चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स

Submitted by हरचंद पालव on 5 December, 2020 - 01:18

भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.

चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.

खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील

आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.

lincoln.jpg

Group content visibility: 
Use group defaults

स्वामी विवेकानंद व रतनटाटा

Contact आणि Connection
मध्ये नेमका काय फरक ? (एक सत्यकथा)
* धनंजय देशपांडे
-
घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले.
त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यातील एकाने साधूला विचारलं,
"साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला. पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?"
साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले.
साधू : "तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?"
पत्रकार : "येस !! का हो ?"
साधू : "घरी कोण कोण असत?"
*
आपल्या प्रश्नाचे उत्तर टाळण्यासाठी साधूबाबा असं काहीतरी वेगळं विचारत आहेत असं त्या पत्रकाराला वाटलं. कारण त्याचा प्रश्न सार्वजनिक होता अन साधू तर खाजगी काहीतरी विचारत होते.
तरी मूळ प्रश्नाचे "उत्तर" मिळण्याच्या आशेने तो पत्रकार उत्तर देत गेला.
तो म्हणाला : "माझी आई आता नाहीये. वडील व आम्ही तिघे भाऊ बहीण ! सगळ्यांची लग्न झाली आहेत. सेपरेट बंगले असून सर्व सेटल आहेत."
साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत असता का ?"
(आता मात्र त्या पत्रकाराला थोडा राग यायला लागला.)
साधू : "तुमच्या वडिलांशी शेवटचे तुम्ही कधी बोलला ? काही आठवतंय का ?"
पत्रकाराने राग आवरत सांगितलं : "बहुतेक एक महिना झाला असावा."
साधू : "तुमच्या बहीण भावाशी नेहमी भेटीगाठी करता का ? एक कुटुंबीय म्हणून शेवटचे तुम्ही कधी एकत्र भेटले?"
(आता पत्रकाराच्या कपाळावर घाम यायला लागला, की मुलाखत कोण कुणाची घेतेय?)
तरी त्याने उत्तर दिले : "गेल्या वर्षीच्या ख्रिसमसमध्ये भेटलेलो"
साधू : "त्यावेळी किती दिवस एकत्र होता?"
पत्रकार (हळवा होत) : "तीन दिवस होतो"
साधू : "तुम्ही बहीण भावांनी त्या काळात किती वेळ वडिलांच्या अगदी जवळ बसून घालवला ?"
(पत्रकार आता थोडा लाजिरवाणा होऊन, मान खाली घालून कागदावर काहीतरी रेघोट्या मारत बसला.)
साधू : "तुम्ही तुमच्या वडिलांसोबत नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचे जेवण केले का ?"
वडिलांना विचारलं का ? की कसे आहात? आईच्या निधनानंतर ते एकटे जगत होते तर वेळ कसा घालवला?"
(असं म्हणत त्या साधूने पत्रकारला आपुलकीने जवळ घेतल)
साधू : "बेटा, नाराज होऊ नको, लाजिरवाणा पण होऊ नको. तुला असं नकळत दुखावल्याबद्दल उलट मी माफी मागतो. पण तुझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर यात होते.
Contact आणि Connection !!
तू तुझ्या वडिलांच्या फक्त Contact मध्ये आहेस.
मात्र तुझं त्यांच्याशी कोणतेही Connection नाहीय.
You are not connected to him.
आणि वडील संपर्कात असणं वेगळं अन त्यांच्याशी "लगावं" असणं वेगळं.
कारण Connection नेहमी हे आत्म्याचे आत्म्याशी होत असते.
एकत्र बसणे, भोजन सहवास, एकमेकांची काळजी घेणं, डोळ्यांनी संपर्कात नव्हे तर डोळ्याची भाषा ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणे, आपुलकीचा स्पर्श, हात हातात घेणं.... हे सगळं Connection मध्ये येत. Contact मध्ये नाही.
तुम्ही तुमची भावंडं, वडील यांच्या Contact मध्ये आहात पण कोणतेच Connection आपसात नाही.
*
आता पत्रकाराच्या डोळ्यात पाणी आलं.
एक चांगला धडा गिरवून दिल्याबद्दल आभार मानून त्या पत्रकाराने त्यांना नमस्कार करून निघाला.
*****
आज आपल्या भोवताली बहुतेक घरी असच दिसत. घराबाहेरही तसेच दिसत. सगळे एकमेकांच्या Contact मध्ये आहेत पण कुणाशी Connection (लगाव असा) काही नाही. कसला संवाद नाही. कसल्या चर्चा नाहीत. सगळे स्वमग्न झालेत. करोनाने आपल्याला इतकं बदलवल ? मला नाही वाटत तसं. आपण वरचेवर बदलत चाललोय. हेच खरं. अन जर अवघ्या नऊ महिन्यात त्या करोनाने आपल्याला बदलवल असेल तर मग इतक्या वर्षाचे आपले संस्कार, आईवडील गुरुजींनी शिकवलेले ते सगळे कुठं गेले ?
माझ्यावर पण रागावू नका पण दाहक असलं तरी सत्य हेच आहे. तर म्हणून पुन्हा एकदा सगळं सगळं झटकून पुन्हा मस्त संवाद वाढवू. गप्पा मारू. एकमेकांच्या पाठीशी राहू. श्री रतन टाटा म्हणाले तसे "या वर्षी फक्त जगायचे ठरवू. प्रगतीचे पुढच्या वर्षी पाहू"
सो... चियर अप मंडळी ! मस्त हसा,
असो !
आता सांगतो वरील घटनेतील "साधू" म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी विवेकानंद होते....

