निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
<<ज्या कोणी परदेशातील
<<ज्या कोणी परदेशातील स्त्रिया भारतात जातात त्यांना त्रास झालेला असतो. (माझ्याकडे २-३ च डाटा पॉइन्टस आहेत) या सर्वामुळे रेसिस्ट लोकांचे फावते. आयतेच कोलित मिळते त्यांना.>> भारतीयांचा द्वेष करण्यात डेमोक्रॅट्स मागे आहेत असा गैरसमज क्रुपया कोणी करुन घेवू नये. ईन फॅ़क्ट २००० नंतर इथे आलेल्या भारतीयांचे आयुष्य अवघड करण्यात किंवा ते सुखकारक न होऊ देण्यात डेमोक्रॅट्स ही मागे नाहीत. दरवर्षी स्किल्स बेस्ड ग्रिन कार्ड देण्यात (जे मुळात १ मिलीयन पैकी फक्त १ लाख चाळीस हजारच फक्त आहेत) देश निहाय कोटा काढून टाकण्याच्या विधेयकावर दोनदा पास होण्याच्या जवळ असताना डेमिक्रॅट्स्नीच खोडा घातलेला आहे. असो.
पण जर ही ए.ऑ. पुढे गेली तर मात्र गोष्टी अजून अवघड व बिकट होतील ह्यात शंका नाही.
उजच्या लोकांना कशाचा त्रास
उजव्या लोकांना कशाचा त्रास होतो त्याची ही अपूर्ण यादी. टिकटॉक वरुन साभार.
सर्वनामे
इतर लोकांचे लैगिक अवयव
समलिंगी कुटुंबे
पुरुषांनी नखे रंगवणे
ड्रॅग क्वीन
इंद्रधनुष्य
बडलाईट
मेरी ख्रिसमस ऐवजी हॅपी हॉलिडेज म्हणणे
पुस्तके
वाचनालये
हॅरी पॉटर
त्यांना समजत नसेल अशी भाषा बोलणारे इतर लोक
ब्राउन स्थलांतरीत (देसी)
शाकाहारी
व्हीगन्स
स्त्रीया
मुलं नसलेल्या आणि खूप पैसे कमावणार्या स्त्रीया
व्यायाम करणार्या स्त्रीया
विविध रंगांनी केस रंगवलेल्या स्त्रीया
मेकप केलेल्या स्त्रीया
मेकप न केलेल्या स्त्रीया
मांजरी
टेलर स्विफ्ट
मास्क
मास्कची सक्ती
इतरांनी घातलेले मास्क्स
लशीकरण
सत्य (ट्रुथ, रिअॅलिटी, फॅक्ट्स)
मोठी शहरे
हिरव्या, जांभळ्या आणि ब्राउन एम अॅड एम्स
डिस्नी
डिक्सी चिक्स
एम अॅड एम्स
ब्रुस स्प्रिंगस्टीन
जेव्हा गोष्टीतली काल्पनिक माणसं गोरी नसतात उदा लिटिल मरमेड मधली एरिअल
ग्रीन डे
बंदुकांना परवानगी नसलेल्या जागा
निवडणुकीतील हार
एथिस्ट
व्हिडिओ गेम्स
पटेटो हेड
बार्बी
अमित
अमित
विनायक यांच्या सगळ्या पोस्टींशी सहमत.
(No subject)
अमित
अमित
अमितव
अमितव
>>पण मला वाटते हा प्रश्न
>>पण मला वाटते हा प्रश्न कोणत्यातरी मार्गाने सोडवला जाईल.<<
एक पर्याय असा कि, चिल्ड्रन बॉर्न इन युएस टु एलियन पेरेंट्स (हु केम लिगली ऑन नॉन-इमिग्रंट विजा, अँड नॉट थ्रु डंकि राउट) विल्बी केप्ट इन ए सेपरेट बकेट (नॉन डाका). ते जेंव्हा ग्रीन कार्डसाठी अप्लाय करतील तेंव्हा त्यांची कंट्री ऑफ बर्थ अमेरिका असल्याने दे मे गेट सम लीवे कंपेर टु अदर्स..
ऑफ्कोर्स, यु मे कॉल धिस अॅज ए विश्फुल थिंकिंग...
