भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.
चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.
खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील
आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.
सापडलं!!
सापडलं!!
आचार्य दादा धर्माधिकारी यांचं आहे.
वाचू आनंदे, बाल गट-२.
भारताचा नकाशा जास्त बिलिवेबल
अरे हे विचारधन वाले दादा धर्माधिकारी की काय. दरवर्षी असलं काय काय विचारधन शिकवायचे ते आठवलं.
बाकी, भारताचा नकाशा जास्त बिलिवेबल आहे. जगाच्या नकाशात माणूस कसा बसेल? पोटात छातीत पाणी होईल ना!
चार शब्द म्हणजे पुलंच्या
चार शब्द म्हणजे पुलंच्या भाषणांचा संग्रह आहे का?
पुलंनी भाषणात ही गोष्ट उद्धृत केलेली असू शकते.
नुसती गोष्ट वाचताना भाबडी वाटली तरी संदर्भासहित ती चांगली वाटू शकते.
पण इन जनरल पुलंची ओरिजिनल वाक्यंसुद्धा संदर्भ सोडून फॉरवर्ड करणाऱ्यांचा मला अतिशय राग येतो. पुलंचे बहुतांश विनोद हे त्या त्या मूळ संदर्भासहित वाचण्यात जी मजा आहे ती अशा अधांतरी फिरणाऱ्या विनोदांमध्ये नाहीच, शिवाय असे फिरवून ते विनोद उथळ होऊन जातात!
माणसाच्या बेताचे जग आणि
माणसाच्या बेताचे जग आणि जगाच्या बेताचा माणूस... आवरा ...
बरोबर आहे वावे. संदर्भाबद्दल
बरोबर आहे वावे. संदर्भाबद्दल आभार.
पुलंचे बहुतांश विनोद हे त्या
पुलंचे बहुतांश विनोद हे त्या त्या मूळ संदर्भासहित वाचण्यात जी मजा आहे ती अशा अधांतरी फिरणाऱ्या विनोदांमध्ये नाहीच, शिवाय असे फिरवून ते विनोद उथळ होऊन जातात! >>> +१
भूगोलाच्या शिक्षकाने भौगोलिक माहितीवरून राज्यांचे आकार कसे ओळखायचे शिकवायचे सोडून हे काय उद्योग करतोय? उद्या पेपर लिहीताना मुलांनी प्रश्नपत्रिकेच्या मागे पाहायचे काय?
पुलंचे बहुतांश विनोद हे त्या
डबल पोस्ट
ताजा ताजा है. भोंदू असणार.
ताजा ताजा है. भोंदू असणार.
ताजा नाहीये हो, दोन चार
ताजा नाहीये हो, दोन चार वर्षांपासून फिरतोय
https://hindi.news18.com/news/business/china-is-dumping-dangerous-firecr...
ही 2020 ची लिंक
दर वर्षी सरकारला एकदा तरी खुलासा करावा लागतोच
(No subject)
*ज्ञानेश्वर माऊलीचे हे १०
*ज्ञानेश्वर माऊलीचे हे १० विचार अतिशय सुंदर वाटलेत म्हणुन मी आपल्याला पाठवित आहे आपण सुद्धा अवश्य वाचा ही विनंती*
*संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहलेले काही विचार :-*
*१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.*
- *संत ज्ञानेश्वर*
*२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.*
- *संत ज्ञानेश्वर*
*३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.*
- *संत ज्ञानेश्वर*
*४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.*
- *संत ज्ञानेश्वर*
*५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.*
- *संत ज्ञानेश्वर*
*६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.*
- *संत ज्ञानेश्वर*
*७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !*
- *संत ज्ञानेश्वर*
*८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.*
- *संत ज्ञानेश्वर*
*९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.*
- *संत ज्ञानेश्वर*
*१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.*
- *संत ज्ञानेश्वर*
भयंकर.
भयंकर.
सकारात्मक विचार आणि पॉझिटिव्ह एनर्जीचे नवपुजारी सहज ओळखु येतात हे त्यांच्या गावीही नसते.
भयंकर आहे हे! ज्ञानेश्वर
भयंकर आहे हे! ज्ञानेश्वर माऊलींच्या नावानी काहीही खपवणे!
खरंच भयंकर आहे हे!
खरंच भयंकर आहे हे!
या रेट ने भारत माझा देश आहे.
या रेट ने भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत याचं श्रेय ही संत ज्ञानेश्वर लाटणार!
पसायदान लिहिणाऱ्या
पसायदान लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या नावाने हे 'सुविचार' ?????
आचरटपणाचा कळस आहे
आवरा!
आवरा!
या रेट ने भारत माझा देश आहे.
या रेट ने भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत याचं श्रेय ही संत ज्ञानेश्वर लाटणार! >>>>
अमितव
अमितव
'मी चोरी केलेली नाही' असं
'मी चोरी केलेली नाही' असं पुन्हा पुन्हा कुणी म्हटलं तर आधी संशय त्याच माणसावर जाईल, तसं सुविचारानंतर प्रत्येकवेळी 'संत ज्ञानेश्वर' लिहिलेले खटकले. याने फेकाफेकीत सहजता राहिली नाही. Individually wrapped cookies सारखे individually wrapped सुविचार वाटले.
individually wrapped सुविचार
individually wrapped सुविचार वाटले. >> पटकन उचला आणि तोंडात टाका... आपलं कॉपीपेस्ट करा.
