क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॅमसन नि त्याचा फास्ट बॉलर्स विरुद्ध वीकनेस ह्याबद्दल वाचून किती भारतीय बॅटसमन एकदम सराईतपणे १५०+ ची बॉलिंग खेळतात...
>>>>>>>>

वर ज्या दोघांची चर्चा होत आहे ते रोहीत शर्मा आणि ऋषभ पंत..

पंत बाबत तर मी नेहमी म्हणत आलो आहे की त्याचा डिफेन्स नेहमी अंडरस्टिमेट होतो किंवा किती भारी आहे हे लोकांना कळत नाही. आणि १५०+ चेंडू तो नुसते अंधाधुंद न मारता डिफेन्सिव्ह पद्धतीने सुद्धा खेळू शकतो, बॉल सोडू शकतो, हा त्याचा क्लास आहे.

..

किती वेळा अपोजिशनकडे १५० + ने बॉलिंङ करणारे दोन चांगले बॉलर्स असणार आहेत
>>>>
कसोटीत नक्कीच असू शकतात. जर सॅमसनने यावर उपाय नाही शोधला तर कसोटी कधी खेळू शकणार नाही. त्याचीच इच्छा नसेल हे हायेस्ट लेव्हलचे क्रिकेट खेळायची तर ठिक आहे.

माहित नाही तर रोहित पी आर स्टंट्स करतोय ह्यावर एव्हढे उखडला का आहेस ?
>>>>

छे, उखडलेय कोण.. उलट मीच तर ब्रँड व्हॅल्यू मुळे संघात जागा कायम राहते म्हणत आहे. आणि हे म्हणताना पीआरची गरज आणि आस्तित्व तिथे मीच मान्य करत आहे.
गावस्करबाबत काय नेमकी तक्रार केली ती मी वाचली नाही तर त्यावर काय बोलू? तुम्ही मला दाखवा काय आहे ते मग बोलूया. फक्त खात्रीशीर सोर्स दाखवा.

“ कोहली लिमिटेड ओवर मध्ये तुफान खेळतो आहे आणि म्हणून त्याची ब्रँड व्हॅल्यू शाबूत आहे म्हणून त्याला कसोटी संघात जागा मिळत आहे” - हं?????????????? अरे, किती अतर्क्य बोलायचं ह्याची सगळी लिमिट्स सुद्धा लाजतील ह्या लेव्हलला चाललंय हे सगळं.

ओके
पाच वर्षे ३० सरासरी
एकही उल्लेखनीय कसोटी खेळी नाही
तंत्रातील बेसिक चुका कायम
Spin खेळताना गडबडने.. पेस खेळताना ऑफ स्टंप बाहेर शिकार होणे..
पण मी अतर्क्य बोलत आहे.
चालू द्या तुमचे, थांबवतो विषय Happy