>>Ross Ulbricht ची केस इथे
>>Ross Ulbricht ची केस इथे कुणी फॉलो करत असेल असे वाटत नाही.
त्याच्यावर प्रचंड अन्याय झाला होता.<<
हि डिझर्व्ड टु गेट पनिश्ड. शिक्षा कमी कि जास्त हा वादाचा विषय आहे..
>>Libertarian Convention मध्ये ट्रंप ने मी जिंकलो तर त्याला पार्डन करेन असे आश्वासन दिले होते आणी पठ्ठ्याने ते पाळले देखील !<<
या वाक्याला मात्र +१..
गिविंग प्रॉमिसेस इज नॉट ए बिग थिंग, फॉलोइंग इट थ्रु अँड कीपिन्ग देम इज ए ट्रेट ऑफ ग्रेट लिडर्शिप. स्लो लर्नर्स डोंट गेट धिस राइट ऑफ द बॅट, बट दॅट्स ओके...
DEIA वरती भयंकर क्रॅक डाउन
DEIA वरती भयंकर क्रॅक डाउन झालय.
A - अॅक्सेसिबिलिटी - डिसेबल्ड
<<<गिविंग प्रॉमिसेस इज नॉट ए
<<<गिविंग प्रॉमिसेस इज नॉट ए बिग थिंग, फॉलोइंग इट थ्रु अँड कीपिन्ग देम इज ए ट्रेट ऑफ ग्रेट लिडर्शिप. स्लो लर्नर्स डोंट गेट धिस राइट ऑफ द बॅट, बट दॅट्स ओके... >>>
शिवाय, पहिल्याच दिवशी अनेक Executive orders काढीन आणि DEI, Birthright Citizenship हे सगळे कॅन्सल करीन हेहि वचन पाळले. आता त्या Executive orders अंमलात आणण्यापूर्वी त्यावर अनेक खटले भरून तो प्रश्न बरेच दिवस चिघळत राहील हे खरे असले तरी मुद्दा असा आहे की त्रंप्याने म्हंटल्याप्रमाणे केले. त्रंप्याचा लाळघोटेपणा करणे हे आजकाल फॅशनेबल झाले आहे.
<<शिवाय, पहिल्याच दिवशी अनेक
<<शिवाय, पहिल्याच दिवशी अनेक Executive orders काढीन आणि DEI, Birthright Citizenship हे सगळे कॅन्सल करीन हेहि वचन पाळले. >>
झक्की, ती पहिली बर्थराईट सि. शिप ची ए.ऑ. कोर्टाने आज निकालात सुद्धा काढली. त्याच्या मागच्या वेळेच्या (आठवतंय मुस्लीम बॅन?) आणि ह्या वेळच्या सुद्धा सगळ्या ए. ऑ. निकालात निघणार आहेत. मागच्या वेळी तात्याचं अॅडमीन एकही कॉन्सेक्विन्शीयल बील धड पास करू शकलं नव्हतं. उलट दोनदा पदच्युत होण्याचा आणि एक अयशस्वी राजकीय उठाव करण्याचा मान तेवढा मिळवला.
त्याच्या स्लो लर्नर समर्थकांना मात्र "आमचा तात्या दिलेली सगळी वचनं पाळतो बरं का" असंच वाटत रहातं.
>>त्रंप्याचा लाळघोटेपणा करणे
>>त्रंप्याचा लाळघोटेपणा करणे हे आजकाल फॅशनेबल झाले आहे.<<
कुडंट अग्री मोर...
<< पहिली बर्थराईट सि. शिप ची
<< पहिली बर्थराईट सि. शिप ची ए.ऑ. कोर्टाने आज निकालात सुद्धा काढली. त्याच्या मागच्या वेळेच्या (आठवतंय मुस्लीम बॅन?) आणि ह्या वेळच्या सुद्धा सगळ्या ए. ऑ. निकालात निघणार आहेत. >>
------- ए ऑ काढणार - मोठी बातमी, काढल्यावर अजून मोठी बातमी, ट्रम्प म्हणजे बोले त्येसा चाले, दोन दिवसांनी कोर्ट ए ऑ ला blantantly unconstitutional म्हणत स्थगिती देणार ... अगदीच मोठी बातमीच. आता ट्रम्प म्हणणार मी प्रयत्न केला, कोर्टाने हाणून पाडले.
