चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स

Submitted by हरचंद पालव on 5 December, 2020 - 01:18

भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.

चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.

खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील

आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.

lincoln.jpg

Group content visibility: 
Use group defaults

फ्लॉपीत नाही का नको असलेल्या फायली आपण एक कमांड देऊन डिलीट करत ?>>>> हे अनादी काळातलं लेखन वाटतयं, बहुतेक आजच्या कंटेंट क्रिएटर्सचा उत्क्रांती पुर्व काळातील कुणी पुर्वज असावा. जेव्हा फ्लॉपी, डायल अप मोडेम अशा गोष्टी अस्तित्वात होत्या. Rofl
images (3) (6).jpeg

वाफेचं मशीन, मोबाइल, फ्लाॅपी, पोस्टाचा स्टॅम्प, स्नोपावडर, घरी आले की आंघोळी करणारे पाहुणे व त्यांचं खटलं, पळून गेलेली सुमी, अशा वाट्टेल उदाहरणांनी मढवलेल्या या झोपडीवजा मेसेजचं सार काय नक्की? काहीही कळलं नाही. बिचारे खरेच, संदीप खरे!!

विमानाच्या फर्स्ट क्लास मध्ये साध्या कपड्यातील सुंदर पिचाई बरोबर एका हवाई सुंदरीने गैरवर्तन केल्याचा AI च्या मदतीने तयार केलेला व्हीडिओ सोमी वर ट्रेंडिंगला आहे.

Pages