भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.
चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.
खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील
आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.
ते काही का असेना, वरील विचार
ते काही का असेना, वरील विचार असणाऱ्या लोकांनी, असे लोक माहितीत असणाऱ्या लोकांनी मला संपर्क करा.
देणग्या हव्या आहेत.
(No subject)
वेंकटपावनीभानूचंद्रिका हॅ हॅ
वेंकटपावनीभानूचंद्रिका हॅ हॅ हॅ
बॉलिवूड च्या कितीतरी गाण्यांचे मीटर चुकले असते...
हॅलो हॅलो बोलके... मेरे आजू बाजू डोलके.
हॅलो हॅलो...तू प्लोअर पें जब है आयी...
दिल मेरा बोले हॅलो हाऊ आर यू...
(खरं तर असे सेम टू सेम शब्द
(खरं तर असे सेम टू सेम शब्द मायकल जॅक्सन आणी त्याच्या नंतर देवाघरी गेलेल्यांचेही होते) >>>
ह.पा. - बहुधा प्रसिद्ध व्यक्ती शेवटच्या घटका मोजत असल्या की मीडीयावाले लेख तयार ठेवतात त्याचबरोबर हॉस्पिटल मधे जाउन हा लेख वाचायला लावतात असे दिसते
तुमच्या पैकी कुणाला हा
तुमच्या पैकी कुणाला हा फॉरवर्ड आला नाही का? मला नक्की शब्द नाही आठवत, पण साधारण असं होतं ते
Morning law college ला मराठीत काय म्हणतील?
प्रातःविधी महाविद्यालय.
हां जेवढं मला आठवतंय तेवढं म्हणजे असं विधान पु. ल. देशपांडे यांनी केलं होतं असं त्या फॉरवर्ड मधे म्हटलं होतं
नंतर अजून एक
नाथमहाराज कि नामदेव महाराजांचा ते नदीवरून अंघोळ करून परत येताना एक यवन त्यांच्या अंगावर थुंकला असं अनेक वेळा झालं पण ते चिडले नाही अशी गोष्ट शिक्षक शाळेत सांगत असतात आणि तात्पर्य विचारतात. सगळी मुलं सहनशीलता वगैरे वगैरे घ्या गप्पा मारतात. पण एकच विद्यार्थी शांत असतो. शिक्षक त्याला विचारतात की तु का शांत आहेस तेव्हा तो बाणेदारपणे उत्तर देतो की मी त्यांच्या जागी असतो तर असं वागणार्याला मोकळं सोडलं नसतं, यांव केलं असतं आणि त्यांव केलं असतं वगैरे.
आणि तो बाणेदार विद्यार्थी म्हणजेच
विनायक दामोदर सावरकर
काहीही! Morning Law college
काहीही! Morning Law college असं खरंच काही आहे का आधी त्यांनी प्रातर्विधीचा विनोद तयार करून मग उलट भाषांतर केलं आहे? पुलंचा नक्कीच नसणार.
फेसबुकवर हे असले विनोद पुलंच्या नावावर येतात आणि त्याखाली लोक उगाच ' पुल म्हणजे पुल ' ' फक्त पुलच असं बोलू शकतात ' असल्या छापाचे प्रतिसाद देतात. (डोक्यावर हात मारणारी बाहुली)
फेसबुकवर हे असले विनोद
फेसबुकवर हे असले विनोद पुलंच्या नावावर येतात आणि त्याखाली लोक उगाच ' पुल म्हणजे पुल ' ' फक्त पुलच असं बोलू शकतात ' असल्या छापाचे प्रतिसाद देतात >>> +१ टोटली. त्यामुळे अनेकदा असे वाटते की पुलं आवडणार्या अनेक लोकांनी त्यांचे अस्सल लेखन नक्की किती वाचले आहे माहीत नाही. बरेच लोक निव्वळ ऐकीव कथाकथनावरच आहेत. वीट येणे, "अहो कसला गांधी!" वगैरेच्या पुढे त्यांना माहीतही नाही. हे थोडे केवळ शहेनशाह, अग्निपथ, हम बघून अमिताभचे फॅन झालेल्यांसारखे आहे.
