे बाबा गजाआड गेले), डंका पिटत न नाचणे याला कमजोर असणे म्हणत असतील तर मला कमजोर नेते आवडतात.

मनमोहन सिंग यांचे निर्भया संदर्भातले वक्तव्य. या वेळी त्यांनी कुणालाही दोष दिलेला नाही पीडित महिलेप्रती सहानुभुती, काय कारवाई करणार हेच सांगितले आहे. खर्‍या अर्थाने सुसंस्कृत व्यक्ती आहे.
https://youtu.be/Tu1D-w56cxY?t=15

मनमोहनसिंग ठराविक काळानंतर किंवा परदेश दौर्‍यानंतर पत्रकार परिषदा घेत असत, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत. निडर नेता कसा असतो याचे एक मुर्तीमंत उदाहरण होते.

मागच्या दशकभरात, भारताच्या पंतप्रधानांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या?
मणिपूरमधे काही महिला अत्याचाराच्या बळी पडल्या. मानवतेला काळिमा लावणारी अशी घटना उघडकीस आल्यावर - म्हणजे ७५ दिवसानंतर मोदी यांनी यावर तोंड उघडले. काय बोलले? जबाबदारी स्विकारली का?

भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करार हे डॉ मनमोहन सिंग यांच्या कणखरपणाचे सगळ्यात मोठे उदाहरण. आणि त्याला विरोध करणे हे भाजपच्या करंटेपणाचे. कम्युनिस्टांच्या बिन्डोक पोथीनिष्ठेचे.
२००८ च्या जागतिक आर्थिक संकटातून भारताचे तारू त्यांनी सुखरूप पुढे नेले. त्यावेळी भाजप सत्तेत असता तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही. तो स्टिम्युलस वेळीच आवरायची गरज होती, तिथे मनमोहन सिंग जरा चुकले.

माहिती अधिकार कायदा, अन्न सुरक्षा कायदा आणि शिक्षणाचा हक्क कायदा , भूमी अधिग्रहण कायदा ही युपीएची मोठी कामगिरी. य्यातल्या दोन कायद्यांना आज चाप लावला जातोय. शिक्षणाचा हक्क कायदा आर्थिक वृद्धीला मारक आहे, असं मोदींचे आर्थिक सल्लागार म्हणतात.

हे गोर्‍याचे स्टेटमेंटबद्दल एकले आहे. इम्रानखानची उचलबांगडी झाल्यावर अशी शक्यता वाटली होती. पण शहानिह शा करता येत नाही. परस्पर विरोधी वाटतील अशा बातम्या लिक केलेल्या असतात जेणेकरुन संभ्रम निर्माण होईल.>>> १००% सहमत, ते काही तरी  इकॉनॉमिक हिटमॅन सारखे वाटले, Too much Disputable, and fantasized concept. पण जागतिक महासत्तांची सरकारे आणि मेगा कॉर्पोरेशन्स नेहमी इतर राष्ट्रांप्रती वेल्फेअरच्या ऐवजी स्वतःच्या आर्थीक आणि एकाधिकारशाही हिताला अधिक प्राधान्य देतात आणि त्यासाठी काहीही करायला तयार असतात हे बहुसंख्य स्कॉलर्स आणि अँक्टिविस्ट सुद्धा मान्य करतात, त्यामुळे ओव्हर फाँटसईझ्ड  भाग वगळून अशी कारस्थाने होताच नाहीत हे म्हणणे चुकीचे ठरेल. जिओपॉलिटिकल वर्चस्वासाठी बलाढ्य राष्ट्रे कोणत्याही थराला जाऊ शकतात या बाबत मला तरी शंका नाही. त्यांच्या लेखी मनुष्याच्या जीवाची किंवा होणाऱ्या जीवितहानीची ( स्वकीय अथवा परकीय ) किमंत शून्य असते. 

मोदी पंतप्रधान झाल्यापासून कुठल्या बाजूच्या देशाशी भारताचे संबंध चांगले राहिलेत? पाकिस्तान? नेपाळ? भूतान? म्यानमार?बांगलादेश? श्रीलंका? मालदीव?
>>>
काय आहे, इथे येऊन खोटा प्रचार करणे, काहीही पुड्या सोडणे हे एक आणि वास्तव हे एक. श्रीलंकेत नवे राष्ट्रपती आले. त्यांच्या पहिलाच परदेश दौरा होतो, तो ही भारतात आणि त्यातही ते सांगतात की भारताने त्यांना केलेली मदत किती मोलाची आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती खुद्द सांगतात की त्यांच्या भूमीचा उपयोग भारताच्या हानी साठी होऊ देणार नाही. सोबतीला अनेक प्रोजेक्टवर चर्चा झाली. पण करणार काय इथल्या शामृगणा......

https://indianexpress.com/article/india/modi-sri-lanka-president-dissana...

