दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुडी, फारच चपखल लिहिले आहेस. १०-१२ वर्षापूर्वी बोलले होते त्यांच्याशी. बाकी संपर्क काहीच नाही. पण तरीही पोकळी जाणवते आहे कालपासून. मुलगी, विनी दोघिंसाठी वाईट वाटते आहे.
जे कुणी मुलीच्या संपर्कात आहेत त्यांनी थोड्या दिवसानंतर इकडचे मेसेजेस वाचायला द्या तिला. आपल्या आईची आठवण काढणारी इतकी माणसे बघून तिलाही दू:खात सोबत मिळाल्यासारखे वाटेल.

खूप भरुन येत आहे. काही व्यक्ती आपला त्यांच्यासोबत काही संबंध नसतानाही मनाला चटका लावून जातात. असाच त्रास जामोप्या आणि किल्लीचे मिस्टर गेले तेव्हा झाला होता. किल्लीसाठी तर इतका जीव तुटत होता की काही लिहूच शकले नाही त्यावेळेस. त्यातून बाहेर पडायलाच मला काही दिवस गेले.
अमांचा शेवटचा प्रतिसाद वाचला होता त्यात त्या म्हणालेल्या की तब्येत ठिक नसल्यामुळे जास्त लिहता येत नाहिये, तेव्हाच एकदम वाईट वाटलेले. पण त्या फायटर होत्या त्यामुळे विश्वास होता की त्या पुन्हा लिहत्या होतील. पण दैवाला मान्य नव्हते.
भावपूर्ण श्रद्धांजली अमा.

वत्सला,
तिच्या आईच्या आयुष्यात असलेलं मायबोलीचं स्थान मधुरिमाला माहीत आहे. इथल्या लोकांना बातमी कशी कळवायची, असा प्रश्न तिला पडला होता. पण ती त्यांना अगोदरच कळली आहे, असं सांगून तिला इथली लिंक पाठवली. काही दिवसांत ती इथे पोस्ट करेल, असं म्हणाली आहे.
अमांच्या आयुष्यात जसे मायबोलीकर होते, तसे त्यांच्याही आयुष्यात अमा महत्त्वाच्या होत्या, असं तिला सांगितलं.

चीनुक्स, धन्यवाद.
मधुरीमाला लिंक पाठवली आहे हे वाचून थोड वाटलं.

कालपर्यंत लिहीणाऱ्या अश्विनीमावशी नाहीत यावर विश्वास बसत नाही .आई कुठे काय करते धाग्या वरच्या पोस्ट मजेशीर असायच्या त्यांनी केलेल्या पोस्ट वाचण्यासाठी सिरीयल बघितली जायची .कधीही भेट न होताही त्यांच्याबद्दल फार आपुलकी वाटायची. खूप काही शिकता आलं त्यांच्याकडून ,आजाराशी तोंड देता आनंदी कसं राहायचं याचं मूर्तिमंत उदाहरण होत्या. जिंदादिल ,मिश्किल पण तितक्याच प्रेमळ आणि प्राणी प्रेमी .तुमचं लेखन पाहताना खूप आठवण येईल अमा .भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या मुलीला दुःखातून सावरण्याचं बळ मिळो.

‘बेरी हाऊस डेहराडून’ हा त्यांचा लेख वाचून अजूनच भरून येतंय. खूप क्यूट मायलेकी… भावपूर्ण श्रद्धांजली अमा.

आशूडी, खूप सुंदर लिहिलयं!
चिनुक्स आणि पुन्नीच्या संपर्कात असलेल्या सगळ्यांना धन्यवाद.

अमा, भावपूर्ण श्रद्धांजली! /\
धक्का बसला, फार वाईट वाटले. मधुरिमाला यातून सावरायचे बळ मिळो. मला अमा अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून कायम लक्षात राहतील.

अमाना श्रद्धांजली..
त्यांनीं एका दिवाळी अंकात अत्तरावर एक उत्तम लेख लिहिला होता. तो शोधत होते. पण मिळाला नाही. कोणाकडे लिंक आहे का?

अमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
तुम्ही अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला भागात राहायला आलात आणि कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये तुमची treatment सुरु आहे, असे कळले तेव्हा वाटायचे की कधीतरी मी तिथे रक्तदान / platelet donation करायला येईन तेव्हा अचानकपणे आपली भेट होईल किंवा हॉस्पिटलमागच्या गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गाण्याच्या कार्यक्रमात तुम्ही एखादे गाणे म्हणतांना दिसाल! असे जर झाले असते तर समोरासमोर प्रत्यक्ष भेट झालेल्या तुम्ही पहिल्या मायबोलीकर असता! पण ते राहूनच गेले! तुमच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

अमा गेल्याचं वाचून खूप वाईट वाटलं. श्रद्धांजली. जिथे असाल तिथे सुखात रहा. Though I never spoke with you, you will be missed dearly. You had that type of connection through your writing.

अमा ना श्रद्धांजली __/\__
अनेकांनी खूप हृद्य आणि सुंदर लिहिले आहे. फिकर नॉट अमा हा लेख आधी वाचला आणि वाचताना चुटपुट लागत गेली .. लिखणातला भूतकाळ टोचत गेला... आणि दुःखद बातमी समजली.

ओह अमा Sad
फारच दु:खद घटना.. आताच वाचलं त्यांच्याबद्दल
खुप छान पोस्ट असायच्या त्यांच्या.

२०२४ जाता जाता अनेक दुःखद धक्के देऊन गेले.
उस्ताद झाकीर हुसेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, दिग्दर्शक श्याम बेनेगल या तिन्ही महान विभूतींना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_ जाता जाता या वर्षाने जगाच्या पाठीवर दोन मोठे विमान अपघात घडवले. त्या सर्व मृतांना श्रद्धांजली _/\_

माबोकर अमा यांचे जाणे फारच धक्कादायक. अखेरपर्यंत ज्या उमेदीने त्या लिहीत होत्या ते खूप खूप प्रेरणादायी. अमा यांना वाहिलेल्या साऱ्या श्रद्धांजल्या खूप बोलक्या आहेत. मन गहिवरून येते. अमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली
विमान अपघातात गेलेल्यांना श्रद्धांजली

अश्विनी मावशी यांना श्रध्दांजली
डॉ मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली
बेनेगल सरांना श्रध्दांजली
उस्ताद झाकिर हुसेन यांना श्रध्दांजली

जेष्ठ शास्त्रज्ञ, अणुशास्त्रज्ञ, ऑपरेशन स्मायलिंग बुद्धा १९७४ तसेच ऑपरेशन शक्ती १९९८ ( पोखरण १, २) मधे महत्वाची भुमिका बजावणारे डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन.

२००२ - २०१८ या काळांत ते भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार ( Principal Scientific Adviser to GOI) होते.

https://timesofindia.indiatimes.com/india/eminent-nuclear-scientist-r-ch...

Pages