गूढ नजर - एक वेगळी‌ रहस्यकथा

Submitted by प्रथमेश काटे on 22 January, 2025 - 07:03

गूढ नजर - एक आगळी रहस्यकथा

रात्रीचे साडेसात वाजलेले. मृणाल हॉलमधल्या सोफ्यावर बसून तिची आवडती सिरीयल बघत होती. तिचा नवरा अमित आज सकाळीच ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. आता पुढचे काही दिवस, मृणाल घरात एकटीच होती. पण, खरंच ती एकटी होती का ?
नाही. तो होताच की तिच्यासोबत. तो, आणि त्याची ती नजर. सतावणारी, सारखी अस्वस्थ करत राहणारी. आताही, तो सोफ्यावर तिच्या शेजारीच बसला होता. टीव्ही बघत होता, आणि अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. मृणाल सिरीयलवर मन एकाग्र करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. पण तिचंही सगळं लक्ष त्याच्याकडेच लागलेल. बिचारीला अगदी जखडून टाकल्यासारख वाटत होतं.
हे सर्व केव्हापासून सुरू होत, हे तिलाही नीट सांगता आलं नसतं. पण आता एवढ्यातच या सगळ्याला सुरुवात झाली होती, एवढ नक्की. तो कोण आहे ? त्यांच्या घरात कसा शिरला ? ते कळायला काहीच मार्ग नव्हता. अमित घरी असतानाही ' तो ' सतत तिच्या आजूबाजूला असायचाच, पण अमितच्या नजरेस कधीच पडला नाही. कधी अमित हॉलमध्ये बसला असेल, आणि ती किचनमध्ये असेन अशावेळी अचानकपणे तो तिच्या जवळ प्रकट व्हायचा. ती अमितला हाक मारायची, पण अमित किचनमध्ये पोहोचण्याआधीच तो गायब.
‌मृणालने हलकेच मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या कडेच पाहत मिष्कीलपणे हसत होता. त्यामुळे तर ती अजूनच घाबरली. नाही, त्याच हसणं भेसूर वैगेरे नव्हतं. उलट तिला त्याच्या हसण्याची, भुरळच पडली होती. स्वत: मृणाललाही त्याबद्दल आश्चर्य वाटायचं. एकदा अमितशी बोलताना ती म्हणाली होती - ' त्याची भीती वाटत असली, तरी तो हसताना मात्र खूप क्यूट दिसतो. तेव्हा त्याच्याकडे पाहत राहावंसं वाटत.' ते ऐकून अमितचा चेहराही ' पाहण्यासारखा ' झाला होता. पण जेव्हा ' तो ' असा हसतो, तेव्हा त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी शिजत असतं, हे तिला नंतर अनुभवाने समजू लागल होतं. कारण हसल्यावर तो असं काहीतरी करायचा, ज्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. ती दचकायची, किंचाळायची. त्यामुळे नंतर नंतर त्याच्या हसण्यानं मोहवून जाण्याऐवजी ती सावध राहू लागली. पण त्याचा फायदा व्हायचा नाही. त्याला जे अपेक्षित होतं तेच व्हायचं. ती घाबरायची. तसं अजून तरी त्याने फार भयंकर असं काही केलं नव्हतं, पण त्याचा काय भरवसा.
हाताची मुठ घट्ट आवळून, सावध होऊन मृणाल शांतपणे बसली होती. मघाशी ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होती, पण आता डोळ्यांच्या कडांनी अधूनमधून त्याच्यावर नजर टाकत होती. कान त्याच्या हालचाली ऐकण्यासाठी टवकारले होते. इतक्यात लाईट गेली आणि तिच्या मनावरचा तोल ढळू लागला. तिने मूठ अजूनच जोरात दाबली. बाजूला हालचाल झाल्यासारखं तिला वाटलं. पाठोपाठ ' त्या ' च्या खुसखुसत हसण्याचा आवाज. इतक्यात तिच्या खांद्यावर काहीतरी पडले. मृणालने घाबरून ओरडत खांदा झटकला. अर्ध्या मिनिटात लाईट आली. तिने वाकून खाली जमिनीकडे पाहिलं. एक कोळीण लादीवर पडली होती. काळीकुळकुळीत, अनेक पायांची, भयानक ; पण नकली. तिने कपाळावर हात मारून घेतला. पुन्हा त्याच्या हसण्याचा आवाज आला. तिने त्याच्याकडे बघितलं. आता तो मोकळेपणाने, खळखळून हसत होता. मृणाल सावरून बसली. आणि मख्खपणे त्याच्याकडे बघू लागली. तिचा चेहरा.. पूर्ण कोरा होता. तो अजूनही हसतच होता. अचानक -
मृणालने त्याचे दोन्ही दंड पकडून, त्याला जवळ ओढले. आणि आवेगाने त्याच्या कपाळ, गाल, हनुवटीचे मुके घेऊ लागली. चिंटू आईच्या प्रेमाच्या अनपेक्षित वर्षावाने सुखावला.