मालदीव, नेपाळ, भूतान, बांगलादेश संबंध ही चांगले आहेत. पण ते इथल्या मंडळींना दिसणार नाहीत आणि इथल्या सो कॉल्ड संविधान रक्षक, लोकशाही रक्षक मंडळीला वर बाहुबली यांनी कॉमेंट मध्ये बेमालूमपणे "म्यानमार" शिरवल्याचे ही दिसले नाही. जसे की म्यानमार भारताचा भाग नसून वेगळा देश आहे. (काही लोकांना तेच हवे आहे म्हणा). करणार काय मनात व्यक्ती विशेष बद्दल राग जो भरलाय, या गोष्टी कश्या दिसतील.

Manipur
Myanmar

Starts with M, ends with r.

Miyapur

नेपाळ - भारताचे एक शेजारी राष्ट्र, १७५० कि मी ची सिमा आहे.
२०२० ची बातमी आहे. लिपुलेख नकाशांत दाखविल्या बद्दल वाद होता.
https://indianexpress.com/article/india/road-row-triggers-new-nepal-map-...

आज २०२४ मधे, नेपाळने १०० रु च्या नोटा चीन मधे छापायचा कंत्राट दिला. या नव्या नोटांवर कालापानी, लिपुलेख, लिंपियाधुरा हा भाग नेपाळमधे दाखविला आहे.
https://timesofindia.indiatimes.com/world/south-asia/china-company-wins-...

हा सिमावाद फार जूना आहे. ब्रिटन (East India Company) - नेपाळ यांच्यामधे सुगौली करार १८१६ मधे झाला होता. मला original करार नेटवर दिसत नाही. काली नदीच्या पश्चिमे कडच्या भागावर नेपाळ हक्क सोडतो असे करारांत म्हटले आहे. हे विभागणी उत्तर-दक्षिण रेषेत कुठवर आहे ? या बद्दल संभ्रम आहे.
https://en.wikisource.org/wiki/Treaty_of_Sugauli

उद्या चीनसोबत वाद झालाच तर या भागाला स्ट्रॅटेजिकली महत्व आहे. दुसरा तेव्हढाच महत्वाचा सिलगुरी कॉरिडोर /chicken's neck सुरक्षित ठेवण्यासाठी स्थिर आणि मैत्रीचे संबंध असणारा बांग्लादेश हवा आहे. मग तिथे सरकार कुणाचेही असो.

इंडिया टुडेच्या मंचावर राहुल कंवलशी गप्पा मारताना आदर्णीय अमित शहांनी राहुल (गांधी) च्या खाजगी आयुष्यावर टिप्पणी केली.
मुझे मालूम नही है राहुल गांधी हर बार विदेश से क्यों प्रेरणा लेते हैं. उनका प्रेरणास्त्रोतही बाहर है.उसमें मुझे तो हैरानी नहीं है...मुझे तो मालूम है क्योंकि उनका प्रेरणास्रोत बाहर है।

राहुल कंवलने यावर खोदून खोदून विचारल्यावर - 'छोड़िए मैं निजी बातें करना नहीं चाहता हूं...''

छोड़िए, पब्लिक सब समझ गई है। आप (राहुल कंवल) नहीं समझे हो तो थोड़ा पब्लिक में पूछ लेना, यहां किसी को भी खड़ा करो...सब आपको बता देंगे...आप खड़ा करो...आपको जवाब मिल जाएगा...।

मग प्रेक्षकातून एकाला विचारलं - त्याने विदेश में कोई रहता है... मिसेज।

अमित शहा हसत हसत हर महीने पर विदेश जाते हैं...इसलिए कह रहे हैं। अभी थोड़ा और पीछे हो जाओ...कैसेट रिवाइंड करो तो और याद आएगा।'

Lol
वसुधैव कुटुंबकम् आमचा नारा असल्याने दुसरे कोणी तसे केले तर आम्हाला खुपणार नाही का, आम्ही त्यावर टोमणे पण मारायचे नाहीत का? आणि गृहमंत्रीही शेवटी माणुस असतो, गॉसिप करणारच, पण पारदर्शीपणे करतोय ते दिसत नाही का?

