एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोखठोक
People claim their religion is in danger, but it is their party that is in danger, and they are praying to save it, Bollywood actor Riteish Deshmukh has said while campaigning for his brother and Maharashtra Congress leaden.

https://x.com/ANI/status/1855921758710497555
The national seminar on 'Illegal Immigrants to Mumbai: Analysis Socio-Economic and Political Consequences' held at Jawaharlal Nehru University.

VC of Jawaharlal Nehru University, Prof Santishree Dhulipudi Pandit says, "I think any academic study and a good academic study on sound research is welcome because it's the duty of intellectuals who have to build narratives and alert society to these types of dangers...It (illegal immigration) is happening in Jharkhand, West Bengal, Assam, Manipur and many of our border states where the tribal population is there. They are feeling threatened...Any illegality is bad. The rule of law is important, and because they come illegally, they are involved in shady activities, which is very unfortunate. It creates more problems for a country like India."

व्हिडियो क्लिप आहे.

पितृसत्ताक समाजव्यवस्था ही संकल्पना डाव्यांनी शोधली- समाज व मानववंशशास्त्रज्ञ निर्मला सीतारामन

भाजपा शीर्षस्थ नेत्यांचा विधानसभा निवडणुकीतील प्रचार हास्यास्पद पातळीला पोचला आहे. रंग बदलणारा सरडा वगैरे उपमा सुद्धा फिक्या पडतील अशा तऱ्हेची वक्तव्य श्री मोदी आणि श्री शहा महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये करत आहेत.

उदाहरणार्थ श्री मोदी असं म्हणाले की काँग्रेसची सत्ता असलेली राज्य ही त्यांच्यासाठी एटीएम सारखं काम करते. त्यांनी असा आरोप केलाय की काँग्रेसने कर्नाटकमध्ये कोणत्यातरी घोटाळ्यात 700 कोटी रुपये भ्रष्टाचारातून कमावले.

एक सामान्य नागरिक म्हणून असा प्रश्न विचारास वाटतो की मोदी साहेब तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री आहात. आज सर्वशक्तिमान केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या ताब्यात आहेत. तुम्ही एक इशारा केला तर त्या कोणत्याही दिशेला धावत सुटतात, असा आजवरचा इतिहास आहे.

तुमच्याकडे काँग्रेसने केलेल्या सातशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची पक्की माहिती आहे. त्याशिवाय तुम्ही जाहीर सभेत असा आरोप करणारच नाही. हे सगळं असताना तुम्ही या भ्रष्टाचाराविरुद्ध कोणती कारवाई केली हे तुम्ही तुमच्या पुढच्या सभेत सांगाल का?

सर्वशक्तिमान गृहमंत्री श्री अमित शहा काय म्हणतात ते बघू. झारखंड मधल्या सभेत त्यांनी असं विधान केलं की झारखंडमध्ये आदिवासींची जमीन वाचवण्यासाठी भाजपा स्वतंत्र कायदा करेल. स्थलांतरित व्यक्तीने झारखंडी महिलेशी लग्न केल्यास त्या व्यक्तीला त्या महिलेची जमीन मिळणार नाही अशी तरतूद त्या कायद्यात असेल.

खाणमालक असलेल्या गुजराती उद्योगपतीला मात्र याच आदिवासींनी स्वखुशीने जमिनी द्याव्या असा भाजपाचा आग्रह आहे. यादरम्यान ते असे म्हणाले की बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात, अर्थातच मुस्लिम, स्थलांतरित झारखंडमध्ये येतात आणि तिथल्या आदिवासी महिलांची लग्न करतात आणि तिथल्या आदिवासींची जमीन हडपतात. भाजपाला अचानक आदिवासींचा मोठा पुळका आलेला असल्यामुळे श्री शहा यांना निवडणूक झाल्या झाल्या आणि सत्तेत आल्यास लगेच हा कायदा करायचा आहे.

याबाबतीत भारतीय जनता पक्षाची काश्मीर मधली भूमिका मात्र संपूर्णपणे उलट आहे. तेथे भाजपाला असं वाटतं की तिथल्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकत घेता येत नव्हत्या त्यामुळे त्या राज्याचा विकास झाला नाही आणि काश्मीर देशापासून तुटलेले, विलग झालेले राहिले. ते देशाशी जोडण्यासाठी कलम 370 हटवलं. आता देशभरातल्या लोकांनी तिथे जाऊन तिथल्या जमिनी खरेदी कराव्या आणि शक्य झाल्यास तिथल्या सुंदर सुंदर काश्मिरी मुलींबरोबर विवाह देखील करावे आणि काश्मीर देशाशी जोडावे, त्याचा विकास करावा असा भाजपाच्या प्रचार आणि त्यांच्या भक्तांचा विचार आजवर राहिलेला आहे.

