पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेहेहे फा डायरेक्ट एक्झिबीट नं. १ .
वरती रेडिओ ठणाणा वाक्य लिहिताना त्यात टचेआले आले हे लक्षातच नाही आले.>>> हर्पा Lol
"एक्झिबीट नं १ "पण त्यातच आले Lol

हल्ली लोक रात्री झोपत नाहीत का? साडे दहा वगैरे वाजून गेले की लहान मुलांच्या सायकली चालवणे , जोरजोरात गप्पा याला बहर येतो.
मला तर डोक्यात जातात रात्री ऊशीरा पर्यंत मोठमोठ्याने आवाज करणारे लोक

हल्ली लोक रात्री झोपत नाहीत का? >>>> +१

कित्येकदा भाप्रवे प्रमाणे रात्री २, २-१/२ किंवा ३ वाजता देखील लोकं ऑन -लाईन दिसतात किंवा मेसेजेस चेक करतात तेव्हा अगदी हेच मनात येते.

वरती रेडिओ ठणाणा वाक्य लिहिताना त्यात टचेआले आले हे लक्षातच नाही आले.>>> हर्पा Lol
"एक्झिबीट नं १ "पण त्यातच आले >>> Lol हे दोन्ही माझ्याही लक्षात आले नव्हते Happy

जोरजोरात गप्पा याला बहर येतो.>>>> ते ही बिल्डिंग खाली. >>>> पहिल्या मजल्यावर राहणाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होतो . झोपमोड होते . काही सांगायला जावे तर भान्डणाची भीती .

काही सांगायला जावे तर भान्डणाची भीती .>> मग भांडायचे की बिनधास्त.
कोणी जास्तीचे बोलले तर सरळ धमक्या द्यायच्या " चार वेळा जेल मध्ये जाऊन आलोय, हाफ मर्डरची केस आहे अजुन अंगावर, तरीही इथे कायद्यात राहतोय आणि कायद्याचंच बोलतोय ना आणि ते ही अजुनही सभ्यच भाषेत? उगीच उचकवु नका आता, आधीच सांगुन ठेवतोय. आपण धमकी नाही देत, सरळ काय ते करूनच दाखवतो."

काल रात्रीच मी ओरडून आले खाली जाऊन. काहितरी टेढी ऊंगलीच करायला हवी आहे आता. एकच फॅमिली आहे. रात्री फटाके ऊडवणे .. तो ही एकेक करून , जोरजोरात हसणे हे सर्रास चाललेले असते

माझ्याकडे पाहून तसे वाटत नाही. >> Happy
सोमीचं बरं असतं. चेहरा दाखवावा लागत नाही किंवा भलताच डीपी लावता येतो. ऑर्कुटवर शेवटी शेवटी खूप भांडणे झाली काही मराठी समुहात. त्यात काहीजण असे जेल, केसेस मिरवून धमकी द्यायचे. डीपी पण गुंड दिसेल असे असायचे. समूहातून काढले म्हणुन फोनवरही धमकी द्यायचे.

त्री फटाके ऊडवणे .. तो ही एकेक करून , जोरजोरात हसणे हे सर्रास चाललेले असते >> एक दिवस तुम्हीही करा

कुत्रा/मांजरी पाळणारे लोक त्या प्राण्याला घरातल्या नात्यात बांधतात, ते माझ्या डोक्यात जातं.
म्हणजे घरातला मुलगा त्या कुत्र्याचा दादा असतो, मुलाचे आई-बाबा कुत्र्याचे सुद्धा आई-बाबा असतात;
या नियमाने एका घरात मला तिथल्या कुत्र्याची काकू म्हटलं गेलं Uhoh

नियमाने एका घरात मला तिथल्या कुत्र्याची काकू म्हटलं गेलं >> पुलंचं " 'विके, काकांना ओळखत नाहीस का तू...' म्हणजे मी विकीचा काका" हे आठवलं.

हो.
आमच्या बिल्डींगमध्ये एका कुटुंबात एक कुत्री होती. मी एकदा सकाळी ऑफिस ला जायला निघाले तशी ती आली आणि अंगावर चढायला लागली. मी घाबरले,वैतागले . तशी तिची मालकीण - त्या कुटुंबातील मुलगी आली. "अग, जाऊदे , इकडे ये. मावशी ऑफिस ला निघालीय. कपडे खराब होतील. " .
मी तिची मावशी ????

पुलंचं " 'विके, काकांना ओळखत नाहीस का तू...' म्हणजे मी विकीचा काका" हे आठवलं.>>
Lol वाचताना मागून भो भो आवाज पण आला!

Lol
त्यांच्या त्यांच्यात काय ती नाती बांधा. इतरांना का त्यात ओढतात?
लोकसत्तेत छोट्या जाहिरातींत स्मृतिदिनाबद्दल पेड मजकूर असतो (त्याला जाहिरात म्हणावं का? किंवा का म्हणून नये? तुमच्या त्या गेलेल्या व्यक्तीबद्दलच्या भावनांची जाहिरात) - त्यात एका कुत्र्याच्या स्मृतिदिनाची जाहिरात पाहिली आहे.