आर्य चाणक्यच दुसरं कोण? शेंडीला गाठ नाही म्हणून खरंच असलं पाहिजे Wink शिवाय शेल्यावर ते चेहरा असलेले क्रिपी च्युइंगम बघा ....
IMG-20201207-WA0004.jpg

Lol मजेदार फॉर्वड्स.

करोनाने काही कुणी बदललं नाही. जे काही under the carpet होते ते करोनामुळे बाहेर आले आहे, एवढचं. आता प्रश्न असा आहे की आलं आहेच बाहेर तर - करायचं ह्या जन्मीच साफ की परत ढकलायचं कार्पेटखाली की अजून तिसरंच काहीतरी? जाऊ द्या, मस्त गुड-डे खाओ, खुश हो जाओ...

अजून एक जर्मनीत गेलो काही खायला ऑर्डर केले, उरले, सोडून दिले मग जर्मन लोकांनी लगेच फोन करून ऑफिसर्स ना बोलावले... फाईन भरावा लागला ..आणि पुढे नेहमीप्रमाणे अन्न नासाडी, तिकडे लोक उपाशी मरतात वगैरे आख्यान.. असे एक फॉरवर्ड आहे. ते रतन टाटा आणि अजून कोणा कोणाच्या नावेने फिरवलं जातं (त्यांनीच आपला अनुभव लिहिला आहे असे दाखवून.)

काही वर्षांपूर्वी लॉर्ड मेकॉले यांच्या नावाने हे भाषण सर्वत्र जोरात फॉरवर्ड झाले होते.
तेंव्हा माझ्यासहित अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला होता.

आज इंटरनेटवर या भाषणाची पडताळणी करून ते खोटे कसे आहे ते दाखवणाऱ्या बऱ्याच पोस्ट्स उपलब्ध आहेत:

पड़ताल: क्या मैकाले ने कहा था, 'भारत को गुलाम बनाने के लिए वहां की संस्कृति भ्रष्ट करनी होगी'?

Fact Check: Don’t believe this FAKE quote by Lord Macaulay on Indian culture and education

What is the truth behind this speech by (Lord Macaulay)?

The Infamous Macaulay Speech That Never Was

बिल gets >>> हे महान आहे Happy

मधे पंडित नेहरूंनी अ‍ॅटलीला लिहीलेले पत्र फिरत होते. त्यात पंडितजींनी इंग्रजी स्पेलिंग्/ग्रामर चुकाही केल्या होत्या! एरव्ही अनेक गोष्टी पारखून घेणार्‍या माझ्या एका मित्राने ते त्याच्या फेबुवर शेअर केले होते Happy

मजेदार धागा. Biggrin
१० डाउनिंग स्ट्रीट मधलं ing हे बहुधा चालू वर्तमानकाळ दर्शवायला जोडलेलं वाटलं असल्याने हे पत्र भूतकाळातील वाटायला काढून टाकलेलं दिसतंय Wink

अतुल Lol हो हेच बहुधा. पण कदाचित व्हर्जन्स होत्या.

१० डाउनिंग स्ट्रीट मधलं ing हे बहुधा चालू वर्तमानकाळ दर्शवायला जोडलेलं वाटलं असल्याने हे पत्र भूतकाळातील वाटायला काढून टाकलेलं दिसतंय >>> Lol हो नशीब "Downed" स्ट्रीट नाही केले.