चर्चा चालली आहे तर कुतूहल म्हणून विराट कोहलीचा केल्या ५ वर्षातला " टेस्ट " मॅच परफॉर्मन्स पहिला.
५ वर्षे, ३९ मॅचेस, ६९ इंनिंग्स (एवढं तर बऱ्यापैकी खेळाडूंचं पूर्ण करिअर असतं ) : ऍव्हरेज ३०.७२; शतके ३, अर्धशतके ९
प्लेअर ऑफ द मॅच : फक्त १ (२०२३ मध्ये अहमदाबादला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अनिर्णित रन फेस्ट मध्ये १८६ - ह्या सामन्यात आणखी तिघांनी (अल्मोस्ट चौघांनी) शतके केली)
इतर दोन शतकांपैकी परवा ऑस्ट्रेलिया मध्ये जेव्हा तो खेळायला आला (२७५/२) तेव्हा ऑलरेडी ऑस्ट्रेलिया साठी चौथ्या डावात ३२० चे टार्गेट होते. त्याच्या १०० धावांनी टार्गेट आणखी फुगले, पण नसत्या केल्या तरी निकालात फरक नसता पडला.
२०२१ मध्ये वेस्ट इंडिज मध्ये अनिर्णित सामन्यात १२१ धावा (ही बऱ्यापैकी इंनिंग होती, पण मॅच सेविंग वगैरे नव्हती)
९ अर्धशतकापैकीही कुठली खेळी स्पेशल म्हणावी अशी (जशा सेहवागच्या चेन्नईतील ८३, किंवा गिलच्या गॅबाला केलेल्या ९१) वाटली नाही.
तरीही त्याला ऑस्ट्रेलियाला घेऊन जायलाच पाहिजे होते. त्याने एका दौऱ्यात तिथे ४ कसोटी शतके (जे कधी सचिननेही केले नाही ) करण्याचा भीमपराक्रम केला होता. तो टेस्टमध्ये काय करू शकतो हे आधी पाहिल्यामुळे ऑस्ट्रेलिया टीमला त्याच्या पूर्वपुण्याईची दहशत होती. पण तिथेही १० डावांमध्ये १८७ धावा (सरासरी १८.७) करून तो नापास झाला.
पाच वर्षांत जबरदस्त अशी एकही खेळी नाही. ते एक राहिलं तरी बऱ्यापैकी धावा (४० ची सरासरी) सातत्याने काढल्या असत्या तरी एक उपयुक्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहता आलं असतं. पण ३० चं ऍव्हरेज over such a long period does not cut it. त्यात वय ३६ च्या पुढे.
कोहली खरंच महान खेळाडू आहे. तो खूप प्रयत्न आणि मेहनत करतो आहे हे दिसतं आहे. त्याला यश मिळावं अशीच सगळ्यांची इच्छा आहे. पण त्याला एव्हाना खूप long rope दिला गेलेला आहे. सिद्धू त्याच्याच वयाचा होता. १९९७मध्ये ३ शतके केली होती. ऑस्ट्रेलियाच्या ९८च्या भारत दौऱ्यात प्रत्येक डावात ५०+ केले होते. पण लगेच त्यानंतरच्या ९८च्या झिम्बाबवे आणि न्यूझीलंड दौऱ्यांमध्ये केवळ ३ सामन्यांत फेल झाला आणि संघाबाहेर गेला. त्यामानाने कोहलीला बरीच संधी दिली गेली आहे.

सोशल मीडियावर सुद्धा... अरे हो तिथे पी आर असतात
>>
शर्मा कडून काप्तानी गेल्यावर तू इथे जो थयथयाट करत होतास तो पी आर होता तर...

फक्त खात्रीशीर सोर्स दाखवा
>>
तू नेहमी ज्या सोर्सस कडून खात्रीशीर माहिती आणातोस (यारो का यार रोहित, मास्टर स्ट्रोक, फिक्सिंग ई. ई.) तिथेच शोध की

पाच वर्षांत जबरदस्त अशी एकही खेळी नाही. ते एक राहिलं तरी बऱ्यापैकी धावा (४० ची सरासरी) सातत्याने काढल्या असत्या तरी एक उपयुक्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहता आलं असतं. पण ३० चं ऍव्हरेज over such a long period does not cut it.
>>
शर्मा टेस्ट मधे ओपन करायच्या आधी त्याचे टेस्ट मधले आकडे काय म्हणायचे? त्याला तेंव्हा लाँग रोप दिला नाही का? (हे आकडे आणायला जाशील तेंव्हा गावस्कर - शर्मा प्रकरणाचा ही शोध घे)

अजबराव छान संकलन केले.
या पाच वर्षात कोहलीने व्हाईट बॉल क्रिकेट जिथे तंत्र फार टेस्ट होत नाही तिथे खोऱ्याने धावा केल्या आहेत. वर्ल्डकप गाजवले आहेत.