" बदमाश झालायेस अगदी. मी किती घाबरले होते, माहिती आहे ? " त्याचा गालगुच्चा घेत ती म्हणाली.

" ममा, मी तुझ्या खांद्यावर खरा स्पायडर टाकेन का कधी ? माझी लाडकी ममा आहेस ना तू." तो आपल्या गोड आवाजात, लाडाने म्हणाला.‌ त्याचे ते शब्द ऐकताच तिने आवेगाने त्याला अजूनच जवळ ओढलं. आणि छातीशी कवटाळून धरलं.

समाप्त
@ प्रथमेश काटे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तो कोण आहे ? त्यांच्या घरात कसा शिरला ? ते कळायला काहीच मार्ग नव्हता. अमित घरी असतानाही ' तो ' सतत तिच्या आजूबाजूला असायचाच, पण अमितच्या नजरेस कधीच पडला नाही>>>>
हे आणि शेवटच्या ओळी..

काही टोटल लागली नाही.

>>>>>तो कोण आहे ? त्यांच्या घरात कसा शिरला ? ते कळायला काहीच मार्ग नव्हता.
मुलगा आहे ना तो तिचा? मग घरात कसा शिरला हे का कळत नाहीये?

तिला अल्झायमर झालेला असतो
स्वतःचा मुलगा ती विसरून जाते..
आणि मध्येच तो तिला आठवतो>>>> काहीही....

<<<<<अमित घरी असतानाही ' तो ' सतत तिच्या आजूबाजूला असायचाच, पण अमितच्या नजरेस कधीच पडला नाही. .>>>>
हे तुमच्या अल्झायमरच्या थिअरीशी सुसंगतपणे कनेक्ट करून दाखवा बरं.

शक्यता १
तो तिचा प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेला मुलगा...
कदाचीत लहानपणीच देवाघरी गेलेला.,
शक्यता २
ती मानसिक रुग्ण आहे, मुल तिच्या नशिबात नाही, आणि हा सगळा भास आहे

एकंदर बरी वाटली गोष्ट

काटे, जरा रक्तपिपासू पण पूर्ण करा...
तुमचे पुढचे भाग येई तोवर रक्त आटत हो आमचं

@मनिम्याऊ - चिंटू आपल्या आईला सतावून अमितच्या येण्याआधी पळून जात असे, असा साधा सोपा अर्थ आहे. चिंटू एक लहानसाच मुलगा आहे त्यामुळे ही गोष्ट समजणं इतकं काही कठीण नाही.

मुलगा आहे ना तो तिचा? मग घरात कसा शिरला हे का कळत नाहीये? >> जस्ट गंमत म्हणून, आणि ही एक रहस्यकथा आहे म्हणून तसं लिहिलं आहे.

एक आगळी रहस्यकथा एवढंच वाक्य तेवढं रिलेव्हंट आहे कथेत.>> काय म्हणायचं आहे तुम्हाला ?

@ऋन्मेष -तसं मुळीच नाही सर. असतं तर शेवटी तसं क्लिअर केलच असतं की. नाहीतर काहीतरी हिंट दिली असती जेणेकरून वाचकांना ओळखता येईल.्

मला वाटलं उंदीर >> नाही हो Lol Lol

काटे, जरा रक्तपिपासू पण पूर्ण करा...
तुमचे पुढचे भाग येई तोवर रक्त आटत हो आमचं >>काटे, जरा रक्तपिपासू पण पूर्ण करा...
तुमचे पुढचे भाग येई तोवर रक्त आटत हो आमचं >> Lol Lol हो, लवकरात लवकर पुढील भाग पोस्ट करेल. थॅंक्यू.