"ज्वाहरलाल" नेहरूंनी लिहीलेले पत्र Happy "concider" करायला!

इंग्लिश चा धुमाकूळच आहे ह्यात:

Down Street, treachary, the Russians, Rassia, concider, Sencerely

एव्हढी कसली घाई झाली होती "नेहरुंना" कि स्पेलचेक सुद्धा न करता दिले सोडून सोशल मीडियात.
शेवटी कविता पण आहे:

take note of it
do proper and fit

Lol

Down Street, treachary, the Russians, Rassia, concider, Sencerely >>> Lol अरे हो की. जितक्या वेळा वाचावे तितक्या नवीन सापडतात.

खरेच असे पत्र आले असते तर अ‍ॅटली स्वतःच पायउतार होउन चर्चिल ला परत म्हंटला असता हे तूच बघ एम्पायर वगैरे.

*B. J. P. रहेगी तो एक दिन "चांद पर तिरंगा" होगा...
पर कहीं (CONGRESS) आयेगी तो- झंडे पर "चांद" होगा... बस यह हमेशा याद रखना !..*
*जय हिंद*
*देशहित में जारी*
*बीबीसी के विख्यात पत्रकार मार्क टुली नें ब्यान दिया है, कि "मोदी इस देश के उस बडे बरगद को उखाड़ कर गिरा रहे हैं, जिसमें वर्षों से विषैले कीड़े लगे हुए हैं ! इसके लिए उन्हे लगातार महासंघर्ष करना होगा !"*
*मोदी नें देश में छुपे सारे जहरीले नागों के बिल में एक साथ हाथ डाल दिया है, इसलिये ये नाग फुफकार रहे हैं, कांग्रेस, वामपंथ, जेहादी, नक्सली, मिशनरी सहित हर तरह के नागों को कांग्रेस नें अपनें पास छुपाए रखा था, भारत भूमि को बर्बाद करने के लिए, वो तो अच्छा हुआ कि मोदी सत्ता में आ गये और इन जहरीले नागों से देश को परिचित और सतर्क कर इन्हें बेनकाब कर दिया, वरना ये जहरीले नाग आनें वाले समय में इस भारत भूमि और हिन्दूओं को निगल जाते और हमारी आनें वाली पीढ़ियों के पास सिवाय रोने, बिलखने के इलावा कुछ नही बचता।*
*मोदी को बहुत संघर्ष करना होगा और मोदी संघर्ष कर भी लेगा, परन्तु इस देश वासियों को खासकर हिन्दुओं को मोदी के साथ डट कर खड़ा रहना होगा*,
*क्योंकि मोदी नें ये जंग अपनें लिये नहीं, बल्कि यह हमारे देशवासी बच्चों, आनें वाली पीढियों और भारत के उज्जवल भविष्य के लिए जंग छेड़ी हुई है।*
कृपया जनहित में यह आगे भेज कर अन्य देशवासियों को भी जगानें का काम करें !!.
Read to feed unknown knowledgeable janta:

https://www.altnews.in/modi-destroying-old-termite-ridden-banyan-tree-wr...

कम से कम
पांच लोगों को भेजे
देश को सच्चाई बताया

'मी कंपनीत पूर्ण वेळ हा विचार करण्यात घालवतो की संध्याकाळी कंपनी सुटल्यावर लवकर बाहेर पडण्याचा शॉर्टकट कुठला आहे.' -बोकलत
हे खरोखरच काही दिवसांपूर्वी माझ्या नावाने कंपनीत फॉरवर्ड झालं होतं. Hr ची समजूत काढताना माझ्या नाकी नऊ आले होते.

हे खरोखरच काही दिवसांपूर्वी माझ्या नावाने कंपनीत फॉरवर्ड झालं होतं. Hr ची समजूत काढताना माझ्या नाकी नऊ आले होते. >>> Lol

Hr ची समजूत काढताना माझ्या नाकी नऊ आले होते. >> Lol ऐसे फॉर्वर्ड बनानेवाले दोस्त हो तो जिंदगीमें दुश्मनोंकी कोई कमी नै....

हे खरोखरच काही दिवसांपूर्वी माझ्या नावाने कंपनीत फॉरवर्ड झालं होतं. Hr ची समजूत काढताना माझ्या नाकी नऊ आले होते. >>> Lol

Pages