@ अँकी
शर्मा ओपनर यायच्या आधी त्याचा कसोटी रेकॉर्ड वाईट होता हे मान्य आहेच. पण म्हणून तर तो संघात नव्हता. बसवायचेच ना त्याला. कोहलीला एकदाही ड्रॉप केले नाहीये.

तू नेहमी ज्या सोर्सस कडून खात्रीशीर माहिती आणातोस
>>>>

मी क्रिकबझचे आकडे आणतो जे fact असतात.
आणि आयपीएल काही सामने स्क्रिप्ट असतात असे मला स्वताला वाटते. अझर जडेजा यांच्या बाबत सुद्धा ते फिक्सर वाटायचे आणि पुढे तेच खरे निघाले.
तुम्हाला शर्माने गावस्करची तक्रार केली असे "वाटत असेल" तर माझी काही हरकत नाही. मी बरे म्हणून पुढे जातो.

@ अजबराव
मी सुद्धा हल्लीच दुसरीकडे चर्चा करताना खालील आकडे काढले होते. (मला जरा मेहनत घेऊन आकडे काढायला मजा येते)
##############

कोहलीचा गेल्या ५ वर्षात ३९ कसोटीत ३० एवरेज आहे.
सचिनचा त्याच्या शेवटच्या ३९ कसोटीत ५०+ एवरेज होता.

तो देव होता. त्याला वेगळे ठेऊया आणि Fab four मधील इतर जागा अडवलेल्या खेळाडूंचा शेवटच्या दोन वर्षातील रेकॉर्ड बघूया. गंमत म्हणजे तिघेही त्यांच्या शेवटच्या २ वर्षात नेमके २५ कसोटी सामने खेळले आहेत.

द्रविड - सरासरी - ४५.०७
लक्ष्मण - सरासरी ४७.०५
दादा - सरासरी - ४६.३

दादाचे कमबॅक म्हणून भारी समजले जाते. संघाबाहेर जाऊन परत आला आणि शेवटच्या दोन वर्षात कारकिर्दीपेक्षा जास्त एवरेज आणि सन्मानाने निवृत्त झाला.

असो, या लोकांवर जागा अडवल्याचे आरोप आणि आता अळीमिळी गुप चिळी का रे जळकुट्या..

गेल्या पाच वर्षात भारताच्या सध्याच्या संघातील इतर खेळाडूंची सरासरी उतरत्या क्रमाने बघूया

यशस्वी १९ सामने ५२.९ सरासरी
पंत ३२ सामने ४२.४ सरासरी
रोहीत ३५ सामने ३६.० सरासरी
गिल ३२ सामने ३५.१ सरासरी
जडेजा ३२ सामने ३३.९ सरासरी
राहुल २२ सामने ३२.१ सरासरी

सर्वांची कोहलीपेक्षा जास्त आहे.

गेल्या पाच वर्षात संघाबाहेर गेलेल्या खेळाडूंची या काळातील सरासरी बघूया
अय्यर १४ सामने ३६.९ सरासरी
पुजारा २८ सामने २९.७ सरासरी
विहारी ९ सामने २६.७ सरासरी
रहाणे २२ सामने २५.४ सरासरी

जेंव्हा केवळ आकडेवारीवर आधारित खेळाडूंची तुलना केली जाते, तेंव्हा मला एक शंका सतावत राहते - जेंव्हा सर्व प्रकारची, सर्व तऱ्हेची इतकी तपशीलवार आकडेवारी उपलब्ध नव्हती, तेंव्हाची खेळाडूंची निवड / तुलना कशी केली जात होती व ती अयोग्य होती का ?

आकडे फक्त निरीक्षणाला प्रमाण म्हणून असतात..
गेले पाच वर्षात कोहली ज्या प्रकारे कसोटी खेळतो आहे ते समजायला कुठल्या आकडेवारीची गरज नाही खरे तर..