बरेच लोक निव्वळ ऐकीव
बरेच लोक निव्वळ ऐकीव कथाकथनावरच आहेत. >>> अगदी.
काल प्रतिलिपीशी भांडण्यात वेळ गेला. रेल्वेस्टेशनवाली कथा कुणीतरी स्वतःच्या नावाने खपवलीय हे समजलं म्हणून बघितलं. आधी पण कुणीतरी सांगितलं म्हणून आता प्रकरण ९ शीर्षकाखाली सारांश दिलाय. ते ही कॉपी पेस्टच.
गंमत म्हणजे नामवंत लेखकांच्या कथा पण तिथे दिल्यात. कुणीच कसं सांगत नाही त्यांना ? वाचन असेल तर लक्षात येईल .
मध्यंतरी कुणीतरी एक फॉरवर्ड
मध्यंतरी कुणीतरी एक फॉरवर्ड पु. लं.च्या काही कोट्या आणि काही ‘मनाचे श्लोक‘ एकत्र करून पाठवला होता. त्यात काहीतरी ऑनलाईन शॉपिंगवरून सुद्धा कोटी(?) होती.
अहो कसला गांधी >> हे वाक्य
अहो कसला गांधी >> हे वाक्य लोक पुलंचं मत म्हणून घेतात आणि त्यांना एका गांधी टोपीचा प्रवास ह्याबद्दल सांगा, तर म्हणतात की पुल असं लिहूच शकत नाहीत!
रानभूली, हे गंभीर आहे. आपलं लिखाण लोकांनी परवानगी न घेता आपल्या पानावर टाकलं तर काय पावले उचलावीत ह्याबद्दल मिपावर एक धागा आहे, नक्की वाचा.
*व. पु .काळे.*
*व. पु .काळे.*
आमचं फार पटतं,
WE ARE VERY CL0SE _
जवळपास ही वाक्यं बऱ्यापैकी खोटारडी आहेत !
माणसाचं दुःख कमी होण्यासाठी
हल्लीच्या तकलादू RELATI0NS चा काहीही उपयोग नाही..
उपयोग का नाही ?
कारण मित्र किंवा नातेवाईक कितीही CL0SE असोत,,,
हल्ली फक्त GET T0GETHER करतात,
शेक हॅन्ड करतात,
आपलं यश सांगतात,
त्याचं आवर्जून प्रदर्शन करतात, पण कोणीही कुणाला आपलं दुःख सांगत नाही,
त्यात मात्र कमीपणा मानतात, स्वत:चं अपयश समजतात..!
खाणे-पिणे, हसणे-खिदळणे
किंवा एखाद्या रेकॉर्डेड गाण्यावर
सर्वांनी मिळून डान्स करणे
हे सुख नाही, हा फक्त सुखाचा आभास निर्माण करण्याचा प्रयास आहे..
याचा अर्थ या गोष्टी करू नयेत असा नाही.
परंतु..
जोपर्यंत माणसं खरं दुःख एकमेकाला सांगणार नाहीत, मनमोकळं रडणार नाहीत,
तोपर्यंत आपल्याला कधीही हलकं वाटणार नाही..!
आजूबाजूला काय दिसतंय.?
चेहरे चिंताग्रस्त आहेत
मुखवटे मात्र हसत असतात.
म्हणून आजकाल माणसं
खूप दुःखी दिसतात.
मग यावर उपाय.. ?
उपाय नक्कीच आहे !
आपल्या दुःखाला कुणी हसणार नाही, माघारी टिंगल टवाळी करणार नाही हा विश्वास आपल्याला निर्माण करावा लागेल.
तरंच आपल्या भेटण्याला काही तरी अर्थ असेल !
हसणे आणि रडणे या क्रिया जोपर्यंत खळखळून होणार नाहीत तोपर्यंत आनंदी किंवा FRESH चेहरे कधीही दिसणार नाहीत !
