या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतरिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे. राहते मात्र तिच्या स्वकमाईच्या सुंदर सजवलेल्या घरात, एकटी. स्वतः सुखवस्तू आहे आणि वयोपरत्वे येणाऱ्या छोट्या कुरबुरी सोडल्या तर बाकी तिला कोणाचा आणि तिचा कोणाला काहीच त्रास नाही.
तर ही ऐंशीपार सखी सध्या एका वेगळ्या विचाराने झपाटलेली आहे. तीन वर्षांपूर्वी एका स्वीडिश जोडप्याच्या निमंत्रणावरून स्वीडनला जाऊन आल्यानंतर आणि विशेषतः करोनाच्या वावटळीत दोनदा सापडल्यानंतर तिला Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात' सिन्ड्रोमने पछाडले आहे. आपल्याला 'मृत्यू' म्हटलं की बहुदा दुःख, निराशा, रडारड अशा नकारात्मक भावना दाटून येतात. नकोच तो विषय, त्यात काय बोलायचं. जेव्हा जायची वेळ येईल तेंव्हा बघू असेच सर्वांचे साधारण मत असते. माझेही तसेच मत आहे. पण ही सखी वेगळीय. तिला संध्याछाया जरी भिववीत नसल्या तरी 'मोकळ्या हाताने' पैलतीरी जायचे आहे यावर ठाम आहे.
तर काय आहे हे Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ 'मोकळे हात'? अगदी थोडक्यात सांगायचे तर एका विशिष्ट वयानंतर स्वतः आयुष्यभर केलेला पसारा स्वतः आवरणे. स्वीडिश लेखिका मार्गरेट मॅग्नसन हिचे The Gentle Art of Swedish Death Cleaning: How to Free Yourself and Your Family From a Lifetime of Clutter असे भारदस्त नावाचे पुस्तक आहे यावर. त्याचा सारांश :- पुढच्या प्रवासाला निघतांना आपल्या मागे राहणाऱ्या प्रियाजनांसाठी आवरण्याची कमीत कमी कामे सोडून जाणे. साधारण २०१७ सालापासून ही कल्पना त्यांच्याकडे जोर धरू लागलेली आहे. भारतात वर्षानुवर्षे 'वानप्रस्थाश्रम' ही कल्पना आहे, पण ती थोडी वेगळी आहे, घरदार-संसारातून पाश पूर्णपणे सोडवण्याची. इथे घरातच राहत असतांना, स्वतःच्या हयातीत, स्वतःच्या हाताने आयुष्यभराचा संसार Stada म्हणजे स्वच्छ - मोकळा - नीटनेटका करून मग पुढच्या प्रवासास निघणे असा विचार आहे. सोपे नाही. सिमटे तो दिल-ए-आशिक और फैले तो जमाना है !
सखीनं पुस्तक वाचलंय, मी अजून नाही. चर्चेवरून मला थोडंफार समजलंय ते इथे लिहितो. मार्गरेटनी 'मोकळ्या हातांनी जाण्यासाठी' काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ती अशी :
१. एकट्याने सुरुवात करणे :-
हा प्रवास मोठा आहे, आयुष्यभर जमवलेला पसारा ४-२ दिवसात आटोपणार नाहीच. सुरवातीला कोण्या दुसऱ्याला हा विचार पटवून द्यायला वेळ लागेल, जोडीदारालाही पटेलच असे नाही. त्यामुळे सुरवात 'एकट्याने' करा. जे जमेल तेव्हढेच.
२. पुढच्या टप्प्यावर जोडीदार, परिवार आणि मित्रांना हळूहळू सामील करणे. आयुष्यभर हौसेनी जमवलेल्या हजारो वस्तू कुणाला हव्या आहेत की कुणालाच नको आहेत याचा अंदाज घेत घेत वाटचाल करणे. यात पुस्तके, छंदापोटी जमवलेल्या वस्तू, घरगुती वापराच्या अधिकच्या वस्तू, सजावटीचे सामान, फर्निचर असे खूप काही येईल. सगळेच काही एकावेळी देऊन टाकण्यासारखे नसले तरी मोठ्या प्रमाणात वस्तुकपात करायला परिवार आणि मित्रमंडळी मदत करू शकतात. त्यांना जे हवे आहे ते बेलाशक देऊन टाकणे. अर्थात यासाठी वय उलटण्याची वाट बघायला नकोच, हे आपण सततचा गृहपाठ म्हणून करू शकतो - वापरात नसलेल्या-बिनकामाच्या वस्तू त्यांचा ज्याला उपयोग आहे त्याला देऊन टाकणे.