आज पण बघा तो संजू सलग चौथ्यांदा तसाच बाद झाला..
दुसऱ्या सामन्यात बाद झाला तेव्हाच माझी पोस्ट होती की याला एक्स्ट्रा पेस त्रास देत आहे का?
त्याने अजून दोन वेळा नापास होऊन ते सिद्ध केले.
आकडेवारीत हे कधीच येणार नाही.

आकडे महत्त्वाचे तेव्हाच जेव्हा त्याचे विश्लेषण करायची समज असेल..

अजबराव, कोहलीच्या फॉर्मवर, त्याचा परफॉर्मन्स होत नसताना त्याला त्याच्या अनुभवामुळे, सिनिऑरिटीमुळे, खेळापेक्षा खेळाडू मोठा झाल्यामुळे टीममधे स्थान मिळतं का, ते तसं मिळावं का - हे सगळे चर्चेचे मुद्दे आहेत. पण उगाच ‘ब्रँड व्हॅल्यू, पॉप्युलॅरिटी’ वगैरे थियरीज मांडायच्या आणि वादासाठी वाद म्हणून त्या डिफेंड करत बसायच्या हा प्रकार निरर्थक आहे.

आकडे महत्त्वाचे तेव्हाच जेव्हा त्याचे विश्लेषण करायची समज असेल.. <<
अगदी बरोबर. पण एखाद्याला ती समज आपल्याला आहे किंवा नाही, हे कळायची पण समज हवी ना..

आकडे महत्त्वाचे तेव्हाच जेव्हा त्याचे विश्लेषण करायची समज असेल..>>>> बरोबर
जसं
यशस्वी १९ सामने ५२.९ सरासरी>>> याचा डेब्यू होऊन आजून ५ वर्षे झाली नाहीत, वर सामन्यांची संख्या ही कमी.

राहुल २२ सामने ३२.१ सरासरी>>> हा जवळपास अर्धे सामने( ३९ च्या) खेळला आहे, म्हणून तुलने साठी योग्य नाही

अय्यर १४ सामने ३६.९ सरासरी
पुजारा २८ सामने २९.७ सरासरी
विहारी ९ सामने २६.७ सरासरी
रहाणे २२ सामने २५.४ सरासरी>>> यातले तर कुणीच सरासरीच्या तुलनेसाठी योग्य नाही....
जेव्हा डेटा ची तुलना होते तेव्हा प्रिप्रोसेसींग मधे नॉर्मलायझेशन नावाचा प्रकर असतो जो सर्व उपलब्ध डेटाला ०-१ रेंज मधे बसवतो...हे करणे निकडीचे असते कारण एखादा खेळाडू कमी सामने खेळल्याने त्याची अधिक सरासरी ठेवण्याची शक्यता वाढते.

मी सुद्धा हल्लीच दुसरीकडे चर्चा करताना खालील आकडे काढले होते. (मला जरा मेहनत घेऊन आकडे काढायला मजा येते)>>>
आकडे महत्त्वाचे तेव्हाच जेव्हा त्याचे विश्लेषण करायची समज असेल..>>> त्यामुळे डेटा जसाच्या तसा उचलून (रॉ डेटा) त्यावर योग्य प्रिप्रोसेसींग न करता विश्लेषण करून निष्कर्ष काढणे हे चुकिचे निष्कर्ष निघण्याचा राजमार्ग असतो.

आयपीएल सुरू झाले तेव्हा पहिल्या वर्षी सचिन दादा द्रविड सेहवाग आणि युवराज यांना आयकॉन प्लेअर म्हणून मुंबई कलकत्ता कर्नाटक दिल्ली आणि पंजाब संघात निवडले होते याची इथे कोणाला कल्पना आहे का?

द्रविड आणि दादा ज्यांची लिमिटेड ओवर कारकीर्द आटपली होती तरीही त्यांना संघात कुठलाही लिलाव न करता सर्वाधिक पैसे देऊन जबरदस्ती घ्यायला लावले होते हे ठाउक आहे का?

