पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृता वहिनींंच्या नावाच्या आणि नात्याचा घोळ घातला!
कदाचित भुभू बाळ अमृताला नात्याने नाही तर नावाने हाक मारत असेल. कोण जाणे!

घोळ नाही. ते भौ मग या वैनी नको का?

बाकी अमृता वहिनी म्हटलं की आजकाल धडकी भरते. पण वैनी काय ऐकेनात. हळदी कुंकू काय, मॅरेथॉनचे उदघाटन काय, आता माबोवर पण. सर्वव्यापी परमेश्वरानंतर त्याच.

इथे बाकी नाती (बाई, दादा वगैरे) बाहेर आणि नावे कंसात आहेत, त्यामुळे अमृता हे नाते आणि वहिनी हे नाव ठरते.

ता क - सॉरी, वरती अमितने नाव आणि नात्याचा घोळ आधीच लिहून झालाय. मी नीट वाचले नाही.

उत्सवमूर्ती नऊ वर्षांपूर्वी खपले. तेव्हा अमृता वहिनी घरात आल्यासुद्धा नसतील. बिचाऱ्या 'गजब बेइज्जती है यार' म्हणत असतील. वर त्यांनाच ट्रोल करता Proud

आमच्या इथे दुकानात कुत्रं घेऊन यायचं नवीन फॅड निघालय. होम डेपो वगैरे ठिकाणी एक वेळ समजू शकतो. पण ट्रेडर जो सारख्या ग्रोसरी स्टोअर मध्ये , जिथे आईलस इतके टाईट असतात की दोन लोक सुद्धा कसेबसे पास होतात आणि जिथे भाज्या, फळं knee लेव्हल ला ठेवली असतात, तिथे हे महामूर्ख कुत्रपति दांडगी कुत्री ओढत फिरत असतात. एखादा अतिशहाणा तर ट्रॉलीत कुत्रं घालून फिरत असतो. म्हणजे जिथे आपण खाण्याचे पदार्थ ठेवतो त्याच सरफेस वर यांचे ढुंगणाला विष्ठेचे अवशेष चिकटलेले श्वान महोदय आरूढ झालेले असतात. लोकांनी कंप्लेंट केल्यावर आता काही स्टोअर्स नी दारावर कुत्र्यांना मनाई करणारे बोर्ड लावले आहेत, तरी काही मुजोर कुत्रपति आणि पत्न्या त्याच्याकडे कानाडोळा करताना दिसतातच.

Pages