लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि त्यात "याचा वेगळ्या पद्धतीने अर्थ काढणे योग्य नाही" असंही म्हटलंय.>>>मी तेच तर म्हणतोय. Lol

देवा... Happy

Submitted by कुमार१ on 2 December, 2024 - 09:20 >>>>>>>> खतरनाक Rofl

मनोरंजनाचा अविरत कोसळणारा धबधबा - टिचन किप्स !

7487e0f4-1faf-4385-8f88-3e31e41073d2.jpeg

मी रोज चदाम खातो, त्याची पारीक पावडर मात्र करत नाही. मला यांचेयाएवढे हुष्यार होण्णासाठी अजून काय्य कर्रावे लागेल ? सुचवा प्लीज.

अनिंद्य , १/४ चाटी corn flour किँवा १/२ नाम ओव्हन मध्ये ठेवून त्यात सचे दुध घालून पाहा काही उपयोग होतोय का Proud

बेसन लाडू करताना त्याला वेसण घालून भाजावे

ठेल्यावरील पदार्थ ठेलकट असतात.>>>>हे वरोवर आहे

मी रोज चदाम खातो, त्याची पारीक पावडर मात्र करत नाही.>>>>असे नका करू ती पश्याला चिकटेल. सिऱ्यात टाकून खा.

आज खूप दिवसांनी दैनिक सकाळ बघितला. पहिल्या पानावरच्या बातमीने मथळा, अर्थहीन वाक्ये, चुकीचे शब्द, व्याकरण आणि पूर्णविराम / स्वल्पविराम यांची गल्लत असा सर्वच बाबतीत कहर केलाय.

मनोरंजन झाले, तुम्हीपण हसून घ्या.
7b2df15f-b4ce-41a6-afaa-0518c852a45e.jpeg

***

5fdd581c-fda5-4a50-8c06-6eea82e829ca.jpeg

***

ca926f79-49a0-4079-a7a7-3519b61211d2.jpeg

मराठीत धोका म्हणजे डेंजर … हे विसरायला होते कधीकधी.

But Nothing beats अर्जनुना Lol
आणि “शुखबुऐं” अगदी टिचन किप्स चे भावंड !

Pages