क्रिकेट हा खेळ आहे तसा तो व्यवसाय सुद्धा आहे Happy

फार्स विथ द डिफरंस
>>>
आकडे तुमच्यासाठी आणले आहेत. हवे तसे विश्लेषण करा.
कोहली कसोटीत गेले पाच वर्षे गंडला आहे आणि बिलकुल भरवशाचा वाटत नाही हे समजायला मला स्वताला आकड्यांची गरज नाही Happy

कोहली जास्त सामने खेळला म्हणून त्याची कमी असलेली सरासरी ३० ही योग्य आहे यावर खरेच मी काही बोलू शकत नाही Happy

किंबहुना जास्त सामने खेळून सुद्धा ३० इतकी कमी सरासरी आहे ही चिंतेची बाब आहे..
जर कमी सामन्यात असती तर सॅम्पल साईज छोटा आहे असे समजू शकलो असतो.

किंबहुना जास्त सामने खेळून सुद्धा ३० इतकी कमी सरासरी आहे ही चिंतेची बाब आहे.. जर कमी सामन्यात असती तर सॅम्पल साईज छोटा आहे असे समजू शकलो असतो.>>> हे शेवटचं कमी सॅंपल साईज तुलनेसाठी घेण्याचं वाक्य इतर सर्व खेळाडूंच्या बाबतीत लागूनाही होत का? काय बोलू आता? फक्त इतकचं बोलेन की तुमची वरील वाक्ये तुम्ही व्यक्त केलेल्या चिंता या विदा विश्लेषणाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन नाहीत त्यामुळे त्यासंदर्भातील तुलना फॅक्चुअल नसून ओपिनियनेटेड आहेत असे मी म्हणेन. ( हे फक्त तुम्ही जो वर डेटा तुलनेसाठी दिला आहे त्यासंदर्भात आहे)

**....हा प्रकार निरर्थक आहे * -

जाम खडसावलं मी त्या रोहित व विराटला; गयावया करत म्हणाले, " नांवावर आतापर्यंत धांवा खूप झाल्या, आता जरा नांवावर धागा किती चालतो तें बघत होतो ! "20210119_225628_1.jpg

हर्षित राणा हा शिवम दुबे जागी सबस्टिट्यूट म्हणून आला याचा फायदा झाला..
दुबेने अर्धशतकी फलंदाजी केली आणि याने गोलंदाजी करत तीन विकेट काढल्या..
दोघांना मिळून सामनावीर द्या आता.

संजूने आपल्या विकेट कीपिंगने सामना धोक्यात आणलेला. बरेच चुका करतो तो.. त्याला रिप्लेस करायला पंतला ब्रँड व्हॅल्यूची सुद्धा गरज नाही.

हे शेवटचं कमी सॅंपल साईज तुलनेसाठी घेण्याचं वाक्य इतर सर्व खेळाडूंच्या बाबतीत लागूनाही होत का?
>>>>>

लागू होते की?
कमी सॅम्पल मध्ये जास्त सरासरी असलेल्या कुठल्या खेळाडूला मी लिजेंड म्हणून घोषित करत नाहीये किंवा कमी आहे म्हणू. काढा म्हणत नाहीये.

कोहली बाबत मोठा सॅम्पल असून सुद्धा सरासरी कमी असेल तर हा चिंतेचा विषय नाही का..
किती पाठीशी घालाल त्याला?

