पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> पण डॅडी शब्दाचा अर्थ हल्ली वाह्यात झाला आहे ना Wink दरवेळी ती म्हटली की हसूच येतं. >> Lol बाबांसमोर बॉयफ्रेंडला डॅडी म्हणणे हा एक मध्यंतरी हमखास हसू येणारा टिकटॉक ट्रेंड होता. त्याने डोक्याच्या एआयचं ट्रेनिंग झाल्याने 'काटी रात मेने खेतों मे तू आई नही' गाण्यात 'ऐसे खेतों मे जो लडके बुलाते है, डॅडी बनते - कभिभी वो जमाई नही' असं ऐकू यायचं. Proud Lol

एकवेळ कुत्र्यांशी नाती जोडणे, त्यांनी सोसायटीच्या आवारात घाण करणे, भुंकण्याच्या आवाजानं झोप मोड होणे सगळे परवडले . सगळे सहन करू शकतो मी. पण कुत्रे अंगावर आलेले सहन करणे अशक्य . कारण कुत्र्यांची प्रचंड भीती वाटते . लहानपणी दोन वेळा कुत्रा चावला होता . एकदा मित्राच्या घरी पाळलेला व एकदा रस्त्यावरील भटका कुत्रा चावला आहे . (एक बारीक ओरखडा ऊठला होता.) तेंव्हा दोन्ही वेळा इंजेक्शन्स घेतली आहेत . फार मनस्ताप झाला होता तेंव्हा . व मनात भीती बसली. (mild PTSD म्हणता येईल . ) जे माझ्यासारख्या अनुभवांतून गेले आहेत तेच समजू शकतील .

मी पण माझ्या भावाच्या कुत्रीची आत्या होते.वर लिहिल्याप्रमाणे खटकले नाही.म्हणो बापडा.पण मी तिला भाची मानत नव्हते.

कुत्रा चावण्याचे म्हणाल तर आमचा घरचा कुत्रा,लहानमोठे धरून 15-१६ वेळा चावला आहे.तो कुत्रा अतरंगी होता.आईवडील सोडल्यास सर्वांना प्रसाद मिळाला आहे.

अमितव, तू लिहिलेली गाण्याची ओळ भारीये

पण मला डॅडी शब्दाचा वाह्यात अर्थ माहिती नाही.
अलीकडचे ट्रेण्डी शब्दप्रयोग माहिती नसणे हा सुद्धा कुणाचा तरी पे.पी. असू शकतो. (इथे मी आणखी एका पेटपीव्हला जन्म दिलाय. आम्ही लहानपणापासून घरात सहज गप्पा मारता मारता शॉर्टफॉर्म्स वापरतो, त्यामुळे त्याची खूप सवय आहे)

https://www.reddit.com/r/TotalKalesh/comments/1ha2l5o/मधय_परदश_क_भपल_कतत_क_आतकcctv_म_कद_हई_घटन_सकट_सवर/?utm_source=share&utm_medium=web3x&utm_name=web3xcss&utm_term=1&utm_content=share_button

या विडिओ मध्ये दुचाकी वाल्यांच्या मागे कुत्री लागली आहेत व त्यांना दगड मारताना काही मंडळी विरोध करताना दिसत आहेत .

कुत्री मांजरी पण घरातल्यांशी नाती जोडतात. आमची मांजरे मला आई मानतात आणि माझ्याशी तसेच वागतात. माझी मुलगी त्यांची दिदी.. तिच्याशी फटकुन वागतात Happy मी कधी कंटाळुन ‘जा तिकडे दिदुटलीकडे’ म्हटले की गुपचुप जातात तिच्याकडे Happy बोललेले सगळे कळते.

सगळी नाती कळतात हो आमच्या विकीला.
आमची ठमा म्हणजे त्याची ताई. तिच्या लग्नात कुणीही न सांगता नवऱ्या मुलाचा कान तोंडात धरला हो लाजाहोमाच्या वेळी.

बघा…. तरी मी सांगत होते सगळे कळते म्हणुन……. Happy

नंतर पाळण्याला झोका पण देत बसला असणार, उगीच ताईची झोपमोड नको.

नवऱ्या मुलाचा कान तोंडात धरला >> माईक टायसनने प्रतिस्पर्ध्याचा कान का चावला हे आज कळलं. बिचाऱ्याच्या बहिणीचं लग्न असेल.

अरे पहिल्याला लांबवा आणि दुसर्‍याला थांबवा सांगतात आणि तुम्ही लग्नघरातच पाळणा लावलात! कमाल आहे!