असं असताना काश्मीरमध्ये विस्थापितांविषयी एक भूमिका आणि झारखंडमध्ये विस्थापितांविषयी दुसरी भूमिका आणि खाण मालकांविषयी तिसरीच भूमिका बाळगताना भाजपाच्या या नेत्यांना कणभर देखील शरम वाटत नाही. किंवा आपण याला कुठेतरी उत्तरदायी आहोत, आपल्याला कोणी विचारल्यास काय उत्तर देणार? असा प्रश्न देखील त्यांच्या मनाला पडत नाही. ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे. हीच हुकूमशाही आहे आणि हेच दमनीकरण आहे. ज्याच्या भीतीमुळे पत्रकार, निवडणूक आयोग किंवा नागरिक असे प्रश्नच विचारत नाहीत.

श्री शहा महाराष्ट्रातल्या गुंतवणुकी गुजरातमध्ये जात आहे या आरोपाबाबत असे म्हणाले की जर महाराष्ट्रातल्या गुंतवणुकी गुजरात मध्ये गेले असत्या तर महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत कायम पहिल्या क्रमांकावर कसं राहिलं असतं? याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये असलेलं उद्योगस्नेही वातावरण पाहतात सर्वच परकीय गुंतवणूकदारांना आपला उद्योग महाराष्ट्रात काढावा असं वाटतं. त्यानुसार ते प्रस्ताव पाठवून महाराष्ट्रात गुंतवणूक करायची तयारी देखील दाखवतात. पण मध्येच मोदी आणि शहा यांना आपल्या मातृभूमीची 'ने उद्योग ने परत मातृभूमीला' अशी कळवळून आठवण येते आणि महाराष्ट्रात येऊ घातलेली परकीय गुंतवणूक साम दाम दंड भेद वापरून तो उद्योग गुजरात मध्ये कसा पळवून नेता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. केंद्रीय सत्ता त्यांच्याकडे असल्यामुळे बहुतेक वेळेला त्यांना ती गुंतवणूक गुजरातमध्ये वळवणं शक्य पण होतं. त्यामुळे महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक गुजरातमध्ये पळवून नेले जात आहे हे ढळढळीत सत्य सर्वांनाच लक्षात आलेले आहे.

आजवर असे अनेक उद्योग, रोजगार संधी आणि अब्जावधींची गुंतवणूक गुजरात मध्ये गेली आहे. श्री शहानी त्याबाबतीत कितीही सफाई देण्याचा प्रयत्न केला तरी मराठी माणूस आता या प्रचाराला भुलणार नाही हे नक्की.

विदर्भात काँग्रेस, मराठवाड्यात जरांगे, मुंबईत उद्धव ठाकरे, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार भाजपचा पराभव करतील अशी परिस्थिती असून मतदरांचीही तशीच मानसिकता आहे. कोकण, ठाण्यात एकनाथ शिंदे चालतील. उर्वरित शहरी भागात भाजपाला थोडाफार दिलासा मिळेल. सबका साथ सबका विकास पासून बटोगे तो कटोगे पर्यंत झालेला प्रवास भाजपसाठी नैसर्गिकच आहे. सततच्या खोट्या आणि विषारी प्रचाराचा लोकांना आता खोरखर वीट आलेला आहे हे नक्की.
Sandip Tamhankar

https://www.facebook.com/share/p/1AoR7K8D4G/

**

हे सगळं असताना तुम्ही या भ्रष्टाचाराविरुद्ध कोणती कारवाई केली हे तुम्ही तुमच्या पुढच्या सभेत सांगाल का?

मोदी तुम्ही माबोवर लवकर या आणि या प्रश्नाचे उत्तर द्या.

https://x.com/DrMohanYadav51/status/1857109100007415878
Dr Mohan Yadav
@DrMohanYadav51
शिवपुरी से भोपाल जा रहे एक परिवार के 7 सदस्यों की कार ब्यावारा के पास दुर्घटनाग्रस्त होकर खंती में गिर गई थी। वहां से गुजर रहे एक नागरिक वारिस खान ने साहस दिखाते हुए कार का कांच तोड़कर सभी को बाहर सुरक्षित निकालकर जान बचाई।

वारिस खान जी की संवेदनशीलता एवं साहस प्रशंसनीय व प्रेरणादायक है। इस साहसिक कदम के लिए मध्यप्रदेश सरकार द्वारा एक लाख रुपए की प्रोत्साहन राशि प्रदान करने के निर्देश दिए हैं।

हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.

कारमधले सगळे प्रवासी हिंदू होते . वकील हसन सारखं या वारिस खानचं घर कधी तोडणार?
$ बटोगे तो कटोगे

कार का कांच तोड़कर सभी को बाहर सुरक्षित निकालकर
कारची काच तोडल्याबद्दल आधी एफ आय आर होईल आणी मग घर तोडले जाईल, आप क्रोनोलोजी समझिये !