मनातल्या मनात दुःख कोंडल्यामुळे किंवा भावभावनांचा निचरा न झाल्यामुऴेच रक्त वाहिन्या मध्ये ब्लॉकेजेस होतात,
आणि दिवसेंदिवस आपल्याशी मनापासुन गोड बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.
*एक लक्षात घ्या -*
*ब्युटी पार्लरमधे गेल्यामुळे चेहरे तेजस्वी होत नसतात..*
*मसाज केल्यामुळे वेदनाही कमी होत नसतात ..*
*चार फोटो काढल्याने सौंदर्य वाढत नाही..*
*इतरांविषयी पाठीमागे वाईट बोलण्याने आपण चारित्र्यसंपन्न असल्याचे सिध्द होत नाही, उलट आपलं खरं रुप बाहेर पडतं...*
पूर्वी आपण एकाद्याकडे पाहुणे होऊन जायचो, जे देतील ते आनंदाने खायचो..
ओसरीवर, बैठकीत, एकत्र झोपायचो..
खळखळून हसायचो..
एकमेकाला दुःख सांगून
गळा काढून मग मन मोकळे रडायचोही..
हुंदक्यांमागे हुंदके यायचे
आणि AUT0MATIC कपालभाती होवून जायची..
कुणीतरी जवळ घ्यायचं,
पाठीवरून हात फिरवायचं,
रडू नको म्हणत म्हणत
घट्ट कवटाळून धरायचं..
खूप मोठा आधार वाटायचा..
हत्तीचं बळ यायचं.
माझ्याबरोबर सगळे आहेत
असं मनापासून वाटायचं..
काळवंडलेले चेहरे
एकदम खुलून जायचे.
चेहरे एकदम FRESH आनंदी
दिसायचे..
मित्रहो
आपल्यालाही तेच करावं लागेल
दुसरं काहीही नाही,
नाहीतर नुसते खोटारडे सुखी चेहरे घेऊन केलेल्या दिखाऊ
Good morning
G00D DAY
ना काहीही अर्थ नाही.!!
*_व पु काळे.*
*संकल्प : आनंदी जीवनाचा !*
हुंदक्यांमागे हुंदके यायचे
हुंदक्यांमागे हुंदके यायचे
आणि AUT0MATIC कपालभाती होवून जायची..
>>>>एपिक
(No subject)
एपिक
एपिक
“ हुंदक्यांमागे हुंदके यायचे
“ हुंदक्यांमागे हुंदके यायचे
आणि AUT0MATIC कपालभाती होवून जायची..”
“ हुंदक्यांमागे हुंदके यायचे
“ हुंदक्यांमागे हुंदके यायचे
आणि AUT0MATIC कपालभाती होवून जायची..” >>>
वपुंनी नंतर बहुधा इंटरनेट, सोशल नेटवर्क, टिकटॉक, कुबरनेटीस ई वरही असेच लिहीले असेल
त्यांची हुंदक्यानी कपालभाती
त्यांची हुंदक्यानी कपालभाती अन् आपली हसहसुन भ्रस्तिका झाली.
AUT0MATIC कपालभाती
AUT0MATIC कपालभाती
मनातल्या मनात दुःख कोंडल्यामुळे किंवा भावभावनांचा निचरा न झाल्यामुऴेच रक्त वाहिन्या मध्ये ब्लॉकेजेस होतात,
आणि दिवसेंदिवस आपल्याशी मनापासुन गोड बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. >>> 'आणि' ने जोडलेल्या या दोन वाक्यांचा, 'ती दोन्ही विनोदी आहेत' याव्यतिरिक्त एकमेकांशी काय संबंध आहे?
असं म्हणू नका वावे. सुकडू
असं म्हणू नका वावे. सुकडू सुताराने कपाटांचं काम नीट केलं नाही हे सांगायला मी पूर्वी गावभर फिरायचो आणि भावभावनांचा निचरा करून घ्यायचो. आता तसं करायला किंवा ते ऐकून घ्यायला लोकच राहिले नाहीत गावात. सगळे मुंबईला जाऊन मोठे कलेक्टर झाले आहेत ... भायखळ्याच्या स्टेशनावर.