कुणाचा फायदा होणार नसला तरी या सर्व प्रकारांत मीडियाचा मोठा फायदा होणार आहे.
प्रेसिडेंट मस्कला सूझी बाईंनी
प्रेसिडेंट मस्कला सूझी बाईंनी वेस्ट विग बाहेर काढला. आता तो व्हाहा बाहेर आयाझेनहॉवर टॉवर मध्ये बसेल आणि चीफ ऑफ स्टाफ सुझी वाईलस् ला रिपोर्ट करेल. फर्स्ट लेडी ट्रम्प ला डायरेक्ट रिपोर्ट करणार नाही.
डाव्यांना कुठल्या गोष्टींचा
डाव्यांना कुठल्या गोष्टींचा त्रास होतो ?
सामान्य ज्ञान
स्त्रीवर प्रेम करणारा पुरुष
पुरुषावर प्रेम करणारी स्त्री
जन्मजात मिळालेले लिंग बाळगणारा पुरुष
जन्मजात मिळालेले लिंग बाळगणारी स्त्री
कुटुंब
९ महिने पोटात गर्भ संभाळून अर्भकाला जन्म देणारी स्त्री
९ महिने मातेच्या पोटात राहून सुखरुप जन्माला आलेले जिवंत बाळ
व्यवस्थित कपडे परिधान केलेला पुरुष
व्यवस्थित कपडे परिधान केलेली स्त्री
केसाचा नैसर्गिक रंग तसाच ठेवून केसांचा उत्तम भांग पाडणारा पुरुष
केसाचा नैसर्गिक रंग तसच ठेवून केषभूषा करणारी स्त्री
शरीरावर कुठेही भोक न करणे त्यात कडे किवा तत्सम दागिना न ओवणे
उत्तेजक अमली पदार्थांपासून अलिप्त असणे
अंघोळ आणि शॉवर
उन्हाळ्यातील तीव्र उन्हाळा (क्लायमेट देवाचा कोप)
थंडीत पडलेली जोरदार थंडी (क्लायमेट देवाचा कोप)
पावसाळी मोसमात पडणारा जोरदार पाऊस (क्लायमेट देवाचा कोप)
सौम्य उन्हाळा (क्लायमेट देवाचा कोप)
सौम्य हिवाळा (क्लायमेट देवाचा कोप)
दुष्काळ (क्लायमेट देवाचा कोप)
वादळ (अर्थातच क्लायमेट देवाचा कोप)
वारे आणि जंगल नीट साफ न केल्याने होणारे गचपण आणि त्यातून लागणार्या आगी (क्लायमेट देवाचा कोप)
वरील गटात न मोडणारे कुठल्याही स्वरुपाचे हवामान (क्लायमेट देवाचा कोप)
शेती
बागायत
दुधासाठी मांसासाठी केलेले पशुपालन (क्लायमेट देव असंतुष्ट होण्यामागचे कारण)
अंडी आणि मांस यासाठी केलेले कुक्कुटपालन (क्लायमेट देव असंतुष्ट होण्यामागचे कारण)
बॅटरीवर न चालणारे आणि सामान्य लोकांना परवडणारे वाहन
ट्रंप
ट्रंपचे नातेवाईक
नियम पाळणारे नागरिक
देव धर्म पाळणारे सरळमार्गी नागरिक
देशात जन्मलेले, देशात कायदेशीर रित्या स्थायिक झालेले नागरिक
देशाचा अभिमान बाळगणारे नागरिक
देशावर प्रेम आहे म्हणून सैन्यात भरती होणारे सैनिक
जगात फक्त दोनच लिंग आहेत असे मानणारे क्रूर उन्मादी अत्याचारी लोक
एखाद्या व्यक्तीकडे पाहून सामान्य ज्ञान वापरून सर्वनाम ठरवणारे
गुणवत्ता
अभ्यासू वृत्ती
नवनिर्मिती
कल्पकता
उद्योजकता
गुणग्राहकता
कुठलीही आनंददायक गोष्ट
विनोद
६ जानेवारीच्या तथाकथित भयंकर,
६ जानेवारीच्या तथाकथित भयंकर, अमेरिकेचा सर्वनाश करु इच्छिणार्या अभूतपूर्व आंदोलनात सहभागी लोकांना माफी देण्याबद्दल.