३. योग्य वस्तूंपासून आवरण्याची सुरुवात करणे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जर सुरवातीलाच फोटो अल्बम, आईच्या/स्वतःच्या लग्नातल्या साड्या-बांगड्या आणि जुनी पत्रे काढून बसलात तर काम पुढे सरकत नाही, भावना दाटून येतात असा ‘पटेबल’ युक्तिवाद आहे. त्यामुळे सोप्पे काम आधी. गाद्या-दुलयांमध्ये जीव तेव्हढा गुंतलेला नसतो, वापरलेल्या जुन्या कपड्यांमध्ये, भांड्यांमध्ये पण कमीच. त्यामुळे ते आधी. अर्थात हे व्यक्तिपरत्वे बदलेल. कुणाला पुस्तके देववणार नाहीत तर कुणाला जुने कॅमेरे, जुनी भांडी. स्वतः मुखत्यार व्हावे, काय आधी काय नंतर स्वतःपुरते ठरवावे.
४. ज्याला हवे त्यालाच द्यावे. सगळं सामान कुणावरही ओतू नये. वेळ काळ पाहून एक-एक वस्तू समोरच्याला विचारून देत राहावी. संचयातल्या एखाद्या वस्तूचे आपल्याला अप्रूप असले तरी जुनेपाने हल्ली कुणालाच नको असते हा विचार नेहेमी असू द्यावा. जिथे वापर होईल अशा ठिकाणी, ज्यांना किंमत असेल, आवड असेल अशा लोकांना ती-ती वस्तू द्यावी. उदा. गावातले घर सोडले तेंव्हा आमच्या सुमारे २४०० पुस्तकांवर अनेक पुस्तकप्रेमींचा डोळा होता. काही त्यांच्याकडे गेलीत, काही पिताश्रींनी मित्राच्या वाचनालयाला दिलीत, अधिकाधिक लोकं वाचतील म्हणून. बागेतील शंभरेक कुंड्यातील सुंदर झाडांना सर्व बागप्रेमी मंडळी - शेजारीपाजारी यांच्याकडे नवीन घर मिळाले. तर, योग्य वस्तू योग्य व्यक्तीस आणि त्यांना हवी असेल त्याच वेळी हा नियम पाळावा.
५. जीव गुंतलेल्या वस्तूंना सरसकट दूर न करणे. आपण उद्याच जग सोडणार नाही आहोत. ज्या वस्तू आनंद देतात त्या आपल्यासोबत असू द्याव्यात. फोटो काढणे-बघणे, गाणी ऐकणे, चित्रे काढणे, एखादे वाद्य असे आपले छंद असल्यास त्याला लागणाऱ्या वस्तू जपाव्यात, उत्तमपणे शेवटपर्यंत वापराव्यात. आपल्यापश्चात समछंदी व्यक्तीला मिळतील अशी व्यवस्था करून ठेवावी. आपल्याला परमप्रिय असलेल्या अनेक वस्तू आपल्यानंतर कचऱ्यात जाऊ शकतात हे भान असू द्यावे, त्याने काम सोपे होते. परमप्रिय वस्तूंचे प्रमाण कमी असते, किंबहुना कमीच असावे. आवरायला सोपे असावे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी.
६. पुनर्विचार न करणे. प्रत्येक वस्तुबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्यावा, हवा तेव्हढा वेळ निर्णयासाठी घ्यावा पण एकदा एखादी वस्तू देण्यासाठी काढली की मग ती पुन्हा घरात न घेणे हा एक महत्वाचा टप्पा आहे. नाहीतर चार पावले पुढे आणि चार मागे करत मोकळ्या हातांनी करायच्या प्रवासाची तयारी काही संपणार नाही. अगदी कुणीच घेणारा नसेल तर ती वस्तू विकून टाकावी, भंगारात द्यावी पण परत घरात घेऊ नये. ही आवराआवर पुन्हा पुन्हा करायची नाही आणि हा प्रवास परतून येण्यासाठी नाही ही जाणीव ठेवल्यास हा कठीण टप्पा पार पाडता येतो.