बरोबर आहे हरचंद पालव तुमचं.
बरोबर आहे हरचंद पालव तुमचं. आता म्हशी तरी कुठे राहिल्यात म्हणा तशा! पूर्वी कशा, पूर्वेकडून ईशान्येकडे जातानासुद्धा बरोब्बर एसटीसमोर यायच्या. आता त्या म्हशीही गेल्या आणि एसटीचंही काही खरं नाही!
ह.पा., वावे
ह.पा., वावे
वपुंच्या पोस्टपेक्षा ह पा आणि
वपुंच्या पोस्टपेक्षा ह पा आणि वावेंच्या पोस्ट भारी आहेत
*इतरांविषयी पाठीमागे वाईट
*इतरांविषयी पाठीमागे वाईट बोलण्याने आपण चारित्र्यसंपन्न असल्याचे सिध्द होत नाही, उलट आपलं खरं रुप बाहेर पडतं...*>> लोल
खर रुप चारित्र्य संपन्न असेल तर ? ते बाहेर पडल तर ?
वावे, हपा
आमच्याकडे एका वर्षी प्रचंड दोडके लागलेले. नेबरहुडमध्ये देवून सुद्धा संपले नव्हते. एक नुकतीच ओळख झालेले कपल आमच्याकडे आले होते. त्यांना अमेरिका अज्जिब्बात आवडत नव्हती. (पण सिटिझन शिप घेतलेली.) भारतातलेच सगळे ग्रेट, महान, उच्च संस्क्रुती वगैरे चालू होते.
मी तिला म्हटल दोडके तोडू का ताजे. घेवून जाणार का ?
ती त्यावर म्हणाली , " अलिकडचे दोडके वगैरे खाण्याची इच्छाच राहिली नाही. काय पुर्वीचे दोडके असायचे भारतातले.!! इथले दोडके कसले ग!!
आता आपल वय वाढल, (३०च्या असु तेव्हा. ) त्यामुळ चवीतला फरक सोसवत नाही. दोडके भारतातलेच खावेत बाई. नको देवुस इथले. "
मी बरं म्हटल. वाईन कॅलिफोर्नियाची होती. ती तिला ऑफर केली. आणि भारतातली वाईन नाही माझ्याकडे म्हटल. चालते म्हणाली ती.
" काय पुर्वीचे दोडके असायचे
" काय पुर्वीचे दोडके असायचे भारतातले" - अशी कुंपणावरची माणसं वात आणतात.
सीमा
सीमा
प्रधान.जी आठवले. आल्यागेल्या
प्रधान.जी आठवले. आल्यागेल्या सगळ्यांना दुधी!
काय पुर्वीचे दोडके असायचे
काय पुर्वीचे दोडके असायचे भारतातले >>> एका अर्थाने भारतातले लाडके व इथले दोडके!
आणि भारतातली वाईन नाही माझ्याकडे म्हटल. चालते म्हणाली ती. >>> हे ही भारी.
फारेंड, अमित या बाफशी रीलेटेड
फारेंड, अमित या बाफशी रीलेटेड नाही पण हा कॉमेडिअन तुम्ही फॉलो करता का ? Steve Trevino. हा खालचा व्हिडिओ 'वाईफ प्रॉब्लेम' मस्तच आहे पण बाकीचे पण जबरदस्त आहेत. Relatable, Tell me what you want ,The fights इत्यादी एपिसोड एकदम भारी आहेत.
https://www.youtube.com/watch?v=vahoE9zparA
दोडका आणि वाईन पोस्ट भारी आहे
दोडका आणि वाईन पोस्ट भारी आहे
अमित, 'लवकी लाए हैं!'
हे कायप्पा वर आलंय...
हे कायप्पा वर आलंय...
Pages