खरंतर सर्व प्रश्नांची उत्तरे कालच देणार होतो पण वेबसाईट मध्ये काहीतरी error आल्यामुळे जमलं नाही.

मुलगा आहे ना तो तिचा? मग घरात कसा शिरला हे का कळत नाहीये? >> जस्ट गंमत म्हणून, आणि ही एक रहस्यकथा आहे म्हणून तसं लिहिलं आहे.

Uhoh कथा गंडलीये. वाचकांनी शब्दात पकडलं, तर "जस्ट गंमत" हे एक्स्प्लेनेशन! धन्य आहात.
रहस्यकथा अशी असते का? बरं.

हे तुमच्या अल्झायमरच्या थिअरीशी सुसंगतपणे कनेक्ट करून दाखवा बरं.

hallucination>>>
<<<<स्वतःचा मुलगा ती विसरून जाते..>>> जर मुलगा अस्तित्वात असेल, आणि ती विसरून गेली असेल तर तिच्या नवऱ्याला तो कधीच दिसत नाही हे hallucination (it's can't be a continuous state of mind especially in Alzheimer) कसं असेल?
एक काम करा डिसॉसेटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर, डिल्युजनल डिसऑर्डर, बायपोलार डिसऑर्डर, स्लीप ऍप्नेया अशा आजून ४-५ डिसॉर्डर्स घ्या आणि बघा कुठे काही ओढाताण करून जमतंय का ते, अपने घर की ही खेती है, काय फरक पडतोय. कायच्या काय... 🙏

एक आगळी रहस्यकथा एवढंच वाक्य तेवढं रिलेव्हंट आहे कथेत.>> काय म्हणायचं आहे तुम्हाला ? >>>> बाकी या कथेत काहीही सुसंगत नाही आहे.... पूर्णपणे गंडलीय... 🙏

कथा गंडलीये. लेखकांनी शब्दात पकडलं, तर "जस्ट गंमत" हे एक्स्प्लेनेशन! धन्य आहात.
रहस्यकथा अशी असते का? बरं. >> बापरे ! फारच गंभीर झालात. बाय द वे कुणीही मला शब्दात पकडलेलं नाही. आणि ती, जस्ट गंमतच आहे. जी तुम्हाला कळली नाही. आणि रहस्यकथा लेखनाच्या बाबतीत तुम्ही केलेल्या प्रश्नावरून वाटतं, की तुम्हाला रहस्यकथा हा प्रकारच समजत नाही. किंवा पचत नाही. किंवा आवडत असूनही जमत नाही. बाकी कथा चांगली आहे की नाही हे अर्थात वाचकांनी ठरवावं. पण गंडलेली तर मुळीच नाही.

बाय द वे एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते. मी तुम्हाला सुज्ञ वाचक समजलो होतो. असो Bw

•••••••

नाही आवडली . >> ठिक ; पण तुमची जेवढ्यास तेवढी, थेट प्रतिक्रिया मला आवडली. धन्यवाद. आणि पुढील लेखन तुम्हाला आवडू‌ शकेल Bw

बाकी या कथेत काहीही सुसंगत नाही आहे.... पूर्णपणे गंडलीय >> ठिक. कथा किंवा त्यात रहस्य दर्शवण्याची पद्धत आपल्याला समजली नाही, हे मी समजलो. फक्त समीक्षकाचा आव आणून कथा गंडलीच आहे असा एकदम निर्णय द्यायचा नाही. तेवढा कुणाला अधिकारही नाही.

@वीरू - ही छोटीशीच रहस्यकथा आहे. भागांमध्ये नाही.