ट्रंपने खणखणीत स्पष्ट आश्वासन दिले होते की मी या लोकांना माफ करणार आहे.
मतदारांनी हे ऐकूनही ट्रंपला भरघोस मते देऊन विजयी केले.
ट्रंपने आपल्या शब्दाला जागून त्या कल्पनातीत कृष्णकृत्य करणार्या मंडळींना माफ केले.
सर्वसामान्य लोकांना जानेवरी ६ चे आंदोलन हे सरकार उलथून टाकणारे, नरसंहार करणारे भयानक आंदोलन वाटत नाही.
ह्या आंदोलन करणार्या लोकांमधे एफ बी आयचे लोक सामील होते.
ह्या आंदोलनाला सहज चिरडून टाकता आले असते पण नॅन्सी पेलोसी सारख्या उच्च पदस्थांनी केंद्र सरकारच्या पोलिसांना रोखले. ज्यायोगे ह्या आंदोलनावरून ट्रंपला कोंडीत पकडता येईल.
उलट म्हातार्या बायडनने आणि त्याच्या नालायक सेक्रेटरीने अनेक वेळा असे आश्वासन दिले होते की तो दिवट्या हंटरला माफी देणार नाही. आणि तरी शेवटच्या काही दिवसात ते केले. आणि अनेक लंगड्या सबबी देऊन हा निर्णय कसा योग्य होता ते दाखवायचा प्रयत्नही केला.
लिझ चेनी आणि अशा जानेवारी ६ चा खोटा तपास करणार्या लोकांना सर्वव्यापी माफी देऊन त्याच्या पापावर पांघरूण घालण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणार आहे. २०२० मधे असा उलटा कांगावा चालवला होता की ट्रंप आपल्या नातेवाईकांना अशा प्रकारची व्यापक माफी देऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकणार आहे. पण ट्रंपने तसे काहीही केले नाही. मात्र ह्या भ्रष्ट, भ्रमिष्ट थेरड्याने तेच कृष्णकृत्य केले. तेही आपल्या सत्ताकाळाच्या शेवटच्या काही तासात! किती प्रामाणिक, शब्द पाळणारा राष्ट्रपती तो!
ट्रंपने लेकन रायली कायद्याला
ट्रंपने लेकन रायली कायद्याला समर्थन दिले होते ज्यायोगे बेकायदा घुसखोरी पुरेशी नाही म्हणून आणखी वरती गुन्हे करणार्या लोकांना वेळीच हाकलून देता यावे. डाव्या, पुरोगामी डोकेफिरू लोकांनी ह्या विधेयकाला विरोध केला. पण ट्रंपने दिलेले समर्थन, लोकांचा असंतोष विचारत घेऊन अनेक लोकप्रतिनिधीनी ह्याच्या बाजूने मतदान करून ते विधेयक पारित केले.
टॉम होमन नामक एक कठोर शिस्तीचा माणूस इमिग्रेशन झार म्हणून नेमला आहे. कुठलेही आढेवेढे न घेता तो स्पष्ट सांगतो की होय, मी असल्या घुसखोराना हाकलून देणार आहे. सी एन एन वगैरे लोक कुटुंबे दुरावणार, लहान लहान बालके पोरकी होणार वगैरे आक्रंदन करत आहेत. पण असा विचार एखादा चोर, एखादा खुनी, एखादा आर्थिक गुन्हे करणारा, ह्याबद्द्ल का नाही? त्यांच्यापैकी अनेक जण पोरेबाळे असणारी असतात. म्हणून त्यांचे गुन्हे माफ केले जातात का?
बेकायदा घुसखोर लोकांचे गुन्हे मात्र हळूवार हाताळले जावेत ही अपेक्षा तर्कदुष्ट वाटते.
कोलंबिया इज डूम्ड...
कोलंबिया इज डूम्ड...
आता हे फक्त माबोंकरता..