म्हणजे मांजरांना सुद्धा असला वाह्यातपणा आवडत नाही Happy
ही तिला मुलगी मानते म्हणजे मी तिची बहीण झाले काय? गुर्र...

नंतर वाचला. म्हणजे आधीच नंतर वाचला. :आयरोल:
पण नंतर म्हणजे कान चावल्या नंतर. गेला असेल टॉम्या वरपक्ष वधुपक्ष खोलीत पाळणा हलवायला. Wink तरी तू 'पाळण्याला झोका देऊन' अशी शब्दरचना करुन 'पाळणा हलवायला गेला' टाईप जोकवर काटच मारली आहेस! Lol तरी केलाच तो जोक. Wink

तो कुत्रा अतरंगी होता.
>> वाट्टेल ते बोलू नका.
ते फक्त शाब्दिक चावे घेतात.
ते पण फक्त ववि वृ लिहिताना. Light 1
बाकी तसे चांगले आहेत ते Happy

आमची ठमा म्हणजे त्याची ताई. तिच्या लग्नात कुणीही न सांगता नवऱ्या मुलाचा कान तोंडात धरला हो लाजाहोमाच्या वेळी.

>> त्याच ठराविक टोन मध्ये वाचले आणि फुटले. स्वरचित रत्न ना हे? Lol

स्वरचित>> हो.

(काल पर्यंत स्वरचित फक्त मंगलाष्टकं असतात असा माझा समज होता.)

पियू Lol
काय एकेक posts आहेत वरच्या ह्हपुवा

स्वरचित फक्त मंगलाष्टकं >> अशी मंगलाष्टकं म्हणताना स्वर हे चित-पट झाल्याचा अनुभव येतो ती म्हणजे स्वर-चित मंगलाष्टकं

अरे!!! बरी आठवण करून दिली... स्वरचित मंगलाष्टकं आणि ती गाणार्‍या साळकाया-माळकाया हे माझे डबल पेट पीव्ह्ज आहेत. एकावर एक फ्री Biggrin

धमाल चालू आहे!
पण मी धाग्याच्या विषयाला धरून लिहितेय म्हणून माफ करा... मागे कोणीतरी हिरवा सिग्नल पडला की शून्य सेकंद होत नाहीत की लगेच मागचं पब्लिक हॉर्न देतं, जणू काही पुढचे लोक मुक्कामालाच आले आहेत असं म्हणून ते मागचे हॉर्न वाजवणारे लोक पे पी आहेत असं म्हटलं होतं.. तर, मी आवर्जून हॉर्न द्यायला सुरूवात केली आहे हल्ली. कारण १० सेकंद उरले आहेत असं दिसत असूनही खिशातून मोबाईल काढून टेक्स्टिंग करतात पुढचे लोक (मागचेही करत असतील, पण त्यांच्यामुळे ट्रॅफिक अडकत नाही शक्यतो), किंवा फोनवरच्या गप्पा चालूच असतात असं मला आता राजरोसपणे दिसतं. मग त्यांना भानावर आणायला मी हॉर्न वाजवते. सिग्नल असताना किंवा एकूणच ट्रॅफिकचे नियम न पाळणारे लोक हे खूप त्रासदायक असतात. एक्सट्रीम डाव्या बाजूने येऊन मोठे वळण घेत उजवीकडे जाणं (किंवा हेच उलट दिशेने यऊन करणं), सरळ जायचं असूनही एक्सट्रीम उजव्या किंवा डाव्या लेनमधे थांबणं यामुळे मागच्या लोकांची कशी पंचाईत होते हे कधी समजणार लोकांना! Uhoh

एकदम प्रज्ञा...
इकडं पण घेतला हा अनुभव बरेचदा...
परवा मुलाचा वाढदिवस म्हणून सहाला घरातून निघालो व्यवस्थित प्लान करून.. अर्धा तासाच्या अंतरावर जायचं होतं दिड तास लागला..एके ठिकाणी मी उतरून जाऊन बघून आले ट्रैफिक का सरकेनाय पुढे तर काही नाही बेशिस्त लोकांनी आडव्या तिडव्या गाड्या सर्विस लेन मधे घुसवल्याने कुणालाच हलता येत नव्हतं...ट्रैफिक मधे असं अडकल्याने ठरवलेले काहिच न करून खाऊन आलो घरी परत..

प्रज्ञा, मीपण हल्ली गाडी चालवताना एकीकडे फोनवर बोलणारे किंवा लिहिणारे लोक दिसले (अनेक दिसतात) की तो माणूस इरिटेट होईल असा हॉर्न वाजवत जाते!

Pages

Back to top