@मनिम्याऊ - चिंटू आपल्या आईला सतावून अमितच्या येण्याआधी पळून जात असे, असा साधा सोपा अर्थ आहे. चिंटू एक लहानसाच मुलगा आहे त्यामुळे ही गोष्ट समजणं इतकं काही कठीण नाही.>>> बरं 
<<<<अमित घरी असतानाही ' तो ' सतत तिच्या आजूबाजूला असायचाच, पण अमितच्या नजरेस कधीच पडला नाही.>>>
म्हणजे या वाक्यावरून अमित ठार आंधळा होता असा अर्थ काढायला वाव आहे कथेत....कदाचित तेच रहस्य असेल कथेचं  Rofl

जस्ट गंमत म्हणून, आणि ही एक रहस्यकथा आहे म्हणून तसं लिहिलं आहे.>>>>
<<<त्याच हसणं भेसूर वैगेरे नव्हतं.>>>>कोणत्या आईला स्वतःच्या मुलाचं हसणं' भेसूर वाटेल??? थांबा तुम्ही उत्तर देऊ नका मीच देतो....--- >जस्ट गंमत म्हणून, आणि ही एक रहस्यकथा आहे म्हणून तसं लिहिलं आहे.... दंडवत 🙏 😂

म्हणजे या वाक्यावरून अमित ठार आंधळा होता असा अर्थ काढायला वाव आहे कथेत....कदाचित तेच रहस्य असेल कथेचं :हाहगलो: >> अमितच्या येण्याआधी पळून जातो असे उत्तरा मध्ये लिहीले आहे ना ? तरी समजत नाही, म्हणजे अमित तर आंधळा नाही पण आपण... असो

कोणत्या आईला स्वतःच्या मुलाचं हसणं' भेसूर वाटेल??? थांबा तुम्ही उत्तर देऊ नका मीच देतो....>> अरे माणसा भेसूर नव्हतं असंच लिहीलय ना. आणि हो तीही गंमतच आहे. जी तुला कळणार नाही. कदाचित समीक्षकाचा आव नको असं सरळच सांगितल्याने मन:शांती ढळलेली दिसतेय. आणि शब्दांचा अर्थ समजून पण खुसपट काढायची उर्मी येते आहे.

आणि अल्झायमरचा कथेत उल्लेख नसतानाही, आणि तसं क्लिअर करूनही या निरर्थक मुद्दयावरून ऋन्मेष सरांसोबत बाचाबाची चालू आहे !! किती तो मंदपणा. अरे जरा प्रतिक्रिया नीट लक्षपूर्वक वाच. म्हणजे दिलेली उत्तरं आणि क्लिअर केलेल्या गोष्टी समजतील.

कदाचित समीक्षकाचा आव नको असं सरळच सांगितल्याने मन:शांती ढळलेली दिसतेय. >>>> रहस्यकथा वाचून मन:शांती ढळलीये Rofl

रहस्यकथा वाचून मन:शांती ढळलीये >> ठिक‌ आहे की. सगळ्यांना नाही जमत. त्यात एवढा काय विचार करायचा. गोष्टी क्लिअर करूनपण निरर्थक खुसपट काढून वेळ घालवण्याचं दुर्मिळ टॅलेंट आहे की. आणि महत्वाचं सांगायचं राहिलं. मला ईमोजी नाही तर शब्द दिसतोय. आणि 'तेच' सुरू आहे Proud

कथेमध्ये जबरदस्त पोटेन्शियल आहे. चार पाच भागात उलगडा करता आला असता.
पण तुम्ही तीला गमतीदार रहस्यकथा करून पुढची उत्सुकता संपवली. असो..

तुम्हाला रहस्यकथा हा प्रकारच समजत नाही. किंवा पचत नाही. किंवा आवडत असूनही जमत नाही.>> Rofl

कोहरा , दहाड अशा सीरीज बघून त्या कळल्या आहेत. पण तुमची रहस्यकथा नाही समजली मला Sad अरेरे मठ्ठ आहे मी.

अरे माणसा भेसूर नव्हतं असंच लिहीलय ना.>>>>हो पण एखाद्या आईला आपल्या मुलाच्या हसण्याची तुलना खळाळून, खोडकर, खट्याळ, मुग्ध अशा कोणत्याही हास्याशी न करता सरळ 'भेसूर' हसण्याशी करावीशी वाटते??