मालदीव, नेपाळ, भूतान, बांगलादेश संबंध ही चांगले आहेत. पण ते इथल्या मंडळींना दिसणार नाहीत >>>>
विश्वगुरू ब्रँडचे कॅसिनो चष्मे Rofl
casino_chashma.JPG

उत्तर प्रदेश - मुरादाबाद - तबलानवाझ अहमद जान थिरकवाँ यांचा पुतळा एका चौकातून हटवण्यासाठी भाजप आणि विहिंपचे आंदोलन

झाकिर हुसैन अमेरिकेत गेला ते बरं झालं. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातून मुस्लिम नावं पुसून टाकायला हवीत आणि त्यांची निर्मिती / वारसा नष्ट केले जावे.

त्यांनीमग लेकी बोले. सुने लागे या न्यायाने राहुल्जीन्च्या प्रदेश यात्रांवर कुत्सित टीका केली.
कहीपे निगाहे कहीपे निशाणा!

मणिपूर मधली कायदा सुव्यावस्था सारख्या महत्वाच्या प्रश्ना वर लक्ष द्यायचे सोडून राहुल गांधी यांच्या परदेश वार्‍या मोजत बसतात. मानवनिर्मीत अशांतता सुरु झाल्यावर, राहुल गांधी तर मणिपूरला अनेकवेळा भेटी दिल्या आहेत. पंतप्रधानांनी तर ७५ दिवसाचे मौन व्रत ठेवले होते.

आता आंबेडकर नावावरुन नवा वाद सुरु केला आहे. विरोधी पक्षांना कायदेशीर सापळ्यांत अडकवत आहेत. आंबेडकर, घटना आणि सांसदिय लोकशाही यांच्या बद्दल भाजपाला थोडे जरी प्रेम असते तर नव्यासंसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी संगोल आणि अर्धनग्न लोकांची धर्मसभा भरवली नसती.

आदर्णीय अमितजी शहांजींना राहुल कंवलने मणिपूरसकट अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले. उत्तरे ऐकून हेच खरे लोहपुरुष याची खात्री पटली.
झारखंडमध्ये तिथला सत्ताधारी पक्ष बांग्ला देशी आणि रोहिंग्यांना आणून वसवतो, ती त्यांची व्होट बँक आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. प. बंगालचेही नाव घेतले. पण झारखंड सीमावर्ती राज्य नाही, म्हणून मी त्याचा मुद्दाम उल्लेख केला. आणि हे बोलणारा देशाचा गृहमंत्री आहे, हे विशेष.

अमित शहा यांचे संसदेतले भाषण, तसेच पत्रकार परिषदेतले स्टेटमेंट बघितले.
"आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर.... एव्हढ्या वेळा देवाचे नाव घेतल्यास .. स्वर्ग.... " आंबेडकरांबद्दल राग किती खोलवर दडला आहे हे या विखारी वक्तव्यातून दिसून येते.

आता पत्रकार परिषद घेत, ' मेरा वक्तव्य तोड मरोडकर.... ', अरे कुठे तोडफोड केली आहे? अगदी जस्सेच्या तस्से बघितले तरी ते वक्तव्य चूकीचे आणि निषेधार्ह आहे. हे रेकॉर्ड झाले आहे. आधी नंतरचा संदर्भ ( गरळच आहे) बघितले तरी महामानवा प्रती मनातला द्वेष लपत नाही.

आज कोट्यावधी लोक या महामानवाला , त्यांच्या कार्याला मानत आहेत. त्यांच्यासाठी ते देवापेक्षा कुठेही कमी नाही. मला त्यांच्या कार्याबद्दल आदर आहे, त्यांनी सामान्य भारतीयांना जे दिले आहे त्याबद्दल प्रत्येक नागरिकाने त्यांचे ऋणी असायला हवे.

अमित शहा यांच्या वक्तव्याचा आणि सडक्या मानसिकतेचा निषेध.

भाजप कार्यालयातून आदेश सुटला, राहुल गांधीविरोधात आंदोलन करा. कार्यकर्ते निघाले. आंदोलन नक्की कशासाठी? बघा आणि ऐका.

एरवी डॉ आंबेडकरांचं कंट्रिब्युशन काय , तर आरक्षण देऊन गुणवत्ता मारली, त्यांना मानणारे भीमटे असं लिहिणार्‍या नेटभगव्यांना आज त्याच डॉ आंबेडकरांबद्दल प्रेमादर उचंबळून आले.

हॉस्पिटल मधली गंमत जंमत वेगळीच.

Pages