चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स

Submitted by हरचंद पालव on 5 December, 2020 - 01:18

भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.

चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.

खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील

आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.

lincoln.jpg

Group content visibility: 
Use group defaults

अरे प्रत्येक धाग्यावर हे बॉट सारखे तेच तेच वर्शाविहारचे सन्देश आता चीप पब्लिसिटी स्टंट वाटू लागले आहेत. आवरा.

बापरे Lol
सात वर्तुळात १२ लिंबं कसे ठेवत होते ते पण सांगा ना...

Lol
बरोबर आहे. तरी बरं मंदोदरी आणि रावणावर पूर्वार्धात 'बीवी नं १' गाण्याचं रिमिक्स लावलं नाही.

जेव्हां एखादी स्त्री म्हणते कि "तुम्हाला आवडतं ना मला साडीत / पंजाबी / वेस्टर्न लिक मधे पहायला ? म्हणून ही खरेदी "
तेव्हां खरे तर नवर्‍याने सावध असायला पाहीजे.
कारण तुम्हाला आवडतं ही खरी मेख असते.
अशा पद्धतीने बायका मला नव्हतीच घ्यायची पण तुमच्यावर उपकार म्हणून या सदराखाली स्वतःसाठी भरमसाठ खरेदी करत असतात.
आणि वर " मी कशी दिसते ?" म्हणून मूर्खात काढत असतात.
कारण पुरूष मूर्ख असतात यावर बायकांची श्रद्धा असते.
शिवाय लहानपणापासूना मूर्ख बनवण्याच्या क्लास मधे त्यांचं नाव बाय डिफॉल्ट नोंदवलेले असते.
तुम्ही कधी ऐकलेय का एखाद्या नवर्‍याला बायकोला विचारताना " मी कसा दिसतो या शर्ट प्यांट मधे ?"
नाही ना ?
तुम्ही कधी ऐकलेय का एखाद्या नवर्‍याला बायकोला सांगताना "तुला आवडतं ना म्हणून मी शर्ट प्यांटची खरेदी केलीय"
नाही ना ?
कारण नवरा बायकोमधे नवर्‍यासाठी कपड्याची खरेदी हे गृहीतच धरलेले नसते.
आपल्याला आवडते म्हणून बायको खरेदी करते हे त्याच्या मेंदूमधे इतके बारकाईने कोरलेले असते कि स्वतःसाठी पण कपडे घ्यायचे असतात हेच तो विसरलेला असतो.
आणि घेऊन घेऊन तरी काय घेणार ?
तेच ते शर्ट आणि प्यांट. फारतर टी शर्ट आणि जीन्स.
चॉईसच नाही दुसरा.
बायकोला कधी कधी गिल्टी फिलिंग येतं कि आपण या बाबाला खूपच फसवलंय.
मग तीच म्हणते "अहो, किती दिवस तेच तेच शर्ट आणि प्यांट ? ढेरी बाहेर आलीय ना "
मग खूप आग्रह करून ती दोन शर्ट सिलेक्ट करते, एक प्यांट सिलेक्ट करते.
बिल आपले आपल्यालाच द्यायला लावते.
मग दोन तीन वर्षे "बघा, तुम्हाला मी कपडे घेऊन दिले" हे ऐकवत राहते.
एव्हढ्या काळात वर्षाला पंधरा लग्ने, डोहाळ जेवणे, वाढदिवस, बाहेर फिरायला, माहेरी जायला अशा विविध कारणांसाठी एक एक साडी घेऊन झालेली असते.
पण नवर्‍यांच्या ल़क्षात येईल तर ना ?
कारण त्यांची सुई एकाच टेपवर अडकलेली असते.
तुम्हाला आवडतं ना म्हणून...

- सर विव्हियन रिचर्डस

(समस्त नवर्‍यांना सावध करण्यासाठी शेअर करा, फॉरवर्ड करा.)

काहीही हं खरेच!
नवरा बायकोंचे हे असले जोक फार पांचट झालेत आता....!!
आता कुणी नाही असे वागत..आणि त्यावर हसत!
Angry

हपा Lol
ती addition माझी आहे. नाहीतर कुठे पोस्टावं ते समजत नव्हतं. Lol

विवीयन रिचर्ड हे अति महान आहे Happy
मी आता 'पुरुष माणसांना पाली घालवता आल्याच पाहिजे' अश्या आशयाचा फॉरवर्ड सुधा मुर्तींचं नाव टाकून लिहिणार आहे Happy
सर्वांनी सावध राहा.

हा वरचा उतारा मी 'वाचू आनंदे' या संग्रहात वाचलाय. अगदी नेमके हेच शब्द असतील किंवा नसतील पण हाच अर्थ आहे हे नक्की.

अच्छा..म्हणजे चुकीच्या पुस्तकाच्या नावाने आहे हा. Happy वाचू आनंदे हे वेगवेगळ्या लिखणांचा संग्रह आहे ना? मग मूळ कदाचित बरोबर असू शकेल. मी चार शब्द वाचलेलं नाही.
तरी पण काहीही आहे. पुलंचं सगळंच पटलं पाहिजे असं नाही.

Pages