भाऊ Proud

जेंव्हा सर्व प्रकारची, सर्व तऱ्हेची इतकी तपशीलवार आकडेवारी उपलब्ध नव्हती, तेंव्हाची खेळाडूंची निवड / तुलना कशी केली जात होती व ती अयोग्य होती का ? >> आता ब्रँड व्हॅल्यूवर कोहली, रोहित,पंत सारखे प्लेयर्स सिलेक्ट होतात असा फतवा जारी झाल्यानंतर असा प्रश्न विचारणे ध्राष्ट्याचे वाटत नाही का भाऊ तुम्हाला ? Wink

दुबे ने आज रशिदला जे हँडल केले तो जबरदस्त प्रकार होता. रशिद ने तीन सामने भारी त्रास दिला होता मधल्या ओव्हर्स मधे. आज त्याची स्टाईल बदलली गेली . त्या जोरावर पांड्या वाचला असे म्हणता येईल नाहितर अंडर १०० रेट महाग पडू शकला असता. बिष्नोई अंडर द रडार चांअग्ली बॉलिंङ करतो आहे सलग. रिंकुला परत फॉर्म गवसायला लागलाय म्हणून मस्त वाटले.

राणाच्या सब चा राडा होणार बहुधा Happy

कोहली बाबत मोठा सॅम्पल असून सुद्धा सरासरी कमी असेल तर हा चिंतेचा विषय नाही का....>>> जेव्हा सामन्यांची संख्या वढणार तेव्हा सरासरी कमी होणार, फक्त जो कंसिस्टंट असणार तोच सरासरी मेंटेंन करु शकणार (याला आपण क्लास म्हणतो), म्हणून कमी सामन्यात जास्त सरासरी असण्याची शक्यता जास्त असते ( यालाच सामान्य भाषेत फॉर्म म्हणतात) आणि जास्त सामन्यात कमी सरासरी असण्याची शक्यता वाढते.... त्यामुळे मी पुन्हा हेच म्हणेन की नॉर्मलायझेशन केल्याशिवाय वर दिलेल्या डेटा वरुन कोहली तुलनेने वाईटच खेळला हा निष्कर्ष काढू शकत नाही, ( त्याच्या क्लासच्या तुलनेतही तो वाईटच खेळला यात काही वाद नाही)....वरील डेटा पहाता नॉर्मलायझेशन नंतर पंत आणि रोहीत नंतर चांगल्या परफॉर्मन्स मधे त्याचाच क्रमांक राहील असे वाटतेय..... यावरून त्याला संघात घ्यावे की नाही, चिंता करावी की नाही याबाबत माझे काहीच म्हणणे नाही.... सामान्यतः याचसाठी संघनिवड करताना फॉर्म ( क्लास असला तरीही) पाहीला जातो....माझं म्हणणं फक्त एवढच होत की तुम्ही जो डेटा डकवला आहे त्याचं वैज्ञानिक रितीने विश्लेषण केल तर तुलनेत तो फार खराब परफॉर्मर नाही आहे हेच सिध्द होईल. तो आऊट ऑफ फॉर्म आहे नी संघाबाहेर बसायल हवा या निष्कर्षाप्रत येण्यासाठी इतक्या मोठ्या रेंज च्या डेटाची आवश्यकताच नाही...सरळ सामने पाहून कुणालाही कळेल ते.

किती पाठीशी घालाल त्याला?>>> कोहलीला आणि मी पाठीशी घालणार?? Rofl

जेव्हा सामन्यांची संख्या वढणार तेव्हा सरासरी कमी होणार
>>>>

अहो जेव्हा कमी सामन्यात ६०-७० अशी भारी सरासरी असते तेव्हा जास्त सामने झाल्यावर कमी होते...
पण कमी म्हणजे ३० नाही..
याचा अर्थ क्लास गंडला आहे.

चला सोडा, मी हरलो Happy

तो आऊट ऑफ फॉर्म आहे नी संघाबाहेर बसायल हवा या निष्कर्षाप्रत येण्यासाठी इतक्या मोठ्या रेंज च्या डेटाची आवश्यकताच नाही...सरळ सामने पाहून कुणालाही कळेल ते..
>>>>>>

हे आता वाचले..
मग तर उत्तमच !

पण पाच वर्षे हा एवढा मोठ्ठा काळ आह की याला आऊट ऑफ फॉर्म किंवा बॅड पॅच म्हणता येत नाही.. तो फार तर एका सीजनचा असतो..

Pages