७. दस्तावेज वगैरे. हा टप्पा विचारपूर्वक आणि योग्य सल्ले-विचार घेऊन मगच पार पाडण्याचा आहे. आपल्या हयातीत कमावलेली संपत्ती, घरदार, दागदागिने, पैसाअडका वगैरे आपल्यापश्चात कुणाला मिळावे यासाठी मृत्युपत्र- इच्छापत्र जाणकार व्यक्तीच्या मदतीने करून घ्यावे. संपत्ती आणि बँकखाती, आयुर्विमा वगैरेसाठी वारसांचे नामनिर्देशन करावे. अनेक शहरात असलेला जमीनजुमला किंवा बँकेत अनेकजागी खाती / लॉकर्स कमी करू शकलात तर वारसांचा वेळ वाचेल आणि त्यांना पडणारे कष्ट कमी होतील. जवळच्या मित्रांना आणि वारसांना त्याबद्दलची माहिती देऊन ठेवावी. नेत्रदान-देहदान वगैरेचे काय ते ठरवून त्याचे दस्तावेज, औषधोपचार आणि दीर्घकालीन कोमा वगैरे झाल्यास उपचार थांबवण्यासाठीचे अधिकार कुणाला द्यावे याबद्दलचे आरोग्यविषयक इच्छापत्र, अंतिम संस्काराचे विधी कसे आणि किती करावेत याबद्दलची इच्छा, जमल्यास त्याबद्दलची आर्थिक तरतूद हे सगळे झाले की मग बऱ्यापैकी मोकळे हात घेऊन मजेत जगावे.
आणि हो, पुन्हा पसारा जमा होऊ देऊ नये, नाहीतर सगळे मुसळ केरात !!!
सखीची तयारी जोरात सुरु आहे. मलातरी हा 'मोकळ्या हातांनी प्रवासाचा' विचार आवडला आहे. इथल्या मंडळींचे काय मत ?
पियू पण खरंच अनिंद्य खूप छान
पियू पण खरंच अनिंद्य खूप छान मुद्दे मांडले आहेत.
बघा बघा पियू मी किती सिरियसली
बघा बघा पियू मी किती सिरियसली “No clutter life” फॉलो करतोय.
“ आधी केले मग सांगितले “ असे थोरामोठ्यांचे म्हणणे आहे ना?
ऑन सिरियस नोट, इथे चर्चेत चांगले मुद्दे येतात. सारांश लिहिला की मला नंतर कामी येतो.
पियू तुम्हेई सिक्सर लावलात
पियू तुम्ही सिक्सर लावलात
>>>>>बघा बघा पियू मी किती सिरियसली “No clutter life” फॉलो करतोय. “ आधी केले मग सांगितले “ असे थोरामोठ्यांचे म्हणणे आहे ना? Happy
हाहाहा सो फनी!!
स्वाती, स्वस्ति, धनुडी, सामो
स्वाती, स्वस्ति, धनुडी, सामो - थँक्यू !
चालते थोडी गंमत, नाहीतर विषय हेवी वेट आहे फार
अतुलच्या आत्महत्येची बातमी
अतुलच्या आत्महत्येची बातमी वाचल्यावर हा धागा आठवला...
अतुलच्या आत्महत्येची बातमी ?
अतुलच्या आत्महत्येची बातमी ?
नाही समजले
अतुल सुभाष या बंगलोर स्थित
अतुल सुभाष या बंगलोर स्थित टेकिने बायकोने व न्याय संस्थेने केलेल्या छळामुळे आत्महत्या केली. त्याने २४ पानी सुसाईड नोट लिहून व दीड तासाचा व्हिडीओ करून आत्महत्येचा निर्णय का घ्यावा लागतो आहे याची माहिती दिली आहे.
वैवाहिक जीवनात वितुष्ट आल्यावर घटस्फोटाचा निर्णय घेताना पत्नीने केलेल्या विविध केसेस, अनरिझनेबल अलिमनीच्या मागण्या, सेटलमेंट करण्यासाठी जजने लाच मागणे व ती न दिल्यामुळे ज्युडिशिअल मार्ग वापरून छळ करणे यामुळे त्याच्या आयुष्यात राम उरला नाही असा त्याचा आरोप आहे.
त्याची सुसाईड नोट व व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रचंड गदारोळा झाला. त्याची टेकी पत्नी व तिचे नातेवाईक बेपत्ता होते. अखेर त्यांना आता सुसाईड नोटच्या आधारावर अटक करण्यात आली आहे.
याच केसची दुसरी बाजू सांगणार्
याच केसची दुसरी बाजू सांगणार्या म्हणजे बायकोने सुरवातीला पोलिस केसेस केलेल्या बातम्याही येताहेत. असो. हे इथे अवांतर होईल खुप.
मंजूताई याबद्दल
मंजूताई याबद्दल म्हणताहेत
https://www.livemint.com/news/how-bengaluru-techie-atul-subhashs-last-da...
होय. ही केस गाजतेय, माहित
होय. ही केस गाजतेय, माहित होती. पण इथे संबंध लक्षात नाही आला.
बरीच गुंतागुंत दिसते त्यांची आपसात. Sad.
अतुलचा (सु?) नियोजित मृत्यू
भरत हो तेच म्हणायचंय. अतुल चा(सु?) नियोजित मृत्यू होता त्यामुळे त्याने आवराआवर करून ठेवली होती...