ते लिहिणारी व्यक्ती mhanel की
ते लिहिणारी व्यक्ती mhanel की संत ज्ञानेश्वर हे नामस्मरण केल्याप्रमाणे घेतलं आहे, श्रेय नाम म्हणून नाही.
- आचार्य बाबा बर्वे
individually wrapped सुविचार
individually wrapped सुविचार >>>
धन्य आहेत.
धन्य आहेत.
सगळ्यांचे लेखक संत ज्ञानेश्वर
सगळ्यांचे लेखक संत ज्ञानेश्वर आहेत तर इतके रॅप का केले आहे? हे म्हणजे 5 बिस्कीट चा पार्ले जी चा पुडा मिळायचा तसा 2 लेयर मेणकागदी पॅकिंग करून फक्त 1 बिस्कीट चा पुडा बाजारात विकण्या सारखं झालं
संपूर्ण मेसेज *" "* मध्ये आहे
संपूर्ण मेसेज *" "* मध्ये आहे. सगळेच बोल्ड केलेले ! सगळेच बोल्ड केल्यावर बोल्ड करण्याचा काय उपयोग ?
सगळेच बोल्ड केल्याने मेसेज
सगळेच बोल्ड केल्याने मेसेज क्लीन बोल्ड झाला आहे
*पु. लं... च्या शब्दात ...*
*पु. लं... च्या शब्दात ...*
शून्यातून विश्व,
की विश्वातून शून्य ...!!!
टू रुम किचनचा
एखादा फ्लॅट ...
दोन चार एकरचं
फार्म हाऊस ...,
एखादी चार चाकी गाडी
आणि भौतिक वस्तूंचं
प्रदर्शन मांडता आलं, की
आपण म्हणतो ...
अमक्या-तमक्यानं
शून्यातून विश्व
निर्माण केलं ....!!!
म्हणजे होतंय कांय, की
सुख मिळेल, या आशेनं
माणूस श्रीमंत होण्यासाठी
धडपडतोय, पण सुखी
कांही दिसत नाही ...!!!
आपणचं म्हणतो, की
आमच्या लहानपणी खूप
मजा यायची ...
खूप करमायचं,
घर भरलेलं असायचं ...
दिवस कधी मावळायचा
ते कळायचंच नाही ...!!!
मग आता
कांय झालं ???
मजा कुठं गेली ???
एकटं एकटं कां वाटतं ...???
छातीत धडधड कां होते ...???
कशामुळं करमत नाही ...???
कारण...
"विश्व निर्माण करण्याची"
व्याख्या कुठंतरी चुकली ...!!!
विश्व निर्माण करणं
म्हणजे ...
नाती गोती जपणं ...
छंद जोपासणं ...
पाहुणे होऊन जाणं ...
पाहुण्यांचं स्वागत करणं ...
खूप गप्पा मारणं ...
घराच्या उंबऱ्यात
चपलांचा ढिग दिसणं ...
खळखळून हसणं ...
आणि ...
काळजातलं दुःख सांगून
मोकळेपणानं रडणं ...!!!
या गोष्टी आपण
प्राप्त करू शकलो, तर ...
"शून्यातून विश्व
निर्माण केलं" असं म्हणावं ...
तुम्हीच सांगा ...
आपल्या आयुष्यांत या
सर्व गोष्टींची वाढ झाली,
की घट झाली ...???
तुमचं खरं दुःख तुम्ही
मोकळेपणानं किती
जणांना सांगू शकता ???
असे किती मित्र, शेजारी,
नातेवाईक आपण निर्माण
करू शकलो ...???
खूप कमी,
किंबहूना नाहीच ...!!!
मग आपण
"विश्व निर्माण"
केलं कां ...???
तर नाही ...
मित्रहो,
रजिस्ट्रीच्या कागदाच्या
फायली म्हणजे विश्व ...???
भौतिक साधनांची रेलचेल
म्हणजे विश्व ...???
नाही ...!!!
लॉकरमध्ये ठेवलेले
हिरे मोत्यांचे दागिने
म्हणजे विश्व ...???
मुखवटे घातलेल्या
चेहऱ्यांची गर्दी
म्हणजे विश्व ...???
नाही ...!!!
हे समजून
घ्यावं लागेल ...!!!
मोठं बनण्याच्या
दडपणामुळं ...
आणि मग कामाच्या
व्यापामुळं ...
नाती दूर जाणार
असतील, ...
इतरांना तुच्छ लेखण्यामुळं
आणि अहंकारामुळं माणसं
जवळ येणार नसतील...
दुःख सांगायला,
मन हलकं करायला
जागांच उरणार नसेल,
तर ...
आम्ही शून्यातून
विश्व निर्माण केलं,
की ...
विश्वातून शून्य...?????
*( पु लं.च्या एका संग्रहातून )*
वपुंच्या नावाने खपवलं असलं तर
वपुंच्या नावाने खपवलं असलं तर खपलंही असतं बहुतेक.
+ १ आणि आईन्स्टाईनच्याही. वर
+ १ आणि नाती दूर जाणार + विश्व म्हणजे काय+ भौतिक साधने=
आईन्स्टाईनच्याही. वर शेवटी 'थेअरी ऑफ रिलेटीव्हिटी' ही नातलगांवरची होती. कारण रिलेटीव्ह म्हणजे नातलग, आमचंच खरं.....कारण हा द्वयर्थी संदेश दिला होता. फेकाफेकीच्या शुन्यातून विश्व निर्माण करत असताना- रतन टाटा काय, अमिताभ बच्चन काय, अब्राहम लिंकन काय आणि वपु काळे आणि आईन्स्टाईन काय सारखेच.
Pages