झाशी ( उत्तर प्रदेश ) येथे महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या neonatal ICU विभागांत लागलेल्या भीषण आगीत दहा नवजांत बाळांचा मृत्यू झाला Sad . वाईट वाटले.
आगीचे नक्की कारण अजून कळालेले नाही.

स्वत : च्या जुळ्या मुलींना वाचविण्यास अपयशी ठरलेल्या याकूब मन्सुरी याने अशा वेळी इतर बाळांचे प्राण वाचविण्यास मदत केली. मानवता अजूनही शिल्लक आहे.

https://www.esakal.com/desh/jhansi-hospital-fire-tragedy-father-loses-tw...

Industrialist Jaysukh Patel, the main accused in the 2022 Gujarat suspension bridge collapse that claimed 135 lives, received criticism after he was felicitated at an event organised by the Patidar community in Morbi district.

नवीन Submitted by भरत. on 18 November, 2024 - 12:00>>>>

यांना‌ दोष देऊन काही उपयोग नाही, तमाम भक्तांनी भारताची या मिम प्रमाणेच अवस्था करुन ठेवलीयं. IYKYK!!

1000357189.jpg

उत्तर प्रदेश राज्य पाल आनंदी बेन पटेल ह्यांच्या म्हणण्यानुसार ऋषी भारद्वाजनी विमानांचा शोध लावला. निवडनुकीच्या धामधुमित हे मनोरंजन. ह्याचा विसर न व्हावा.
https://www.rediff.com/news/report/aircraft-from-vedic-era-not-wright-br...

भारद्वाज जुनं झालं. मुंबईतल्या सायन्स काँग्रेसमध्ये त्यावर पेपर वाचला गेला.
हे घ्या - आनंदीबेनचंच आहे
https://x.com/ranvijaylive/status/1858564055574667452
कुंभकरण 6 महीने सोता था, ये बात सच नहीं है.

कुंभकरण technocrat था.

वो टेक्नोलॉजी जानता था. ये टेक्नोलॉजी दूसरे देश न जाए इसलिए गुप्त तरीके से यंत्र बनाता रहता.

रावण का आदेश था- आपको 6 महीने तक बाहर नहीं निकलना है. ये काम यंत्रशाला में बैठकर करना है.

और अफवाह फैलाई कि कुंभकरण 6 महीने सोता है

विशेष म्हणजे हे त्यांनी एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सांगितलं.

और वो यंत्रमानव बनाता था.

पण हे एका भाषा विश्वविद्यालयात सांगुन काय उपयोग, विज्ञान विश्वविद्यालयात सांगायला हवे.

असं काय? हे सगळं आमच्या (फक्त) पुस्तकांत आहे. म्हणजे भाषेचाच संबंध आला. यंत्रमा नवाचे अवशेष मिळाले असते तर आय आय टी मध्ये सांगता आलं असतं.

अरे तुम्हाला काय वाटतय? घाबरतात कि काय? हल्ली Indian Science Congress मध्ये अश्या विषयांवर पेपर वाचतात.
माझी एकच अपेक्षा आहे कि वेद, उपनिषदे, पुराने वागैरेचा अब्यास करून कुणी भक्त पाश्चीमात्याच्या अगुदर असा शोध लावावा कि बस.
सगळे जग पूर्ण हात तोंडात घालेल.

माझी एकच अपेक्षा आहे कि वेद, उपनिषदे, पुराने वागैरेचा अब्यास करून कुणी भक्त पाश्चीमात्याच्या अगुदर असा शोध लावावा कि बस.>>> माझ्या एका व्हिजेटीआय बीटेक, एमबीए आणि तेव्हा सिमेन्स मधे मॅनेजर असणाऱ्या कट्टर धर्माभिमानी आणि राष्ट्रवादी मामेभावासोबत २०२० मधे पैज लावलेली अशी की पुढच्या १० वर्षांत अस काही घडलं तर मी कुलाब्याच्या ताज पॅलेस मधे फॅमिली ला ग्रॅंड पर्टी देणार आणि सर्वांसमक्ष सनातन धर्म वगैरे गोष्टींचा वरचढपणा मान्य करणार, नाही घडलं तर तो पार्टी देणार, आणि सर्वांसमक्ष आपल्या मुर्खपणाची कबूली देणार. ४ वर्षे उलटून गेलीत तो दोन वर्षांपूर्वी कॅनडाला शिफ्ट झालाय, पण मी दर ६ महीन्यांनी त्याला फॅमिली ग्रूप मधे या पैजैची आठवण करुन देतो. मजा येते मला फार.. Rofl