डॉगी चे मम्मी पप्पा ऐकलं की माझ्या डोळ्यांसमोर- डिलिव्हरी रूम बाहेर नातेवाईक चिंतेत बसले आहेत. अचानक डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात "बधाई हो!.. आपको चिहुवाहुआ हुवा है" असली काहीतरी विचित्र दृश्य येतात Proud

एकदा नेक्स्टडोअर वर एका बाईने girl missing अशी पोस्ट टाकली होती. उघडून पाहिली तर ती गर्ल म्हणजे कुत्रं निघालं Sad तत्क्षणी त्या बयेला ब्लॉक केलं.

girl missing अशी पोस्ट टाकली होती. उघडून पाहिली तर ती गर्ल म्हणजे कुत्रं निघालं >>> Biggrin

अगदी!
स्वच्छ शब्दांत ट्रेलवर/ पार्कमध्ये कुत्री आणू नका लिहिलेले असताना आणणे ही अजिबात आवडत नाही. ती लीशवर ठेवण्याइतकी ही अक्कल नसते. हाडतुड करायची जाम इच्छा असते पण त्या मालकाकडे बघुन खोटं हसू तोंडावर ठेवतो. डॉग पार्क मध्ये न्या आणि काय ते बॉल फेकून खेळ करायचे ते करा ना. नातं जोडणं तर अगम्य. इथे माबोवर नाही का कुत्री आणि मांजरी हे धाग्याच्या नावात न लिहिण्याची दहशत आहे. भुभू आणि माऊ बाळ म्हणे!

Lol माझ्याकडे कुत्रं आहे पण मी लॉ अबायडींग सिटिझन आहे. ती लोक एरवीही बेजबाबदारच असतात. तुमचा दृष्टीकोनही समजू शकतेय. माणसाची मानसिक आणि शारीरिक सुरक्षितता टॉप प्रॉयॉरिटी असायला हवी हेच मत आहे.

तशीही अन्या, ईशा आणि कूकीकडून येणाऱ्या निमंत्रणांना मी सरावलेली आहे. पण मी पेट पेरेंट्सच्या घरात असताना किंवा कुठल्याही सोशल/कम्युनिटी प्लेसमध्ये असताना त्यांनी माझ्या किंवा मुलीच्या अंगावर अचानक उडी मारू नये (मान्य आहे त्यांना प्रेमात यायचे असते पण मी प्रेमळ नाहीये), मी खात असताना आजूबाजूला बसू नये व माझ्या झोपायच्या ठिकाणी येऊ नये एवढीच माझी अपेक्षा असते. मग माझी कूकी, मफ़ू, स्नोबॉल वगैरेंची आत्या, काकू, मामी वगैरे व्हायला हरकत नाही.

या नियमाने एका घरात मला तिथल्या कुत्र्याची काकू म्हटलं गेलं >>>>

डॉगी चे मम्मी पप्पा ऐकलं की माझ्या डोळ्यांसमोर- डिलिव्हरी रूम बाहेर नातेवाईक चिंतेत बसले आहेत. अचानक डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात "बधाई हो!.. आपको चिहुवाहुआ हुवा है" असली काहीतरी विचित्र दृश्य येतात >>>> Lol

अगदी !!! कुत्र्यांशी बोलताना आई-बाबा-दादा वगैरे म्हणणं फार फनी आणि विचित्र वाटतं. हो "भुभू आणि माऊ बाळ" पण महान आहे! अरे पण गिरीश कुबेरांसारखेही अग्रलेखात "कुत्रा" असं स्वच्छ न लिहिता "श्वान" लिहितात. कुत्र्याला कुत्रा म्हंटलं नक्की भावना का दुखावतात ?

(रच्याकने, मला त्या धाग्यावरचे फोटो बघायला आवडतात. पण गोग्गोड, काल्पनिक गोष्टी बोर होतात. )

ह्या चर्चेवरून आठवलं. नवरा बायको मुलांसमोर (आणि सवय झाल्यावर इतर वेळीही) एकमेकांनाच आई/बाबा/मम्मी/पप्पा म्हणतात. ते ही फार फनी वाटतं! आम्ही इथे नवीन रहायला आलो तेव्हा एका शेजार्‍यांकडे खेळायला गेलेल्या आमच्या मुलीला बोलवायला गेलो. तर त्या बाईंनी मला आत बोलावलं आणि आतल्या खोलीच्या दिशेने तोंड करून हाक मारली "पप्पा येता का जरा? सईच्या मैत्रिणीचे बाबा आले आहेत". एक तर अहो-जाहो आणि त्यात "पप्पा" हे संबोधन ऐकून मला वाटलं की त्या बाईंचे वडील भारतातून आले आहेत पण बघतो तर तिचा नवराच खोलीतून बाहेर आला! Proud मग जरा गप्पा झाल्यावर तो म्हणाला "आई, जरा चहा कर ना!" Proud तेव्हा कळलं की खानदानी पद्धत दिसते आहे Proud

माझ्या ओळखीच्या फॅमिलीत म्हणतात मम्मा डॅडी ते कपल एकमेकांना (एक मुलगी कॉलेजात, एक नोकरी)
माझा काही हा पीव्ह नाही, म्हणेना का? पण डॅडी शब्दाचा अर्थ हल्ली वाह्यात झाला आहे ना Wink दरवेळी ती म्हटली की हसूच येतं.

बरीच लघुरुपं माहीती नव्हती. मी स्कूलग्रुपवर एकदा हा का ना का वापरलं, सर्व अवाक, समजेना कोणाला काही, तेव्हा माझ्या लक्षात आलं, हे मायबोली नाहीये आणि इथलं कोणीही मायबोलीवर नाहीये, मग नीट लिहीलं. असं अवधान ठेवावं लागतं. नाहीतर हा का ना का करताना, हाकलवून लावतील आपल्याला शाळा सवंगडी. बाकी बरीच लघुरुपं अजूनही माहीती नाहीयेत.

कुत्र्याची काकू, मावशी वाचून जाम हसायला आलं मात्र.

Pages