हो ना. ती केस फार भयंकर
हो ना. ती केस फार भयंकर दिसतेय. असो इथे अवांतर होइल.
त्याचा आणि डेथ क्लिनिंगचा काय
त्याचा आणि डेथ क्लिनिंगचा काय संबंध मलाही समजलं नाही.
स्युसाईड नोट आणि व्हिडिओ ही आवराआवर नाही.
अतुलच्या दुर्दैवी आत्महत्येचा
अतुलच्या दुर्दैवी आत्महत्येचा आणि death cleaning चा काय संबंध
होय संबंध नाही. आवराआवर करुन
होय संबंध नाही. आवराआवर करुन आत्महत्या होत नाहीत. क्षणिक आवेगात, नैराश-वैफल्यात होत असाव्यात.
A “to-do” list was pasted
A “to-do” list was pasted next to the placard, detailing the tasks he had given himself to check until “executing” his suicide. The checklist was divided into 'Before last day', 'Last day' and ‘Execute last moment’, listing tasks such as disabling the fingerprint lock from his phone, keeping his car and house keys on the fridge, submitting his laptop at his office and completing the office work.
as securing his finances, completing office responsibilities, making legal arrangements, organising and compiling all communications, backing up important data, and “creating redundancies
disabling his phone lock, presumably to allow access to more information, uploading his suicide note and video, returning his office equipment and completing all payments
It took me a few months to make sure that I complete my pending responsibilities I had towards my family and finish my work commitments etc,” Atul Subhash said in his letter.
अगदी डेथ क्लिनिंग असं नाही, पण आपण गेल्यानंतर ( पुढचं लिहायला योग्य शब्द सुचत नाहीत ) आपल्या जवळच्या नातलगांना, आपल्या ऑफिसला पुढच्या कामात अडचण येणार नाही, हे त्याने पाहिलं. सगळं विचारपूर्वक , सुनोयोजित रीत्या केलं. कधी काय करायचं ती चेकलिस्ट बनवून ठेवली.
ह्म्म. समजलं.
ह्म्म. समजलं.
भरत अगदी हेच म्हणायचंय मलाही
भरत अगदी हेच म्हणायचंय मलाही शब्द सापडेना. माझ्याबाबतीत वस्तूंची काही प्रमाणात आर्थिक आवराआवरी जमली आहे पण भावनिक जमत नाहीये. मला वस्तू निरूपयोगी वाटली की ती कोणालाही देते सत्पात्री, संस्था वै विचार करत नाही.
… सगळं विचारपूर्वक ,
… सगळं विचारपूर्वक , सुनोयोजित रीत्या केलं. कधी काय करायचं ती चेकलिस्ट बनवून ठेवली….
हे विचित्र वाटले. मुख्य मुद्दा/ आक्षेप लांबलेला घटस्फोट + पोटगीची जास्त रक्कम हा होता असे समजते. Revised petition/ सुप्रीम कोर्ट पर्याय होते. त्यामागे लागता तर त्याचे आयुष्य कदाचित मार्गी लागले असते. Anyway, ज्याचे दु:ख त्याला ठावे
… वस्तू निरूपयोगी वाटली की ती कोणालाही देते सत्पात्री, संस्था वै विचार करत नाही.
हे योग्य आहे. आपण फार विचार करत राहिलो की “कृती” घडत नाही.
अनिंद्य, छळ - मारहाण- हुंडा
अनिंद्य, छळ - मारहाण- हुंडा मागणे अशा अनेख केसेस टाकल्या होत्या. त्याला बंगळूरूहून जौनपूरला वरचेवर जावं लागायचं. तिथली मॅजिस्ट्रेट ही विरुद्ध पक्षाला सामील होती, असं त्यांचं म्हणणं होतं.
In India, legal process itself is punishment.
फारच छान धागा. सगळ्यांचे
फारच छान धागा. सगळ्यांचे प्रतिसाद सुद्धा माहितीपूर्ण.
या वाटेवर आहे पण अजून मंजिल बहोत दूर आहे असे वाटते आहे.
पुस्तके आणि काही जुन्या अँटीक गोष्टीचा मोह सुटत नाहीये.
अनिंद्य, तुमचे मधून मधून आलेल्या सर्व प्रतिसादांचे विश्लेषण सुद्धा आवडले
माळ्याची चर्चा वाचून सगळीकडे माळ्याच्या माळ्यामंदी सेम असते हे वाचून हायसे वाटले.
.. सगळीकडे माळ्याच्या
.. सगळीकडे माळ्याच्या माळ्यामंदी सेम असते…
Pages