या पुर्वि, मी क्रिप्टोकरंसीच्या अगदि विरोधात होतो, एस्पेशियली बिटकॉइन्स. पण गेल्या ६-७ वर्षांत बरंच पाणी पुलाखालुन गेलं आहे. सो, इफ यु हॅव फ्यु ग्रँड्स इन डिस्पोजेबल इन्कम, डु योर रिसर्च अँड बाय ए क्रिप्टो; इवन इफ इट इज ए प्योर स्पेक्युलेशन/इमोशन्स ड्रिवन बाय मार्केट फोर्सेस..
बिटकॉइन इज आउट, बट युएस गवर्नमेट मे पिक वन ऑफ द क्रिप्टो टोकन अॅज ए स्टोर ऑफ वॅल्यु. इफ दॅट हॅपन्स टु बि योर पिक, यु विल हिट ए जॅकपॉट..
डिस्क्लेमर : हा माझा अंदाज आहे, जो चूकिचा ठरु शकतो. प्लिज डु योर ड्यु डिलिजंस बिफोर मेकिंग ए मुव...
(No subject)
https://www.cnn.com/2025/01
https://www.cnn.com/2025/01/26/politics/colombia-tariffs-trump-deportati...
ट्रंपने दोन मिलिटरी विमाने भरून अमेरिकेत घुसलेले कोलंबियन समाजकंटक परत कोलंबियाला पाठवले. तिथल्या उन्मत्त राष्ट्रपतीने ते स्वीकारण्यास नकार दिला. का तर म्हणे ह्या कोलंबियन नररत्नांना पुरेसा सन्मान न देता गुरासारखे मिलिटरी विमानात कोंबून आणले!
ट्रंपने तात्काळ रुद्रावतार धारण केला.
समस्त कोलंबियन सरकारी अधिकार्यांना अमेरिकेत प्रवेश बंदी, तिथून आयात होणार्या मालावर मोठ्या प्रमाणावर आणीबाणी तत्त्वावर कर आणि अन्य काही जाचक बंधने.
असे नाक दाबल्यावर तत्काळ त्या मुजोर राष्ट्रपतीचे तोंड उघडले आणि गुपचूप हवे तेवढे समाजकंटक आम्ही स्वीकारतो असे दाती तृण धरून कबूल केले!
घुसखोरांची उचलबांगडी करू असे आश्वासन दिले आहे ते पुरे करण्यात आपण कुठे कमी पडू नये ह्याची पुरेपूर दक्षता घेत आहेत साहेब.
साम, दाम, दंड, भेद, जे काही उपाय शक्य आहेत ते सगळे व्यवस्थित वापरत आहे.
हे चालू असताना आपल्या प्रकांड बुद्धीमत्तेसाठी प्रसिद्ध असणार्या ए ओ सी बाई "आता कॉफी कित्ती कित्ती महाग होणार, काय गरज होती नसते संकट ओढवायची" वगैरे स्वप्नरंजन करत होती. पण ते भंग पावले! असो.
एकेलॉ ट्रम्पही है कॉफी है।
अकेलॉ ट्रम्पही कॉफी है।
गो बेन अँड जेरीज!
गो बेन अँड जेरीज!
गो कॉस्टको
अँड अॅपल अॅंड जेपीमॉर्गन
Trump सरकारने गाझाला पाठवले
Trump सरकारने गाझाला पाठवले जाणारे ५ कोटी डॉलर रद्द केले. कशासाठी होते हे? चांगला प्रश्न आहे! हे होते गाझा च्या नागरिकांना कंडोम घेता यावेत म्हणून! बहुधा हे ठरलेल्या कामासाठी न वापरता कुठलेसे शस्त्र बनवायला वापरले जात होते असे कळते.
काहीही असले तरी अमेरिकन करदात्यानी ह्या बहुमोल कामात योगदान द्यावे असे काहीही दिसत नाही.