त्याची भीती वाटत असली,>>> आईला मुलाची भीती वाटते?? Sad ( इथे आयांना पाहून मुलं चळाचळा कापतात )

अमितच्या येण्याआधी पळून जातो असे उत्तरा मध्ये लिहीले आहे ना ?>>>
<<<अमित घरी असतानाही 'तो' सतत तिच्या आजूबाजूला असायचाच, पण अमितच्या नजरेस कधीच पडला नाही. >>>
मुलगा सतत आजूबाजूला असून अमितच्या नजरेस कधीच(???) पडला नाही??

यातून फक्त एकच शक्यता उरते, मुलगा सतत मृणालच्या आजूबाजूला असायचा, पण अमित कधीही मृणाल सोबत नसायचा म्हणून तो त्याला ( डोळस असूनही ) दिसत नसेल, अधिक जेंव्हा मृणाल अमितला हाक मारून बोलवायची तेंव्हा मुलगा पळून जायचा....म्हणजे मुलगा अमितच्या नजरे समोर कधीच यायचा नाही ( कसला बाबा आहे हा? मुलगा कधीही नजरेसमोर दिसत नाही तरीही निश्चिन्त?)

काहीतरी बघणं, वाचणं आणि ते कळणं यात फरक असतो. 'अशी असते का रहस्यकथा?' असा प्रश्न तुम्हीच केलात, आणि गंडली वैगेरे परस्पर ठरवून तुम्हाला कथा समजलीच नसल्याचं सिद्ध केलत.

हो पण एखाद्या आईला आपल्या मुलाच्या हसण्याची तुलना खळाळून, खोडकर, खट्याळ, मुग्ध अशा कोणत्याही हास्याशी न करता सरळ 'भेसूर' हसण्याशी करावीशी वाटते?? >> हे मृणालचं मनोगत आहे हे कुणी ठरवलं ?

त्याची भीती वाटत असली आईला मुलाची भीती वाटते?? Sad ( इथे आयांना पाहून मुलं चळाचळा कापतात ) >> चिंटू सारखा खोडकर मुलगा काहीही करू शकतो म्हणून. अर्थात कॉमन सेन्स आहे. पण आधी सेन्सच नाही तर...

म्हणजे मुलगा अमितच्या नजरे समोर कधीच यायचा नाही ( कसला बाबा आहे हा? मुलगा कधीही नजरेसमोर दिसत नाही तरीही निश्चिन्त?) >> लहान मुले खोड्या केल्यावर एका जागी थांबत नाहीत. Again.. कॉमन सेन्स पण...

रच्याकने इथे प्रतक्रिया देणाऱ्या बहुतेक वाचकांच्या ही रहस्यकथा कॉमनसेन्स कथा डोक्यावरून गेलीय असंच त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसतंय. असो.... It is what it is.

नक्की चिंटू का पिंटू (मुलगा) अमितचाच होता ना कि मृणाल च्या आधीच्या प्रियकरापासूनचे अपत्यं . किंवा चिंटू जेव्हा जन्मला तेव्हा अमितला बिझिनेस मध्ये मोठ्ठ नुकसान झाले आणि त्याने मृणाल ला सांगितले कि याला कधीच माझ्या समोर आणू नकोस . म्हणून चिंटू बापाच्या नजरेस कधीच पडत नसेल .

रच्याकने इथे प्रतक्रिया देणाऱ्या बहुतेक वाचकांच्या ही रहस्यकथा कॉमनसेन्स कथा डोक्यावरून गेलीय असंच त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसतंय. >> हो अगदीच. बाय द वे या आयडीवर काही डोक्यात शिरणाऱ्या रहस्यकथा वाचायला मिळतील अशी अपेक्षा होती, परंतू निराशा झाली ; पण विनाकारण एवढा उद्धटपणा करण्यामागचं कारण समजलं. ते म्हणजे - दर्जेदार कथा लेखन न जमणे. अर्थात इथे केलेल्या फालतू कमेंट्सला दर्जेदार समजत असल्यास नाईलाज आहे. मात्र ते दर्जेदार नाहीच उलट लिहीणाऱ्याची निर्बुद्धता दाखवून देणारे आहे.

Pages