यावर्षी इंडियन सायन्स काँग्रेस झालीच नाही . काँग्रेसचा अर्थ मीटिंग.
https://theprint.in/ground-reports/we-are-scientists-not-beggars-indian-...
अमेरिकेत ओक्लाहोमा राज्यात पब्लिक स्कूलच्या प्रत्येक वर्गात सरकारी खर्चाने बायबल ठेवलं जाण्यावरून गदारोळ झाला आहे. गदारोळ करण्यासारखं काय ते मला कळत नाही. माझ्या लहानपणी पाचवीपासून आम्ही वर्गात दर वर्षी गीतेचा एक अध्याय म्हणत असू. शाळा सरकारी अनुदानावर चालणारी. सरकारने गीता शिकवा किंवा म्हणा, असं सांगितलं नव्हतं. गीता पठण / पाठांतराच्या स्पर्धाही होत. माझ्याकडे सर्टिफिकेट होतं. स्पर्धा राज्य स्तरावरची एक संस्था घ्यायची. आता काही राज्यांच्या अभ्यासक्रमातच गीतेचा अंतर्भाव केला आहे.

विज्ञानाचा अभ्यास पुढे सगळ्यांनाच उपयोगी पडतो असं नाही. पण गीता शिकली तर नक्की उपयोग होतो.

Lol नवीन Submitted by केशवकूल on 19 November, 2024 - 20:31>>> या पेक्षा अधिक खात्रीशीर कोणता पुरावा मिळेल??

विज्ञानाचा अभ्यास पुढे सगळ्यांनाच उपयोगी पडतो असं नाही.>>>>
शिक्षणाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्या सारखा वाटला. शाळेत विज्ञान शिकवतात ते पुढील आयुष्यात टेस्ट्यूब्ज आणि फ्लास्क घेउन प्रयोग करायचे असतात म्हणून नव्हे तर जीवनात समोर येणाऱ्या आणि घडणाऱ्या घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पहाता यावे म्हणून ( मी स्वतः १००% वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवतो हा दावा इथे नाही पण किमान तसा शक्य तेवढा प्रयत्न नक्कीच करतो ) , आयुष्यात आपण जे ही शिकतो त्याचा उद्देश त्यायोगे आपल्यात निरक्षीर विवेक येउन गोष्टी/ घटना आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या कुवतीने ताडून/पडताळून पहाव्यात यासाठी , जेव्हा ते आपण सातत्याने करतो तेव्हा आणि फक्त तेव्हाच आपण कोठल्याही शिक्षणाचा किमान उपयोग झाला असं म्हणू शकतो. मग ती गीता असो की विज्ञान.

ऊप्स् !!! Uhoh

गीता शिकविण्याचा उद्देश क्षात्रतेज आणायचा असावा. पुढे विविध उपक्रमांत सामावून घेता येते.

युवकांना नोकरी मिळाली नाही तर उत्तमच. पूर्ण वेळ राष्ट्र निर्माण कामासाठी ' वापर ' करता येतो. क्वचित प्रसंगी काहींची नावे पेपरांत झळकतात. तुरुंगवासही होतो.... पण बाहेर आल्यावर हार-तुरे, पेढे वाटपाने स्वागतही होते.

आमच्या पूर्वजांनी विज्ञानाचा अभ्यास केला आहे. Wi-Fi , टेस्ट ट्यूब, प्लास्टिक सर्जरी, क्षेपणास्त्रे, विमाने असे अनेक महत्वाचे शोध आमच्या पूर्वजांनी लावले आहेत. आम्ही शेणांतही विज्ञानाचा शोध घेत असतो.

गीता
एकमेकात सलोख करण्या ऐवजी उठ युद्ध कर ची शिकवण. हे मा वै म.

विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यात आदर्णीय मोदी अगदी चुनचुनके राज्यपाल पाठवतात. महाराष्ट्रात कोशियारी, तमिळनाडू मध्ये टी एस रवी, प बंगाल मध्ये आधी जगदीप धनकर आणि आता सी वी आनंद बोस. या महोद यांनी राजभवनात स्वतःच्याच पुतळ्याचे अनावरण केले. तो पुतळा त्यांना भेट मिळाला होता.

माननीय नेहरूंनी स्वतःला भारतरत्न दिल्याची आठवण झाली. नव्या पिढीचे नेते थोरामोठ्यांच्या परंपरा अशी कशी खंडित होऊन देणार.

राजेंद्रबाबू हे नेहरूंचे ड्यु आय होते हे माहीतच नव्हतं वाली सर.

हे माहीत असूनही फेकाफेक करीत रहावे.

मला दुसरे एक आठवले. स्वतःच्या नावाची अक्षरे विणलेला अंगरखा घालणारे.

Pages