१७५७ मधील प्लासिचा विजय आणि
१७५७ मधील प्लासिचा विजय आणि १८१८ मध्ये पेशवाई बुडवल्यावर जवळजवळ सगळा भारत इंग्रजांच्या ताब्यात आला होता. उरलेला ताबा १८५७ मध्यल्या बंडानंतर मिळाला. पण मधल्या काळात इंग्रजांनी कायदा आणि सुव्यवस्था तसेच बेसिक पायाभुत सुविधा (रेल्वे, पोस्ट -तारखाते इ.) भारतात आणल्या. ह्या सुविधा ऐत्तदेशिय लोकांसाठी आणलेल्या नसल्या तरी त्या आल्यामुळे ऐत्तदेशिय लोकांची सोय झाली. विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीमुळे. कारण त्यामुळे ठगांचा बंदोबस्त झाला. हे लोक जंगलात लपुन बसत आणि तीर्थ यात्रेसाठी जाणारया लोकांना लुटत आणि मारुन टाकत. त्यामुळे "आता इंग्रजांचे राज्य आले, आता काही काळजी नाही. आता खुशाल काठीला सोने टांगुन काशीला जावे." असे लोक म्हणु लागले. ह्या भावनेवर लोकमान्य टिळकांनी पुढे मार्मिक भाष्य केले. "पुढे लोकांच्या लक्षात आले की इंग्रजांच्या राज्यात आपल्या हातात सोने उरले नाही आणि काठीही उरली नाही!"
ह्या इतिहासाची चर्चा आत्ता इथे कशाला? कारण History repeats itself if people don't learn anything from it!
ट्रुडोला शांत बसवले ट्रंपने
ट्रुडोला शांत बसवले ट्रंपने हे एक बरे झाले. ही इज फिनिशड. बिच्चारा खलिस्तानकरता शहीद झाला
जनरल मार्क मिली ह्या
जनरल मार्क मिली ह्या देशद्रोही सेनापतीला Trump सरकारने पदावनती आणि अन्य कठोर शिक्षा दिल्या आहेत.
मागे Trump सत्तेवर आला तेव्हा ह्या माणसाने चीन सरकारला आश्वासन दिले होते की अध्यक्षाने सांगितले तरी मी तुमच्यावर हल्ला करणार नाही.
अशा प्रकारचे आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षाला अंधारात ठेवून करणे ही एक फितुरी आहे. कितीही नावडता असला तरी तो लष्कराचा सर्वोच्च प्रमुख असतो.
असल्या कृष्णकृत्याचे चोख प्रायश्चित ह्या इसमाला दिले जावे.
अर्थातच हा मिली पुरोगाम्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. पण असेच होत राहिले तरी एक घातक पायंडा पडेल.
पीट हेक्सेथ तातडीने काहीतरी करेल अशी आशा.
पण 'अध्यक्षाने सांगीतले तरी'
पण 'अध्यक्षाने सांगीतले तरी' ही बातमी कुठे आहे? कृपया लिंक द्या.
Milley should be "tried for treason" for talking to Li "behind the President's back and telling China that he would be giving them notification" of an American attack.
एवढाच आरोप मला विकीवरती सापडला - की हल्ला करण्याच्या आधी आम्ही आधी चीनला कळवु.
-------------
जर तशी लिंक नसेल, जर तसे वास्तव नसेल तर ट्रंप विरुद्ध बोलणार्या कोणाही व्यक्तीवरती सूडी (रिटॅलिएटरी) आरोप होउ शकतात असा पायंडा पडणेही घातकच आहे.
जनरल हे लष्कराचे उच्चपद आहे.
जनरल हे लष्कराचे उच्चपद आहे. जनरल कडे मोठे अधिकार असतात. पण जनरल हा अध्यक्षाच्या हाताखाली असतो.
जनरलला जर आपला अध्यक्ष फासिस्ट आहे असे वाटत असेल तर त्याने राजीनामा द्यावा. आणि मग त्या अध्यक्षावर मनसोक्त टीका करावी.
पदावर राहून बॉस विरुद्ध काड्या करणे हा राजद्रोह आहे. म्हाताऱ्या बायडन ने पार्डन देऊन ठेवले आहे याचा अर्थ ह्याने काहीतरी केले आहे.
अध्यक्ष कितीही नावडता असला तरी जनरल ने परक्या देशाशी संपर्क साधून बोलणी करणे हा पायंडा घातकच.
डॉ. स्ट्रेन्जलव्ह आठवला.
डॉ. स्ट्रेन्जलव्ह आठवला.
या या कॉमी. खूप दिवसांनी!
Pages